Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडणारी पिंपरी चिंचवड मनपा बरखास्त करावी - सचिन साठे

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेत एक वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपाच्या पुढा-यांनी भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. मनपाची तिजोरी मोकळी करण्याचा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. करदात्या नागरीकांच्या पैशाची लूट आणि सावळा गोंधळ रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका बरखास्त करावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

पिंपरी (पुणे) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत साठे बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कडून पृथ्वीराज साठे, संग्राम तावडे,शानी नौशाद यांची प्रदेश सदस्य आणि भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत भिकाजी नेवाळे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब वामनराव साळुंके आणि चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम शंकर गुंजाळ यांची निवड झाल्याचे जाहिर केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, एन्‌एसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे आदी उपस्थित होते.

साठे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शहर कॉंग्रेस विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जनतेच्या वतीने पिंपरी चिंचवड मनपा बरखास्तीची मागणी आम्ही करणार आहोत. या बाबतचा निर्णय ताबडतोब घ्यावा व जनतेच्या पैशाची लूट थांबवावी. मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चौकशी समिती नेमण्याचा फार्स करु नये. कारण मुख्यमंत्री हे भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालतात हे वेळोवेळी सिध्द झाले आहे. मुख्यमंत्री हे ‘क्लीन चिटर’मुख्यमंत्री असल्याची टिका साठे यांनी केली. पिंपरी चिंचवड मनपात विरोधी पक्षाचे अस्तित्व नाही. शिवसेना चोरी झाली म्हणून विरोध करते का चोरीमध्ये वाटा मिळाला नाही म्हणून विरोध करते असा प्रश्न करदात्या नागरीकांना पडला आहे. त्यामुळे शिवसेनेचा विरोध संशयास्पद आहे. भाजपाचे केंद्रापासून मनपा पर्यंत बहुमत आहे. त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधींची व जनतेच्या भावनांशी अनादर करण्याची सवय झाली आहे. त्यामुळेच खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला. पिंपरी चिंचवड मनपात भाजपाचेच नगरसेवक प्रवेशव्दारासमोर फ्लेक्स फेकतात त्यांच्या नेत्यांचे आदेश पाळत नाहीत आणि त्यांचे नेते देखील अशा लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत. अनाधिकृत बांधकामांवरील कारवाई नुसता दिखावा आहे. विशालनगर, वाकड येथील दारुचे दुकान भाजपाशी संबंधित व्यक्तीचे असल्यामुळे त्यावर कारवाई केली जात नाही. तर सर्व सामान्य जनतेच्या घरावर हातोडा मारला जात आहे. त्यांच्या कारवाईच्या त्रासातून एका महिलेने आत्महत्या केली अशा किती महिलांना जीव गमवावा लागेल. पाणी पट्टीतील दरवाढ झाकण्यासाठी 6 हजार लिटीर मोफत पाणी प्रत्येक कुटूंबाला दिल्याचे भांडवल करतात. स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, शास्तीकर असे अनेक प्रश्न प्रलंबित असून वाकड मधील सीमा भिंतीत देखील यांनी भ्रष्टाचार केला. विकास कामांच्या निवीदा भरताना ठेकेदारांशी संगनमत करुन रिंग केली. याबाबत त्यांच्याच पक्षाचे खासदार प्रतिनिधी तक्रार करीत आहेत. मेट्रोचे ते भांडवल करतात. मेट्रोचा प्रकल्प आघाडी सरकारने मंजूर केला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्याची ही भाजपाची पध्दत जनतेला खाईत लोटणारी आहे. निवडणुकी पुर्वी कथीत भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करुन जनतेची दिशाभूल करुन सत्ता मिळविली. भ्रष्टाचा-यांना तुरुंगात पाठवू म्हणणा-यांनी त्यांनाच पक्षात घेतले. अशीही टिका सचिन साठे यांनी केली.

...Read More

V. S. News
आयसीबीच्या वतीने परंदवडीत क्रिकेट स्पर्धा

व्हीएस न्यूज - इंडीयन बिझनेस क्लबच्या (IBC)च्या वतीने पिंपरी चिंचवड मधील एमएसएमई (सुक्ष्म लघु मध्यम उद्योजक) उद्योजकांना व कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी लॉन टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी (पुणे) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत इंडीयन बिझनेस क्लबचे (आयबीसी) संस्थापक अध्यक्ष अनिल मित्तल यांनी माहिती दिली.

शनिवारी, रविवारी (दि. 10 ते 11 फेब्रुवारी) रोजी परंदवडी, उर्से (ता. मावळ) येथील वेदांन्त स्पोटर्स ॲकेडमीच्या क्रिडांगणावर या लॉन टेनिस क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड मधील एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. स्टिल केस, स्ट्राईकर्स, आयबीसी रॉयल, रवी ॲव्हेंजर्स, एडीयंट आर्या,जेसीबी लॉयन्स, जय भवानी वॉरीयर्स, रोहित रायझिंग स्टार्स, आणि वसंत जग्वार्स हे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उद्‌घाटन शनिवारी सकाळी 8वाजता आणि स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.

विजेत्या संघांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रायोजक वसंत ग्रुप, सह प्रायोजक के. मिंन्ट, आयव्हरी स्पेसेस आहेत. आयोजक केलक्टिव्ह मार्केटिंग ॲण्ड सर्व्हिसेस आणि धनलक्ष्मी इंटरप्राईजेस हे आहेत.

...Read More

V. S. News
महापालिका आणि शिव व्यापारी सेनेच्या वतीने भाटनगरमध्ये स्वच्छता मोहीम

व्हिएस न्युज - पिंपरीतील भाटनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासुन स्थानिक राजकिय पुढार्यांच्या अनास्थेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. येथील घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र शिवव्यापारी सेनेच्या आंदोलनामुळे आज या घाणीच्या साम्राज्यावर यशस्वी ‘सर्जिकल स्टाईक’ झाला असल्याची माहिती शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले यांनी दिली.

याबाबत युवराज दाखले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून भाटनगर परिसरात घाणीचे साम्राज्य होते. मात्र शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेनेने या समस्येला वाचा फोडण्यासाठी मोरवाडी चौकातील आहिल्यादेवी पुतळा येथे निदर्शने केली होती. या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली. सहाय्यक आयुक्त प्रमोद अष्टिकर यांनी तात्काळ दखल घेऊन आरोग्य निरिक्षकांना या ठिकाणी स्वच्छतेचे आदेश दिले. त्यानंतर आज भाटनगर येथील विद्युत पुरवठा खंडीत करून स्वच्छता मोहीम करण्यात आली. यावेळी दोन ट्रक कचरा उचलून नेण्यात आला. तसेच परिसरात औषध फवारणी देखील करण्यात आली.

या घाणीच्या साम्राज्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले व शिवव्यापारीसेना उपशहरप्रमुख गणेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या महिला शहर संघटिका भाग्यश्री मस्के,शिवसेना महिला विभागप्रमुख सारीका तामचिकर, शिवसैनिक दिपक कांबळे, मारूती म्हस्के, दत्ता गिरी, नवनाथ गारगुटे यांच्यासह शिवसैनिक व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते

...Read More

V. S. News
सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन घेऊन  डॉक्टरची आत्महत्या

व्हीएस न्यूज - सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन घेऊन एका डॉक्टरने आत्महत्या केली. ही धक्कदायक घटना गुरूवारी दुपारी मोशी येथे उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
महेश महादेव मोहिते (वय-27, रा. सेक्टर नं.4 संतनगर, मोशी) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. मोहिते यांचे भोसरीत जयहिंद नावाचे रूग्णालय आहे. त्यांची पत्नीही डॉक्टर आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारी यांनी माहिती दिली. डॉ. महेश यांनी बुधवारी रात्री घरात त्यांच्या बेडरूममध्ये सलाईनव्दारे विषारी इंजेक्शन घेतले. सकाळी 11 वाजल्यानंतर रूग्णालयात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या चुलत भावाने डॉ. महेश यांच्या मोबाईलवर गुरूवारी सकाळी फोन केला. त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ घरी आला. त्यांनी डॉ. महेश यांच्या बेडरूरमचा दरवाजा वाजविला. आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यावेळी डॉ. महेश यांच्या हाताला सलाईन लावले होते. बेशुद्ध अवस्थेतील महेश यांना खासगी संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. भोसरी, एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
कातळकडेचा खडतर तैलबेला किल्ला सर केलेल्या विद्यार्थ्यांचा  सत्कार

व्हीएस न्यूज - येथील 11 ते 15 वयोगटातील अमृता विद्यालयातील नऊ शाळकरी मुलींनी या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात चढाईसाठी कोणताही मार्ग नसलेला कातळकडेचा खडतर तैलबेला किल्ला सर केला व तेथे भारताचा तिरंग फडकवला. त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे महापालिकेतर्फे महापौर नितीन काळजे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती सीमा सावळे, अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टीकर, कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्या आशा धायगुडे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, कोमल मेवाणी, अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, नगरसेवक लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, अमित गावडे, बाळासाहेब ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मान करण्यात आलेल्यांमध्ये चेलूवी ढोकले, वैदही भोंगे, मानसी मगर, आकांक्षा पवार, श्रेया भदे, तानीक्षा पवार, वैष्णवी गवळी, मृणाल ठाकर, सई भालेघरे यांच्यासह मार्गदर्शक एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांचा समावेश होता.

...Read More

V. S. News
22 वर्षांपासून गरवारे नायलॉन कंपनीच्या कामगारांची परवड

व्हीएस न्यूज - पिंपरीतील गरवारे नायलॉन कंपनी बंद होऊन 22 वर्ष झाली. परंतू, या कामगारांना अद्यापही सेवा उपदान, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळाली नसल्यामुळे उतारवयात कामगारांची मोठी परवड होऊ लागली आहे. कंपनी मालकाने याप्रश्नी योग्य तो न्याय देण्याची मागणी कामगारांच्या वतीने करण्यात आली आहे.
गरवारे नायलॉनच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या न्याय हक्कासाठी गरवारे कामगार कृती समितीची स्थापना केली. या समितीच्या पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची गुरूवारी निगडी येथे एक बैठक पार पडली. समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय खैरे, उपाध्यक्षपदी मोरया बहिरट, सत्येन राव, कार्याध्यक्ष मुरलीधर चिन्हे, सेक्रटरी रमेश बोंद्रे, सह सेक्रटरी शिवाजी साळुंखे, खजिनदार उदय भागवत यांची निवड करण्यात आली. याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गरवारे नायलॉन कंपनी बंद होऊन 22 वर्ष झाली. कामगारांना अद्यापही सेवा उपदान, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळाली नाही. ही रक्कम मिळविण्यासाठी कृती समितीने न्यायालयात धाव घेतली आहे. कायदेशीर सल्लागार म्हणून अभिजीत देसाई यांची निवड करण्यात आली आहे. कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याच्या मागणीसाठी समितीचे पदाधिकारी शहरातील खासदार, आमदार, महापौर, पालिका आयुक्त आदींची भेट घेणार आहेत. तसेच कंपनीच्या जागेवर कोणाताही प्लॉन मंजुर करू नये, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष दत्तात्रय खैरे यांनी निवेदनाव्दारे सांगितले आहे.

...Read More

V. S. News
खेळाडू घडविण्यात शालेय प्रशिक्षकच महत्त्वाचा

व्हीएस न्यूज - आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचा खेळाडू घडविण्यात शालेय जीवनातील प्राथमिक प्रशिक्षक महत्त्वाचा असतो. त्यांच्यामुळेच खेळाडू स्पर्धेचे विविध स्तर पार करीत राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर चमकू शकतो, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी केले.
पिंपरी-चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय खेळाडू, गुणवंत क्रीडा शिक्षक, पत्रकार व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा निगडीतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या मनोहर वाढोकर सभागृह येथे नुकताच झाला. कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू शांताराम जाधव व शकुंतला खटावकर,ऑलिम्पिक मॅरेथॉन धावपटू बाळकृष्ण अकोटकर, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे, क्रीडा भारतीचे राज्य कार्यवाह राज चौधरी, निगडी केंद्राचे उपप्रमुख मनोज देवळेकर, शरद इनामदार आदी उपस्थित होते.
शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांना जीवनगौरव पुरस्कार, क्रीडा शिक्षक सचिन खांदवे, जगदीश सोनवणे, बन्सी आटवे, संपदा कुलकर्णी यांना गुणवंत क्रीडा शिक्षक आणि मिलिंद कांबळे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा परिषदेचे गुणंवत क्रीडा शिक्षक राजेंद्र महाजन, शबाना शेख, सुवर्णा घोलप यांचाही गौरव करण्यात आला. त्याचबरोबर विविध शाळा व महाविद्यालयांतील 90 राष्ट्रीय व राज्य खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
अंजली भागवत म्हणाल्या की, खेळात करिअर करताना आपले ध्येय निश्चित करा. राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय, ऑलिम्पिक, विश्व स्पर्धेत पदक जिंकण्याचे ध्येय समोर ठेवून शिस्त, सराव आणि जिद्दीने मार्गाक्रमण करा. मात्र, त्यासाठी शालेय वर्गाप्रमाणे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग पार करीत म्हणजे जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तर टप्प्या-टप्प्याने स्पर्धा स्तर पार करून खेळाडूंनी पुढे गेले पाहिजे. त्यानुसार प्रशिक्षकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्यांच्या शिवाय खेळाडूच कामगिरी करूच शकत नाही, असे त्या म्हणाल्या.
मोरे, अकोटकर, आटवे यांनी मनोगत व्यक्त केले. कविता आल्हाट व अशोक जाधव यांनी सुत्रसंचालन केले. संघटनेचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. सचिव अंगदराव गरड यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान सोनवणे, शेखर कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, सोपान खोसे, अनिल नाईकरे, अशोक अवारी, संजय देवरे, सुरेश मुळूक, ज्ञानेश्वरी लोखंडे, सुजाता चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.

...Read More

V. S. News
ज्येष्ठ महिलेची 75 हजारांची सोन्याची चैन हिसकावली 

व्हीएस न्यूज - पती समवेत फिरायला गेलेल्या ज्येष्ठ महिलेची दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी 75 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावली. ही घटना 23 जानेवारी रोजी वाकड येथे घडली.
महिलेच्या 43 वर्षीय सुनेने बुधवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिलेचे सासू-सासरे 23 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता फिरण्यास बाहेर गेले होते. माऊंट बेस्ट बिबांत सोसायटीजवळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 75 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारून तोडून नेली. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. आर. लोंढे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
दोन दुचाकीचोर गजाआड; चार दुचाकी जप्त   

व्हीएस न्यूज - दुचाकीचोर दोन सराईत गुन्हेगाराला गस्तीवरील पिंपरी पोलीस पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दीड लाख रूपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.
सतीश दादाराव लोंढे (वय-22, रा. अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळ, यशवंतनगर, पिंपरी), संतोष बबन लोंढे (वय-29, रा. दत्त मंदिराजवळ गुलाब पुष्प उद्यानासमोर गवळीमाथा, भोसरी) या दोघांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे फौजदार विठ्ठल बढे, बाळासाहेब अंतरकर यांच्यासह आदी पोलीस पथक डी. वाय पाटील महाविद्यालय परिसरात गस्त घालत होते. वेगाने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना थांबण्याची सुचना केली. दुचाकीस्वार तरूण थांबले नाहीत. पोलीसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता उडवा-उडवीचे उत्तरे देऊ लागले. पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीनी दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले. यासह आणखी दोन दुचाकी चोरल्याचे त्यांनी तपासात सांगितले. तर मंगळवारी एका अल्पवयीन दुचाकीचोराला ताब्यात घेवून त्यांच्याकडून एक दुचाकी जप्त केली. तिघांकडून एक लाख 40 हजार रूपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
गळफास घेवून वाहन चालकाची आत्महत्या

व्हीएस न्यूज - ओढ्याच्या कडेला असलेल्या शिवरीच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने एका वाहन चालकाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी पुनावळे येथे उघडकीस आली.
महादेव दत्तात्रय बारसकर (वय-45, रा. पुनावळे) असे आत्महत्या केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारसकर यांनी गुरूवारी सकाळी पुनावळे येथील ओढ्याच्या कडेला आले. त्यांनी शिवरीच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या मुलगा किरणने हा प्रकार पहिल्यानंतर त्यांना त्वरीत खाली उतरवत वायसीएम रग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यांच्य़ा आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
वाकड पोलीस तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांना स्थायीची मंजूरी

व्हीएस न्यूज - अमृत योजने अंतर्गत चिखली, पिंपळे निलख व बोपखेल येथे मैलाशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येणार आहेत. शहरातील जुन्या २०९ किलोमिटर ड्रेनेज लाईन बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या सुमारे १५६ कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील २०१८-२०१९ या वर्षासाठी करांचे व करेत्तर शुल्क निश्चित करण्यास अंतिम मान्यतेसाठी महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस स्थायी समिती सभेत करण्यात आली. यासह शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे २५७ कोटी ५३ लाख ९३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. शहरामध्ये ज्या मिळकतींना पाणी कनेक्शन नाही परंतु त्यांना स्वत्रंत कनेक्शन घेण्याच्या दृष्टीने महानगरपालिके मार्फत पाणीपुरवठा लाईन टाकणेत आलेली असते. निर्धारित तरतूदीनुसार त्याकरिता पाणी कनेक्शन नसणा-या मिळकतींना मिळकत करामध्ये पाणीपट्टी कर आकारणी करता येईल. त्या अनुषंगाने सन २०१८-२०१९ पासून पाणी कनेक्शन नसणा-या मिळकतींना मिळकत कराचे बिलात त्यांचे कर योग्य मूल्याचे ५% दराने पाणीपट्टी कर लागू करणेबाबत प्रस्तावित केले आहे. सन २०१८-१९ या वर्षाकरिता महानगरपालिका करांचे दर आणि करेत्तर बाबीची फी/शुल्क निश्चित करण्याचा व खाजगी मराठी माध्यामांच्या शाळा इमारतींना मालमत्ता कर हा बीगरनिवासी दराचे ऐवजी निवासी दराने आकारणी करणेस तसेच करयोग्यमूल्य निश्चित करणेकामी जे अ,ब,क,ड विभाग करणेत आलेले आहेत त्याची पुनर्रचना करण्यास मान्यता देणेकामी महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस यावेळी बैठकीत करण्यात आली.

रहाटणी येथे कोकणे चौक ते काळेवाडी फाटा चौकापर्यंत उच्चक्षमता दृतगती मार्ग HCMTR विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे २८ कोटी ४५ लाख ५१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २४ मध्ये नव्याने ताब्यात येणा-या आरक्षित जागेस सिमाभिंत बांधणे व उद्यान विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ५२ लाख ७० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पुनावळे प्रभाग क्रमांक ५२ आ.क्र.४-७१ येथे उद्यान विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ५४ लाख ०४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. च-होली येथील मैलाशुध्दीकरण केंद्राची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी येणा-या सुमारे २ कोटी ०७ लाख ०४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ७ च-होली येथील आ.क्र.२-६४ येथील उद्यानाची उर्वरित कामे करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ०८ लाख २२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी यांना इन्स्ट्रुमेंट मॅकेनिकल या व्यवसायाकरीता ट्रेनिंग वर्क बेंचेस खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ०५ लाख ०४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

थेरगाव सर्व्हे.न.०९ येथे बहुउद्देशीय इमारत बांधण्यासाठी येणा-या सुमारे ११ कोटी ८० लाख ८७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. जुन्या तालेरा हॉस्पिटलची इमारत पाडुन नविन इमारत बांधण्यासाठी येणा-या सुमारे ३९ कोटी १३ लाख ७० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१८ मध्ये चापेकर चौक ते केशवनगर काळेवाडी रस्त्यांच्या क्रॉक्रीटीकरणाचा दुसरा टप्पा विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे ११ कोटी ०७ लाख १६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ०५ जाधववाडी कुदळवाडी मधील ताब्यात आलेल्या आरक्षणांच्या जागा विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ४७ लाख ५२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.५३ वाकड मध्ये नव्याने ताब्यात येणा-या जागेनुसार विकास आराखड्यातील रस्ते विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी २६ लाख ०६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

...Read More

V. S. News
पिंपळे निलखमध्ये चौंधे पाटील स्पोर्टसच्या वतीने सोसायटी स्पोर्टस मिटचे आयोजन

व्हीएस न्यूज - पिंपळे निलख येथील चौंधे पाटील स्पोर्टसच्या वतीने तिस-या वार्षिक इंटर सोसायटी स्पोर्टस मिटचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन रविवारी (दि. 11 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका आरती चौंधे, ममता गायकवाड, नगरसेवक संदिप कस्पटे, तुषार कामठे, पीसीएमटीचे माजी चेअरमन सुरेश चौंधे आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संचालक संकेत चौंधे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

या इंटर सोसायटी स्पोर्टस मिट अंतर्गत क्रिकेट, फुटबॉल, स्केटिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन आणि लॉन टेनिसच्या स्पर्धा होणार आहेत. वयोगट मुले व मुली 10,13 व 16 वर्षांखालील सोसायटी संघाने सहभाग घ्यावा. तसेच पुढच्या रविवारी (दि. 25 फेब्रुवारी) राजी सकाळी 6वाजता सर्व वयोगटातील इच्छुकांसाठी 2,4 व 6 किलोमीटर खुल्या मॅरेथोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजता पिंपळे निलख येथील चौंधे पाटील स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे. या स्पर्धांमध्ये भाग घेऊ इच्छिना-या स्पर्धकांनी 9158961010 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!