व्हीएस न्यूज - होळी खेळताना एकमेकांना रंगांचे फुगे मारताना स्कूलबसमधून तोल जाऊन एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास वडमुखवाडी येथे घडली. बस चालकाने हलगर्जीपणा केल्यामुळे त्याला दिघी पोलीसांनी अटक केली आहे.
राज सतीश कांबळे (वय 14, रा. साई निकेतन, लक्ष्मीनारायण नगर, वडमुखवाडी, चऱ्होली) असे बसमधून पडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. बबन जालींदर विटेकर (वय-41, रा. काटेवस्ती, चोवीसावाड) असे अटक केलेल्या स्कूल बस चालकाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर स्कूलबस चालक विटेकर मुलांना घरी सोडविण्यास जात होता. मुले बसमध्येच होळी खेळण्यात मग्न होते. मित्रांना रंग लावण्याच्या नादात राजचा तोल गेल्याने तो बसमधून खाली पडला. बसचे पाठीमागील चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बस चालकाने हलगर्जीपणा केल्यामुळेच ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त करून दिघी पोलीसांनी बस चालकाला अटक केली आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002