पीसीसीओईआर मध्ये जागतिक मराठी दिन उत्साहात साजरा
व्हीएस न्यूज - मराठी भाषा समृध्द होण्यामध्ये कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यासह समकालीन लेखक-कवी-नाटककार यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नवकल्पना, नवे विचार, नवनवीन वाड.मय प्रकार वाचकांसमोर मांडून विचार मंथन घडवून आणले. यातूनच भाषा समृध्द होत गेली. आज सोशल मीडियाचा विचार केला तर यामध्येही मराठीचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे, असे आपल्या लक्षात येते. यापुढील काळात सर्वच स्तरांवर मराठी भाषेचा वापर वाढलेला आपल्याला दिसेल, असे मार्गदर्शन प्राचार्य हरिष तिवारी यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) चे रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्रात (पीसीसीओईआर) जागतिक मराठी दिन (कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस) उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालात मराठी भाषेच्या निरनिराळ्या रूपांचा, विचारांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी कविता, लेख तसेच रांगोळीच्या माध्यमातून मराठीचे महत्त्व सादर केले. 'लाभले आम्हास बोलतो मराठी' या मराठी अभिमान गीताचे समूह गायन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. सोनाली कणसे, प्रा. शाम मानकर, प्रा. प्रिया ओघे यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन, आभार समृद्धी देवकाते यांनी केले.
व्हीएस न्यूज - शहरातील नागकिांना पुरेसा पाणीपुरवठा करून शहर टँकरमुक्त करण्याचे भाजपाने आश्वासन दिले होते. हेसोयीस्कररीत्या विसरून एक वर्षाच्या कार्यकालाची भेट म्हणून पिंपरी चिंचवडमधील नागरिकांवर चौपट पाणीपट्टी दरवाढ लादण्याचे दुष्कर्म भाजपाने केले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु असलेल्या भाजपाच्या या पारदर्शक भ्रष्टाचाराचा जनतेवर अधिभार का? असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला.
पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (1 मार्च) पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भाजपाने केलेल्या पाणीपट्टी दरवाढ विरोधात निदर्शने केली. या वेळी महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे,युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्प संख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महिला प्रदेश सचिव बिंदू तिवारी, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैसवाल, एनएसयूआय शहराध्यक्ष विशाल कसबे, ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, परशुराम गुंजाळ, बाळासाहेब साळुंखे, ज्येष्ठ नागरिक सेल शहराध्यक्ष लक्ष्मण रूपनर, अल्पसंख्यांक सेल प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, मॅन्यूअल डिसुजा, क्षितिज गायकवाड,विश्वनाथ खंडाळे, सचिन नेटके, तानाजी काटे, गौरव चौधरी, तारीख रिझवी, विजय ओव्हाळ, सुरेश लिंगायत, सिद्धार्थ वानखेडे, फय्याज शेख, हुरबाणो शेख, कल्पना जाधव, वामण ऐनेले, अर्जून खंडागळे, विठ्ठल खलसे, भास्कर नारखेडे, अनिरूद्ध कांबळे, बाबा बनसोडे आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले, मागील वर्षी सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाने एक वर्षाच्या कार्यकालात एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पाशवी बहुमतामुळे भाजपामध्ये मस्ती आलेली आहे. ही मस्ती कॉंग्रेसचे कार्यकर्ते उतरविल्याशिवाय राहणार नाहीत. पाशवी बहुमतापुढे निषप्रभ ठरलेल्या विरोधी पक्षामुळे पिंपरी चिंचवडच्या जनतेवर चौपट पाणीपट्टी दरवाढ भाजपाने लादली. दिशाभूल करणारी आकडेवारी सादर करून सहा हजार लिटर मासिक पाणीपुरवठा प्रत्येक कुटुंबाला मोफत देणारी देशातील पहिली महापालिका असे जाहिर करून प्रसिद्धी करून घेतली.
प्रत्यक्षात मात्र, पिंपरी चिंचवड महापालिका आतापर्यंत देशात सर्वात कमी दराने पाणीपुरवठा करीत होती. प्रस्तावित दरवाढीमुळे देशात सर्वात महागडा पाणीपुरवठा पिंपरी चिंचवड मनपा नागरिकांवर लादत आहे. 5 हजार 300 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा पुढील वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला आहे. 405 कोटीच्या निविदा प्रक्रियेत 35 कोटींची बचत केल्याचा अजब दावा आयुक्तांनी केला आहे. वाचवलेली हि रक्कम पाणीपुरवठ्यावर खर्च करावी व नागरिकांना सुविधा द्यावेत. दरवर्षी पाणीपट्टीतून 70 कोटींहून जास्त रुपये महापालिकेत जमा होतात. तरीदेखील पाणीपट्टीची अन्यायकारक दरवाढ नागरिकांवर लादली आहे. ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा कॉंग्रेस रस्त्यावर उतरून याला तीव्र विरोध करील असा इशारा सचिन साठे यांनी दिला.
व्हीएस न्यूज - ऑटो इंडिया रेसिंग चॅम्पियनशीप आणि वाघोली, पुणे येथील पार्वतीबाई मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय गो-कार्ट’ स्पर्धेत बावधन पुणे येथील पीव्हीपीआयटी महाविद्यालयाने चॅम्पियनशीपचा किताब व रोख 75 हजारांचे पारितोषिक पटकावले. मोशी, प्राधिकरण सेक्टर 6 येथील ट्राफिक थिम पार्क येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील36अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रासह ओडीसा, राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश येथून एकूण 900 विद्यार्थी सहभागी झाले होते. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या हस्ते करण्यात आले. 125 सीसी क्षमतेचे इंजिन वापरून बनवलेल्या गो-कार्ट मध्ये स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी ब्रेक टेस्ट, स्किड पॅड टेस्ट, ॲटो क्रॉस व इंडोरन्स रेसिंग अशा विविध कौशल्यपूर्ण चाचण्या पूर्ण केल्या. ॲटो इंडिया रेसिंग चॅम्पियनशीप क्लब तर्फे प्रा. प्रतीक सातव, प्रा. मनोज भोजणे, प्रा. गणेश कदम,प्रा. मार्तंड पंडागळे यांनी संयोजनात सहभाग घेतला.
स्पर्धेतील विजयी संघ खालीलप्रमाणे : प्रथम क्रमांक (75 हजार रोख व चॅम्पियनशीप ट्रॉफी) : पीव्हीपीआयटी (बावधन,पुणे); व्दितीय क्रमांक (50 हजार रोख) - डीकेटीईएस टेक्सटाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट (इचलकरंजी), तृतीय क्रमांक (35 हजार रोख) - जेएससीओई (हडपसर, पुणे); चतुर्थ क्रमांक (20 हजार रोख) - आर्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (जयपूर राजस्थान); पाचवा क्रमांक ( रोख 12 हजार ) : सीओईपी (पुणे) या संघांना गौरविण्यात आले.
याबरोबरच बेस्ट डिझाईन गटात सीओईपी पुणे यांना प्रथम क्रमांक, तर व्दितीय क्रमांक जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (कुरण, पुणे) यांना देण्यात आला. एक्स्लिरेशन गटात प्रथम - आर्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (जयपूर राजस्थान); व्दितीय - एमएमआयटी, (लोहगाव, पुणे). स्किड पॅड - प्रथम सीओईपी (अवसरी,पुणे); व्दितीय - पीव्हीपीआयटी (बावधन, पुणे); ॲटो क्रॉस - प्रथम क्रमांक एमएमआयटी, (लोहगाव, पुणे); व्दितीय क्रमांक डीकेटीईएस टेक्सटाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट (इचलकरंजी). इनोव्हेशन - प्रथम युपीईएस (डेहराडून) व्दितीय - बीव्हीआरआयटी (नौरपूर हैद्राबाद), ॲस्थिटीक - प्रथम - सिंहगड इन्स्टिट्यूट (लोणावळा,पुणे); व्दितीय - सीओईपी (अवसरी, पुणे). बेस्ट कॅप्टन - प्रथम - मानस जयस्वाल, (युपीईएस, डेहराडून); व्दितीय शुभम गारडे (आरएससीओई, पुणे); बेस्ट ड्रायव्हर - प्रथम - तेजवीर सिंग, व्दितीय - अजिंक्य शिंदे, द्रोणाचार्य ॲवॉर्ड - प्रथम - बी. श्याम बाबू, व्दितीय - शिवलिक दुबे, तृतीय - सुनील तपासे. यांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
व्हीएस न्यूज - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील, असे भाकित वर्तवले आहे. पण भाजप २५० जागा मिळवून केंद्रात सत्तेत येईल, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. गुजरात आणि राजस्थानच्या निकालाचा दाखला आठवलेंनी भाजपच्या जागा कमी होण्याला दिला.
आठवलेंना यावेळी मिलिंद एकबोटेंच्या अटकेसंदर्भात प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, मी सत्तेत असलो तरी माझ्या गृहखाते माझ्याकडे नाही. पण यातील दोषींवर कारवाई करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यावेळी दगडफेक करणाऱ्यांना अटक केली आहे. तसेच, शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेची आठवलेंनी खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे आज एक बोलले, तरी उद्या दुसरे बोलतात. त्यामुळे आज जरी ते स्वतंत्र लढू म्हणाले असतील, तरी उद्या ते विचार बदलतील, असे आठवले म्हणाले.
व्हीएस न्यूज - तापकीरनगर चौकातील वडेवाले जोशी समोरील बीआरटी रोडवरील खोदाच्या जागेवर डांबरीकरण करण्याची मागणी रहाटणी- काळेवाडी विभागाचे शिवसेना प्रभागप्रमुख युवराज भगवान दाखले यांनी केली आहे. याबाबत महापालिकेच्या ग प्रभागाचे मुख्य अधिकारी दांगट यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तापकीरनगर चौकात जीओ कंपनीच्या वतीने केबल टाकण्याचे काम चालू आहे. परंतु, संबंधीत ठेकेदाराकडून कामाकडे गांभिर्याने पाहिले जात नसून यामुळे अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वास्तविक पाहता खोदाईचे काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ काम पूर्ण करून डांबरीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र, ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या वर्दळीच्या ठिकाणी लहान गाड्या स्लिप होऊन अपघात होण्याचे प्रमाणात वाढले आहे. तरी, याबाबत प्रशासन म्हणून लक्ष देण्यात यावे, असेही दाखले यांनी निवदेनात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - आचार्य अत्रे रंगमंदिराचे काम करणाऱ्या कामगारांना ठेकेदाराकडून सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची साधन सामुग्री पुरविली गेली नसल्याने सोमवारी एका 65 वर्षीय वृद्ध कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन ठेकेदारांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश फाळके (वय 40, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) आणि चंद्रकांत जाधव (वय 32, रा. विठ्ठल नगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदारांची नावे आहेत. याबाबत सतीश डोंगरे (वय 28, रा. विठ्ठल नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजीचे काम सुरु होते. हे काम शैलेश फाळके व चंद्रकांत जाधव या दोन ठेकेदारांनी घेतले आहे. सभागृहात पाण्याच्या टाकीचे काम करून घेत असताना कामगारांना ठेकेदाराकडून सुरक्षेबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही. फिर्यादी यांचे वडील कचरू डोंगरे यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होता. तरीही त्यांना सुरक्षेची कोणतीही साधने न देता पाण्याच्या टाकीमध्ये काम करायला लावले. अखेर कचरू डोंगरे यांचा जीव गुदमरल्याने मृत्यू झाला. पुढील तपास फौजदार घुगे करीत आहेत.
व्हीएस न्यूज - सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोन तरुणांना गजाआड केले आहे. या तरुणांनी मराठा समाजाबाबत व्हाट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. विश्वनाथ निवृत्ती वाजे आणि राजेंद्र गोरख मोडवे (दोघेही रा. शिंदेवस्ती, रावेत) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिस नाईक सुनील संपत जाधव यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन तरुण बेरोजगार आहेत. दोघांना दारूचे व्यसन असून या दोघांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. याबाबत पोलीस नाईक सुनील जाधव यांनी तक्रार दिली. विशिष्ट समाजातील लोकांच्या भावना दुखावल्याचे कारणावरून निगडी पोलिसांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेतले.
व्हीएस न्यूज - वाघेरे कॉलनी येथे कामगारांच्या झोपड्यांना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये सुमारे दहा झोपड्या जाळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. वाघेरे कॉलनी येथे रिकाम्या जागेत बिगारी काम करणारी अनेक कुटुंबे राहत आहेत. ही कुटुंबे कर्नाटकवरून पुण्यात रोजी-रोटी कमविण्यासाठी आले आहेत. रोजच्याप्रमाणे झोपड्यांमधील सर्वजण कामावर गेले असता बुधवारी दुपारी एकच्या सुमारास एका झोपडीतून अचानक धूर निघाला. घरी असलेल्या काही महिलांनी जवळ जाऊन बघितले असता झोपडीमधील सर्व वस्तूंनी पेट घेतला होता. महिलांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षणात आग आजूबाजूला पसरली. यामध्ये शेजारी असलेल्या सुमारे दहा झोपड्या जाळून खाक झाल्या. नागरिकांनी अग्निशमन विभागाला घटनेची तात्काळ माहिती दिली. पिंपरी अग्निशमन विभागाचे दोन आणि रहाटणी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. यामध्ये जिवितहानी झाली नसून वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
व्हीएस न्यूज - एका ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. प्रभाकर केशव पांचाळ (वय-65, रा. सरस्वती हौसिंग सोसायटी, रूपीनगर, तळवडे), असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. प्रभाकर पांचाळ यांनी राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 641 मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात ते सोमवारी सकाळी सातच्या दरम्यान घडली. वसिम खान (वय 37, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसिम खान यांचे निगडीतील ट्रान्सपोर्टनगर भागात साई एन्टरप्रायजेस नावाचे मोबाईलचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी त्यांनी दुकान बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी लोखंडी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. 6 लाख 32 हजार 423 रुपये किंमतीचे मोझोमॅक्स व सेलकॉन कंपनीचे एकूण 641 मोबाईल चोरून नेले. सोमवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.बी. खारगे अधिक तपास करीत आहे.
व्हीएस न्यूज - गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आरोपीची चौकशी करत असताना आरोपीने पोलीस ठाण्यातच स्वतःचे डोके फोडून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार सांगवी पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडला. प्रशांत उर्फ डिग्या भानुदास दिघे (वय-26, रा. तंगडेवस्ती, माथळवाडे फाटा भूगाव, ता. मुळशी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत याच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल होते. त्याबाबत सांगवी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी आरोपीकडे चौकशी करीत होते. चौकशीमध्ये पोलिसांना सहकार्य न करता त्याने जवळच असलेल्या लोखंडी कपाटावर डोके आपटून घेतले. यामध्ये आरोपीच्या डोक्याला मार लागला. तसेच लोखंडी कपाटाची काच फुटली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व आत्महत्येचा प्रयत्न या गुन्ह्याखाली आरोपीला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.
व्हीएस न्यूज - फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये आण, असा तगादा लावून विवाहितेचा छळ केला. पैसे न आणल्यास सामूहिक बलात्कार करण्याची धमकी पतीने दिल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळे निलख येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख येथे सासरच्या मंडळींनी सुनेकडे हुंड्याच्या पैशांची मागणी केली. फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये आण, असा तगादा वारंवार लावला. फिर्यादी महिलेने पैसे आणले नाहीत म्हणून तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केला. पतीने तर यापुढे जाऊन पैसे न आणल्यास पत्नीला सामूहिक बलात्काराची धमकी देखील दिली. याबाबत पीडित महिलेने पोलिसांकडे दाद मागितली. महिलेने सासरच्या मंडळींविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार संभाजी पाटील करीत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002