पांगरीच्या वैद्यनाथ कारखान्यात रसाची टाकी फुटली; ९ जण भाजले
परळी
2017-12-09
अतिगंभीर ५ कर्मचाऱ्यांना हलवले लातूरला
व्हीएस न्युज - परळी तालुक्यातील पांगरी साखर कारखान्यातील रसाची टाकी फुटून ९ जण गंभीर भाजले आहेत. यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे . शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हि दुर्घटना घडली. नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक रसाच्या टाकी फुटली आणि टाकीच्या खालच्या भागातून मोठ्या प्रमाणात उकळता रस बाहेर फेकला गेला. या टाकीत नेहमी १२० डिग्री सेल्सिअस तपमानावर उकळता रस असतो. हा रस अंगावर पडल्याने येथे काम करणारे तंत्रज्ञ आणि कामगार असे ९ जण गंभीर रित्या भाजले. जखमींना तातडीने परळी आणि अंबाजोगाई येथील रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. यातील बरेचसे कर्मचारी हे पांगरी परिसरातील आहेत. ज्या पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले.