व्हीएस न्यूज - पुण्याच्या कल्याणीनगर भागात उभारल्या गेलेल्या ट्रम्प टॉवर या अलिशान इमारतींचे उद्घाटन ट्रम्प व्यवसायाचे प्रमुख ज्युनिअर डोनाल्ड ट्रम्प याच्या हस्ते पुण्यात पार पडले. पंचशील डेव्हलपर याच्या भागीदारीत या दोन इमारती बांधल्या गेल्या असून येथे ऋषीकपूर पासुन कतरिना कैफ पर्यंत अनेक सेलेब्रिटीजच्या सदनिका आहेत असे समजते. देशातला हा दुसरा इको फ्रेंडली २३ मजली टॉवर असल्याचे पंचशीलचे अतुल चोरडिया यांनी सांगितले. येथील सदनिकांची किंमत १५ कोटींपासून आहे व अमेरिका, इंग्लंड येथील ट्रम्प टॉवर्सपेक्षा या इमारती अधिक चांगल्या बांधल्या गेल्याचे ते म्हणाले.
या दोन्ही टॉवर्स मधील बहुतेक सदनिका विकल्या गेल्या आहेत. टॉवर बी मधील सदनिका ग्राहकांना ट्रम्प ज्युनिअर याच्या हस्ते टोकन ऑफ अॅप्रिसिएशन देण्यात आले. येथील सदनिका ६१०० चौरस फुटांच्या आहेत आणि आधुनिक फिटनेस सेंटर, स्विमिंग पूल, बायोमेट्रिक कार्ड प्रवेश, वल्डक्लास स्पा, १३५०० चौरस फुटांचे कलादालन, वल्डक्लास सिक्युरिटी सिस्टीम अश्या सुविधा आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002