Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
वाल्हेकरवाडीतील गोळीबार किरकोळ कारणावरून  

व्हीएस न्युज-दारू पिऊन रस्त्याच्या मध्ये बुलेट आडवी लावून थांबलेल्या दोघांना बुलेट काढण्यास सांगितली. यावरून झालेल्या भांडणातून दोघांनी मोटार चालकाला मारहाण केली. चालकाने आपल्या साथीदारांना येऊन आल्यानंतर झालेल्या भांडणातून एका सराईत गुन्हेगारावर 20 मार्च रोजी गोळीबार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. दौला जबार नदाफ (वय-27, रा. पिंपळे-गुरव), अजमत शेख (वय-28, रा. वेताळनगर, चिंचवड), सद्दाम शौकत अली नदाफ (वय-27, रा. बिजलीनगर,चिंचवड) शिवाजी तानाजी सोलनकर (वय-21, रा. मोरयानगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सराईत गुन्हेगार जयवंत चितळकर याच्यावर गोळीबार झाला होता. त्याचा साथीदार निलेश कोळपे हा मारहाणीत जखमी झाला होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मार्च रोजी सराईत गुन्हेगार चितळकर व त्याचे साथीदार मकरंद वाल्हेकर, निलेश कोळपे शिवाजी चौकात दारू पिऊन बसले होते. त्यांची बुटेल भरस्त्यात आडवी लावली होती. यावेळी आरोपी दौला नदाफ याचा मामा अजमर शेख मोटारीने जात होते. त्यांनी हॉर्न देऊन बुलेट रस्त्यामधून काढण्यास सांगितली. यावरून चितळकर व कोळपे यांनी शेख यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यामुळे शेख यांनी आरोपी दौला नदाफ, सद्दाम नदाफ, शिवाजी सोलनकर यांना बोलवून घेत चितळकर व कोळपे यांना मारहाण केली. या वादावादीमध्ये चितळकर याने दौला नदाफ याच्यावर पिस्तुल रोखले. त्याचवेळी सद्दामने पिस्तुल हिसकावून घेवून गोळीबार केल्याने चितळकरच्या दंडाला गोळी लागली. दरम्यान, जखमी चितळकर व कोळपे यांनी याबाबत फिर्याद देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलीसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला. त्याच अंनुुषगाने पोलीसांनी तपास करत चारही आरोपींना अटक केली. निलेश कोळपे याला अटक करत त्याच्याकडून एक पिस्तुल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कामगिरी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, फौजदार रघुनाथ सोडनवर, पोलीस नाईक सुधाकर आवताडे, ऋषिकेश पाटील आदींच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
पिंपरीगावातील शशिकांत वाघेरे यांचे दुख:द निधन

व्हीएस न्यूज - पिंपरीगावातील शशिकांत सोपानराव वाघेरे पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज पहाटे निधन झाले, ते G.K.N. SINTER METALS PVT. LTD कंपनी मध्ये गेली ३० वर्षे काम करत होते. तसेच गेली १५ वर्षे ते कामगार युनियनचे पदाधिकारी होते, त्यांच्या मागे पत्नी दोन मुले एक मुलगी, नातवंडे व भाऊ असा परिवार आहे, त्यांचे वय ६२ वर्षे होते. आज सकाळी ११.०० वाजता पिंपरीगावातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचे ते चुलते होते. तर शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संतोष वाघेरे यांचे ते वडील होते. गुरूवार दि.२९ मार्च रोजी सकाळी पिंपरीगावातील पवना नदीच्या घाटावर दशक्रिया विधी होणार आहे.

...Read More

V. S. News
‘बबन’ चित्रपटात पिंपरी-चिंचवडची जान्हवी कांबीकर

व्हीएस न्यूज - शुक्रवारी प्रदर्शित होणा-या बबनया मराठी चित्रपटात पिंपरी चिंचवड मधील जान्हवी कांबीकर या बालकलाकाराला छोटीसी भुमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ख्वाडाया पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालेले दिग्दर्शक भाऊसाहेब क-हाडे यांचा बबनचित्रपट शुक्रवारी राज्यातील बहुतांश चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत व चित्राक्ष फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे बहुतांश शुटिंग रांजणगाव येथे झाले. कष्टकरी शेतक-यांच्या जीवनप्रवासावर आधारीत कथानक असलेल्या या चित्रपटात चिखली शरदनगर येथील अमृता विद्यालयात आठवी इयत्तेत असणारी जान्हवी कांबीकर हिने एमआयडीसीतील गरीब कामगार मुलीची भूमिका साकारली आहे. भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव हे मुख्य कलाकार आहेत. रांजणगाव येथे ३५ सेंटीग्रेड तापमानात भर उन्हात प्रथमच कॅमेरासमोर उभी राहिलेली जान्हवी म्हणाली मागील वर्षी बालेवाडी येथे या चित्रपटाच्या ऑडीशन्स झाल्या तेव्हा माझीभाऊकाकांनीनिवड केली. ज्याप्रमाणे आपण घरी आई वडीलांशी बोलतो अगदी तसेच चित्रपटातील संवाद माझ्याकडून भाऊकाकांनी वदवून घेतले. माझी भुमिका यात छोटीशी असली तरी प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी आहे. स्वप्निल पटेकर, नितीन वाघ हे देखील पिंपरी चिंचवड मधील कलाकार यात आहेत. कष्टकरी युवा शेतक-याच्या जीवनातील संघर्षमय वास्तव प्रवास आणि त्याला गुलाबी प्रेमाची झालर असे कथानक असलेल्या बबन चित्रपटातील स्थानिक कलाकारांचे काम पाहण्यासाठी प्रेक्षकांना शुक्रवारी २३ मार्चला चित्रपटगृहात जायला हवे असे ती म्हणाली.

...Read More

V. S. News
शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांना मेघडंबरी बसवा – अमित बच्छाव

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या अर्धकृती पुतळ्यास मेघडंबरी बसवा,अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.

अमित बच्छाव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी पेट्रोल पंम्पाच्या जवळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व चिंचवड पेट्रोल पंम्पाच्या जवळ आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांचे शिष्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. परंतु पुतळा परिसराची दुर्दशा झाली आहे. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे पालिकेचा आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तरी पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात यावी. तसेच सदर पुतळ्यांना उत्कृष्ठ प्रतीची, दर्जेदार, आकर्षक मेघडंबरी उभारण्यात यावी, असे बच्छाव यांनी म्हटले आहे.

...Read More

V. S. News
पुण्यात पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे

व्हीएस न्यूज - आता पुण्यात रस्त्यावर गाडी पार्क करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ही मंजुरी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली असून दुचाकीसाठी तासाला २ ते ४ रूपये तर चारचाकी गाडीसाठी १० ते २० रूपये तासाला मोजावे लागणार आहे.

संपुर्ण शहरभर पे अँन्ड पार्क योजना आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून शहराचे वेगवेगळे झोन त्यासाठी करण्यात आले आहेत. त्यामध्ये अ झोनमध्ये कमी वर्दळ पार्किंग, ब झोनमध्ये तीव्र वर्दळ आणि क झोनमध्ये अती तीव्र अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पार्किंगचे दर ठरवण्यात आले आहे. दुचाकीला रस्त्यावरील पार्किंगसाठी अ भागासाठी २ रूपये तासाला आकारण्यात येणार आहे. तर क भागासाठी ४ रूपये आकारण्यात येणार आहेत. तर चार चाकी वाहनांसाठी प्रति तासासाठी १० आणि २० रूपये अशा पध्दतीचे शुल्क आकारण्यात येणार आहेत. रात्री पार्किंगसाठी रात्री १० ते सकाळी ८ असा कालावधी असेल. एका दिवसासाठी १० रूपये आकारण्यात येतील. पुणे महापालिका प्रशासनाकडून शुल्क मोजनीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
आता डीझेल मिळणार घरपोच

व्हीएस न्यूज - आजकाल आपण गर्दी टाळावी म्हणून आवश्यक वस्तू ऑनलाईन खरेदी करण्यास प्राधान्य देतो. त्यात आता पेट्रोल पंपावरील गर्दी टाळण्याची सोय झाली असून ग्राहक आता घरपोच डीझेल मिळवू शकणार आहेत. सध्या ही सेवा पुणे शहरात सुरु झाली असून इंडिअन ऑइल कार्पोरेशन हि सेवा देत आहे. त्यांच्या ट्विटर अकौंटवर हि माहिती दिली गेली आहे.

काही दिवसापूर्वी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वाहनचालकांचा पेट्रोल पंपावर इंधन घेण्यासाठी जाणारा वेळ वाचवा म्हणून सरकार ग्राहकांना घरपोच इंधन पुरविण्याचा विचार करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार डीझेल घरपोच देण्याच्या सेवेला पेट्रोलियम व एक्सप्लोझीव सेफ्टी ऑर्गनायझेशनने मान्यता दिली आहे. पेट्रोलचा मानाने डीझेल कमी ज्वलनशील असल्याने सध्या डीझेल घरपोच दिले जात असल्याचे सांगितले जात आहे. कालांतराने पेट्रोलसाठीही हि सेवा सुरु केली जाणार आहे.

...Read More

V. S. News
नोकरी लावण्याच्या अमिषाने तरूणाची फसवणूक

व्हीएस न्यूज - नोकरी लावण्याच्या अमिषाने एका तरूणाची 60 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निगडी येथे नुकताच उघडकीस आला आहे. तरूणाचे वडील दिलीप चौधरी (वय-60, रा. वानवडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अण्णासाहेब पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला आरोपीने नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी जानेवारी ते मार्च 2017 या कालावधीत आरोपीने वेळोवेळी तरूणाकडून 60 हजार रूपये घेवून नोकरी न लावता फसवणूक केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
ज्येष्ठ महिलेच्या डोळ्यात मिरची पुड टाकून मंगळसुत्र हिसकावणारा गजाआड

व्हीएस न्यूज - पान टपरी चालक ज्येष्ठ महिलेच्या डोळ्यात मिरची पुड टाकून मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला वाकड पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी सकाळी साडेदहा वाजता डांगे चौक रोड, काळेवाडी येथे घडला.
याबाबत 70 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मणसिग सुरजसिग बायसठाकुर (वय-40, रा. सुदर्शन कॉलनी, पिंपळे-निलख) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची काळेवाडी येथे कुणाल पान नावाने टपरी आहे. टपरीवर आलेल्या आरोपीने त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी महिलेने त्याला प्रतिकार केल्याने मंगळसुत्र तुटून टपरीतच पडले. घाबरलेल्या आरोपींने धूम ठोकली. आरोपीला तात्काळ वाकड पोलीसांनी अटक केली.
सहाय्यक फौजदार एम. आर. स्वामी अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
किरकोळ कारणावरून सराईत गुंडावर गोळीबार

व्हीएस न्यूज - किरकोळ कारणावरून दोन सराईत गुन्हेगारांना मारहाण करत एकावर गोळीबार केला. ही घटना वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जयवंत भगवंत चितळकर (वय-30) आणि निलेश कोळपे (दोघेही रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. चितळकर याच्यावर चार तर कोळपे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. चितळकरला चिंचवड पोलिसांनी डिसेंबर 2017 पर्यंत तडीपार केले होते.
याबाबत चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी माहिती दिली. चितळकर आणि कोळपे वाल्हेकरवाडीमधील शिवाजी चौकात बसले होते. त्यांनी दुचाकी रस्त्यात पार्क केली होती. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना अडथळा येत होता. एका मोटार चालकाने रस्त्यात लावलेली दुचाकी काढण्यास सांगितले. यावरून मोटार चालक आणि जखमींमध्ये वाद झाला. काही वेळाने मोटार चालकाने
साथीदारांना घेवून येत कोळपे व चितळकर यांना मारहाण केली. चितळकर याच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्याच्या डाव्या दंडाला गोळी लागली आहे.
घटनास्थळावर परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनायक साळुंखे आदींनी भेट दिली. फौजदार आर. बी. सोडनवार अधिक तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
खडकीत एकाच दिवशी दोन ज्येष्ठ महिलांच्या सोनसाखळी हिसकावल्या

व्हीएस न्यूज - साप्ताहीक सुट्टीच्या दिवशी उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या येथिल परिसरात वर्दळीच्या ठिकाणी दोन ज्येष्ठ वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील 56 हजार रुपये किंमतीच्या सोन्याची चैन दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी हिसका मारुन पळवुन नेल्याची घटना घडली. मागील तिन महिन्यातील सोन साखळी चोरीची खडकी पोलिस ठाणे हद्दीतील ही चौथी घटना आहे.
मंगलम रामरत्तीनन (वय-67 रा.कॉंफी सेंटरा सोसायटी भाऊ पाटील रोड बोपोडी) व सुधा के.के.सोमन (वय -62 रा.गोयल शिंदे पार्क भाऊ पाटील रोड बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगलम या मैत्रीणीसह पावने पाच वाजता घरी जात असताना सोसायटी समोरील फुटपाथ शेजारील रस्त्यावरुन दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारुन पळ काढला. रात्री 8.35 वाजाता सुधा या घरी जात असताना सोसायटी समोर हे दोघे चोरटे दुचाकी वरुण आले व त्यांच्या गळ्यातील 16 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारुन पळवुन नेली. दोन्ही घटना या उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या भाऊ पाटील रोड येथिल वर्दळीच्या ठिकाणी घडल्या.
खडकी पोलिस ठाणे हद्दीतील सोनसाखळी चोरीची मगील तिन महिन्यातील ही चौथी घटना आहे. दुचाकीवरुन हेल्मेट घालुन सोनसाखळी चोरणाऱ्या या दोन चोरट्यांनी खडकी बोपोडी परिसरात धुमाकुळ घातला आहे. न पोलिसांना या आरोपींचा शोध घेण्याकामी अद्याप यश न आल्याने सर्वसामान्य सहीतवयोव्रुद्ध महिला वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक लक्ष्मण बोराटे या प्रकरणी म्हणाले की पोलिस आरोपींचा शोध घेतआहेत.

...Read More

V. S. News
चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाला धर्मदाय आयुक्तांचा हिरवा कंदील

व्हीएस न्यूज - चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाने सादर केलेले चेंजरी रिपोर्ट हे योग्य असून ते धर्मदाय आयुक्तांनी मंजुर केले आहेत. त्यामुळे चिंचवड शिक्षण प्रसारक कार्यकारी मंडळाला धर्मदाय आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. निळकंठ चिंचवडे यांनी निवेदनाव्दारे दिली आहे.
चिंचवडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाने सादर केलेले चेंजरी पोर्ट बोगस आहेत. मंडळाने कुठल्याही प्रकारची सुचना पत्र न देता बैठक घेतली. बैठकीला कोणीही हजर नव्हते. हजेरी पत्रक सुचनेची पोच आणि एनओसी या सर्व कागद पत्रांवर खोट्या सह्या करून चेंजरी रिपोर्ट केल्याची तक्रार सुरेश धोंडींबा चिंचवडे, सुर्यकांत नामदेव चिंचवडे, मुरलीधर सिताराम चिंचवडे, नानासाहेब बाबुराव चिंचवडे यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे सन 2010 मध्ये गेली होती. परंतू, सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी या सर्व प्रकरणाची शहानिशा करून चेंजरी रिपोर्ट हे योग्य असून ते मंजुर केले आहेत. त्यामुळे चिंचवड प्रसारक कार्यकारी मंडळाला धर्मदाय आयुक्तांनी एक प्रकारे हिरवा कंदील दिला आहे.
मंडळाच्या वतीने ऍड. मनोज वाडेकर, ऍड. संजय भळगट यांनी काम पाहिले,अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. निळकंठ चिंचवडे यांनी निवेदनाव्दारे दिली आहे.

...Read More

V. S. News
तृतीयपंथीयाला नाकारला पुण्यातील मॉलमध्ये प्रवेश

व्हीएस न्यूज - गुढीपाडव्याच्या सणानिमित्त खरेदीसाठी पुण्यातील नगर रस्त्यावरील प्रसिद्ध फिनिक्स मॉलमध्ये गेलेल्या तृतीयपंथी सोनाली यांना रोखण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मॉलच्या महिला सुरक्षा रक्षकाने आपल्याला मॉल प्रशासनाच्या नियमावलीत तसा आदेश असल्याचे सोनाली दळवी यांनी सांगितले. तसेच या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

सोनाली म्हणाल्या, फिनिक्स मॉलमध्ये मी मित्रासोबत गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी गेले होते. प्रवेशद्वाराजवळील महिला सुरक्षारक्षकाने मॉलमध्ये जात असताना मला पाहताच माझी तपासणी करण्यास टाळाटाळ केली आणि मला थांबण्यास सांगून तिने दुसऱ्या महिला सुरक्षारक्षकाला बोलावून घेतले. माझी हात न लावता त्या महिला सुरक्षारक्षकाने तपासणी करून मला प्रवेश नाकारला. प्रवेश नाकारण्याचे कारण विचारले असता आमच्या मॉल व्यवस्थापन पॉलिसीमध्ये तृतीयपंथाच्या व्यक्तींना प्रवेश न देण्यास सांगितले आहे, असे मला सांगण्यात आले.

सोनाली या प्रकारावर नाराजी व्यक्त करताना म्हणाल्या, मॉलमध्ये प्रवेश देण्यापासून मला रोखण्यात आले. मला याचे दुखः झाले असून या पुढील काळात अशा घटना घडू नयेत, यासाठी पाठपुरावा करणार. दरम्यान, याबाबत मॉलचे व्यवस्थापक सी. पी. पोरवाल म्हणाले, यापूर्वी आम्हाला तृतीयपंयाबाबत वाईट अनुभव आले होते. तसेच आम्ही त्यांना सुरक्षेसाठीच्या कारणास्तव थांबवून ठेवले होते. त्यांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!