व्हीएस न्यूज - मंगळावर जाण्यासाठी भारतातील १.३ लाख उत्साही व्यक्तींनी नासाकडे मंगळावरील मोहिमेसाठी नावे नोंदवली आहेत. नासाने पुढील वर्षी मंगळावर जाण्यासाठी एक मोहीम आखली आहे. अर्थात, या लोकांना प्रत्यक्षात मंगळावर जाता येणार नाही तर त्या मोहिमेचा बोìडग पास त्यांना दिला जाणार असून, त्यांनी नावे कोरलेली एक पाटी इनसाइट यानाबरोबर पाठवली जाणार आहे. इनसाइट म्हणजे इंटिरिअर एक्स्प्लोरेशन युजिंग सिसमिक इन्व्हेस्टिगेशन, जिओडेसी अँड हीट ट्रान्सपोर्ट असे यानाचे पूर्ण नाव आहे.
ज्यांनी नासाकडे नावे नोंदवली आहेत त्यांना ऑनलाइन बोìडग पास दिले जाणार आहेत. त्यांची नावे सिलिकॉनच्या पातळ पट्टीवर कोरली जातील, त्यासाठी इलेक्ट्रॉन शलाकेचा वापर केला जाईल, त्यामुळे अक्षरे मानवी केसाच्या व्यासाच्या एकहजारांश इतक्या लहान आकारात उमटतील, त्यामुळे लहान पट्टीवर एवढी १.३ लाख नावे बसवली जातील. नावांची ही पाटी इनसाइट लँडर यानाच्या डेकवर लावली जाईल व ती नंतर मंगळावर कायम राहील. इनसाइट यान ५ मे रोजी मंगळाकडे झेपावणार असून, मंगळ मोहीम नावनोंदणीसाठी भारतीयांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. एकूण जगातून २४२९८०७ जणांनी नावे नोंदवली आहे. त्यात १,३८,८९९ लोक भारतीय आहेत.
मंगळाने आतापर्यंत उत्साही लोकाना नेहमीच भुरळ घातली आहे, असे इनसाइट मोहिमेचे मुख्य संशोधक ब्रुस बँडर्ट यांनी सांगितले. मंगळाचे संशोधन करणाऱ्या मोहिमेचा भाग बनण्याची संधी यामुळे लोकांना मिळाली आहे असे त्यांनी स्पष्ट केले. तुमची नावे मंगळावर पाठवा या मोहिमेत आम्ही पूर्वीसारखीच लोकांचा सहभाग वाढवण्याची युक्ती वापरली आहे. यातून लोकांना या मोहिमेबाबत उत्सुकता राहील व नासाचे कामही लोकांपर्यंत पोहोचेल असे नासाच्या जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेचे अँड्रय़ू गुड यांनी सांगितले. या मोहिमेसाठी नावे पाठवण्याची मुदत गेल्या आठवडय़ात संपली आहे. नाव नोंदवलेल्या लोकांनी त्यांचे मंगळाच्या मोहिमेचे बोìडग पास समाजमाध्यमांवर टाकले आहेत. यात मंगळ मोहिमेचे एकूण अंतर दिले आहे.
‘इनसाइट’ भूकंपलहरी शोधणार…
इनसाइट हे यान पुढील वर्षी २६ नोव्हेंबरला मंगळावर उतरणार आहे. मंगळाच्या पृष्ठभागाचा सखोल अभ्यास करणारी ही पहिलीच मोहीम असून, त्यात मंगळकंपचा (पृथ्वीवर भूकंप तसा मंगळावर मंगळकंप) कानोसा घेतला जाईल. मंगळावरील भूकंपलहरी या भूगर्भीय पदार्थातून वेगवेगळय़ा वेगाने प्रवास करतात व त्यातून वैज्ञानिकांना मंगळ ग्रहाच्या रचनेचा उलगडा होणार आहे. इनसाइट यानाचा उद्देश केवळ मंगळाचा अभ्यास करणे हा नसून,खडकाळ ग्रहांचा अभ्यास करणे हाही आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002