व्हीएस न्यूज - पुणे महामेट्रोच्या ३१ किलोमीटर या मार्गाला केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. पुणे महामेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत राज्य सरकारने उचित निर्णय घ्यावे, असे पत्र केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्य सरकारला दिले आहे. मंत्री पुरी यांनी हे पत्र खासदार श्रीरंग बारणे यांना देखील पाठविले आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.
पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केली होती. मंत्री पुरी यांनी महापालिका सर्वाधिक आर्थिक सहभाग उचलण्यास तयार असेल तर पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाला तत्काळ मंजुरी दिली जाईल, असे सांगितले होते. मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारने संमती दर्शविली आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याबाबत राज्य सरकाराने उचित कारवाई करावी, असे पत्र त्यांनी राज्य सरकारला पाठविले आहे. त्यामुळे मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, ”केंद्र सरकारच्या वतीने पुणे महानगर क्षेत्रातील सार्वजनिक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील मेट्रो रेल्वे कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्ग क्र.१ स्वारगेट ते पिंपरीला मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्येच निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो सुरु व्हावी, ही पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची मागणी आहे. त्यानुसार निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत मी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यांना पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्याची विनंती केली होती”.
”पुणे महामेट्रोच्या ३१ किलोमीटर या मार्गाला केंद्र सरकारने सात डिसेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. पुणे महामेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत राज्य सरकारने उचित निर्णय घ्यावे, असे पत्र केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्य सरकारला दिले आहे. त्यामुळे मेट्रो निगडीपर्यंत नेण्याबाबतचा निर्णय आता राज्य सरकारच्या कोर्टात आहे”, असेही बारणे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती केली आहे. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या विचारात घेता. तसेच नागरिकांच्या मागणीचा विचार करुन पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या मार्गास राज्य सरकारने त्वरित मान्यता द्यावी. राज्यसरकारतर्फे आर्थिक मदत करुन महामेट्रोला निगडीपर्यंतच्या मेट्रोचा डीपीआर त्वरित तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे, असेही बारणे यांनी सांगितले.
बारणे म्हणाले, ”मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची शहरवासियांची मागणी आहे. त्याला केंद्र सरकारने त्वरित मान्यता दिली आहे. पिंपरीपर्यंत मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. त्याला राज्य सरकारने मान्यता द्यावी. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत आर्थिक सहकार्य करावे. काही आर्थिक भार पिंपरी चिंचवड पालिका पेलेल. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. चालू कामात निगडीपर्यंतचे देखील काम मार्गी लागेल. त्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा”.
व्हीएस न्यूज – महापालिकेच्या सर्व प्रभागातील नागरी प्रश्न व समस्या जलद गतीने मार्गी लावण्यासाठी सर्व प्रभाग स्तरावर विशेष बैठकांचे आयोजन करण्यात येत असल्याचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. तर बैठकीत पदाधिकारी नगरसदस्य, नगरसदस्या यांनी केलेल्या सुचनांचे पालन करण्याबाबत व प्रभागातील प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज अ प्रभागात आयोजीत करण्यात आलेल्या प्रभागस्तरीय विशेष बैठकीमध्ये ते बोलत होते.
अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य राजू मिसाळ, जावेद शेख, अमित गावडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, विशाल कांबळे, देवाण्णा गट्टूवार, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम.एम.शिंदे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे यासह प्रभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत पाणी पुरवठा, जलनि:सांरण, विद्युत पोल व एलईडी दिवे, अनधिकृत बांधकामे व नळ जोडणी, स्वच्छता, आरोग्य, घंटा गाडी, पाणी टँकर, भटकी कुत्री, हॉकर्स व हॉकर्सझोन, फुटपाथ व त्यावर लावण्यात येणारे ब्लॉक, महापौर निवास, वृक्ष गणना, पशु दफन भूमी, ड्रेनेज लाईन, ड्रेनेज चोकप, साठलेला कचरा, राडारोडा, भिकारी निवारा केंद्र, मोकळ्या जागेवर होणारे अतिक्रमण, आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, शहरातील सर्वभागात मुबलक पाणी पुरवठा होणे कामी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. प्रत्येक प्रभागात पाणी वितरणा कामी किमान एक टँकर उपलब्ध करुन देण्यात यावा. प्रभागात अनधिकृत बांधकामे व अनधिकृत नळ जोडनी होऊ नये याबाबत अधिकारी व नगरसदस्यांनी काळजी घ्यावी. प्रभाग स्वच्छतेबाबात आरोग्य विभागाने तर रस्त्यावरील राडारोडा उचलणे बाबत स्थापत्य विभागाने दक्षता घ्यावी. प्रभाग स्तरावरील बैठकीत मांडण्यात आलेले प्रश्न त्वरीत निकाली काढण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष बैठकांचे आयोजन सर्व प्रभागांमध्ये केले जाणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.
स्थायी समिती सभापती सिमा सावळे म्हणाल्या, शहरात वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक असून शहरातील पशु दफन भूमी सुस्थीतीत असणे गरजेचे आहे. तसेच शहरात नव्याने पशु दफन भूमी बांधणे आवश्यक आहे. शहरातील सर्व भागात समान पाणी पुरवठा होणे कामी तातडीने कार्यवाही करण्यात यावी असेही त्या यावेळी म्हणाल्या.
शहरात वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा शहरात बेगर शेल्टर योजना राबविण्यात यावी. तसेच प्रभागातील प्रलंबीत कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतच्या सुचना यावेळी उपमहपौर शैलजा मोरे यांनी केल्या.
अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे यांनी प्रभागातील आरोग्य प्रश्न गंभीर असून ड्रेनेजचे चोकअप तातडीने काढण्यात यावे. साठलेला कचरा व राडा रोडा तातडीने उचलण्यात यावा. चालु असणाऱ्या स्थापत्य विषयक कामाच्या ठिकाणी कामाची सुरुवात, मुदत व येणारा खर्च आदी बाबत वर्णन असणारा फलक लावण्यात यावा. प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा पदपथा वरील अतिक्रमणे काढण्यात यावीत. पालिकेच्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमण थांबवावे. प्रभागात सर्व ठिकाणी एलईडी दिवे लावण्यात यावेत, अशा सुचना केल्या. प्रभागातील पाईप लाईनसाठी खोदलेले खड्डे बुजवण्यात यावे, अपुर्ण ड्रेनेजचे काम पुर्ण करण्यात यावे. विद्यानगर मध्ये असलेल्या महापालिकेच्या सांस्कृतीक भवनांवर नियंत्रन असावे अशा सुचना नगरसदस्या अनुराधा गोरखे यांनी यावेळी केल्या.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002