कॉंग्रेसच्या वीणा हेमंत सोनवणे यांचे नगराध्यक्षपद कायम
जेजुरी
2017-12-01
सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
कॉंग्रेसच्या वीणा हेमंत सोनवणे पुढील चार वर्ष पाहणार कारभार
व्हीएस न्यूज - डिसेंबर २०१६ मध्ये जेजुरी नगरपालिकेमध्ये थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती.त्यामध्ये नगराध्यक्ष पद हे ओ.बी.सी महिला प्रवर्गासाठी राखीव होते.या निवडणुकीत कॉंग्रेसच्या विना सोनवणे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मीनल बारभाई यांच्यामध्ये मुख्य स्पर्धा होती.यामध्ये कॉंग्रेसच्या वीणा हेमंत सोनवणे या विजयी झाल्या होत्या.परंतु निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मीनल बारभाई यांनी अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीकडे अपील केले होते.वीणा सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र वैध नाही असा आक्षेप घेतला होता . जून २०१७ मध्ये अहमदनगर जात पडताळणी समितीने त्यांची कागदपत्रे पाहिल्यानंतर त्या कुलवंत वाणी आहेत असे निदर्शनात आणून देत त्यांचे नगराध्यक्ष पद रद्द केले होते.त्याविरुद्ध नगराध्यक्षा विना सोनवणे यांनी बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर अपील केले होते .हायकोर्टाने अहमदनगर जात पडताळणी समितीचा निर्णय योग्य ठरविला होता.वीणा सोनवणे यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये हायकोर्टाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील केले होते.दि.२९ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने वीणा सोनवणे यांचे बाजूने निर्णय दिला असून त्याची जात वाणी आहे असे स्पष्ट केले . पंजोबा आणि आजोबा यांची जात वाणी आहे त्या संबंधीचे पुरावे देऊन स्पष्ट केले. जरी वीणा सोनवणे यांच्या वडिलांनी कुलवंत वाणी अशी जात लावली असली तरीही ती जात ग्राह्य धरली जाणार नाही.जी आजोबा व पंजोबाची जात आहे आणि जे पुरावे १९४७ च्या अगोदरचे आहेत तेच पुरावे ग्राह्य धरले जातील असे स्पष्ट केले.आणि सांगितले की जात ही बदलता येत नाही आणि आजोबा पंजोबा यांनी जी जात नमूद केलेली आहे तीच जात वीणा हेमंत सोनवणे यांची राहील असा निर्णय दिला. त्यामुळे १९४७ चे वीणा सोनवणे यांचे पुरावे ग्राह्य धरले गेले. त्यामुळे बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल सुप्रीम कोर्टाने रद्द केला व वीणा हेमंत सोनवणे यांना नगराध्यक्ष पद पुन्हा बहाल केले.या निर्णयामुळे येत्या १३ डिसेंबर रोजी होणारी पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे.