व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्या राम जन्मभूमी वादावर एका मुलाखतीदरम्यान महत्वाचा खुलासा केला आहे. राम मंदिराचा तिढा चंद्रशेखर सरकारच्या काळात सुटण्याच्या मार्गावर होता. मात्र, काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार कोसळल्याने हा प्रश्न मागे पडला असे पवार यांनी सांगितले.
अयोध्या राम जन्मभूमी वादावर तोडगा काढण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एक समिती गठीत केली होती. या समितीत शरद पवार यांच्यासह राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांचा समावेश होता. या दोघांवर दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या चर्चेदरम्यान मंदिराकरता ६०-६५ टक्के तर मशिदीकरता ३५-४० टक्के जागा देण्याचे निश्चित करण्यात आले होते. या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली होती. हा वाद जवळपास सुटण्याच्या मार्गावर होता. दरम्यान, याच काळात केंद्रात राजकीय अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली. काँग्रेसने चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार कोसळले. त्यामुळे अयोध्या राम जन्मभूमी वादाचा प्रश्न मागे पडला.
डिसेंबरमध्ये होणार अंतिम सुनावणी-
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात या वादासंदर्भातील याचिकांची एकत्रित सुनावणी सुरू होणार आहे. आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी अयोध्या रामजन्मभूमी वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याचे संकेत नुकतेच दिले आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002