व्हीएस न्यूज - बेकायदेशीर रित्या तलवारी बाळगणाऱ्या अनिल शिंदे नामक इसमाला सुपा पोलीसांनी अटक केली आहे.सूपा पोलिसांनी अनिल शिंदे कडून दोन तलवारी बारामद करून त्याच्यावर गुन्हे क्र - १२//२१०८ भारतीय हत्यार अधिनियम ४/२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
दिनांक १९/०५/२०१८ रोजी सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना विठ्ठल नगर सुपा येथे अनिल शिंदे हा विनापरवाना हत्यार बाळगत असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता त्वरित सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या शिंदेला जागीच अटक करण्यात आली.आरोपीच्या घराची झडती घेताना घरातून २५ इंच आणि २२ इंच लांब व धार असलेल्या दोन तलवारी जप्त करण्यात आल्या .
सादर कारवाई रंजनकुमार शर्मा पोलीस अधिक्षक अहमदनगर , घनश्याम पाटील अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर, अक्षय शिंदे सह. पोलीस अधिक्षक अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पो.हे.कॉ. बबन मखरे, पो.ना.खंडेराव शिंदे , पो.कॉ.यशवंत ठोंबरे , बाळू चाबुकस्वार, सुरेश मुसळे,म. पो.ना. शबाना तांबोळी यांनी केली.