व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणुक गुप्त मतदानाने व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे उमेदवार नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणुक येत्या ७ तारखेला होणार आहे. भाजपकडून राहुल जाधव आणि शितल शिंदे यांना डावलून आमदार लक्ष्मण जगताप समर्थक ममता गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या सदस्यामध्ये अस्वस्थता पसरली अाहे. त्याचाच फायदा घेत राष्ट्रवादीकडून मोरेश्वर भोंडवे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भोंडवे यांना शिवसेनेने पाठींबा दर्शविला आहे. तसेच भाजपातील नाराज सदस्यांची मते मिळू शकतात असा विश्वास भोंडवे यांना आहे. त्यामुळेच स्थायीच्या अध्यक्षपदाची निवडणुक गुप्त मतदानाने व्हावे अशी मागणी मोरेश्वर भोंडवे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान ही निवडणुक गुप्त मतदानाने झाल्यास चांगलाच घोडेबाजार होणार असल्याची चर्चा आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002