Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
अभियंता संजय कुलकर्णीवर कारवाई करा - रमेश वाघेरे

व्हिएस न्यूज- पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेतील पर्यावरण विभागात काम करणाऱ्या एका महिला कर्मचारी बरोबरच छेडछाडीचा प्रकार झाला होता. यामध्ये दोषी असतानाही पर्यावरण विभागातील अभियंता संजय कुलकर्णी याला इतक्या दिवसापासून प्रशासनाकडून पाठीशी घालण्यात येत होते. मात्र, आता महापालिकेच्या विशाखा समितीने अभियंता कुलकर्णी याला दोषी ठरवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी आयुक्त हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, संजय कुलकर्णी यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना निलंबीत करावे, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
...Read More

V. S. News
गुजरात, हिमाचल प्रदेशमधील विजय म्हणजे मोदींवरील विश्वास - मुख्यमंत्री फडणवीस

व्हीएस न्यूज - गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल म्हणजे सामान्य माणूस मोदींच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचा पुरावा आहे, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते सोमवारी नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतील यशाबद्दल भाजप कार्यकर्त्यांचे आणि सामान्य जनतेचे आभार मानले.

गुजरात विधानसभा निवडणुकीत विरोधात वारे वाहत असतानाही राज्यातील सत्ता टिकवण्यात भाजपाने यश मिळवले आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून आणण्यात भाजपाना यशस्वी झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. "विकास आणि विश्वासाला गुजराती जनतेने पाठिंबा दिला आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला विजय हा जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाला आहे." असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
केंद्र आणि गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने गुजरातमधील आपली सत्ता राखण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यावर सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने मिळवलेली आघाडी मोडून काढत भाजपाने 100 हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. सध्या भाजपाने एकूण 88 जागांवर विजय मिळवला आहे. तर 12 ठिकाणी भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसने 66 जागा जिंकल्या असून, 14 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती. दरम्यान, मतमोजणीला सुरुवात झाल्यावर भाजपाची सुरुवातीची आघाडी मोडीत काढत काँग्रेसने मुसंडी मारल्याने राज्यात मोठा उलटफेर होण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र जसजसे कल स्पष्ट होऊ लागले तशी भाजपाची आघाडी वाढत गेली.

...Read More

V. S. News
पेट्रोल, वीज, घरखरेदी ‘जीएसटी’च्या फेऱ्यात

व्हीएस न्यूज - नव्या अप्रत्यक्ष कराच्या तूर्त कक्षेबाहेर असलेल्या पेट्रोल, वीज तसेच घर खरेदी – विक्रीचे व्यवहार वस्तू व सेवा कर (जीएसटी) कक्षेत आणण्याची तयारी सुरू आहे. याविषयक परिषदेच्या पुढील बैठकीत निर्णय होण्याचे संकेत परिषदेचे एक सदस्य व बिहारच्या अर्थमंत्र्यांनी दिले आहेत.

‘फिक्की’ या उद्योग संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेल्या बिहारचे अर्थमंत्री सुशील मोदी यांनी सांगितले की, नजीकच्या काळात तेल व वायू, ऊर्जा, गृहनिर्माण आदी क्षेत्र वस्तू व सेवा कराच्या जाळ्यात आणले जातील. याबाबत वस्तू व सेवा कर परिषद तिच्या पुढील बैठकीमध्ये निर्णय घेईल. ही प्रक्रिया वस्तू व सेवा करविषयक नियमातील कोणत्याही बदलाविना होईल, असे स्पष्ट करत मोदी यांनी मात्र नेमका निर्णय केव्हा घेतला जाईल, हे सांगितले नाही. पेट्रोलियम पदार्थाना नव्या कररचनेत आणताना त्याचा सर्वाधिक करटप्पा असेल, असेही मोदी म्हणाले. शिवाय राज्यांना त्यावर अधिभार लावण्यास मुभा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या पेट्रोल, डिझेल तसेच या गटातील अन्य पदार्थावरील कराच्या माध्यमातून केंद्र तसेच राज्य सरकारांना एकूण महसुलाच्या ४० टक्क्यांपर्यंतचा वाटा मिळतो.

वस्तू व सेवा करप्रणालीची १ जुलै २०१७ पासून अंमलबजावणी झाली आहे. सध्या शून्य, पाच, १२, १८ व २८ टक्के अशा पाच स्तरावरील वस्तू व सेवा कर विविध २,००० हून अधिक वस्तूंवर आकारला जात आहे. पैकी १२ व १८ टक्क्यांचा एकच स्तर करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र महसूलवाढीनंतरच हा निर्णय होणार असल्याचे केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. गुरुवारी सुशील मोदी यांनीही याबाबत पुनरुच्चार केला. सध्याचा २८ टक्के कर स्तर २५ टक्के करण्याचे सुतोवाच जोड त्यांनी यावेळी केले. बिहार राज्याचे अर्थमंत्री असलेले मोदी हे परिषदेत सहभागी विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटाचे प्रमुख आहेत. जुलैपासून वस्तू व सेवा करप्रणाली लागू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर या माध्यमातून होणारे कर संकलन गेल्या काही कालावधीत रोडावले आहे. तसेच या करांतर्गत विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्याही कमी होत आहे. परिषदेने अनेक वस्तू आधीच्या तुलनेत कमी कराच्या टप्प्यात आणून ठेवल्या आहेत.

...Read More

V. S. News
डेबिट कार्डावरील दोन हजार रुपयापर्यंतचे विनिमय शुल्करहित

व्हीएस न्यूज - डेबिट कार्ड, भिम तसेच यूपीआय अ‍ॅपद्वारे होणारे २००० रुपयापर्यंतच्या विनिमय व्यवहारांवर शुल्क न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ग्राहक तसेच व्यापाऱ्यांना याचा लाभ दोन वर्षांसाठी घेता येणार असून यापोटी बँकांना होणाऱ्या २५१२ कोटी रुपयांच्या भरपाईची तयारी सरकारने दर्शविली आहे. निश्चलनीकरणानंतर थंड पडलेल्या रोकडरहित व्यवहारांना नव्याने चालना देण्यासाठी शुक्रवारी डेबिट कार्ड तसेच अ‍ॅपद्वारे होणाऱ्या निधी व्यवहारांकरिता सरकारने ग्राहक तसेच व्यापाऱ्यांना हा शुल्क दिलासा दिला. ग्राहकांच्या डेबिट कार्डाद्वारे व्यापाऱ्यांना व्यवहार करण्यासाठी बँकांकडून मशीन (पीओएस) दिल्या जातात. त्यासाठीचे शुल्क (एमडीआर) बँका व्यापाऱ्यांकडून प्रत्येक व्यवहारामागे आकारतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपरोक्त माध्यमातून होणारे २००० रुपयेपर्यंतच्या व्यवहारांवर शुल्क लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जानेवारी २०१८ पासून याची अंमलबजावणी दोन वर्षांसाठी करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. शुल्कसूटचा लाभ ग्राहक तसेच व्यापाऱ्यांना होणार असून बँकांना होणारे २५१२ कोटी रुपयांचे नुकसान सरकार भरून देणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने पाचव्या द्विमासिक पतधोरणाद्वारे या व्यवहाराकरिता वार्षिक २० लाख रुपयांची उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकरिता ०.४० टक्के शुल्क लागू केले होते. तसेच व्यवहारामागे २०० रुपयांची मर्यादाही निश्चित करण्यात आली. २० लाख रुपयांवरील उलाढाल असलेल्यांना ०.९० टक्के शुल्क तसेच १००० रुपयांची मर्यादा घालून देण्यात आली होती. डेबिट कार्डाद्वारे गेल्या वित्त वर्षांत ३.३ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. नोव्हेंबर २०१६ मधील ३५,२४० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये ४७,९८० कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते.

...Read More

V. S. News
इव्हीएममध्ये फेरफार अशक्य : मुख्य निवडणूक आयुक्त

फेरफारचे आरोप करणे चुकीचे

व्हीएस न्यूज - इव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांकडून होत असतानाच मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. जोती यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. इव्हीएममध्ये फेरफार अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांमधील मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. जोती यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. जोती म्हणाले, इव्हीएममध्ये फेरफार झालेली नाही. इव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर आम्ही त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. गुजरातमध्ये व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात आला, कोणाला मत दिले हे मतदारांना समजते,त्यामुळे फेरफारचे आरोप करणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले. अहमदाबादस्थित एका कंपनीचे १५० अभियंते मतदान यंत्रांत फेरफार करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी रविवारी केला होता. पाच हजार मतदानयंत्रांत फेरफार करण्याचा कट असून देवाने तयार केलेल्या मानवी शरीरात बदल करता येतात तर मग मानवानेच तयार केलेल्या मतदानयंत्रात का बदल करता येणार नाहीत, अशी ट्विप्पणी हार्दिक यांनी केली होती. यापार्श्वभूमीवर जोती यांनी हे विधान केले आहे.

दरम्यान, गुजरातचा गड राखण्यात भाजपला यश मिळाले असले तरी त्यांना १५० जागांचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला हादरा देत भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. हिमाचलमध्ये भाजप ४३ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस पक्ष २२ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय, ८ जागांवर अन्य पक्षांनी आघाडी घेतली आहे. हिमाचल विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी एकूण ६८ जागांपैकी ३५ जागांवर विजय मिळवणे आवश्यक होते. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता बहुमताचा आकडा गाठणे भाजपला अवघड जाणार नाही, असे चित्र तुर्तास दिसत आहे.

...Read More

V. S. News
विजय रुपाणींनी गड राखला

व्हीएस न्यूज - गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत राजकोट पश्चिमेतून भाजपचे विजय रुपाणी भरघोस मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रनील राजगुरु यांचा सुमारे २० हजार मतांनी पराभव केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. रुपाणींविरोधात लढण्यासाठी काँग्रेस नेते इंद्रनील राजगुरु यांनी स्वत:चा मतदारसंघ सोडून राजकोट पश्चिममधून हट्टाने उमेदवारी मागितली होती. राजगुरू गेले दीड वर्ष मतदारसंघात जमवाजमव करत होते. राजगुरु यांची १४१ कोटी रुपयांची अधिकृत संपत्तीदेखील होती.

रुपाणी यांच्या मतदार संघात तगडा उमेदवार देऊन रुपाणी यांना मतदार संघातच रोखून ठेवण्याची काँग्रेसची रणनिती होती. यात भर म्हणजे हार्दिक पटेल यांच्या सभेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे रुपाणी यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती. रुपाणी राज्यात प्रचारात व्यस्त असल्याने त्यांची पत्नी अंजली रुपाणी या पतीसाठी प्रचार करत होत्या. सोमवारी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी झाली. मतमोजणीच्या सुरुवातीला रुपाणी यांनी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर ते पिछाडीवर गेले. त्यामुळे राजकोट पश्चिमेत काँग्रेस जिंकणार की काय अशी शंका उपस्थित झाली. मात्र, त्यानंतर रुपाणी पुनरागमन केले. रुपाणी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत भाजपने सत्ता कायम राखण्यात यश मिळवले असले तरी १५० जागांचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता रुपाणी यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

...Read More

V. S. News
‘द्रौपदीच स्त्रीवादाची जननी, तिच्यामुळेच महाभारत घडले’

व्हीएस न्यूज - महाभारत एकट्या द्रौपदीमुळे घडले. स्त्रीवादाची ती जननी होती असे म्हटले तर मुळीच वावगे ठरणार नाही. द्रौपदीला पाच पती होते पण ती एकाचेही ऐकत नव्हती. तिने कृष्णाला सखा आणि मित्र मानले होते त्याचेच तिने ऐकले. हे वक्तव्य केले आहे भाजपचे महासचिव राम माधव यांनी. द्रौपदीमुळे महाभारताचे युद्ध झाले या युद्धात १८ लाख लोकांचा मृत्यू झाला. द्रौपदीला हक्क हवा होता म्हणून ही लढाई झाली असेही वक्तव्य राम माधव यांनी केले.

पणजी या ठिकाणी झालेल्या एकदिवसीय भारतीय विचार महोत्सवात राम माधव यांनी त्यांची मते मांडली आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले. द्रौपदी जर स्त्रीवादाची जननी असेल तर मग शिखंडी हा काय पहिला हा LGBT (तृतीयपंथीय) कार्यकर्ता होता का? असे प्रश्न विचारून राम माधव यांना ट्रोल करण्यात आले आहे. इतकेच नाही तर द्रौपदीला पाच पुरूषांशी विवाह करण्यास भाग पाडण्यात आले होते. तिचा पाच पांडवांशी विवाह तिच्या इच्छेविरोधात करण्यात आला होता. अशी उत्तरे देत राम माधव यांना ट्रोल करण्यात आले.

...Read More

V. S. News
गुजरात, हिमाचलमधील निर्णायक आघाडीनंतर पंतप्रधान विजयी मुद्रेत

व्हीएस न्यूज - गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या दोन्ही ठिकाणी भाजपला बहुमत मिळणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेबाहेर आले तेव्हा साहजिकच खुशीत दिसत होते. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांना पोझ देताना ‘व्हिक्टरी साईन’ दाखवले. संसदेच्या परिसरात आल्यानंतर मोदी आपल्या गाडीतून उतरले. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून त्यांनी नमस्ते म्हटले व ‘व्हिक्टरी साईन’साठी आपला हात उंचावला. गुजरातमध्ये भाजपने सलग चौथ्यांदा सत्ता कायम राखली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली. यामुळे भाजपची सत्ता असलेल्या राज्यांची संख्या १९ वर पोहोचणार आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील बहुतांश निकाल स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकणार आहे. यापैकी गुजरातमध्ये भाजपने १०५ जागांवर आघाडी मिळवली असून येथील पक्षाचा विजय जवळपास स्पष्ट आहे. तर राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली लढणारा काँग्रेस पक्ष ७२ जागांवर पुढे आहे. भाजप बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचला असला तरी काँग्रेसच्या जागांमध्ये पूर्वीपेक्षा २० जागांची वाढ झाली आहे. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिल्यास काँग्रेस पक्षाच्यादृष्टीने हे मोठे यश म्हणावे लागेल.

एक्झिट पोल्सनी गुजरातमध्ये भाजपला मोठे यश मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. उद्योगजगतानेही काहीसा असाच अंदाज बांधला होता. मात्र, मतमोजणीच्या सुरूवातीच्या टप्प्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. याचे पडसाद भांडवली बाजारातही उमटले होते. त्यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल ८०० अंकांनी कोसळला होता. मात्र, थोड्यावेळात भाजपने पुन्हा मुसंडी मारत १०० जागांवर आघाडी घेतल्यानंतर सेन्सेक्स पुन्हा २६७ अंकांनी वधारला होता.

...Read More

V. S. News
आमचे आबा वाचले असते : स्मिता पाटील

व्हिएस न्यूज - व्यसनामुळे आपल्यासोबतच आपले कुटुंबही उद्ध्वस्त होते. त्यामुळे नागरिकांनी व्यसनापासून दूर रहावे, असे कळकळीचे आवाहन राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी केले.

‘राजकीय कामाच्या तणावातून आबांनी तंबाखू खायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचे तंबाखूचे व्यसन वाढले. त्याच व्यसनामुळे आबा आपल्याला सोडून गेले’ असे स्मिता म्हणाल्या.

गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. अभय बंग यांच्या सर्च या प्रकल्पाच्या मुक्तीपथच्या आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यसनामुळे आबा आपल्याला सोडून गेल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात आबा यांच्या पत्नी आ. सुमन पाटील, डॉ. अभय बंग,पोलिस अधीक्षक अभिनव देशमुखआणि मोठ्या प्रमाणात नागरिकउपस्थित होते.
...Read More

V. S. News
हिमाचल प्रदेश निवडणूकित भाजप बहुमताकडे

व्हीएस न्यूज - जरात निवडणुकीमुळे दुर्लक्षित असलेल्या हिमाचल प्रदेशात भाजपने सत्तेच्या दिशेन वाटचाल केली आहे. 68 जागांच्या हिमाचल प्रदेश विधानसभेत भाजपने 40 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी काँग्रेस 20-21 जागांमध्ये अडखळताना दिसत आहे. दुपारपर्यंतचे कल पाहता, हिमाचलमध्ये भाजपच सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र असं असलं तरी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल पिछाडीवर आहेत.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017 मध्ये कोण बाजी मारणार, हे आज स्पष्ट होईल.
हिमाचल प्रदेशात 9 डिसेंबरला 68 जागांसाठी 74 टक्के मतदान झालं. काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्याचं आव्हान आहे. तर भाजप नेते प्रेम कुमार धुमल यांनी वीरभद्र सिंह यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लाव
...Read More

V. S. News
पत्रकार तुषार खरात याच्या विरोधात महिला पत्राकाराचा लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

व्हीएस न्यूज - माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात मुंबईतील एका नामवंत दैनिकातील पत्रकार तुषार खरात याच्या विरोधात महिला पत्राकाराचा लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषार खरातने लैंगिक छळ केल्यानंतर या महिला पत्रकाराने कार्यालयीन प्रशासनाला त्याची तक्रार दिली होती. पण त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या महिला पत्रकाराने पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. गेल्या काही महिन्यांपासून हा पत्रकार संबंधित महिलेचा लैंगिक छळ करत होता. त्याचप्रमाणे तो तिचा मानसिक छळही करत होता. त्यामुळे तिने या पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, खरातने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या आरोपात काडीमात्र तथ्य नसल्याचं त्याचं म्हणणं आहे.
...Read More

V. S. News
दिल्लीत १६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार ,आरोपी फरार

व्हीएस न्यूज -निर्भया प्रकरणाला पाच वर्ष पूर्ण होत असताना दिल्लीत सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन आरोपींनी एका १६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला असून आरोपी फरार आहेत.

पीडित मुलगी शालिमार बाग येथील हैदरपूर गावांजवळ एका झोपडपट्टीत आईसह राहते. शनिवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्याजवळच असलेल्या एका उद्यानात सामूहिक बलात्काराची घटना घडली. पीडित मुलगी आपल्या मित्रासह उद्यानात बसली होती. त्यावेळी घटनास्थळी असलेल्या तिघांनी मुलीला छेडण्यास सुरूवात केली. मुलीच्या मित्राने छेडछाडीला विरोध केल्यानंतर आरोपींनी त्याला जबर मारहाण केली. आरोपींनी पीडित मुलगी आणि तिच्या मित्राजवळील मोबाइल हिसकावून घेतला. आरोपींनी तिच्या मित्राला बांधून ठेवले. त्याच्या समोर आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. एका आरोपीने बलात्काराचा व्हिडीओ काढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपींविरोधात पोलिसांनी अपहरण, सामूहिक बलात्कार , मारहाण करणे, पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!