Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नाना पटोलेंची नियुक्ती

व्हीएस न्यूज - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या महासचिवपदी भाई नागराळे यांची नियुक्ती झाली आहे. नाना पटोले व भाई नागराळे यांच्या नावाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मान्यता दिली. काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाल्याने विदर्भात काँग्रेसला नवे नेतृत्व मिळू शकते. यामुळे पटोले यांचे काँग्रेसमध्ये वजन वाढणार आहे.

...Read More

V. S. News
महिला आरक्षणाची गरज, विधेयक संसदेत प्रलंबित

व्हीएस न्यूज - लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्याची तरतूद असणारे विधेयक संसदेत तसेच प्रलंबित राहिले आहे. १९९६ साली पहिल्यांदा म्हणजे एच.डी. देवेगौडा हे पंतप्रधान असताना हे विधेयक मांडण्यात आले पण ते मंजूर झाले नाही. त्यानंतर दहा वर्षेेे संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात शेवटच्या दिवशी या विधेयकाचा विषय निघायचा आणि ते आता मंजूर करता येणार नाही असे म्हणून ते लांबणीवर टाकले जात असे. तशी परंपराच पडली. अर्थात हे विधेयक कोणालाच नको आहे म्हणून ही चालढकल होत असे. आता तर गेल्या पाच सहा वर्षात या विधेयकावर कोणी चर्चाही करायला तयार नाही. मग ते मंजूर होण्याची तर गोष्टच बोलायला नको. महिलांना आरक्षण दिल्यास काही मातबर खासदारांना घरी बसावे लागेल म्हणून त्यांनी या विधेयकाचा मार्ग अडवला आहे.

हे विधेयक असे प्रलंबित असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण धुमधडाक्याने राबवले जात असून अनेक महिला प्रतिनिधींनी आपण या संस्थांचे कारभार सक्षमपणे करू शकतो हे दाखवून दिले आहे पण संसदेत मात्र महिला आरक्षणाला अटकाव करण्यात आला आहे. तिथे महिलांच्या आरक्षणात जात निहाय पोट आरक्षण असावे की नाही यावरून मतभेद निर्माण झाल्याचा देखावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणात मात्र महिलांच्या आरक्षणात पुन्हा जातींना पोट आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. मग तसे ते संसद आणि विधानसभांतच का नसावे याचे तर्कशुद्ध उत्तर कधीच मिळालेले नाही. महिलांच्या आरक्षणात पुन्हा जातीय पोट आरक्षण नको अशी भूमिका घेणारे लोक या बाबत ढोंगीपणा करीत आहेत.

२०१७ १८ च्या इकानॉमिक सर्व्हे मध्ये या बाबत काही चर्चा करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालात स्थानिक स्वराज्य संस्थातल्या महिलांच्या आरक्षणाचे लाभ समाजाला मिळत असल्याचे म्हटले आहे. असे असताना संसद आणि विधिमंडळात महिलांना आरक्षण का नको असा सवाल या अहवालात करण्यात आला आहे. भारतीय लोकशाहीच्या या दोन वरिष्ठ सभागृहांत महिलांच्या जागा आरक्षित नसल्याचे परिणाम महिलांच्या जविनात दिसत असल्याचे या अहवालाने म्हटले आहे. महिलांचे पुरेसे प्रतिनिधित्व या सदनांत नसल्याने महिलांच्या कल्याणाच्या काही योजनांना पुरेशी गती मिळालेली नाही असेही निरीक्षण य अहवालाने नोंदले आहे.

...Read More

V. S. News
एसबीआय गुपचूप कापत आहे ग्राहकांचे 990 रुपये

व्हीएस न्यूज - स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आपल्या ग्राहकांना गुपचूप चुना लावत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारे बँकेने शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांचा फटका लावला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हवामानाची स्थिती व अंदाज व्यक्त करण्याच्या नावाखाली एसबीआयच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यातून 990 रुपये कापत आहे, असे वृत्त मध्‍य प्रदेशातील नई दुनियाया वृत्तपत्राने दिले आहे. गंमत म्हणजे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अगोदरच टोल फ्री नंबरवरून हवामानाची माहिती मोफत देण्याची सुविधा उपलब्‍ध करून दिली आहे. तसेच कमी शिल्लक असल्याच्या नावाखाली खातेदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केल्याबद्दल एसबीआयवर याआधी प्रचंड टीका झाली होती. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील हजारीलाल शर्मा नावाच्या शेतकऱ्याची कथा या वृत्तपत्राने छापली आहे. हवामान वृत्त अलर्टच्या नावावर त्यांच्या खात्यातून 990 रुपये कापल्याचा संदेश शर्मा यांना आला होता. शर्मा यांनी बँक व्यवस्थापनाकडे तक्रार केली, परंतु त्यांचे पैसे परत देण्यात आले नाहीत.

विदिशातील सटेरन येथील एसबीआयच्या शाखा व्यवस्थापक बी. एस. बघेल यांनी माहिती न देता शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे कापल्याची कबुली दिली, असेही या वृत्तात म्हटले आहे. मात्र ही रक्कम मुंबई येथील मुख्य शाखेतून कापली जात असल्याचा दावा त्यांनी केला. स्टेट बँकेने हवामान अलर्टची सुविधा देण्यासाठी आरएमएल नावाच्या कंपनीशी करार केला आहे. देशातील 16 राज्यांतील 500एसबीआय शाखांतील ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्‍ध आहे.

...Read More

V. S. News
कैद्याने बनविले नाविन्यपूर्ण जनरेटर, केंद्र सरकारकडून विचारणा

व्हीएस न्यूज - बेंगळुरू तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने पर्यावरणपूरक वीज जनरेटर बनविला असून तो इंधनाशिवाय चालतो. राज्यातील सर्व तुरुंगात हे जनरेटर बसविण्याचा प्रस्ताव त्याने दिला असून केंद्र सरकारनेही त्यात रस दाखविला आहे.

बेंगळुरू येथील पारप्पान अग्रहारा तुरुंगात आठ वर्षांचा तुरुंगवास भोगणाऱ्या देवेश कुमार सिंग याने हा जनरेटर तयार केला आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये टाकण्यात आलेल्या एका बँक दरोड्याप्रकरणी त्याला शिक्षा झाली आहे. देवेश हा मध्य प्रदेशातील असून घटनेच्या वेळेस तो बेंगळुरू महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. दरोड्याच्या वेळेस एका ग्राहकावर गोळी झाडल्याबद्दल त्याला शिक्षा झाली आहे. देवेशने 28 डिसेंबर, 2017 रोजी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून आपला प्रस्ताव कळवला होता. तुरुंगात इंधन न वापरता आणि प्रदूषण न करता वीजनिर्मितीचा हा प्रस्ताव होता. या संदर्भात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून देवेश याला गुरुवारी पत्र मिळाले.

आम्ही आपल्या कल्पनेची प्रशंसा करतो. तथापि, इंधनाशिवाय वीज कसे तयार होईल हे त्यात स्पष्ट नाही. आपल्या पत्राला प्रतिसाद देण्यासाठी या जनरेटरची कार्यप्रणाली, वापरलेले इंधन, तांत्रिक तपशील इत्यादी तपशील आवश्यक आहेत,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.

...Read More

V. S. News
१०० चौ.मीटरचा नवा देश किंग्डम ऑफ एन्क्लाव्हा

व्हीएस न्यूज - युरोप मधील काही मित्रांनी स्लोवानिया आणि क्रोएशिया याच्या सीमेवरचा कुणाच्याच मालकीचा नसलेला एक जमिनीचा तुकडा स्वतंत्र देश म्हणून घोषित केला असून त्याचे नामकरण किंग्डम ऑफ एन्क्लाव्हा असे केले आहे. हा देश अगदी चिमुकला म्हणजे अवघा १०० चौरस मीटर परिसराचा आहे. सध्या या देशाचे ८०० लोकांनी आभासी निवडणुका घेऊन मतदान झाले व मंत्री निवडले गेले असे समजते.

वरजेंकिविज नावाच्या तरुणाने त्याच्या मित्रांसह हा नवा देश स्थापन केला आहे. क्रोएशियाची राजधानी जागरेब जवळ हा जमिनीचा तुकडा आहे. १९९१ साली युगोस्लावियाचे विघटन झाले तेव्हा त्यातून ७ राज्ये बनली. त्यांच्यात आपसात सीमा वाद होताच. त्यातून नो मॅन्स लँडची घोषणा झाली. नव्या देशाची जागा यातीलच एक असल्याचे समजते. या देशाने जगातील सर्व नागरिकांसाठी त्यांचे दरवाजे खुले केले आहेत. येथे रंग, जात, धर्म, राष्ट्रीयत्व यात भेदभाव केला जाणार नाही. शिक्षण मोफत व आयकर नाही अशीही जाहिरात केली गेली आहे. या देशाने सध्या ५ भाषांना मान्यता दिली असून त्यात चीनी भाषेचा समावेश आहे. देशाची घटना लवकरच लिहिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

...Read More

V. S. News
मोबाइल नंबर १३ अंकी होणार; जाणून घ्या अधिक माहिती…

व्हिएस न्यूज - आता सगळ्यांचे मोबाइल क्रमांक १० ऐवजी १३ अंकांचे होणार या वृत्ताने अनेकांची झोप उडाली आहे. पण यात घाबरण्याचे कारण नाही. कारण ही माहिती अर्धवट असून फक्त मशिन टू मशिन या अंतर्गत येणाऱ्या उपकरणांमध्ये जी सिम कार्ड वापरली जातात, उदारणार्थ स्वाइप मशिन्स, कार्स,इलेक्ट्रिक मीटर्स आदींमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिम कार्डचे नंबर १३ डिजिटचे होणार आहेत. त्यामुळे आपल्या सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाइल क्रमांक आहेत तसेच राहणार आहेत.

नुकतेच केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून १० डिजिटचे मोबाईल क्रमांक आता १३ डिजिट होणार असल्याचे सांगण्यात आले. हा नवीन बदल १ जुलैपासून लागू होणार असून सर्व ग्राहकांचा क्रमांक आता १३ आकडी असेल, अशा बातम्या सर्वत्र आल्या आहे. पण केवळ एम टू एम ग्राहकांसाठी हा बदल असल्याची बाब अनेकांच्या लक्षात आली नाही आणि गोंधळ उडाला आहे. १ ऑक्टोबर रोजी एमटूएमचे मोबाइल क्रमांक १० अंकांहून बदलून १३ अंकी करण्याचे काम सुरू होईल आणि ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे. तर १ जुलै पासून दिले जाणारे एम टू एम क्रमांक १३ अंकी असतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
सामन्यादरम्यान मनिष पांडेवर भडकला कॅप्टन कुल

व्हीएस न्यूज - जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंह धोनी त्याच्या शांत स्वभावासाठी लोकप्रिय आहे. पण धोनीचाही कधीतरी संयम सुटल्याचेही पहायला मिळाले आहे. सेंच्युरियन मैदानावर काल झालेल्या सामन्यातही असेच काहीसे घडले आणि त्याच्याबरोबर फलंदाजी करणाऱ्या मनिष पांडेवर धोनी संतापला आणि त्याने संतापाच्या भरातच अपशब्द वापरले. सध्या ट्विटवर याच घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

काल झालेल्या सामन्यात धोनी आणि मनीष पांडेने ९८ धावांची नाबाद भागीदारी केली. १८८च्या समाधानकारक धावसंख्येपर्यंत भारतीय संघाला पोहचवण्यासाठी दोघांनीही शेवटच्या पाच षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. भारताचा डाव सुरवातीलाच गडगडल्याने डावाला आकार देण्याची जवाबदारी या दोघांवर होती आणि ती त्यांनी पूर्णपणे निभावली. दोघे शेवटच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा काढत नाबाद राहिले. मात्र सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये धावा काढण्याचा दबाव दोन्ही फलंदाजांवर दिसून येत होता. धोनीच्या तोडून यामधूनच पांडेसाठी अपशब्द निघाले.

त्याचे झाले असे, पांडेने २०व्या षटकातील पहिल्या चेंडूंवर एक धाव काढली आणि धोनी स्टाइकर्स एण्डला गेला. गोलंदाज त्यानंतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार झाला तरी नॉन स्टाइकर्स एण्डला क्षेत्ररक्षक कुठे उभे आहेत हे पांडे पाहत होता. पांडेने प्रत्येक धाव महत्वाची असणाऱ्या सामन्यातील अशा क्षणी आपल्याकडे पहावे जेणेकरुन किती धावा पळायच्या आहेत किंवा इतर महत्वाचे संवाद त्याच्याबरोबर करता येईल असे धोनीला वाटत असल्याने त्याने थोड्या रागानेच पांडेला आपल्याकडे लक्ष देण्यास सांगितले. धोनी व्हायरल झालेल्या एका ट्विटमध्ये पांडेवर ओरडताना दिसत आहे. ‘ओए के इधर देख ले, उधर क्या देख रहा है. मै इधर खडा हू ना बॅटिंग कर रहा,असे धोनी रागाने म्हणाला. धोनीने नंतर या षटकामध्ये सतरा धावा काढल्याने भारताने धावफलकावर १८८ धावांचा टप्पा गाठला.

...Read More

V. S. News
जाहिरात दोन पक्षांची पण जाहिरातीतील लाभार्थी ‘सेम टु सेम’

व्हीएस न्यूज - योजनांपेक्षा जाहीरातबाजीवरच विद्यमान सरकार डोंगराएवढा खर्च करत असल्याचे आरोप आपण अनेकदा ऐकत आलो आहोत असतो. राजकीय पक्षांच्या जाहिरातबाजींचे भलेमोठे पोस्टर आपल्याला देशाच्या कोणत्याही गल्लीबोळ्यात गेले तरी दिसतील. पण या जाहीरातबाजी दरम्यान घोळही होऊ शकतो. याचा प्रत्यय आम आदमी पक्ष आणि भाजपने लावलेल्या बॅनरवरून आला आहे. भाजपने नागरिकांना गॅस सबसीडी सोडवी यासाठी आवाहन करणारी जाहिरात केली होती.

तर दुसरीकडे तीन वर्षांत सरकारने केलेल्या बदलाचा आढावा दिल्ली सरकारने जाहिरातीत मांडला होता. आपापल्या परीने दोन्हीही पक्षांनी जाहिरातबाजी केली. पण यात एक मोठी गफलत झाली आणि सोशल मीडियावर या दोन्ही पक्षांचे बॅनर ट्रोल होऊ लागले आहे. दोन्ही पक्षांनी जाहिरातीत दाखवलेले लाभार्थी अगदी सेम टु सेमच होते. त्यात फरक एवढाच होता की जाहिरातीवरील पक्ष वेगवेगळे होते.

आता ही जाहिरात ज्यांनी डिझाइन केली त्याच्या किंवा अगदी पक्षाच्याही ही बाब लक्षात आली नाही. पण, बरीच स्मार्ट लाभार्थी जनता असल्याने हा घोळ त्यांच्या नजरेतून काही न सुटल्यामुळे आप आणि भाजपची ही सेम टु सेम जाहिरातीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

...Read More

V. S. News
लष्करप्रमुखांनी राजकीय पक्षांमध्ये हस्तक्षेप करू नये : ओवेसी

व्हिएस न्यूज – लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आसाममधील राजकीय पक्षाबाबत केलेल्या विधानाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले असून ओवेसी यांनी रावत यांच्यावर राजकीय पक्षांवर भाष्य करणे हे लष्कर प्रमुखांचे काम नसल्याचे म्हणत निशाणा साधला आहे.

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सोमवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात आसाममधील बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) पक्षाबाबत भाष्य केले होते. आसामसारख्या राज्यात बेकायदा मुस्लीम निर्वासितांमुळेच एआययूडीएफसारख्या पक्षाची वाढ झाली. भाजपपेक्षाही जास्त वेगाने या पक्षाची वाढ होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. चीन व पाकिस्तान या देशांचा मुस्लीम निर्वासितांच्या घुसखोरीमागे हात असून या क्षेत्रातही अशांतता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले होते. ओवेसी यांनी रावत यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. राजकीय विधाने लष्करप्रमुखांनी का करावे, राजकीय पक्षाची स्थापना करणे आणि तो वाढवण्याची मुभा लोकशाहीत असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय विषयांमध्ये लष्करप्रमुखांनी हस्तक्षेप करु नये. एखाद्या पक्षाच्या वाढीवर भाष्य करणे हे लष्करप्रमुखाचे काम नाही. राजकीय पक्षांना लोकशाहीने व देशाच्या संविधानाने स्वातंत्र्य दिले आहे. नेहमीच देशातील जनतेने निवडून आलेल्या नेतृत्वाखालीच लष्कराने काम केले पाहिजे, असे ओवेसींनी म्हटले आहे.

...Read More

V. S. News
पाकिस्तानला सुधारण्यासाठी तीन महिन्यांची मुदत

व्हिएस न्यूज - आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या पैशांवर नजर ठेवणाऱ्या संस्थेने पाकिस्तानला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. अमेरिका आणि अनेक युरोपीय देशांनी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन न करणाऱ्या देशांच्या यादीत टाकण्याची मागणी केली होती.

या यादीत नाव येऊ नये, यासाठी पाकिस्तान गेली अनेक महिने धडपड करत आहे. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स ( एफएटीएफ) ही संस्था हे नियम तयार करते. या यादीत पाकिस्तानला समाविष्ट केले तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

एफएटीएफच्या सदस्यांची बैठक गेल्या आठवड्यापासून पॅरिस येथे होत आहे. पाकिस्तानला या यादीत टाकण्याचा प्रस्ताव अमेरिकेने दिला होता, तर जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. मात्र तीन महिन्यांसाठी ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे व आशिया-प्रशांत गटाकडून याबाबत अहवाल मागविण्यात आला आहे. हा ग्रुपही एफएटीएफचा भाग आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी मंगळवारी उशीरा ही माहिती दिली. सध्या रशियाच्या दौऱ्यावर असलेले आसिफ यांनी ट्वीट केले असून त्यांनी म्हटले आहे, की“प्रयत्नांचे चीज झाले आहे. पाकिस्तानला नॉमिनेट करण्यावर सहमती झाली नाही.” जूनमध्ये आशिया-प्रशांत गटाचा अहवाल येईल आणि त्यावर नंतर कारवाई होईल.

...Read More

V. S. News
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजकारणात बच्चा –येडियुरप्पा

व्हिएस न्यूज - कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व भाजप यांच्यात वाग्युद्ध जोमात असून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. त्यातच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे राजकारणात बच्चा असून त्यांनी प्रचार करणे हे भाजपच्या बाजूने काम करेल, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा बुधवारी म्हणाले.

कर्नाटक भाजपचे अध्यक्ष असलेले येडियुरप्पा हे कर्नाटकच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करून ते म्हणाले, की भाजपचा या निवडणुकीत 150 जागांवर विजय होईल. भाजपच्या सोशल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना येडियुरप्पा म्हणाले, की (काँग्रेसने) कर्नाटकमध्ये ‘बच्चा’ (राहुल गांधी) यांना आणल्यामुळे आता आपल्याला 150 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, याची खात्री आहे. तत्पूर्वी काँग्रेस झोपडपट्टीत राहणा-या लोकांची उपेक्षा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. “गरिबी निर्मूलन करण्यात काँग्रेसला काहीही स्वारस्य नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 70 वर्षांनंतरही हे लोक झोपडपट्टीत रहात आहेत,” असे येडियुरप्पा म्हणाले.

...Read More

V. S. News
भारतवंशीय शिवा अय्यादुराई आहे ईमेलचा जनक

व्हीएस न्यूज - आज जगात सर्वत्र ईमेलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या सेवेमुळे वेळेची बचत होते आहेच पण अक्षरशः कोट्यावधी टन कागदाची बचत होते आहे. या ईमेल चा शोध लावणारा व्ही ए शिवा आय्यादुराई मुळचा भारतीय पण आता अमेरिकेचा नागरिक आहे याची माहिती अनेकांना नाही. शिवाचा जन्म १९६४ मध्ये मुंबईत एका तमिळ कुटुंबात झाला असून तो वयाच्या सातव्या वर्षी आईवडिलांसोबत अमेरिकेला गेला व तेथेच स्थायिक झाला आहे.

१९७८ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी त्याने माध्यमिक शिक्षण सुरु असतानाच संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी न्यूयार्क विद्यापीठात कोरांट इंस्टीट्युट ऑफ मॅथेटीकल सायन्ससाठी प्रवेश घेतला आणि त्यानंतर न्यूजर्सीच्या लीविंग्टन हायस्कूल व युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन अँड डेटीस्ट्री येथे रिसर्च फेलो म्हणून शिक्षण घेतले. येथेच त्याने पहिले इंटरऑफिस मेल सिस्टीम तयार केले व त्याला ईमेल असे नाव दिले.

या मेलमध्ये इनबॉक्स, आउटबॉक्स, फोल्डर, अॅड्रेसबुक, मेमो अश्या सर्व अॅटॅचमेंट होत्या. याच प्रोग्रॅमला ऑफिशियल ईमेल शोध मान्यता मिळाली. या शोधासाठी पहिला अमेरिकन कॉपी राईट दिला गेला कारण त्यावेळी सॉफ्टवेअर सुरक्षेसाठी कॉपीराईट हीच पद्धत उपलब्ध होती असे समजते.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!