Breaking News

पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. |
V. S. News
यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे चिंतन करण्याची गरज

व्हीएस न्यूज - सत्तास्थान हे लोककल्याणाचा एक मार्ग आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपले काम लोकशाही पध्दतीने चालले आहे कि नाही, याचे कठोर आत्मपरिक्षण नित्य केले पाहिजे, असे लोककल्याणाला मार्गदर्शक ठरणारे विचार यशवंतराव चव्हाण यांचे होते. आज त्यांच्या विचारांचे सर्व सत्ताधाऱ्यांनी चिंतन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष साठे यांच्या हस्ते सोमवारी वल्लभनगर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सरचिटणीस सज्जी वर्की, हिरा जाधव, शोभा कोराटे, हुरबानो शेख, इर्शाद शेख, वसंत मोरे, मकर यादव, अनिरुध्द कांबळे, किसन भालेकर, सुनिल राऊत, तुषार पाटील, माधव पुरी, श्रीरंग सरपते आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र गावात जन्मलेले यशवंतराव चव्हाण हे उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी, अभ्यासू व्यक्तीमत्व, रसिक व साहित्यिक होते. युगांतर, सह्याद्रिचे वारे, कृष्णाकाठ, ऋणाबंध हे त्यांचे ग्रंथ आजही महाराष्ट्रातील अभ्यासकांना मार्गदर्शक आहेत. महाराष्ट्राच्या औद्योगिकी करणाचा पाया यशवंतराव चव्हाण यांनी उभारला. आज शेती आणि उद्योगात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे यांचे श्रेय यशवंतराव चव्हाण यांचे आहे.

...Read More

V. S. News
डेक्कन एक्सप्रेसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

व्हीएस न्यूज - मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस गाडीच्या धकडेत एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडला.
अपघातात ठार झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटली नाही. तरुणाने अंगावर निळ्या पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. रंगाने सावळा, केस काळे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास एक 25 वर्षीय तरुण आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडत होता. मुंबईवरून पुण्याकडे जात असलेल्या डेक्कन एक्सप्रेसची धडक बसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
दुचाकीस्वाराची एक लाखांची रोकड पळविली  

व्हीएस न्यूज - बॅंकेतून पैसे घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराला खाली पैसे पडल्याचे सांगून दुचाकीच्या हॅन्डलला अडकवलेली 90 हजार रूपयांची पिशवी भामट्याने पळविली. ही घटना सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास कासारवाडीतील युनियन बॅकेच्या बाहेर घडली.
निलेश लांडे (वय-31, रा. गुळवे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडे यांनी सोमवारी कासारवाडीतील युनियन बॅकेतून 90 हजार 900 रूपये काढले होते. पैसे घेऊन दुचाकीवरून घऱी जात असताना एकाने पैसे खाली पडल्याचे त्यांना सांगितले. लांडे खाली पडलेले पैसे उचलत असताना दुचाकीच्या हॅन्डलला लावलेली पैशांची पिशवी पळवून नेली.
फौजदार पी. आर. कठोरे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
किरकोळ कारणावरून दोन भावांना टोळक्याची मारहाण 

व्हीएस न्यूज - घराकडे जाण्याच्या रस्त्यावर लावलेला टेम्पो काढण्यास सांगितल्यामुळे आठ जणांनी महिलेला शिवीगाळ करत दोन भावांना जबर मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री साडेसात वाजता चिखली येथे घडली.
रविंद्र रोकडे (वय-40, रा. चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय उत्तम रोकडे याच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी संजय रोकडे याने टेम्पो लावला होता. रस्त्यातील टेम्पो काढ, असे फिर्यादीच्या आईने आरोपीला सांगितले. यावरून चिडलेल्या आरोपींने महिलेला शिवीगाळ केली. इतर नातेवाईकांना बोलावून घेत फिर्यादाचा लहान भाऊ शैलेंद्र रोकडे याला लोखंडी गजाने डोक्यात, कपाळावर मारून गंभीर जखमी केले. फिर्यादीलाही लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीचे वडील संपत रोकडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
फौजदार भोये अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
खासगी बसच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू 

व्हीएस न्यूज - रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठाला भरवान खासगी बसने धडक दिल्याने ज्येष्ठाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता निगडीतील अंकुश चौकात घडली.
मारूती अंबादास गायकवाड (वय-60, रा. नालंदा सोसायटी, निगडी) असे मृत्यू झालेल्या ज्य़ेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी बस चालक सुनिल किसन वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांचा जावई पापा पवार (वय-32) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारूती गायकवाड सोमवारी दुपारी अंकुश चौकातून रस्ता ओलांडत होते. भरधाव आलेल्या खासगी बसने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
फौजदार मोरे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
एकतर्फी प्रेमप्रकरणातून मित्राने केली मित्राची हत्या

व्हीएस न्यूज - प्रेमात अडथळा ठरणाऱ्या मित्रानेच दहावीतील मित्राची धारधार चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी निगडी, पूर्णानगर येथे मध्यरात्री बारा वाजता घडली आहे.
वेदांत जयवंत भोसले (वय 15, रा. स्वामी विहार, बी वींग, पूर्णानगर) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रोहन प्रदिप महाळगीकर (वय-18, रा. पुर्णानगर,चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वेदांतची आई जान्हवी जयवंत भोसले (वय-40) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
वेदांत हा निगडी, यमुनानगर येथील अमृत माता विद्यालयात दहावीत शिकत होता. सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. तर आरोपी रोहन पिंपरी, वल्लभनगर येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्गात शिकत होता. वेदांत, रोहन यांची तीन वर्षापासून मैत्री होती.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीची परिक्षा सुरू असल्यामुळे वेदांत व त्याची मैत्रिण वेदांतच्या सोमवारी रात्री उशिरापर्यंत घरी अभ्यास करत होते. अभ्यास झाल्यानंतर वेदांत मैत्रिणीला तिच्या घरी सोडविण्यासाठी दुचाकीवरून गेला. वेदांत व त्याच्या मैत्रिणीला घरी जाताना आरोपी रोहनने पाहिले. मैत्रिणीला सोडून वेदांत घरी जात होता. रस्त्यावर थांबलेल्या आरोपी रोहनने मला थोडे पुढे जायचे आहे. दुचाकीवरून मला सोडव, असे सांगितले. मोरया क्लासिक बिल्डींगसमोर आरोपी रोहनने वेदांतचा गळा चाकूने चिरला. दंडावर, कमरेवर चाकूने वार केल्याने वेदांत क्लासिक बिल्डींगच्या पायऱ्यावर निपचीत पडला. घाबरलेल्या आरोपीने घटनास्थळावरून धूम ठोकली. बराच वेळ झाला तरी वेदांत घरी आला नाही म्हणून त्याची आई वेदांतच्या मैत्रिणीच्या घरी निघाली होती. क्लासिक बिल्डींगच्या पायऱ्यावर वेदांत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. त्यांनी त्वरीत वेदांतला महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात त्याला दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

...Read More

V. S. News
आरटीओ पासिंगसाठी आलेल्या पीएमपीएमएल बसला आग

व्हीएस न्यूज - नवीन आरटीओ कार्यालय आवारात पासिंगसाठी आलेल्या एका पीएमपीएमएल बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.
स्वारगेट डेपोच्या आठ बस गाड्या आरटीओ पासिंगसाठी चिखली आरटीओ कार्यालयात आल्या होत्या. पाच गाड्यांची पासिंग झाली. (एमएच 14, सीडब्ल्यू 2008) ही बस पासिंगसाठी पुढे जात असताना अचानक इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याने बसच्या चालकाने तात्काळ बसमधील अग्निशमन उपकरणाचा वापर केला. मात्र, आग वाढल्याने चालकाने बसमधून उडी मारली. चालू बस मागच्या दिशेने गेली व एका भिंतीला फोडून खड्‌ड्यात घसरली. पिंपरी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये मोठे बसचे नुकसान झाले.

...Read More

V. S. News
आरोग्य विभागातील महिलांना टोपी व स्कार्पचे वाटप

व्हीएस न्यूज - पिंपळे निलख येथील कै.पांडुरंग धोंडीबा माकर प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्र. 28 मधील आरोग्य विभागातील महिलांना ऊन व पावसापासुन संरक्षण मिळण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच आरोग्य सहाय्यक दिपक माकर, आरोग्य निरिक्षक राकेश सौदाई यांच्या हस्ते टोपी व स्कार्पचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम पिंपळे सौदागर येथील आरोग्य कार्यलयात घेण्यात आला. यावेळी महिलांना कर्मचारी वर्गानी मिठाई वाटुन व केक कापुुन या महिलादिनाचा आनंद व्यक्त केला. सर्व कर्मचारी महिलांना आरोग्य विभागातील अधिकारी व कामगारांनी शुभेच्छा दिल्या.

...Read More

V. S. News
महिलांनी धाडसाने पुढे येऊन  स्पर्धात्मक कामाचा ठसा निर्माण करावा

व्हीएस न्यूज - महिलांनी सर्वच क्षेत्रात धाडसाने पुढे येऊन आपल्या स्पर्धात्मक कामाचा ठसा निर्माण करावा, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला मंचच्या संस्थापिका सौ सारिका संजय भेगडे यांनी केले.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने महिला बाल कल्याण समितीकडून जागतिक महिला दिनाच्यानिमित्त विविध कार्यकर्माचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी खेळ पैठणीचा, दुचाकी रॅली, शूर महिलांच्या जीवनावर एकांकिका, आदर्श महिला पुरस्कार आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून सारिका भेगडे या होत्या. यावेळीं शहरातील 20 महिलांना विविध क्षेत्रात समाजपयोगी कार्य केल्याबद्दल आदर्श गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी दीनदयाळ अत्योदय योजना राष्ट्रीय नागरी अभियाना अंतर्गत बालाजी महिला गट, श्री स्वामी समर्थ महिला बचत गट, महालक्ष्मी महिला बचत गट यांना प्रत्येकी रुपये 10 हजार फिरता निधीचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महिला बाल कल्याण समिती सभापती संध्या भेगडे यांनी केले. तर सारिका भेगडे, चित्रा जगनाडे, हेमेलता खळदे, वैशाली दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले. खेळ पैठणीच्या कार्यक्रमात प्रथम क्रमांक तेजश्री पाटील, व्दितीय प्रियदर्शनी हेंद्रे तर तृतीय क्रमांक जया लाटकर यांनी पटकाविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा जाधव यांनी केले. नियोजन उपसभापती प्राची हेंद्रे, समन्वयक सारिका लामखेडे यांनी केले. आभार नगरसेविका काजल गटे यांनी मानले.

...Read More

V. S. News
भोसरीत सत्संग सोहळ्याला भाविकांचा प्रतिसाद 

व्हीएस न्यूज - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संत निरंकारी सत्संग भवन भोसरी येथे सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चाकण, खेड, शिक्रापूर येथून 1500 हुन अधिक भक्त उपस्थित होते.

या कार्यक्रमात केंद्रीय प्रचारक निर्मल मनचंदा यांनी नारी शक्ती चे महत्व पटवून दिले. सदगुरूच्या गुरुसिखाची लक्षणे त्यांनी सांगितली. सदगुरुचा शिष्य हा नेहमी त्याचे स्मरण करीत असतो, तो शांत तर असतोच. परंतु जे कोणी त्याच्या जवळ येतात त्यांना हि तो शांत बनवण्याचं कार्य करीत असतो.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला गाडेकर यांनी केले. कार्यक्रमाला भोसरी सेक्टर मधील सर्व शाखांचे मुखी, सेवादल अधिकारी, प्रबंधक उपस्थित होते. भोसरी सेक्टर प्रमुख अंगद जाधव यांनी आभार मानले.

...Read More

V. S. News
वृध्द महिलेची सोन्याची चेन हिसकावली

व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एक लाख रूपयांची सोन्याची चैन हिसका मारून तोडून नेली. ही घटना जागतिक महिला दिनी सकाळी साडेआठच्या सुमारास अजमेरा कॉलनी येथे घडली.
याबाबत शैला सतिश शिराळकर (वय-76, रा. अजमेरा, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या गुरूवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पिंपरीतील सिनीयर ऑफिसर कॉ. सोसायटीजवळून पायी जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील 1 लाख 10 हजार रूपयांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारून तोडून नेली.
फौजदार विठ्ठल बढे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
थेरगावात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा खून

व्हीएस न्यूज - पूर्ववैमनस्यातून एका तरूणाचा नऊ जणांच्या टोळक्याने लोखंडी कोयता, चॉपरने डोक्यात, हातावर, पायावरण वार करून खून केला. ही घटना गुरूवारी रात्री साडेदहा वाजता थेरगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली. याप्रकरणी वाकड पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
रुपेश सुखबीर सोराती (वय, 24 रा. गणराज कॉलनी, आदर्शनगर, काळेवाडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व रूपेश यांच्यात पुर्ववैमनस्य होते. याच पूर्ववैमनस्यातून आरोपींनी रूपेश गुरूवारी रात्री साडेदहा वाजता घऱी जाताना थेरगावातील पाण्याच्या टाकीजवळ त्याला अडविले. आरोपींनी रूपेशवर लोखंडी कोयता, चॉपरने डोक्यात, हातावर, पायावर वार करून गंभीर जखमी केले. रूपेशला तात्काळ चिंचवड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, त्याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक सतीश माने अधिक तपास करीत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!