व्हीएसन्यूज - जरात निवडणुकीमुळे दुर्लक्षित असलेल्या हिमाचल प्रदेशात भाजपने सत्तेच्या दिशेन वाटचाल केली आहे. 68 जागांच्या हिमाचल प्रदेश विधानसभेत भाजपने 40 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी काँग्रेस 20-21 जागांमध्ये अडखळताना दिसत आहे. दुपारपर्यंतचे कल पाहता, हिमाचलमध्ये भाजपच सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र असं असलं तरी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल पिछाडीवर आहेत.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017 मध्ये कोण बाजी मारणार, हे आज स्पष्ट होईल.
हिमाचल प्रदेशात 9 डिसेंबरला 68 जागांसाठी 74 टक्के मतदान झालं. काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्याचं आव्हान आहे. तर भाजप नेते प्रेम कुमार धुमल यांनी वीरभद्र सिंह यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लाव