Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
पाणी दरवाढी विरोधात महापालिका मुख्यालयात मनसेचे आंदोलन

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात आज मनसेच्यावतीने पाणी दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. आज होणार्या महासभेत पाणी दरवाढ करण्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळेच ही दरवाढ करू नये या मागणीसाठी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात आंगोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना सचिन चिखले म्हणाले की, शहरवासियांचे पाणी चौपट महाग करण्याचा घाट घातला जात आहे. या दरवाढीला मनसेचा पूर्णपणे विरोध आहे. महासभेत सत्तेच्या जोरावर भाजपने दरवाढ केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

...Read More

V. S. News
कॉंग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

व्हीएस न्यूज - शिवजयंतीनिमित्त पिंपरी एच.ए.कंपनी समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सचिन साठे व महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, प्रदेश कमिटीच्या महिला सचिव बिंदू तिवारी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम गुंजाळ,अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शोभा बोराटे, सरचिटणीस सज्जी वर्की, विजय ओव्हाळ, विरेंद्र गायकवाड, विनीता तिवारी, हिरामण खवळे, सिध्दार्थ वानखेडे, हिरा जाधव, अर्जुन खंडागळे, अनिरुध्द कांबळे, तारीक रिजवी, फारुक इनामदार आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
काँग्रेस पर्यावरण विभागातर्फे शिवजयंती उत्साहात

व्हीएस न्यूज - प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची ३८८ वीं जयंती कार्यक्रम अजमेरा कॉलनीतील कार्यालयात साजरा झाला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी प्रदेश महासचिव अशोक मंगल, पुणे शहर अध्यक्ष राजन पानसे, अमर नानेकर, पिंपरी शहर अध्यक्ष उमेश बनसोडे़, प्रवक्ता आयुष मंगल, पराग आठवले, सोनू वाघमारे, श्वेता मंगल, नेहा मंगल, अक्षांश मंगल, मिताली चक्रवर्ती, राजेश नायर, साक्षी राणीम आदि उपस्थित होते.

...Read More

V. S. News
अॅड. हरीश भोसुरे यांना अज्ञात वक्तीने फोने करून दिली मारण्याची धमकी.

व्हीएस न्यूज - पिंपरी आणि पुणे न्यायालयात प्रॅक्टिस करणारे व आर.टी.आय कार्यकर्ते अॅड.हरीश दौलत भोसुरे हे आपल्या राहते घरी असताना दि - १६/०२/२०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता अज्ञात वक्तीने फोने करून अमानुष शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली .सादर च्या घटाने विषयी अॅड. हरीश भोसुरे यांनी यमुनानगर निगडी पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे .तरी आजतागायत स्थानिक पोलीस स्टेशन च्या पोलीस अधिकाऱ्यांनी सदरील अज्ञात व्यक्तीच्या कॉल रेकॉर्डिंग ची तपासणी केली नाही व घटने विषयी दुर्लक्षपाणा करतात आसा आरोप हरीश भोसुरे यांनी केला आहे .

या विषयी बोलताना ते म्हणाले कि ," या दरम्यान जर माझ्यावर कुठलाही अनुचित प्रकार घडला तर स्थानिक पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी जबाबदार राहतील, सदरील घाटाने विषयी मी पिंपरी चिंचवड व पुणे अॅडव्होकेट बार असोसिएशन कडे दाद मागितली आहे."
...Read More

V. S. News
‘अखंड जनसेवा’ अॅपचे खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते लोकार्पण

व्हीएस न्यूज - शिवसेना प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांच्या ‘अखंड जनसेवा’ या अॅपचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. शिवसेना सचिव खासदार आनिल देसाई यांच्या हस्ते शिवसेना भवन दादर मुंबई या ठिकाणी या अॅपचे उद्घाटन झाले.

पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच अशा पध्दतीचे अॅप तयार करण्यात आले आहे. या ‘अखंड जनसेवा’ अॅपमुळे शहरातल्या जनतेच्या विविध समास्याचे निराकरण होण्यासाठी मदत होणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर अनिल देसाई यांनी युवराज दाखले यांचे व अॅप डेव्हलपर्स रविकिरण घटकार यांचे कौतुक केले.

यावेळी शिवसेना भंडारा-गोदींयाचे जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, शिवसेना प्रभाग प्रमुख युवराज दाखले, गणेश आहेर,निलेश भोरे, तसेच चाणक्य आय.टी. सोल्युशनचे रविकिरण घटकार तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

...Read More

V. S. News
गुन्हेशाखेकडून १४ पिस्तुले आणि २५ काडतुसे जप्त

व्हीएस न्युज - उत्तर प्रदेशातून पुण्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र घेऊन आलेल्या गुंडाला पकडण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या सराईत गुंडाकडून दोन पिस्तुले व १२ गावठी कट्टे अशी एकूण १४ पिस्तुले आणि २५ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याला कोर्टाने सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

संतोष विनायक नातू (वय ४२, रा. झांबरे पॅलेसजवळ,महर्षीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नातू याच्या विरुद्ध रंजि. नं ५४/२०१८ आर्म अॅक्ट कलम ३,७ (२५) व मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३७ ( १ ) १३५ प्रमाणे स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर पूर्वी देखील शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याने उत्तर प्रदेशातून ही पिस्तुल आणल्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी पथक पाठविण्यात आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलिस नाईक परवेज जमादार यांना माहिती मिळाली, की सराईत गुन्हेगार संतोष नातू हा गावठी पिस्तुल विक्री करण्यासाठी झांबरे पॅलेस चौकात येणार आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्या वेळी त्याच्याकडे असलेल्या सॅकची तपासणी केली. त्यामध्ये पोलिसांना तब्बल चौदा पिस्तुल आणि २५ काडतुसे आढळून आली. त्याने ही पिस्तुल विक्रीसाठी घेऊन आणल्याचे सांगितले आहे. तसेच, त्याने कोणाला मारण्यासाठी ही पिस्तुल आणली होती का याचा देखील तपास सुरू आहे. नातू हा पूर्वी फरासखाना परिसरात लॉटरीचे दुकान चालवित होता. मात्र, त्याने हे काम सोडून दिल्यानंतर शेती करत असल्याचे समोर आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. संतोष नातू ही पिस्तुले उत्तर प्रदेशातून घेऊन आला आहे. तो ही पिस्तुले घेऊन ट्रॅव्हल्सने आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्राची तस्करी करून तो घेऊन आला आहे.

हि कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे , पोलीस उप आयुक्त पंकज डहणे, सपोआ गुन्हे -१ समीर शेख , यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम , पोलीस निरीक्षक रॅम राजमाने , संघटीत गुन्हेगारी दक्षिण विभाग पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, सह पोलीस निरीक्षक विध्हुलता चव्हाण , सह. फौजदार संजय दळवी ,यशवंत दळवी ,यशवंत आंब्रे ,विनायक पवार , शंकर पाटील , पोलीस कर्मचारी परवेज जमादार, निलेश पाटील, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा, धनाजी पाटील, सुनिल चिखले,
ठवरे, राहुल घाडगे, दत्तात्रय काटम, बशिर सैय्यद, प्रमोद गायकवाड, रामदास गाणते, चेतन मोरे, प्रविण जाधव यांनी केली.

...Read More

V. S. News
संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस नगरसदस्या अनुराधा गोरखे व सह आयुक्त दिलिप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक आयुक्त आशा देवी दुरगुडे व अण्णा बोदडे यांच्या हस्तेही संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पाजली अर्पण करण्यात आली. या जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, संतोष जाधव, आकाश चव्हाण, बंजारा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते नंदुभाऊ राठोड, गुलाब राठोड व रवि गोरसिकवाडी कर्मचारी रवि राठोड, बालाजी रोठोड, सीताराम राठोड व रावसाहेब राठोड आदि उपस्थित होते.
...Read More

V. S. News
क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, लहूजी वस्ताद साळवे यांना आदरांजली

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके व लहूजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्तचिंचवड स्टेशन येथील त्यांच्या पुतळ्यास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्या अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात
आले.
यावेळी माजी नगरसदस्य राम पात्रे, सह आयुक्त दिलिप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम.शिंदे सामाजिक कार्यकर्ते नितीन घोलप, भाऊसाहेब अडागळे, अण्णासाहेब कसबे, संदिप जाधव, आबाजी भवाळ, विलास डोलारे, अरुण जगताप, उमेश शिंदे, राजू ओव्हाळ, भरत जगताप, ज्ञानेश्वर पोळ, दादा कसबे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.
...Read More

V. S. News
पाणीपट्टी दरवाढ रद्द करा

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरवासियांवर सत्ताधारी भाजपने अन्यायाकारक पध्दतीने पाणीपट्टीची दरवाढ केली आहे. ही दरवाढ त्वरीत रद्द करावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी महापलिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पाणीपट्टीची अन्यायकारक दरवाढ जनतेवर लादू नका. पवना बंदिस्त पाईप लाईनसाठी जागा ताब्यात नसताना करोडो रूपयांचा खर्च करण्यात आला. ते पैसे तत्कालीन अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणीही तायडे यांच्यासह गुलाब पानपाटील, राजेंद्र साळवे, विष्णु सरपदे, विनोद जाधव, गौतम जगभार आदींनी केली आहे.
...Read More

V. S. News
नॉव्हेल महाविद्यालयामध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा

व्हीएस न्यूज - चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन मेळावा शुक्रवारी पार पडला. बारावीनंतर पुढील क्षेत्र कसे निवडायचे. परदेशात करिअरच्या कोणत्या विविध संधी उपलब्ध होतील. त्यासाठी कोणता शैक्षणिक अभ्यास करणे गरजेचे आहे. याबद्दलचे मोफत मार्गदर्शन विद्यार्थ्यांना 11 अमेरिकन युनिर्व्हसिटीच्या प्रतिनिधींनी केले. या करिअर मार्गदर्शन मेळाव्याला विद्यार्थी व पालकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्याला पेनसिल्व्हानिया स्टेटच्या असोसिएट डायरेक्टर सुप्रिया कानेटकर यांच्यासह अबर्न मार्केटिंग मॅनेजर करण ललिल, रिक्रूटमेंट मॅनेजर हर्ष जोशी, अबर्न ऍकॅडमिक कौन्सिलर भाग्यश्री, संचालिका रिबेका बहन, रिद्धी मेहता, कॅसोलिन क्लाप्सी, ग्रॅंड व्हॅली स्टेट युनिव्हर्सिटीचे ख्रिस्तोफर हेंड्री, जॉन्सन कॉलेजचे समन्वयक डर्बन चेस, जॉक्सन मिशीगन, आफरीन नाझ, नुपूर खुराना आदी उपस्थित होते. या करिअर मेळाव्यात अकरावी व बारावी वाणिज्य शाखा व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालकही उपस्थित होते.
संयोजिका सुप्रिया कानिटकर म्हणाल्या की, पुण्याच्या महाविद्यालयात आम्ही प्रथमच अशा करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करीत आहोत. आम्हाला विद्यार्थी व पालकांकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतीय विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील कौशल्य व बुद्धिमत्ता लक्षात घेता अमेरिकन युनिर्व्हसिटीज या अशाच उत्तमोत्तम कौशल्य व बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांच्या शोधात असतात. विद्यार्थी आणि पालकांचा मेळाव्यासाठी मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे दरवर्षी, असे मेळावे घेतले जातील. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील क्षेत्रातील दिशा ठरवण्यासाठी योग्य मार्गदर्शन व संधी मिळेल. नॉव्हेल महाविद्यालयाने दिलेल्या पाठींब्यामुळे त्यांनी शाळेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांचे आभार मानले. यावेळी नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे व प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे उपस्थित होत्या.

...Read More

V. S. News
हातगाडी व पथारी व्यवसायिकांच्या पुनर्वसनासाठी आंदोलन

व्हीएस न्यूज - हातगाडी व पथारीधारकांचे पुर्नवसन करावे मागणीसाठी खडकी येथील कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर गुरुवारी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. समाजवादी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रफिक कुरेशी व खडकी विभाग अध्यक्ष विलास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. रवी यादव, सालार शेख, रामरुप यादव, मोहम्मद खान, रमेश शाहू, लक्ष्मी परदेशी, सलिमा शेख, माधवी पिल्ले, रेखा कांबळे, संतोषी चौधरी, रशिदा इराणी, अस्मिता स्वामी, अमृत पिल्ले आदी व्यावसायिक आंदोलनात सहभागी झाले होते. हातगाडी व पथारीधारकांचे योग्य ठिकाणी योग्य प्रकारे पुर्नवसन केले जावे अशी त्यांची मागणी होती.
मागील वर्षभरापासून कॅंटोन्मेंट बोर्ड वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या हातगाडी व पथारी व्यवसायिकांवर कारवाई करीत आहे. यातील बाधित व्यवसायिकांना जुन्या पाण्याच्या टाकीजवळ जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र तेथे व्यवसाय नीट चालत नसल्याने पूर्वीच्याच गोलमार्केट, टिकाराम चौक या ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. कॅंटोन्मेंट सदस्य दुर्योधन भापकर व हातगाडी संघटनेचे अध्यक्ष भरत ठाकूर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन या प्रकरणी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!