व्हिएस न्यूज – सुंजवान हल्ल्यात पाच काश्मिरी मुस्लिमांचा मृत्यू झाला असून जवानांचाही यामध्ये समावेश होता. यावर आता सर्व गप्प का? असा सवाल उपस्थित करत एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हिंदुत्ववादी संघटना, सताधाऱ्यांवर टीकेच झोड उठवली.
सुंजवान हल्ल्यात मृत झालेल्यांमध्ये सात पैकी पाच मुसलमान होते. आता सारेच त्यांच्या मृत्यूवर शांत आहेत. कोणीही काही बोलायला तयार नाही. या मुद्द्यावर ऐवढी शांतता का, असे ते म्हणाले. मुस्लिमांच्या देशभक्तीवर जे लोक प्रश्न उपस्थित करतात त्यांना पाकिस्तानी म्हणून हिणवतात,यातून अशांनी धडा घायला हवा, असे ते म्हणाले. देशासाठी आम्ही प्राणाची आहुती देत आहोत. मुस्लिमांनाही दहशतवादी ठार करत आहेत. ते हिंदू-मुस्लीम असा भेदभाव करत नाही. त्यांच्यासमोर केवळ भारतीय असतात. तरीही भारतातील काही लोक मुस्लिमांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करत आहेत, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
व्हिएस न्यूज – नोटाबंदी ही कल्पना कुठून आली हे तुम्हाला माहिती आहे का? आरबीआय, अरुण जेटली किंवा अर्थ मंत्रालयातील अधिकारी यांची नोटाबंदीची कल्पना नाही. तर आरएसएसची ही विचारधारा होती. ही कल्पना त्यांनी पंतप्रधान मोदींवर लादली. मोदी यांनी त्यानंतर नोटाबंदी केली, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजप आणि संघावर टीका केली आहे.
हिंदुस्थानातील संस्थांना काबीज करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना प्रत्येक संस्थेत टाकण्याचा प्रयत्न आरएसएस करत आहे. प्रत्येक मंत्रालय आणि विभागात आरएसएसची लोक आहेत. सध्या मोदी सरकार संघ चालवत असल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला.
व्हीएस न्यूज - कानपूरच्या मार्बल मार्केटमधील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ची ५०० रुपयांची नोट बाहेर आल्याची घटना घडली आहे. अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून सचिन नामक व्यक्तीने १० हजार रुपयांची कॅश काढली. त्यात एक नोट बनावट होती. ‘रिझर्व्ह बँक ऑ इंडिया’च्या ऐवजी त्या नोटेवर ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे छापले होते, शिवाय ‘फुल ऑफ फन’ असेही त्या नोटेवर छापण्यात आले होते. लहान मुलांच्या खेळण्यात ज्या नोटा असतात, त्यातली ही नोट होती.
एटीएम गार्डकडे यासंदर्भात मी तक्रार केली असून, त्यांनी सोमवारपर्यंत नोट बदलून देण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय, यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करणार असल्याचेही सांगण्यात आल्याचे सचिन यांनी सांगितले. दोन जणांनी अॅक्सिस बँकेच्या याच एटीएममधून पैसे काढले. एकाने २० हजार, तर दुसऱ्याने १० हजार रुपये. दोघांनाही ५०० रुपयांची एक-एक नोट बनावट मिळाली, जिच्यावर चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया छापले होते. हे एटीएम आता बंद करण्यात आले असून, तपास सुरु करण्यात आला असल्याचे दक्षिण कानपूरचे पोलिस अधिक्षकांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - तुम्ही इन्स्टाग्रामवर दुसऱ्याच्या स्टोरी नकळत बघत आहात ? स्टोरीचा स्क्रीनशॉट काढत आहात ? पण हे जर लपूनछपून करत असाल तर जरा थांबा. कारण आता यूजर्सला हा रेकॉर्ड कळू शकणार आहे. इन्स्टाग्राम आता स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही सांगणार आहे.
इन्स्टाग्राम यासाठी एक नवे फिचर घेऊन येत आहे, युजर्सना जे नोटीफिकेशन देणार आहे. हे फिचर यायला अजून वेळ असून त्याच्या डेव्हलपिंगचे काम सुरू आहे. याबाबत ‘द इंडिपेंडेंट’ ने दिलेल्या वृत्तानुसार जर कोणी तुमच्या इन्स्टाग्राम स्टोरीचे स्क्रीनशॉट घेत असेल तर ‘सुर्या’च्या सिंम्बॉलसहीत स्टोरी व्ह्यू सेक्शनमध्ये दिसणार आहे.
व्हीएस न्यूज – पाकिस्तान आणि सौदी अरेबियात काम करणाऱ्या दहशतवादी संघटनांची अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) ही एक शाखा असल्याचा खळबळजनक आरोप शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केला आहे.
भारतातील मुसलमानांशी संबंधित महत्वाचे निर्णय पाकिस्तान आणि सौदी अरेबियातील दहशतवादी संघटना घेतात. अशा दहशतवादी संघटनांची मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड शाखा आहे. जे आपल्या विचारांच्या आधारावर देशाचे वातावरण बिघडवत असल्याचे रिझवी यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे राम मंदिर उभारण्याचे समर्थन करणारे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना सलमान नदवी यांना बोर्डातून काढण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर रिझवींनी हा आरोप केला आहे.
एआयएमपीएलबीला दहशतवादी संघटना घोषित करून त्यावर बंदी घालावी असे रिझवी यांनी म्हटले आहे. नदवीच्या भूमिकेचे समर्थन करताना रिझवी म्हणाले, अयोध्येत राम मंदिर बांधले जावे आणि दुसरीकडे एका जागेवर आपला मस्जिद बांधण्याचा एकमेव मार्ग आहे. मौलाना सलमान हुसैनी नदवी यांनी ९ फेब्रुवारी रोजी श्री श्री रवीशंकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राम मंदिर बांधणीस पाठिंबा दर्शविला होता.
व्हीएस न्यूज – नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतल्यानंतर चलनातून जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बाद झाल्या. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकामध्ये रांगा लागल्या.
एका वृत्तसंस्थेच्या बातमीदाराने माहितीच्या अधिकारात नोटाबंदीनंतर बँकेत चलनातून बाद झालेल्या किती नोटा जमा झाल्या याची माहिती मागितली होती. आरबीआयने यावर सांगितल्याप्रमाणे ज्या ५०० आणि १००० च्या नोटा बँकेत बदलविण्यासाठी जमा करण्यात आल्या, त्यांची मोजणी आणि सत्यता पडताळण्याची प्रकिया अद्याप सुरू असून ही प्रकिया जलदगतीने करण्यात येत आहे, अशी माहिती आरबीआयने दिली.
आरबीआयने पुढे माहिती देताना सांगितले, की निश्चित बँकाच्या नोटांची मोजणी आणि त्यांची सत्यता पडताळण्याची प्रकिया वेगाने सुरू आहे. ही प्रकिया पूर्ण झाल्यानंतर एकूण नोटांचा हिशोब सादर करता येणार आहे. आरबीआयने चलनातून बाद झालेल्या एकूण किती नोटा बँकेत जमा झाल्या यावर उत्तर देताना सांगितले, की ३० जून २०१७ पर्यंत १५.२८ ट्रिलियन नोटा बँकेत जमा झाल्या. चलनातून बाद झालेल्या नोटांची मोजणी कधीपर्यंत पूर्ण होणार यावर उत्तर देताना आरबीआयचे अधिकारी म्हणाले, की मोजणी अद्याप सुरू असून लवकरच याची माहिती देण्यात येईल, असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले.
व्हीएस न्यूज - संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस खासदार रेणुका चौधरींच्या हसण्यावर त्यांची तुलना रामायणातील शुर्पणखेशी केली होती. काँग्रेसने तत्काळ मोदींच्या या टिप्पणीचा निषेध केला. रेणुका चौधरींनीही आता मोदींवर पलटवार केला आहे. कोणताही जीएसटी हसण्यावर नसल्यामुळे हसण्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरजही नसल्याचे त्यांनी म्हटले.
मोदींची महिलांप्रती असलेली मानसिकताही माझ्यावर केलेल्या वक्तव्यावरून समोर येते, असा टोलाही त्यांनी लगावला. मी पाच वेळा खासदार राहिले आहे आणि पंतप्रधान माझी तुलना नकारात्मक पात्राशी करतात. परंतु, ते विसरले आहेत की, महिला आज बदलल्या आहेत. त्यांची महिलांप्रती काय मानसिकता आहे, हे त्यांनी आपल्या वक्तव्यातून दाखवून दिले आहे, असेही त्यांनी म्हटले.
तुम्ही जर योग्य असाल तर ते सगळीकडे झळकते. आता हेच होत आहे. कसे आणि केव्हा अशाप्रकारचा नियम नाही. तुम्ही हसा.. आणि हसण्यावर कोणताही जीएसटी नाही. पाचवेळा खासदार राहिल्यानंतर हसण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही. माझ्या वडिलांनी मुलगा किंवा मुलीच्या रूपात नव्हे तर देशाची नागरिक म्हणून मला वाढवले आह, असे त्या म्हणाल्या.
व्हीएस न्यूज - सैन्याला तयारीसाठी ६-७ महिने लागतील मात्र, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा कार्यकर्ता दोन दिवसांतच तयार होऊ शकतो या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा आता देशभरातून निषेध होताना दिसतोय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. भागवतांचे हे वक्तव्य प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारे असून यामुळे सीमेवर शहीद होणाऱ्या जवानाचा अनादर झाल्याचे ते म्हणाले. शहीदांचा आणि सैन्यदलाचा अपमान करणाऱ्या भागवतांची आपल्याला लाज वाटते, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. दरम्यान, भागवतांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे संघाकडून स्पष्टीकरण करण्यात आल्याचे माध्यमांत वृत्त येत आहे.
बिहारच्या दौऱ्यावर असलेल्या मोहन भागवतांनी रविवारी मुझफ्फरपूर येथे कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना हे वक्तव्य केले होते. भागवतांच्या या वक्तव्याचे पडसाद लगेचच देशभर उमटण्यास सुरूवात झाली. सर्वच विरोधी पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. राहुल गांधी यांनी ट्विट करत भागवतांवर तोंडसुख घेतले. संघप्रमुखांनी भारतीय नागरिकांचा व सीमेवर लढणाऱ्या जवानांचा अपमान केला आहे. हा तिरंग्याचाही अपमान आहे, कारण प्रत्येक जवान हा तिरंग्याला सलाम करतो. शहीद जवानांचा आणि भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या भागवतांची मला लाज वाटते, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही भागवतांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली. तर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनीही भागवत व भाजपावर टीका केली. इतर पक्षाच्या नेत्यांनी जर असे वक्तव्य केले असते तर माध्यमांनी त्यांना देशद्रोही ठरवले असते. त्यांचे वक्तव्य सैन्यदलाच्या कार्यक्षमतेवर नाही का, हा सैन्यदलाचा अपमान नाही का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले.
काय म्हणाले होते मोहन भागवत..
आपण लष्कर नाही मात्र आपली शिस्त लष्कराप्रमाणेच आहे. आपले स्वयंसेवक लष्कराच्या आधी तयार होऊ शकतात. देशाला जर आमची गरज पडल्यास तसेच संविधानाने आणि कायद्याने आम्हाला परवानगी दिली. तर आम्ही तात्काळ शत्रूशी लढण्यास तयार आहोत. सैन्याला तयारीसाठी ६-७ महिने लागतील मात्र, आपण दोन दिवसांतच तयार होऊ शकतो, कारण आमची शिस्तच तशी आहे. आमची संघटना ही लष्करी किंवा निमलष्करी संघटना नाही. मात्र, ती एक कौटुंबिक संघटना असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
व्हीएस न्यूज - एकीकडे भारतीय संघात नवोदीत खेळाडू आपली जागा पक्की करण्यासाठी धडपडत असताना; सुरेश रैना, युवराज सिंह यांसारख्या खेळाडूंची कारकिर्दीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सुरेश रैनाने मोठ्या कालावधीनंतर आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. मात्र डावखुरा अष्टपैलू खेळाडु युवराज सिंह अजुनही भारतीय संघाच्या बाहेर आहे. वाढतं वय आणि बिघडत चाललेला फॉर्म पाहता अनेकांनी युवराज आणि रैनाला निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. मात्र ३६ वर्षीय युवराज सिंहने भारतीय संघात पुनरागमन करण्याची आशा अजुन सोडलेली नाहीये.
SportsLive या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत युवराज सिंहने आपल्या निवृत्तीविषयीचं मत मांडलं. “कोणतीही गोष्ट मनात ठेवून मला निवृत्ती स्विकारायची नाहीये. एखादी गोष्ट करायची राहून गेली असा विचार निवृत्तीनंतर माझ्या मनात येऊ द्यायचा नाहीये. ज्यावेळा मी माझी सर्वोत्तम खेळी करेन आणि यापुढे आपण क्रिकेट खेळू शकणार नाही असं मला वाटेल, त्यावेळी मी स्वतःहून निवृत्त होईन. आयपीएल खेळायला मिळावं म्हणून मी क्रिकेट खेळत नाहीये. मी अजुनही भारतीय संघात पुनरागमन करु शकतो. साधारण २-३ आयपीएल स्पर्धा खेळू शकेन इतकी स्फुर्ती अजुनही माझ्या अंगात कायम आहे.” युवराज सिंह मुलाखतीमध्ये बोलत होता.
माझा आतापर्यंतचा प्रवास नक्कीच चांगला झाला. कारकिर्दीत आतापर्यंत अनेक संकटांचा सामना केला. कॅन्सरवर मात करुन संघात पुनरागमन केल्यानंतर माझं आयुष्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरावं असं मला नेहमी वाटत राहिलेलं आहे. यापुढच्या काळात जेव्हा कधीही मला खेळण्याची संधी मिळेल त्यावेळी मी १०० टक्के प्रयत्न करुन चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. २०१७ साली चॅम्पियन्स करंडकानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळलेला एकदिवसीय सामना हा युवराजचा शेवटचा सामना ठरला आहे. यानंतर युवराजला संघात जागा मिळू शकलेली नाही. २०१८ च्या आयपीएल हंगामात युवराज किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाकडून खेळणार आहे. २ कोटी रुपयांच्या बोलीवर पंजाबच्या संघ व्यवस्थापनाने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलंय. त्यामुळे आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन युवराज भारतीय संघात पुनरागमन करतो का हे पहावं लागणार आहे.
व्हीएस न्यूज - जर गुन्ह्यात दोषी ठरलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. तर पक्षाचे दोषी नेते निवडणुकीत उमेदवार कसे निवडू शकतात, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने सोमवारी विचारला आहे. तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना निवडणुका लढवण्यावर बंदी घालावी अशी शिफारस निवडणूक आयोगाने केली आहे.
गुन्हेगारीपार्श्वभूमी असलेल्या नेत्यांविरोधात अश्विनी उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. दोषी ठरलेल्या नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व देखील करु नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या वतीने अमित शर्मा यांनी बाजू मांडली. निवडणूक आयोगाने अश्विनी उपाध्याय यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. शर्मा म्हणाले, निवडणूक आयोग १९९८ पासून यासाठी प्रयत्न करत आहे. पण दोषी व्यक्तींना पक्षाचे नेतृत्व करण्यापासून रोखण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे नाही. यासाठी संसदेने विद्यमान कायद्यांध्ये सुधारणा करणे गरजेचे असून या कायद्याची अंमलबजावणी होईल याकडे निवडणूक आयोग लक्ष देईल, असे शर्मा यांनी सांगितले. किमान पाच वर्षे शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांचे आरोप असलेल्या आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेल्या लोकांना निवडणुका लढवण्यावर बंदी घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी, अशी शिफारसही केंद्र सरकारला केली असल्याचे आयोगाच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले.
जर एखाद्यावर निवडणूक लढवण्यास बंदी असेल तर तो पक्षाचे नेतृत्वही करु शकत नाही, असे कोर्टाने सांगितले. ‘दोषी ठरलेली व्यक्ती राजकीय पक्षाची स्थापना करुन पक्षाचे नेतृत्व करु शकते’, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. लालूप्रसाद यादव, ओ पी चौटाला आणि शशिकला हे गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरले असले तरी त्यांच्या राजकीय पक्षातील मोठे पद अजूनही कायम आहे, याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले. यावर कोर्टाने चिंता व्यक्त केली. ‘दोषी व्यक्ती दुसऱ्यांची मदत घेऊन शाळा देखील सुरु करु शकते. यात त्याला काहीच अडचण देखील येणार नाही. पण ते जेव्हा देशाच्या व्यवस्थेत येण्याचा प्रयत्न करतील ती चिंतेची बाब आहे, असे कोर्टाने सांगितले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे मत मांडले.
व्हीएस न्यूज - त्रिपुरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या मुस्लीमांना स्थानिक मशिदीनं वाळित टाकलं असून प्रवेश बंदी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे या मुस्लीमांना वेगळी मशिद बांधावी लागली आहे. जनसत्ता ऑनलाइननं दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण त्रिपुरामध्ये मोईदातिला नावाचं गाव आहे, जिथे 83 कुटुंब मुस्लीमांची आहेत. यापैकी 25 कुटुंबांनी येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहोत असा दावाही या 25 मुस्लीम कुटुंबांनी केला आहे. मात्र, यामुळे त्यांना अन्य मुस्लीमांनी वेगली वागणूक दिली असून त्यांना गावातील मशिदीत नमाज पढण्यास मनाई करण्यात आली. परिणामी त्यांनी वेगली मसिद बांधली असून आता या लहानशा गावात दोन मशिदी झाल्या आहेत.
आम्ही 16 महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून आम्हाला मशिदीमध्ये नमाज पढण्यास मज्जाव करण्यात आल्याचे बाबुल हुसेन यांनी सांगितले. जोपर्यंत हिंदुत्ववादी पक्षाला समर्थन द्याल तोपर्यंत इथं नमाज पढता येणार नाही असं त्यांना सांगण्यात आलं आहे. शेवटी या लोकांनी पत्र्याची एक वेगळी मशिद बांधली आहे. या मशिदीमध्ये वेगळ्या इमामाचीही नियुक्ती करण्यात आली असून ही25 कुटुंबे पैसे काढून इमामाला पगार देतात. त्रिपुरामध्ये निवडणुका होऊ गातल्या असून भाजपा संपूर्ण शक्तीनं सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपावर केवळ हिंदुत्ववादी असल्याचेच नाही तर मुस्लीमविरोधी असल्याचे आरोपही होत आहेत. त्रिपुरामध्ये दोन दशकांहून अधिक काळ डाव्यांचं सरकार आहे. हे सरकार उलथवण्यासाठी भाजपा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करेल असे आरोपही विरोधकांनी केले आहेत. मात्र, बाबुल हुसेन म्हणतात की भाजपा हिंदुवादी पार्टी असल्याचं आपल्याला वाटत नाही. मुस्लीमांवर हल्ले करण्यामध्ये भाजपा सहभागी असल्याचं काँग्रेस व कम्युनिस्ट सांगतात परंतु आपला त्यावर विश्वास नसल्याचं हुसेन यांनी म्हटलं आहे. काँग्रेस संपल्यात जमा आहे असं सांगतानाच डाव्यांनी 25 वर्षे सत्ता उपभोगली परंतु आपल्या पदरात काहीही पडलं नसल्याचं हुसेन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपाची सत्ता आली तर आमच्या समस्या सुटतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
व्हीएस न्यूज – एखाद्या पॉलिसीधारकाने पॉलिसी खरेदी केल्यानंतर त्याचे ९० दिवसांच्या आत आकस्मिक निधन झाले तरी विमा कंपनी निश्चित केलेली रक्कम देण्यास नकार देऊ शकत नाही. एका प्रकरणात विमा कंपनीला मृत पॉलिसीधारकाच्या परिवारला ९ टक्के व्याजाबरोबर २.५ लाख रूपयांची रक्कम देण्याचा आदेश राष्ट्रीय ग्राहक पुनर्वसन आयोगाने (एनसीडीआरसी) दिला आहे. पॉलिसीधारकाचा मृत्यू याप्रकरणात पॉलिसी खरेदी केल्यानंतर ९० व्या दिवशीच झाला होता.
या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार पंजाबमधील फाजिल्का येथील हे प्रकरण असून पॉलिसीधारकाचे नाव कुलविंदर सिंग असे आहे. २६ मार्च २०१० मध्ये त्यांनी एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शूरन्स कंपनीची एक विमा पॉलिसी खरेदी केली होती. त्यांनी ४५,९९९ रूपयांचा प्रिमियम यासाठी भरला होता. त्याचे त्याचवर्षी २५ ऑगस्ट रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर विमा कंपनीकडे त्यांच्या कुटुंबीयांनी दावा दाखल केला होता. पण त्यांना प्रिमियमची रक्कम देऊन कंपनीने त्यांची बोळवण केली होती. २७ जून २०१२ रोजी विमा नियामक आयआरडीएचा हवाला देत न्या. एस श्रीशा यांनी विमा कंपनीला संपूर्ण रक्कम देण्यास सांगितले. आयआरडीएचा हा आदेश पण याच विमा कंपनीसाठी होता.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002