व्हीएस न्युज - शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत मटण शॉप दुकानातील २२ बकऱ्या आणि २ बोकडांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत ५ दुकान जळून खाक झाली आहेत. ही घटना रविवारी पहाटेच्या ५ च्या सुमारास मोरवाडी लाल टोपीनगर येथे घडली.
या आगीत एकूण ७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या विभागाने दिली आहे. मोरवाडी लाल टोपीनगर येथे पहाटे ५ च्या सुमारास मारुती टायर दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली, आगीने रोद्ररूप धारण करत शेजारी असलेल्या शानदार मटण शॉप या दुकानाला देखील आगीने घेरले.या दुकाना मधील २२ बकऱ्या आणि २ पाळलेल्या बोकडांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शानदार मटण शॉप मालक आणि मारुती टायर विक्री करणाऱ्या दुकानदाराचे ७ लाखांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देताच घटनास्थळी भोसरी, संत तुकाराम नगर, चिखली, प्राधिकरण येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश आले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002