Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
पुणे- लोणावळा लोकलमधील तांत्रिक बिघाडामुळे चार तास रेल्वे सेवा विस्कळीत

व्हीएस न्यूज - पुण्यावरुन लोणावळाकडे जाणाऱ्या सकाळी सहा वाजताच्या लोकलमध्ये सोमवारी खडकी येथे तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे सुमारे चार तास रेल्वे सेवा विस्कळीत झाली. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल चांगलेच झाले.

सकाळी 6 वाजुन 1 मिनीटाने पुण्यावरुण लोणावळाकडे जाणारी लोकल रेंजहिल्स रेल्वे बोगद्याजवळ आली. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड निर्मांण झाला. लोकलमधील प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्मांण झाले. खडकी लोहमार्ग पोलिस व आरपीएफचे पथक तातडीने घटनास्थळी आले. घटनेची माहिती घेत त्यांनी पुणे रेल्वे विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन मदत यंत्रणा बोलावुन घेतली.

संबधीत रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रमानंतर बिघाड निर्माण झालेली लोकल खडकी रेल्वे स्थानकातील प्लॅंटफॉंर्मवर आणली. त्यानंतर लोकलमधील प्रवाशी प्लॅंटफॉंर्मवर थांबले. 45 मि.उशिराने पुण्यावरुण मुंबईकडे जाणारी सिंहगड एक्सप्रेस रेल्वे स्थानकात आल्यावर लोकल मधिल सर्व प्रवाशांनी सिंहगडद्वारे आपला पुढील प्रवास केला. रेल्वेच्या वतिने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणुन सिंहगड सहीत नांदेड पनवेल एक्सप्रेस इंटरसिटी व प्रगती एक्सप्रेस सर्व स्थानकावर थांबवुन प्रवाशांची होणारी गैरसोय दुर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

लोकल बिघाडामुळे पुण्यावरुण लोणावळा व तळेगांवकडे जाणाऱ्या लोकल 40 ते 45 मिनीटे ऊशिराने धावु लागल्या. लांबपल्ल्याच्या रेल्वे ही उशिराने धावत होत्या. मुंबईवरुण पुण्याकडे जाणाऱ्या इंद्रायणी इंटरसिटी व डेक्कन एक्सप्रेस ही 30 ते 40 मिनीट उशिराने धावु लागल्या. लोणावळा पुणे लोकल दिड तास उशिराने धावली. सकाळी कामावर जाणारे चाकरमानवर्ग व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थीयांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र मुंबईवरुण पुण्याला जाणाऱ्या इंद्रायणी व इंटसिटी एक्सप्रेस या सर्व रेल्वे स्थानकावर थांबवुन लोकल प्रवाशांना प्रवास करण्याची सुविधा रेल्वेच्या वतिने उपलब्ध करुन दिल्याने रेल्वे प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला. सकाळी 10 वाजता विस्कळीत झालेली रेल्वे सेवा पुर्वपदावर आणण्याकामी रेल्वे प्रशासनाला अखेर यश आले. तब्बल चार तास रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

रेल्वे सुत्राने दिलेल्या माहितीनुसार लोकलमधील ब्रेकमध्ये काही बिघाड झाल्यामुळे लोकल काही वेळ थांबली गेली. नंतर लोकल खडकी रेल्वे स्थानक येथिल प्लॅंटफॉंर्मवर तीन तास थाबवुन ती दुरुस्त झाल्या नंतर पुढे रवाना करण्यात आली. दरम्यान खडकी रेल्वे स्थानकातील प्लॅंटफॉंर्म नंबर दोनवर दुरुस्तीकामी लोकल थांबविल्याने मागुन आलेली सिंहगड एक्सप्रेस ही मधल्या रेल्वे रुळावर थांबवण्यात आली. त्यामुळे सिंहगड एक्सप्रेसमध्ये चढण्या करिता प्लॅंटफॉंर्म नसल्याने प्रवाशांना चांगलीच तारेवराची कसरत करावी लागली.

...Read More

V. S. News
देहूरोड मनसे शहराध्यक्षाला गावठी पिस्तूलासह अटक

व्हीएस न्यूज - देहूरोड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षाला गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह पुणे ग्रामीण पोलीस गुन्हे अन्वेषन शाखेने किवळे येथील मुकाई चौकातून रविवारी अटक केली. यामुळे देहूरोड पसिरात एकच खळबळ उडाली आहे.

विनोद इरान्ना भंडारी (वय-34 वर्षे, रा. किवळे देहूरोड), असे अटक शहराध्यक्षाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकाई चौक येथे एका जवळ बेकायदा शस्त्र असल्याची माहिती खबऱ्यामर्फत मिळाली. आरोपी भंडारी याला पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे 1 पिस्तूल व 1 जिवंत काडतुस जप्त केली. विनोद भंडारी याने फेब्रुवारीमध्ये झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची किवळे प्रभागातून निवडणूक लढवली होती. यामध्ये त्याचा पराभव झाला होता. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
एटीएममध्ये पैसे काढण्यास मदतीचा बहाणा करून तरूणाला पाच लाखांचा गंडा

व्हीएस न्यूज - एटीएममध्ये पैसे काढण्यास मदतीचा बहाणा करून दोन भामट्यांनी एटीएमची आदला-बदल केली. कार्डव्दारे विविध एटीएममधून पैसे, वस्तूची खरेदी करून तरूणाची तब्बल पाच लाखांची फसवणूक केली. हा प्रकार चिंचवड येथे दि. 13 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत घडला. ओंकार टेकाळे (वय-27,रा. चिंचवड) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकाळे यांचे आजोबांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी फिर्यादी व त्यांच्या मामी गावी जाणार होते. मामीने त्यांच्या आर्मीतील पती बालाजी गायकवाड यांचे एटीएम फिर्यादीला देवून एटीएममधून दहा हजार रूपये काढून आणण्यास सांगितले. टेकाळे यांनी चिंचवडमधील पी. एन. जी. ज्वेलर्स समोरील एस. बी. आय बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. टेकाळे यांना पैसे काढण्यास अडचण येत असल्याचे पाहून एटीएमबाहेर उभ्या असलेल्या दोन भामट्यांनी त्यांना मदतीचा बहाणा केला. एटीएम कार्डची आदलाबदल करून भामट्यांनी त्यांच्याकडील एटीएम टेकाळे यांना दिले. त्या एटीएमव्दारे विविध एटीएममधून पैसे काढले. तसेच विविध ठिकाणाहून साहित्याची खरेदी करून पाच लाख 5 हजार 689 रूपयांची फसवणूक केली. फौजदार पी. डी. महाले अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
दंगलीतील सहभागाबद्दल मोदींना पंतप्रधानपद बक्षीस - भाई वैद्य

व्हीएस न्यूज - गुजरातमधील दंगलीतील सहभागाबद्दल नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधानपद बक्षीस म्हणून दिले आहे. त्यामुळे सरकारी धोरणांचा समाजावर विपरीत परिणाम होत असल्याची परखड टीका ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केली. ‘हम समाजवादी संस्थाए’तर्फे आयोजित अखिल भारतीय समाजवादी महिला संमेलनात ते बोलत होते.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर म्हणाल्या, की सामाजिक समस्या, निसर्गाच्या विरोधात जाऊन होणार्‍या विकास प्रकल्पांसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये महिलांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अनेक संघर्षांमध्ये महिल्या आक्रमक राहिल्या आहेत. देशभरात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना यामध्ये महिला शेतकरी दिसून येत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. पण त्यांना त्या आत्मविश्‍वासाची जाणीव करुन दिली पाहिजे. धर्म, रूढी परंपरांच्या नावाने होणार्‍या पिळवणुकीच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी महिलांना जागृत करायला हवे. अन्यायाविरोधात लढण्यासाठी महिलांचा ढाल नव्हे तर तलवार म्हणून वापर झाला पाहिजे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे म्हणाल्या, की महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात, तेव्हा महिलांना सुधारायची, आणि मानसिकता बदलायची भाषा केली जाते. मात्र पुरुषी दृष्टी बदलायला हवी यावर कुणी परिश्रम घेत नसल्याचे त्यांनी निरीक्षण नोंदविले. या कार्यक्रमाला सुनिती सु. र., डॉ. मनीषा गुप्ते, रझिया पटेल आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
ओंकार इंजिनिअरिंग कंपनीला आग, मोठ्या प्रमाणात नुकसान

व्हीएस न्यूज - चिंचवड मोहननगर येथील ओंकार इंजिनिअरिंग कंपनीला शनिवारी सायंकाळी आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.

मोहननगर येथील ओंकार इंजिनिअरिंग या कंपनीत मशीनचे सुटे भाग बनविण्यात येतात. कंपनीने मागील काही महिन्यांपूर्वी कंपनीचे उत्पादन युनिट इतर ठिकाणी हलविले आहे. मोहननगर येथील ही कंपनी मागील दोन महिन्यांपासून बंद होती. आज अचानक पाचच्या सुमारास कंपनीत आग लागली. कंपनी बंद असल्याने कंपनीत कामगार नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत कंपनीचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कंपनीत ऑईलचे डबे होते, मात्र तिथपर्यंत आग न पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

...Read More

V. S. News
शाळांमध्ये सॅनीटरी नॅपकीन डिस्पोजेबल मशिन बसवा - गिरीजा कुदळे

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत असणा-या अनुदानीत, विनाअनुदानीत, खाजगी, सरकारी सर्व शाळांमध्ये सॅनीटरी नॅपकीन डिस्पोजेबल मशिन बसवावे. यासाठी सर्व शाळा व्यवस्थापनांना सक्ती करावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. तसेच पिंपरीत महात्मा फुले पुतळ्यामागे पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय स्मारकात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत संग्रहालय उभारावे आणि याठिकाणी शहरातील हुशार, गरजू, महिला, मुलींना उच्चंशिक्षणासाठी व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल असे सुसज्य ग्रंथालय उभारावे. महानगरपालिका हद्दीत आय टू आर (Industrial to Ressidence) अंतर्गत ताब्यात असणा-या जागेंवर महिलांसाठी उद्योग, प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र उभारावे. तसेच स्मारकाच्या दर्शनी भागात सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारावा. अशीही मागणी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी केली आहे. गुरुवारी (दि. 30 नोव्हेंबर 17) आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यालयात दुपारी झालेल्या बैठकीत मागणीचे पत्र गिरीजा कुदळे, बिंदू तिवारी, संगीता कळसकर, मीना गायकवाड, हुरबानो शेख यांनी आयुक्तांना दिले.

...Read More

V. S. News
दिव्यांग व्यक्तींना सामान्य जीवन जगता आले पाहिजे - आ. गौतम चाबुकस्वार

व्हीएस न्यूज - दिव्यांग व्यक्तींना सर्व सामान्य व्यक्तींसारखे जीवन जगता आले पाहिजे. यासाठी कामायनी आणि श्री विश्व श्रीराम सेना सारख्या संस्था कार्य करतात. अशा संस्थांना शासनाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत आणखी मदत मिळाली पाहिजे. म्हणून आमदार या नात्याने मी प्रयत्न करील असे आश्वासन आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी दिले. श्री विश्व श्रीराम सेना आणि निगडी प्राधिकरण येथील कामायनी प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दिव्यांग सप्ताहाचे आणि आरोग्य, तपासणी शिबीराचे उद्‌घाटन आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या शनिवारी (दि. 02 डिसेंबर 17) हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमित गावडे, श्री विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता, प्रमोद गुप्ता, अक्रम शेख, विनोद गुप्ता, अभय भंडारे, स्टार हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रमोद कुबडे, प्राचार्या हेमा डेरे, रमेश वाघेरे, सुनिल कांबळे, शबनम सैय्यद, डॉ. सौरभ चावरे, डॉ. सायली सावंत, श्रेया चावरे, भाऊसाहेब कांबळे, सुनिता फुलसुंदर, संगिता कुमटेकर, संध्या कवाष्टे आदी उपस्थित होते.

स्वागत प्रास्ताविक करताना श्री विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता म्हणाले की, दिव्यांग मुला, मुलींना या ठिकाणी असणा-या कार्यशाळेतून व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हि मुले भविष्यात स्व:ताचा उदर निर्वाह सक्षमपणे करु शकतात. त्यांच्यातील आत्मविश्वास आणखी वाढला पाहिजे. यासाठी त्यांना समाजातील सर्व थरातून मदत आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था, उद्योजक तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या सीएस्‌आर फंडातून मदत करावी. त्यासाठी आपण प्रयत्न करु असे लालबाबू गुप्ता म्हणाले. या आरोग्य तपासणी शिबारीत कामायनी शाळेतील शंभर दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग यांची नेत्र तपासणी, रक्तदाब व मधूमेह तपासणी, दंत रोग चिकित्सा आणि मौखिक तपासणी करण्यात आली. व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन प्राचार्या हेमा डेरे, आभार भाऊसाहेब कांबळे यांनी मानले.

...Read More

V. S. News
लग्नातील जेवणातून दहा जणांना विषबाधा

व्हीएस न्यूज - देहूरोड परिसरातील किवळे येथील एका लग्न समारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. यातील १० जणांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. रूग्णांमध्ये तीन महिला, तीन मुले आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील धर्मराज मंगल कार्यालयात कांबळे आणि बनसोडे कुटुंबीयांमध्ये रविवार लग्नकार्य होते. समारंभातील जेवणानंतर काही पाहुणे मंडळींना जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरू झाला. यात १० जणांचा समावेश होता. ही विषबाधा बासुंदीमधून झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. इतरांची प्रकृती स्थिर आहे. ही विषबाधा केवळ शेवटच्या पंगतीत जेवणाऱ्या मंडळींना झाल्याचे समोर आले आहे.

...Read More

V. S. News
व्यसन मुक्तीबाबत माध्यमांद्वारे जनजागृती व्हावी – महापौर नितीन काळजे…

व्हीएस न्यूज - मौखिक आरोग्य हि काळाची गरज बनली आहे. व्यसनाधिनता ही तोंडाच्या विविध आजारांना निमंत्रण देत असते. नागरिकांनी शासनाच्या उपक्रमाचा लाभ घेऊन वेळीच मौखिक आरोग्य तपासणी करुन घ्यावी, तसेच मोफत मुख आरोग्य तपासणी मोहिमे बरोबरच तंबाखू, गुटखा, सिगारेट आदी आमली पदार्थांच्या व्यसन मुक्तीबाबत मोठ्या प्रमाणात विविध माध्यमांद्‌वारे शहरात जनजागृती करण्यात यावी. असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने दि.०१ डिसेंबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ अखेर शहरात राबविण्यात येणा-या मुख आरोग्य तपासणी मोहिमेचे उद्‌घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. संततुकारामनगर, पिंपरी येथील यंशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये शनिवारी झालेल्या या कार्यक्रमास माजी नगरसदस्या भारती फरांदे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख, ज्येष्ठ दंततज्ञ तथा दंतशैल्य चिकित्सक डॉ. यशवंत इगळे, ज्येष्ठ सर्जन डॉ. संजय पाडाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय दादेवार, डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ. राजेश गोरे, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. तृप्ती सागळे, समाजसेवक एम.ए. हुसेन, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता महादेव बोत्रे, मेट्रन मोनिका चव्हाण, फरांदे डेंन्टल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक तथा ज्येष्ठ दंततज्ञ डॉ. माऊली फरांदे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय देवधर, डॉ. अनु गायकवाड, डॉ. मनिषा गरुड, डॉ. अभिजित फरांदे, डॉ. मदन साळवे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी आदी उपस्थित होते. महापौर नितीन काळजे म्हणाले, नागरिक मौखिक आरोग्याला फारसे गांभीर्याने घेत नाहित. त्यामुळे मोठ्या आजाराला बळी पडण्याचा धोका निर्माण होतो. कर्करोगावरील उपचार पध्दती आता आधुनिक झाल्या असल्यातरी आजाराचे वेळीच निदान होणे महत्वाचे असते. आधुनिक जिवन शैलीमुळे तसेच पाश्चात्य संस्कृतिचा अनावश्यक रित्या अवलंब होत असल्याने आजचे काही युवक आमली पदार्थांच्या व्यसनाधिन होत असताना दिसत आहेत. त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी प्रबोधनपर जनजागृती करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने शहरात राबविण्यात येणा-या मोफत मुख आरोग्य तपासणी मोहिमेमध्ये तपासनी करुन घेण्यासाठी वयाची अट न ठेवता सर्वासाठी हि मोहिम राबविण्यात यावी. महापालिकेच्या आठ प्रभागामध्ये तसेच मनपा रुग्णालये व दवाखाण्यात हि मोहिम घेण्यात येणार आहे. सर्व मनपा कर्मचारी, अधिकारी व नागरिक यांची या मोहिमे अंतर्गत तपासणी करण्यात येणार आहे.शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कुटुंब प्रमुखा पासून ख-या अर्थाने व्यसन मुक्ती झाली पाहिजे. कॅन्सरची भिती न बाळगता लवकर उपचार करुन घेतल्यास आयुष्य नक्कीच वाढेल. या मोफत मुख आरोग्य तथा दंत चिकित्सा तपासणी मोहिमेचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन यावेळी त्यांनी केले. दंतशैल्य चिकित्सक डॉ. यशवंत इंगळे म्हणाले, मनुष्य किती हि तंदुरुस्त असला तरी मुख आरोग्य तपासणी केल्यावर तो कोणत्या तरी कारणास्तव मुख रोगाने ग्रस्त झालेला आढळतो. मुख तपासणीअंती मुखाच्या इतर आजाराचे आकलन होते. तंबाखू, गुटखा, सिगारेट, आदी तत्सम आमली पदार्थ सेवन केल्याने तसेच काही व्हायरस मुळे मुखकर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. १०-१५ वयोगटापासून मुले तंबाखू खाताना दिसतात. पान, तंबाखू, बिडी, सिगारेट, गुटखा इत्यादी खाणा-यांना यापासून परावृत्त करण्यासाठी सर्वांनी कार्य केले पाहिजे. असे ते यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी मुख रोगाचे स्वरुप, व्याप्ती, प्रकार व मुख रोग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी व मुख रोग झाल्यास त्यावरील इलाज याबाबतचे सादरीकरणही केले. ज्येष्ठ दंततज्ञ डॉ. माऊली फरांदे म्हणाले, मौखिक आजार हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतात. त्यामुळे या मोहिमेचा फायदा सर्वांना होणे गरजेचे असून डॉक्टरांनी तपासणी करताना रुग्णाच्या वयाची अट शिथिल करावी. डॉ. मदन साळवे म्हणाले, आजार बळावला की त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. मौखिक आजाराचे वेळीच निदान झाले आणि उपचार केले तर रुग्ण बरा होऊ शकतो. नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत सतर्क असायला पाहिजे. डॉ. संजय पाडाळे, व अनु गायकवाड डॉ. यशवंत इंगळे यांनी मौखिक तपासणी, शोध, निदान व उपचार करण्यासंदर्भात सर्व डॉक्टर्स आरोग्य़ कर्मचारी व नागरिक यांना मोलाचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.लक्ष्मण गोफणे, डॉ. अभयचंद्र दादेवार, सलिम इनामदार व मेट्रन मोनिका चव्हाण यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. यशवंत इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख यांनी मानले.

...Read More

V. S. News
तरुणाला मारहाणकरून लुटणारी टोळी गजाआड

व्हीएस न्यूज – उपचारासाठीचे पैसे बँकेत भरण्यासाठी जाणाऱ्या एका तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. प्रमोद व्यंकटेश तेलगु, वय-१९, रा-शीतळा नगर देहुरोड, उमेश आदीनारायण बोया, वय-१९, योगेश धनराज द्रविद, वय- २२ असे आरोपींचे नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ७३ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली ९० हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची पल्सर २२० क्रमांक एम.एच.१४/ एफ.डब्लू.४४६० निळ्या रंगाची गाडी जप्त केली आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी उमेश शिवाजी कदम वय- ३०, रा.संत सावता माळी मंदिराजवळ भुमकर चौक, वाकड, हा तरुण शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांच्या स्प्लेंडर मोटार सायकल एम.एच.१२/ जे.डब्लु. ७१८७ वरुन सुर्या हॉस्पीटलची ३ लाख २३ हजार १०७ रुपयांची रोख व एक चेक बँगेत घेवून भरण्यासाठी एसबीआय व एचडीएससी बँक बाणेर रोड, पुणे येथे जात असताना सकाळी १०.३० वाजता आयकॉन टॉवर बिल्डींगमधील एसबीआय बँक शाखेसमोर पायऱ्यांवर आरोपींनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कमेसह बॅग पळवून नेली होती. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

या घटनेचा तपास सुरु असताना पोलिसांनी आरोपींना चतुःश्रृंगी, हिंजवडी, वाकड या परिसरात पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता आरोपींकडून २ लाख ७३ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर गाडी जप्त केली. दरोडे प्रतिबंधक पथकातील पोलिस हवालदार पाटील, सय्यद, काटम, पोलिस नाईक कदम, गायकवाड, सुर्वे, गाणते, जाधव यांनी ही कारवाई केली. घटनेचा अधिक तपास चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे करीत आहेत.

...Read More

V. S. News
महिलेची सोनसाखळी हिसकावली

व्हीएस न्यूज - पतीसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील 58 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसका मारून तोडून नेली. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजता स्पाईन रोड चिखली येथे घडला.

हेमंतकुमार नारायणन (वय-39, रा. चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या पत्नीसोबत गुरूवारी सायंकाळी स्पाईन रोडवरून जॅग्वार कंपनीसमोरून जात होते. पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील 58 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारून तोडून नेला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
बांधकाम साईटवरील हौदात पडून बालकाचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा

व्हीएस न्यूज - बांधकाम साईटवरील उघड्या हौदात पडून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना रहाटणी येथे 26 नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी ठेकेदारास दोघांवर वाकड पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुष शंकर पवार (वय-3) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ठेकेदार संग्राम होकर्णे (रा. भोसरी), महेश पवार (रा. रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी युवराज धोत्रे (वय-47, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची रहाटणी येथे बांधकाम साईट सुरू आहे. या साईटवरील पाण्याच्या उघड्या हौदामध्ये पडून आयुषचा 26 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. ठेकेदारांनी निष्काळजीपणा केल्याचे पोलीस तपास निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीसांनी ठेकेदारासह दोघांवर मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!