व्हीएसन्यूज - नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भटके विमुक्तांच्या प्रशनासह आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आनण्यासाठी शासनाने राज्यपातळीवर पारधी विकास आराखडा तयार करुण त्याची अंबलबजावणी करावी यासाठी महाराष्ट्रातील समता आदोलनाच्या वतीने विविध संस्था संघटनांच्या १४ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्रातील वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर खर्डा येथिल नितीन आगे प्रकरणात शासनाने विशेष लक्ष घालुन शासनाने नितीनला न्याय मिळावा यासाठी तज्ञांची समिती नेमावी,खटल्याची रीट्रायल घेण्यात यावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
सदरील धरणे आंदोलनात संपूर्ण महराष्ट्रातून लोक येणार आहेत या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहण लोकअधिकार आदोलन,ग्रामीण विकास केंद्र,वंचित विकास संस्था यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती लोकअधिकार आंदोलनाचे जिल्हासचिव प्रमोद काळे यांनी दीली.