व्हीएस न्यूज - देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (SBI) आपल्या सुमारे १३०० शाखांची नावे आणि IFSC कोड बदलले आहेत. स्टेट बँकेच्या सर्व सहयोगी बँकांचे विलिनीकरण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळूरू,चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि लखनऊ या शहरांमधील बहुतांश बँकेच्या शाखांच्या नावात हे बदल करण्यात आले आहेत. फस्टपोस्टने याबाबत वृत्त दिले आहे.
यासंदर्भात स्टेट बँकेचे प्रबंध निदेशक (डिजिटल बँकिंग) प्रवीण गुप्ता यांनी सांगितले, आमच्या काही जुन्या सहयोगी बँकांच्या शाखांचे भारतीय स्टेट बँकेत विलिनिकरण करण्यात आले आहे. हे विलिनिकरण झाल्याने त्यांच्या IFSC कोडमध्ये देखील बदल झाले आहेत.
गुप्ता पुढे म्हणाले, बँकेच्या ग्राहकांना कोड बदलल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर अंतर्गत व्यवहारांसाठी देखील बँकांना नव्या कोडसोबत जोडण्यात आले आहे. त्यामुळे जर कोणी जुना IFSC कोड वापरुन व्यवहार केला तर तो नव्या कोडमध्ये समाविष्ट होऊन जाईल. यामुळे ग्राहकांना कोणतीही अडचण होणार नाही.
दरम्यान, एसबीआयने गेल्या महिन्यांत गृहकर्ज आणि ऑटो कर्जावरील व्याज दरांमध्ये कपात केली होती. गृहकर्जात ०.०५ टक्के कपात केली असल्याने ते आता ८.३० टक्के झाले आहे. तर दुसरीकडे ऑटो कर्जासाठी ग्राहकांना ८.७५ टक्के व्याजदर लागू असणार आहेत. पूर्वी ऑटो कर्जाचे दर ८.७० इतके होते. नवे दर नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002