Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
साकीनाका येथे एका फरसाणच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत १२ कामगारांचा होरपळून मृत्यू

व्हीएस न्यूज - आज पहाटे साकीनाका येथे एका फरसाणच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत १२ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत अडकलेल्या १५ जणांपैकी ११ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून चार जणांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

साकीनाक्याच्या खैरानी रोडवरील मखारीया कंपाऊंडमध्ये असलेल्या भानू फरसाण गाळा नंबर-१ या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. यावेळी भानू फरसाण दुकानासह इतर दुकानातील कामगार झोपेत होते. अचानक लागलेल्या या आगीमुळे काही कळायच्या आत १२ कामगार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या कंपाऊंडमध्ये वेल्डिंगची दुकाने आहेत. बहुतेक दुकाने लाकडी असल्याने आग भराभर पेटली. तसेच पहाटेच्या वाऱ्यामुळे ही आग आणखीनच भडकली. ही आग इतकी भीषण होती की, कामगारांना त्यांचा जीवही वाचविता आला नाही. चोहोबाजुंनी आगीचे तांडव झाल्याने या कामगारांना बाहेर पडता आले नाही. परिणामी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी येईपर्यंत या आगीत १२ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आले. तर जखमी कामगारांवरही राजावाडीमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या मखारिया कंपाऊंडमध्ये लागलेली आग अद्याप नियंत्रणात आली नसून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
...Read More

V. S. News
‘मनोरा’ रिकामे करण्यासाठी आमदारांना लवकरच नोटीस

व्हिएस न्यूज – मुंबई येथील मनोरा आमदार निवास इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात मंत्रालय परिसर येथे आमदारांना निवासाची व्यवस्था करण्यासाठी विभागातर्फे कार्यवाही करण्यात येत आहे. येत्या महिन्याभरात आमदारांना नवीन रचनेबाबत माहिती दिली जाईल आणि खोल्या रिकाम्या करण्यासाठी नोटीस दिल्या जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

पाटील म्हणाले, मनोरा आमदार निवासाची इमारत पाडण्याचा निर्णय घेऊन ती नव्याने बांधण्याचे काम केंद्र सरकारच्या कंपनीला दिले आहे. येथे राहणा-या आमदारांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी घाटकोपर येथे ११०० फ्लॅट पाहण्यात आले होते. पण काहींनी त्यावर असहमती दर्शविली. त्यामुळे आता मंत्रालय परिसरात असलेल्या इतर आमदार निवासमधील प्रत्येक आमदाराला आता दोनऐवजी एकच खोली दिली जाईल व दुस-या खोलीचे ५० हजार रुपये भाडे दिले जाईल.

रिकाम्या होणा-या दुस-या खोलीत मनो-यातील आमदारांना स्थलांतरित केले जाईल. यानंतर मनोरा इमारतीचे एक-एक टॉवर पाडून पुनर्बाधणीचे काम केले जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
...Read More

V. S. News
भुजबळांच्या जामिनावर आज निर्णय

व्हिएस न्यूज – महाराष्ट्र सदन आणि इतर गैरव्यवहारांप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय होणार आहे. छगन भुजबळ हे राज्याचे माजी बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आहेत. त्यामुळे विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. एम़ एस़ आजमी यांच्यासमोर भुजबळांच्या जामिनावर सुनावणी होणार असून, न्यायाधीश जामीन अर्जावर काय निर्णय देतात, याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, छगन भुजबळ आणि त्यांचा मुलगा समीर भुजबळ यांनी जामिनासाठी पीएमएलए न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडे अनेकदा अर्ज केले. मात्र, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावले. पण, सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार पीएमएलए कायद्यातील कलम ४५(१) असंविधानिक असून, ते रद्द झाले आहे. त्यामुळे रद्द झालेल्या या कलमाचा आधार घेत, भुजबळ यांनी पुन्हा एकदा न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला असून या अर्जावर सोमवारी निर्णय घेण्यात येणार आहे.

मात्र, ईडीने या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला आहे. पीएमएलएचे कलम ४५ सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असले तरी त्याआधारे भुजबळांना जामीन देता येणार नाही़ त्यांना आपण गुन्हा केला नाही हे सिद्ध करावे लागेल, अशी भूमिका ईडीने घेतली आहे.
...Read More

V. S. News
शिक्षण आणि नोकरीत गरीब सवर्णाना आरक्षणाची गरज – मद्रास उच्च न्यायालय

व्हिएस न्युज – आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्या उच्चवर्णीयांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याची गरज असल्याची महत्त्वपूर्ण सूचना मद्रास हायकोर्टाने तामिळनाडू सरकारला केली आहे. असे करता येईल का, याबाबत अभ्यास करावा असे निर्देशही कोर्टाने सरकारला दिले आहेत. शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावे यासाठी १४ विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने या सूचना केल्या आहेत. ‘गरीब हा गरीब असतो, मग तो पुढारलेल्या जातीतील असो वा मागास जातीतील असो’, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले आहे.

पुढारलेल्या जातींमधील गरिबांना आतापर्यंत डावलण्यात आल्याचे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले आहे. अशी मागणी केल्यास सामाजिक न्यायाच्या नावावर आपल्याला विरोध होईल, या भीतीने गरीब उच्चवर्णीयांनी कधीही आवाज उठवला नाही. सामाजिक न्याय समाजातील प्रत्येक वर्गाला मिळाला पाहिजे असेही कोर्टाने पुढे म्हटले आहे. उच्चवर्णीयांमधील आर्थिकदृष्टय़ा मागास असलेले लोक आरक्षणाचा लाभ घेणा-या मागासवर्गीयांच्या विरोधात आहेत, असा याचा अर्थ काढला जाऊ नये. समाजातील सर्वच वर्गात गरीब लोक आहेत आणि शैक्षणिक, आर्थिक तसेच सामाजिकदृष्टय़ा त्यांचा विकास होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असेही कोर्टाने आवर्जून नमूद केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील खुल्या वर्गासाठी असलेल्या एमबीबीएसच्या जागा बीसी आणि एमबीसी वर्गाकडे वळवणे बेकायदेशीर तर आहेच; परंतु ही मनमानी आणि राज्यघटनेतील कलम १४ चे उल्लंघनही आहे, असा मुद्दाही याचिकाकर्त्यां विद्यार्थ्यांनी आपल्या याचिकेत मांडला आहे. या याचिकेवर आपले म्हणणे मांडताना सरकारने म्हटले की, २२ शासकीय विद्यालयांमध्ये २,६५१ एमबीबीएसच्या जागा होत्या. यांमध्ये ३१ टक्के खुल्या गटासाठी, २६ टक्के मागासवर्गीयांसाठी, ४ टक्के मागासवर्गीय मुस्लिमांसाठी, २० टक्के एमबीसींसाठी, १४ टक्के एससी आणि १ टक्का जागा एसटीसाठी आरक्षित आहेत. खुल्या गटातील एकूण ८२२ जागांमध्ये सामान्य वर्गात मोडणा-या अतिरिक्त आरक्षित वर्गातील विद्यार्थी देखील गुणवत्ता यादीनुसार दावेदार असतात. अशात सामान्य वर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणा-या ७.३१ टक्क्यांत घट होत त्या जागा १९४ इतक्यावर आल्या आहेत.

तामिळनाडूत जातींचे वर्गीकरण बीसी, एमबीसी, एससी आणि एसटी अशा श्रेणींमध्ये झाले आहे, हे सरकारच्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. केवळ काही वर्गच एफसी म्हणजेच उच्चवर्णीय असल्याचे दर्शवण्यात आले आहे. म्हणजेच अधिकांश जातींना बीसी किंवा मग एमबीसी या वर्गामध्ये टाकले तर सामाजिक आणि आर्थिक स्तर गृहित धरून देण्यात येणा-या आरक्षणाला काही अर्थ उरणार नाही, असे म्हटले जात आहे.
...Read More

V. S. News
मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ

व्हिएस न्यूज – बुलढाण्यात नांदुरा येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावसान घोषणाबाजीत झाले. यावेळी सभेसाठी लावलेल्या खुच्र्याची फेकाफेकी सुरू झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा गोंधळ टळला आहे. मात्र हा वाद नेमका कशामुळे झाला याचे कारण अस्पष्ट आहे. तसेच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणासाठी उभे राहताच काही शेतक-यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले.

रविवारी दुपारी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा इथे मुख्यमंत्र्यांची सभा होणार होती. मात्र, सभा सुरू होण्यापूर्वी दोन गटांमध्ये काही कारणाने वाद झाला. याच वादात उपस्थित लोकांनी खुच्र्या उचलून एकमेकांवर फेकण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत हस्तक्षेप केल्याने तणाव काहीसा निवळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बळीराजा जलसंजीवनी योजनेचा शुभारंभ होणार होता. तसेच राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, याच कार्यक्रमाच्या आधी गोंधळ झाला आणि मुख्यमंत्र्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले. या सगळ्या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, काँग्रेस आणि मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यानंतर काही कालावधीनंतर सभास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा सुरू झाली.
...Read More

V. S. News
१७ जिल्ह्यांतील रस्ते खड्डेमुक्त - चंद्रकांत पाटील

व्हिएस न्यूज – शुक्रवापर्यंत राज्यातील ३६ पैकी ३० जिल्ह्यांत आपण रस्त्यावरून प्रवास केला. यादरम्यान, केलेल्या पाहणीत २२ हजार ७९५ किलोमीटरचे रस्त्यांवरील खड्डे भरल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला. तसेच १७ जिल्ह्यांतील रस्ते १०० टक्के खड्डेमुक्त झाल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातले रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली मुदत शुक्रवारी संपली. परंतु राज्यातील बहुतांशी रस्त्यांची स्थिती मात्र जैसे थे असल्याची टीका होत आहे. आता रस्त्यांवर खड्डे दिसले तर चंद्रकांत पाटील खड्डय़ामागे १ हजार रुपये देणार का, असाही प्रश्न विचारला जात असताना त्यांनी नागपूरमध्ये शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली.

चंद्रकांत पाटील यांनी ३० ऑक्टोबर रोजी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी नवी डेडलाईन जाहीर केली होती. १५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा पाटील यांनी केला होता. रस्त्यांच्या दुरुस्तीची माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील एकूण २२ हजार ७९५ किमी रस्त्याचे खड्डे भरले असून, शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत खड्डे भरण्याचे काम शंभर टक्के पूर्ण होईल. राज्यातील एकूण २३ हजार ३८१ किमी लांबी रस्त्यावरील २२ हजार ७३६ रस्त्यांवरील खड्डे भरले आहेत. ग्रामीण भागातील रस्ते खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या टीकेलाही चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिले.

मी कधी हेलिकॉप्टरमधून प्रवास केला? हे सुप्रिया ताईंनी दाखवून द्यावे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले. तसेच, त्या जेव्हा मला यवतमाळला भेटल्या होत्या, तेव्हा माझ्या कामावर समाधान व्यक्त केले होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय, जर काही ठिकाणी खड्डे असतील, तर सामान्य लोकांनी सांगावे. जिथे खड्डा आहे असेल, तिथे मी स्वत: खुर्ची टाकून बसेन आणि खड्डा भरून देईन, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
...Read More

V. S. News
काँग्रेसला कोर्टाचा दणका

गुजरात निवडणुकीतील मतपडताळणीची काँग्रेसची याचिका फेटाळली

व्हिएस न्यूज – गुजरात विधानसभा निवडणूक निकालाच्या तीन दिवस आधी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावणा-या काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. कोर्टाने मतमोजणीत दखल देण्यास नकार देत काँग्रेसची याचिका फेटाळून लावली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी १८ डिसेंबरला कमीत कमी २५ टक्के व्हीव्हीपीटी पावत्यांची मतदान यंत्रांशी पडताळणी करावी. मतदान यंत्रात नोंद झालेली मते ही व्हीव्हीपीटी (वोटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) शी जुळवून बघावीत, अशी मागणी काँग्रेसने याचिकेतून केली होती. सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान ही याचिकाच फेटाळून लावली. तसेच निवडणूक प्रक्रियेतील सुधारणेच्या मागणीसह पुनर्याचिका दाखल करण्याची सूचना गुजरात काँग्रेसला केली. काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी ही याचिका दाखल केली होती. गुजरातच्या अंतिम टप्प्यातील निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवाप्रमाणे काम करीत आहे, असा आरोप काँग्रेसने केला होता.

भाजपने अनेक ठिकाणी इव्हीएम ब्लूटुथशी जोडल्याची तक्रारही काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी दुस-या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान झाले. या मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून भाजपला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसबरोबरच पाटीदार समाजाचा नेता हाíदक पटेल याने एक्झिट पोलवर संशय व्यक्त केला होता. निकाल लागल्यानंतर मतदान यंत्रांबाबत शंका उपस्थित व्हावी म्हणून एक्झिट पोलमधून भाजपचा विजय दाखवला जात असल्याचे हाíदक पटेलने ट्विटमधून म्हटले होते.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. आम आदमी पार्टीसह विरोधकांनी मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप केला होता. तसेच मतदान यंत्र हॅक होऊ शकते, असा दावा आम आदमी पार्टीने केला होता. मात्र निवडणूक आयोगाने हा आरोप धुडकावून लावला होता.
...Read More

V. S. News
नागपुरात सोमवारी मराठा मोर्चाचा ‘हल्लाबोल’

व्हिएस न्यूज – राज्यभरात मराठा समाजाचे लाखोंचे मूक मोर्चे निघाल्यानंतर जाग आलेल्या सरकारने अनेक मागण्या मान्य करीत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याचे पुढे काय झाले, हे सरकारकडून स्पष्ट केले जात नाही. त्यामुळे आता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच विधिमंडळावर येत्या सोमवार, दि. १८ रोजी हल्लाबोल करीत मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी याबाबत सांगितले की, या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिका-यांमार्फत माहिती दिली आहे. शहरातून ९ ऑगस्ट २०१६ रोजी सर्वप्रथम निघालेल्या मोर्चानंतर सरकारने तातडीने समाजाच्या मागण्यांची पूर्तता करायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळेच राज्यभर लाखोंचे मूक मोर्चे निघाले. त्यानंतर सरकारकडून मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासनेच दिली गेली. त्यास मोठा कालावधी उलटूनही ती पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे सरकारने आश्वासनांवर केलेल्या कारवाईविषयी लेखी जाहीर खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली. गतवर्षी अधिवेशनात मराठा भगिनींनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर केले होते. त्यावर एका महिन्यात कार्यवाही करून आपणास कळविले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. खरेतर त्यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. त्यानंतर आम्ही राज्यातील महत्त्वाच्या समन्वयकांसोबत चर्चा करून निवेदनाबाबत पाठपुरावा केला असता, सरकारने कुठलीही ठोस कार्यवाही केली नसल्याचे समोर आले.

मुंबईत महामोर्चा निघाला त्यानंतरही सरकारला जाग आलेली नाही. ४ ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. त्यावर ८ ऑगस्ट रोजी सभागृहात निवेदनावर चर्चा झाली. त्यानंतर दुस-या दिवशी म्हणजे ९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सविस्तर निवेदन करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने सरकार मागण्यांबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. त्यानंतर ८ नोव्हेंबर २०१७ रोजी आश्वासनाबाबत लेखी खुलासा करण्याची मागणी केली. मात्र, आजतागायत कुठलाही खुलासा केला नाही. त्यामुळे समाजाची घोर फसवणूक झाल्याने संतापलेल्या समाजबांधवांनी आता हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. विशिष्ट कालावधी निश्चित करून प्रश्न न सुटल्यास राज्यात उद्रेक होईल आणि त्याची जबाबदारी सरकारवर असेल, असा इशाराही यावेळी समन्वयकांनी दिला.
...Read More

V. S. News
मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर पुन्हा रणकंदन

विधान परिषदेत सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी

व्हिएस न्यूज – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर विधान परिषदेत सर्व पक्षीय सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रश्नावर मंत्रिमंडळाची उपसमिती चर्चा करीत असते. त्या समितीला मार्गदर्शन करण्यासाठी सदस्यांनी चर्चेत सहभाग घ्यावा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. याप्रश्नी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

या विषयावर जवळपास २७ सदस्यांनी विधान परिषदेत मराठा आरक्षणाचा तारांकित प्रश्न उपस्थित केला. तीन वर्षापेक्षाही जास्त काळ हा प्रश्न रेंगलेला आहे. राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघाले. महामोर्चाही काढण्यात आला. तेव्हा शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासने दिली होती. त्यातील एकही आश्वासन सरकारने पाळले नसल्याचा आरोप काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी करत किती जिल्ह्यात वसतिगृहासाठी जागा दिल्या? ५ कोटी निधी देणार होते, त्याचे काय झाले? आणि आता किती दिवसात आरक्षण देणार का? अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय घेणार का? अशी प्रश्नांची सरबतीही त्यांनी राज्य सरकारवर केली.

त्यावर उत्तर देताना सभागृह नेते चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, प्रश्न संवेदनशील आहे. तो अधिक चिघळू नये, यासाठी हा प्रश्न मागास आयोगाकडे सोपविण्यात आलेला आहे. आयोगाची एक बैठकही झालेली आहे. मात्र, ही बाब न्याय प्रविष्ठ असल्याने त्यावर अधिक भाष्य करता येणार नाही. त्यावर भाई जगताप यांनी हरकत घेत, मराठा मुलांच्या वसतिगृहाकरिता किती जिल्ह्यात जागा दिल्या? त्यावर मंत्री पाटील म्हणाले की, वसतिगृह उभारणीसासाठी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, मात्र त्या पुढे येत नाहीत. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता अनुक्रमे ५० आणि ४० हजार रुपये भाडे द्यायची तयारी सरकारची आहे.

३६ जिल्ह्यात प्रस्ताव येतील त्या प्रमाणे दीड महिन्यात जागा उपलब्ध करून देण्यात येतील. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून १० लाख तसेच संस्था किंवा मंडळाकरिता ५० लाखापर्यंतचे कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरत राणे समिती व तावडे समितीच्या अहवालात फरक काय? असा सवाल करत मागास आयोगाचा अहवाल आल्यानंतर तो कोर्टात सादर केला जाईल. पण, तावडे समितीच्या अहवालावर सरकारने शपथपत्र का दिले नाही? असा सवाल केला.

...Read More

V. S. News
शिवसेनेने सरकारचा पाठिंबा खुशाल काढावा – बापट

व्हिएस न्यूज - शिवसेनेने राज्य सरकारमधून बाहेर पडण्याच्या गोष्टी करण्यापेक्षा राज्य सरकारला असलेला पाठिंबा काढून घ्यावा. सेनेने पाठिंबा काढून टाकल्यानंतरही फडणवीस सरकारला कोणताही धोका नसल्याचे संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी आज विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना बापट म्हणाले, राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते घेत असतात. आदित्य ठाकरे हे शिवसेना पक्षाचे ‘ज्येष्ठ नेते’ आहेत. त्यामुळे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या संदर्भात ते निर्णय जाहीर करू शकतात, अशा शब्दात त्यांनी आदित्य यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

गेल्या काही दिवसांपासून सेना व भाजपमध्ये सौहार्दाचे बंध राहिलेले नाही. सेना व भाजपचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेईल, असे विधान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतेच केले होते. शिवसेनेने पाठिंबा काढून टाकला तरी राज्य सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फडणवीस सरकारने आतापर्यंत यशस्वीपणे ३ वर्षे पूर्ण केली आहेत. उर्वरित दोन वर्षाचा कालावधी फडणवीस सरकार पूर्ण करेल, असा विश्वासही बापट यांनी व्यक्त केला.
...Read More

V. S. News
आता तिहेरी तलाक ठरणार गुन्हा

व्हिएस न्युज – केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘मुस्लिम महिला (विवाह अधिकारांचे संरक्षण) विधेयक २०१७’ ला म्हणजेच तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला शुक्रवारी मंजुरी दिली. त्यानुसार तोंडी, लिखित अथवा अन्य मार्गानी दिलेले तिहेरी तलाक (तलाक ए बिद्दत) बेकायदेशीर ठरणार आहेत.

पुढील आठवडय़ात हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. कायद्याचे स्वरूप देण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांत या विधेयकाला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीनंतर याबाबत कायदा अस्तित्वात येईल. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या गटाने तयार केला होता. त्यात सुषमा स्वराज, अरुण जेटली, रविशंकर प्रसाद आणि पी. पी. चौधरी यांचा समावेश होता.

विधेयकातील तरतुदीनुसार तिहेरी तलाक हा दंडात्मक आणि अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीला तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होणार आहे. मात्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये हा कायदा लागू होणार नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तिहेरी तलाकवर विविध स्तरांवर जोरदार चर्चा सुरू होती. तिहेरी तलाक बेकायदा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. तसेच केंद्र सरकारने तिहेरी तलाकविरोधी कायदा तयार करावा, असे निर्देश दिले होते.

ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाने तिहेरी तलाकची प्रथा अवैध असल्याचा ऐतिहासिक तिहेरी तलाक गुन्हा निकाल दिला. तीन विरुद्ध दोन अशा फरकाने सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. माजी मुख्य न्यायमूर्ती जेएस खेहर आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांनी तिहेरी तलाक मुस्लिम धर्माचा मूलभूत अधिकार आहे त्यामुळे तो असंवैधानिक नाही असे मत नोंदवले होते.

पण, अन्य तीन न्यायमूर्ती कुरीयन जोसेफ, आरएफ नरिमन आणि ललित यांनी ट्रिपल तलाकमुळे मुस्लिम महिलांच्या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे तीन विरुद्ध दोन अशा फरकाने ट्रिपल तलाक अवैध असल्याचा निकाल दिला.
...Read More

V. S. News
सोनिया गांधी यांना निवृत्तीचे वेध!

व्हिएस न्यूज – काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपण आता निवृत्त होत असल्याचे स्पष्ट केले आहे. १६ डिसेंबरला दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात सोनिया गांधी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करतील. मात्र शुक्रवारीच त्यांनी आता आपण निवृत्त होत असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांची अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर सोनिया गांधी या निवृत्त होतील, अशी अटकळ होती. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

मी राजकारणातून निवृत्त होत नसल्याचेही त्या सांगायला विसरल्या नाहीत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काही पत्रकारांनी त्यांना काँग्रेसची पुढची पावले काय असतील, असा प्रश्न विचारला ज्यानंतर त्यांनी मी आता अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे म्हटले. मागील काही काळापासून सोनिया गांधींनी स्वत:ला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवले आहे. गुजरात विधानसभा आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातही त्यांनी सहभाग घेतला नाही.

त्यांची प्रकृती बिघडल्याच्याही काही बातम्या मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या. त्यामुळेच त्या काँग्रेस अध्यक्षपदावर फार काळ राहणार नाहीत हे स्पष्ट झाले होते. अपेक्षेप्रमाणे राहुल गांधी हेच काँग्रेसचे नवे अध्यक्ष असतील हे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यानंतर आता सोनिया गांधी यांनी आपण पदावरून निवृत्त होत असल्याचे म्हटले.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!