व्हीएस न्यूज - पिंपरीतील थिसेनक्रुप इंडस्ट्रीजने प्रदूषण निर्मूलन आणि आरोग्यरक्षणाचा संदेश देण्यासाठी नुकतीच सायकल फेरी आयोजित केली होती. या फेरीत कंपनीचे कार्यकारी संचालक मलई दास, वित्तविभाग संचालक गिरीश केतकर, मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र नागेशकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र वाईंगडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कामगार सहभागी झाले होते. 12 किलोमीटर अंतराच्या या सायकल फेरीमध्ये 480 जणांनी भाग घेतला. त्यात महिला कर्माचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. ज्या कर्मचाऱ्यांकडे सायकल नाही अशा कर्मचाऱ्यांनी हे अंतर चालून पार केले....Read More
व्हीएस न्यूज - सध्या वस्तू व सेवा कर 5 ते 28 टक्क्यांच्या दरम्यान आहेत. भविष्यात हे कर 12 ते 18 टक्क्यांच्या दरम्यान निर्धारीत होतील. असे झाले तर देशांतर्गत मालाला मोठी जागतिक बाजारपेठ मिळू शकेल. परिणामी भारताची स्पर्धक क्षमता वाढून भारत जगातील विकसित देशांशी स्पर्धा करू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थ विश्लेषक डॉ. अभय टिळक यांनी केले. इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्यावतीने वस्तू व सेवा कर या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय या चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ अर्थविश्लेषक डॉ. टिळक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.डी. बाळसराफ, उपप्राचार्य डॉ. एस.के. मलघे, संयोजक डॉ. एस. एस. मेंगाळ, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. के.व्ही. अडसूळ, डॉ. एस.के. सानप आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अभय टिळक म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवा करप्रणाली (जीएसटी) अत्यंत महत्त्वाची आहे. विकसित देशांनी फार पूर्वीच वस्तू व सेवा करप्रणालीची अंमलबजावणी केली आहे. 13 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ही करप्रणाली विकसित झाली आहे. यामुळे भारतातील कोणत्याही राज्यात उत्पादित होणाऱ्या वस्तूची संपूर्ण भारतात एकच किंमत असेल. औद्योगिक विकेंद्रीकरणास मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. मागील 30 वर्षापासून चीनमध्ये मनुष्यबळ मुबलक प्रमाणात असल्यामुळे कामगार वर्ग कमी किमतीत उपलब्ध होत होता. त्यामुळे चीनी वस्तूंचा उत्पादन खर्च कमी होता. परिणामी जागतिक बाजारपेठेत चिनी वस्तूंच्या किमती कमी होत्या. चीनची अर्थव्यवस्था उत्पादनाभिमुख होती. मात्र, आता चिनी कामगार महाग होत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत चीनचे महत्त्व कमी होत चालले आहे. भारतीय अर्थव्यवस्था मात्र सेवाभिमुख आहे. डॉ. टिळक पुढे म्हणाले, शेती, शिक्षण, उद्योग, आरोग्य या संदर्भातील जबाबदाऱ्या संबंधित राज्याने पार पाडायच्या असतात. मात्र, राज्यांकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नसते. त्यामुळे राज्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागते. अशा पेचामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे मोठे आव्हान राज्यांपुढे असते. मात्र, वस्तू व सेवा करप्रणालीमुळे राज्यांना देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे साहजिकच राज्यांचा विकस साधला जाणार आहे. कृष्णराव भेगडे म्हणाले, देशातील एक टक्का लोकांकडे 73 टक्के संपत्ती आहे. ही आर्थिक विषमता दूर होण्यासाठी संपत्तीचे समान वाटप करण्याची गरज निर्माण झाली आहे. वरचेवर भारतातील बेरोजगारी वाढतच चालली आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. हे बदलण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे, असेही भेगडे यांनी सांगितले. चर्चासत्राचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी.डी. बाळसराफ यांनी केले. आयोजनामागील भूमिका संयोजक डॉ. एस. एस. मेंगाळ यांनी स्पष्ट केली. सूत्रसंचालन प्रा. के.व्ही. अडसूळ यांनी, तर डॉ. एस.के. सानप यांनी आभार मानले. ...Read More
व्हीएस न्यूज - कस्पटे वस्ती, वाकड येथे सोमवारी सकाळी 10 वाजता देवर्षी नारद मंदिराचा भूमीपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सर्व्हे नं. 227/2/2, दुर्वांकूर पार्क, बालाजी निवासाशेजारी, हॉटेल ऍम्बियन्स मागे, कस्पटे वस्ती येथे चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंदार देव यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून चिंचवड येथील न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक नीलकंठ चिंचवडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास देवर्षी नारद विद्या मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहणार आहेत. हे मंदिर देवर्षी नारद विद्या मंडळ बांधणार आहे....Read More
व्हीएस न्यूज - : चिंचवड येथील सुप्रसिद्ध किर्तनकार दीपकबुवा रास्ते यांना पुणे येथील श्रीहरि किर्तनोत्तेजक सभेने 'किर्तन स्वरभास्कर' या पदवीने गौरविण्यात आले. नुकत्याच झालेल्या महर्षि वेदव्यास नारदीय किर्तन संमेलनात त्यांना गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या सन्मानाचे स्वरूप आहे. हे संमेलन प्रतिवर्षी जानेवारी महिन्यात घेतले जाते. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये अनेक पुरुष, महिला आणि युवायुवती किर्तनकार सहभागी होत असतात. त्यांच्या सादरीकरणानुसार त्यांना पदवी बहाल करण्यात येते....Read More
व्हीएस न्यूज - स्त्री जातीचे एक महिन्याचे अर्भक पिंपरी रेल्वे स्टेशन येथे सापडले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलम गायकवाड या कामावर जाण्यासाठी सकाळी सव्वा नऊ वाजता पिंपरी रेल्वे स्टेशन येथे आल्या असता त्यांना एक महिन्याचे स्त्री जातीचे बाळ रेल्वे स्टेशनवर आढळले. बाळाजवळ दुधाची बाटली, स्वेटर आणि कपड्याचा जोड आढळून आला. गायकवाड यांनी मातेबाबत चौकशी केली असता आई मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी बाळाला पिंपरी रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द केले. हिंजवडी येथे मंगळवारी अशाच प्रकारे स्त्री जातीचे अर्भक मिळून आले होते. शहरातील पाच दिवसामध्ये अशाप्रकारेे स्त्री जातीचे अर्भक सापडणे ही चिंतेची बाब आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत. ...Read More
व्हीएस न्यूज - "कठीण प्रसंगातही धैर्याने सामोरे जात धाडसी निर्णय घ्यायला हवेत. तुमच्याकडे सुशासन, धोरणात्मक व्यवस्थापन आणि चांगल्या उपायांचे पर्याय असतील, तर जटील समस्या सोडविण्यात हमखास यश मिळते. नक्षलवादाच्या, मानवी तस्करीच्या आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनेक प्रसंगात या गोष्टींचा उपयोग झाला. समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधण्याची हातोटी यामुळे चांगले काम करणे शक्य होते,'' असे प्रतिपादन तेलंगणा राज्यातील राचकोंडाचे पोलीस पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी केले. आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या (डीवायपीआयएमएस) वतीने आयोजित नवव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी महेश भागवत बोलत होते. याप्रसंगी प्रसन्न ट्रॅव्हल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्न पटवर्धन, 'डीवायपीआयएमएस'चे कार्यकारी संचालक विंग कमांडर पीव्हीसी पाटील, संचालक डॉ. आशुतोष मिसाळ, डॉ. जे. जी. पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 'नेतृत्व, सुशासन आणि धोरणात्मक व्यवस्थापन ; यशाची गुरुकिल्ली' या संकल्पनेवर आधारित ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. भागवत म्हणाले, "आज भारतासह जगभरात मानवी तस्करीचा प्रश्न मोठा आहे. 1700 पेक्षा अधिक वेश्यावस्ती देशात असून, 30 लाख वेश्या यामध्ये काम करताहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे. नक्षलवादाचा प्रभाव अलीकडे कमी झाला असला, तरी छत्तीसगड, ओरिसा आणि महाराष्ट्राच्या काही भागात नक्षलवाद अधूनमधून डोके वर काढतो. आपल्या कुशल नेतृत्वाचा, नियोजनाचा आणि विवेकबुद्धीला विचार करून काम केले, तर अनेक समस्या सुटतात. नक्षलवादी भागात ग्रामस्थांच्या सहकार्याने केलेल्या कामातून अनेक नक्षलवादी शरण आले. डॉ. आशुतोष मिसाळ यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. तसेच परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. दुपारच्या सत्रात इंडियन स्कुल ऑफ बिझनेसचे वरिष्ठ व्यवस्थापक जे. संदीप, मकरंद ब्रम्हे यांनी मार्गदर्शन केले. तर चर्चासत्रात आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे मुख्याधिकारी रेखा दुबे, सुनील कोडे, चैत्राली पेट्रोकेमिकल्सचे चेतन यादव, बिझनेस स्टॅण्डर्डचे सुमेध गुप्ते, हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनल माया महंत यांनी सहभाग घेतला. सोनिया राजगिरे आणि वृषाली डोके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संजय गायकवाड यांनी आभार मानले....Read More
व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या ज्येष्ठ दाम्पत्याला दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करत 'पुढे खून झाला आहे, दागिने काढून बॅंगेत ठेवा' असे सांगून पावणे तीन लाखांच्या दागिन्याची बॅग हिसकावून नेली. ही घटना गुरूवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास बिजलनीनगर येथील गिरीराज सोसायटी समोर घडली. याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांचे पती गुरूवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास बिजलीनगर येथील गिरीराज सोसायटी समोरून पायी जात होते. त्यांच्याजवळ दोन अनोळखी इसम आले. 'आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झाला असून दागिने बॅगेत काढून ठेवा' असे त्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला सांगितले. दागिने बॅगेत ठेवताच भामट्यांनी दोन लाख 70 हजार रूपये किंमतीचे दागिने असलेली बॅग हिसकावून पळ काढला. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. देवताळे अधिक तपास करत आहेत....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002