व्हीएस न्यूज - दिवसभर शहरातील विविध चौकात फुगे, खेळणी, टिश्यु पेपरसह आदी साहित्य विकणारे परंतु, रात्री बंद फ्लॅट हेरून चोऱ्या करणाऱ्या दोघांना सांगवी पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सोने, चांदी व एक दुचाकी असा पावणे चार लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
जम्बो ऊर्फ गणेश रमेश काळे (वय-20), प्रितेश संगु काळे (वय-31, रा. चतृश्रुंगी पुल्लाखाली, पुणे) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
सांगवी पोलीस परिसरात रात्री गस्त घालत असताना संशयावरून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता सहा गुन्हे उघडकीस आले. दोन्ही आरोपी शहरातील विविध भागातमधील चौकात दिवसभर शहरातील विविध चौकात फुगे, खेळणी, टिश्यु पेपर, मोटार पुसण्याचे कापड यासह आदी साहित्य विकण्याचा व्यवसाय करतात. तसेच रात्री बंद फ्लॅट हेरून चोऱ्या करण्याचा उद्योग करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यांच्याकडून 123. 5 ग्रॅम सोन्याचे दागिने, 85.100 ग्रॅम चांदीचे दागिने एक दुचाकी असा तीन लाख 85 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला.
ही कारवाई सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली बलभिम ननवरे, देवेंद्र शिंदे, पोलीस हवालदार बोकड, कोंथिबीरे आदींच्या पथकाने केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002