इराण- इराक सीमेला भूकंपाचा धक्का ; २०७ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली
2017-11-13
व्हीएस न्यूज - इराण-इराक सीमेवर भूकंपाच्या तीव्र धक्क्याने सुमारे २०७ लोकांचा मृत्यू तर सुमारे १७०० हून अधिक जण जखमी झाले. भूकंपाचा हा धक्का ७.३ रिश्टर स्केलचा असल्याचे सांगण्यात येते. रविवारी रात्री ९.१८ च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू इराकमधील हलब्जापासून ३२ किमी अंतरावर असल्याचे अमेरिकेच्या भूगर्भतज्ज्ञांनी सांगितले. भूकंपामुळे इराणमधील अनेक ठिकाणी वीज गेल्यामुळे मदतकार्यात मोठी अडचण येत होती.
इराणमधील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार देशातील १४ राज्यांना भूकंपाचा धक्का जाणवला. या सर्व राज्यांमध्ये सोमवारी शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. इराणला यापूर्वी २००३ मध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता. यामध्ये सुमारे २६ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. भूकंपामुळे वित्तहानीची माहिती समजू शकलेली नाही.