व्हीएस न्यूज - द. आफ्रिकेविरुद्ध तिसरा टी २० सामना खेळून टीम इंडिया स्वदेशी परतत आहे. या नंतर मार्च मध्ये श्रीलंकेत त्यांच्या ७० व्या स्वतंत्रदिनाच्या निमित्ताने तिरंगी ती २० सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या कप्तान विराट कोहली, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुम्रराह यांना विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याचे वृत्त आहे. रोहित शर्मा कडे या सामन्यांचे नेतृत्व सोपविले जाईल असेही सांगितले जात आहे.
रोहितने नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात टी२० व वन डे मध्ये भारताचे नेतृत्व केले होते. विराट ऐवजी टीम इंडियात मयंक अग्रवाल याला संधी दिली जाईल असे समजते. रोहितला टी२० सामन्यात कप्तानपदाचा चांगला अनुभव आहे कारण त्याने आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तीन वेळा आयपीएल जिंकली आहे. श्रीलंकेत होत असलेल्या या तिरंगी लढतीत श्रीलंका, भारत व बांग्ला देशाचे संघ खेळणार आहेत.