व्हीएस न्यूज - भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयी सलामी दिली. टी-२० सामन्यातील न्यूझीलंडविरुद्धने भारताने मिळवलेला हा पहिला विजय आहे. भारताने न्यूझीलंडचा पराभव केल्यामुळे आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत पाकिस्तानला फायदा झाला. आयसीसीने नुकत्याच जारी केलेल्या क्रमावरीत १२४ गुणांसह पाकिस्तान अव्वलस्थानी पोहोचला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दिल्लीत रंगलेल्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. मात्र, भारताकडून ५३ धावांनी मिळालेल्या पराभवामुळे न्यूझीलंडची क्रमवारीत घसरण झाली. आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत न्यूझीलंड १२१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्यानंतर वेस्टइंडिज (१२०), इंग्लंड (११९), तर भारत (११८) यांचा क्रमांक लागतो.
आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका अनुक्रमे सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर नवव्या क्रमांकावर अफगाणिस्तान आणि दहाव्या क्रमांकावर बांगलादेशला स्थान मिळाले आहे. या क्रमवारीत भारतीय संघ जरी पाचव्या स्थानावर असला तरी वैयक्तिक कामगिरीमध्ये भारतीय खेळाडूंनी लक्ष वेधले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली अव्वलस्थानी आहे. तर गोलंदाजीमध्ये जसप्रित बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील आणखी दोन सामने होणार आहेत. या सामन्यात कामगिरीमध्ये सातत्य राखून क्रमवारीत सुधारणा करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. तर आयसीसी क्रमवारीत आणखी घसरण होऊ नये,यासाठी न्यूझीलंडचा संघ प्रयत्नशील असेल. शनिवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात दोन्ही संघ पुन्हा मैदानात उतरणार आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002