आता माहिती अधिकार अर्जासाठी मोजावे लागणार ५० रुपये
नवी दिल्ली
2018-03-21
व्हीएस न्यूज –आता जास्तीत जास्त ५० रुपये शुल्क माहिती अधिकाराखाली अर्ज करायचा असेल तर लागेल. तसेच प्रति पान ५ रुपये कागदपत्रांच्या फोटोकॉपीसाठी आकारले जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
उच्च न्यायालय, विधानसभा, विधानपरिषद, तसेच इतर सरकारी आणि आरटीआय कायद्यांतर्गत येणाऱ्या सर्व स्वायत्त संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश लागू असणार असून हा आदेश न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या खंडपीठाने दिला आहे. विविध उच्च न्यायालये आणि छत्तीसगड विधानसभेसह काही संस्थांच्या आरटीआयसंदर्भातील नियमांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर हा आदेश देण्यात आला आहे. काही संस्था आरटीआय अर्जासाठी आणि फोटोकॉपींसाठी मोठे शुल्क आकारत होत्या. न्यायालयात ‘कॉमन कॉज’ या एनजीओने एक याचिका दाखल केली होती. यात, अर्जदारांना माहिती कळू नये म्हणून आरटीआय अर्जांसाठी मोठे शुल्क घेऊन त्यांना निराश केले जाते, असे म्हटले होते. केंद्र सरकारच्या नियमानुसार आरटीआय अर्जासाठी केवळ १० रुपये शुल्क आहे. तर तर कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसाठी केवळ २ रुपये एवढेच शुल्क आहे.