व्हीएस न्यूज - गुजरातमध्ये सत्तेचे स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनाच पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ‘ऑफर’ दिल्याचा दावा जशोदाबेन यांच्या एका नातेवाइकाने केला आहे. मात्र काँग्रेसने दिलेली ‘ऑफर’ जशोदाबेन यांनी नम्रपणे नाकारली, असेही त्यांनी सांगितले.
गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सर्वच नेते जीव ओतून प्रचार करत आहेत. भाजपनेही सत्ता राखण्यासाठी निवडणूक प्रचारात दिग्गज नेते उतरवले आहेत. काँग्रेसने थेट मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनाच पक्षाकडून निवडणूक लढवण्याबाबत विनंती केली. मात्र त्यांनी नकार कळवला, असे जशोदाबेन यांच्या नातेवाईकाने सांगितले.
दरम्यान, जशोदाबेन बुधवारी अलवर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यांनी मुलींचे शिक्षण आणि महिला सशक्तिकरण आदी मुद्यावर उपस्थितांना संबोधित केले. ‘गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप १३० हून अधिक जागा जिंकेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘तुमचे आयुष्य देशासाठी समर्पित करा, असे जशोदाबेन यांनी मोदींना सांगितले आहे. मोदी हे महिलांचा आदर करतात. ते कधीतरी परततील, असे जशोदाबेन यांना वाटते,त्यासाठी त्या प्रार्थना करतात,’ असे त्यांचे बंधू अशोक यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002