व्हीएस न्यूज - पुणे येथून लोणावळ्याला मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्यासाठी आलेल्या विद्यार्थी तरुणाचा वाढदिवसाच्याच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यातील वळवण कॉलेज समोर घडली.
शुभम नानूराम सुखवाल (वय-22, सध्या रा. वडगाव धायरी, पुणे, मूळ राज्यस्थान ) असे अपघातात मृत्यू झालेल्या मृताचे नाव आहे. शुभम हा पुण्यातील वडगाव धायरी येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभमचा रविवारी वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी शुभम आणि त्याचे इतर पाच मित्र त्यांच्या मोटारसायकलने पुण्याहून सकाळी पावणेदहाच्या सुमारास लोणावळ्याकडे निघाले होते. शुभम हा त्याच्या पल्सर मोटारसायकलने येत होता. त्याचे लोणावळ्यातील वळवण कॉलेजसमोर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी मार्गालगतच्या सिमेंट पुलाच्या खांबाला जोरात धडकली. यात त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास युवराज बनसोडे करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002