व्हीएस न्यूज - मराठी असोसिएशन पर्थ तर्फे ऑस्ट्रेलियामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. काही तांत्रिक अडचणीमुळे हा सोहळा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी अनेक भारतीय नागरिक, तसेच स्थानिक विदेशी नागरिकांनी देखील आवर्जून उपस्थिती लावून छत्रपती शिवरायांप्रती आदर व्यक्त केला. यावेळी शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन, बालशिवाजींचा पाळणा, शिवाजीमहाराजांचे आचार व विचार, त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, जिजाऊंचे संस्कार यांसारख्या विषयावर छान माहीती, मराठी अस्मितेवरील समुहगान, लहान मुलांचा पारंपरिक वेशभूषा, शिवकालीन ऐतिहासिक प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवराय व जिजाऊंच्या वेशातले बालचमू शोभून दिसते होते.
असोसिएशनच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर अयोजित करीत परदेशात मराठी अस्मितेचा आदर्श निर्माण केला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सदर उपक्रम चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरत आहे. यावेळी असोसिएशनचे कमिटी मेंबर व इतर सभासद उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002