Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली

व्हिएस न्यूज - काँग्रेसमध्ये राहुलपर्वाला शनिवारी सुरुवात झाली. राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी अध्यक्षपदी विराजमान झाले. मनमोहन सिंग यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या असून या घोषणेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला.

राहुल गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा काँग्रेसने सोमवारी केली होती. शनिवारी राहुल गांधी यांचा पक्षाभिषेक सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचे नेते दिल्लीत पोहोचले. दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचीही गर्दी झाली होती. फटाके फोडून आणि मिठाई वाटून कार्यकर्ते जल्लोष करत होते. या प्रसंगी राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या. प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.

सकाळी अकराच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत त्यांना अध्यक्षपदी निवड झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. यानंतर मनमोहन सिंग यांनी संबोधित केले. राहुल गांधी यांना शुभेच्छा देतानाच मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांचे देखील आभार मानले. गेल्या १९ वर्षांपासून पक्षाच्या अध्यक्षपदाची धूरा समर्थपणे सांभाळणाऱ्या सोनिया गांधी यांना मी वंदन करतो, असे ते म्हणालेत.

सोनिया गांधी यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष या नात्याने माझे हे शेवटचे भाषण असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या संवैधानिक मूल्यांवर हल्ला होत आहे. देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले असून देशाच्या मूल्यांचे रक्षण करणे हेच तुमचे ध्येय आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. २०१४ पासून आपण विरोधी पक्षात आहोत, पण आपण घाबरणारे आणि झुकणारे नाहीत, असे त्यांनी नमूद केले. राहुल हा माझा मुलगा असल्याने मी त्याच्याविषयी फार बोलणार नाही. लहानपणापासूनच त्याने हिंसेचा सामना केला. राजकारणात आल्यावर त्याच्यावरील हल्ले आणखी तीव्र झाले पण यातून तो निडर आणि मानसिकदृष्ट्या आणखी कणखर झाला, असे त्यांनी सांगितले.
...Read More

V. S. News
आमदार, खासदारांच्या खटल्यांसाठी १२ विशेष न्यायालये

व्हीएस न्यूज खासदार आणि आमदारांवरील प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणाचा झटपट निकाल लावण्यासाठी देशात १२ नव्या विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली आहे. या कामासाठी ७.८० कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही केंद्र सरकारने सांगितले आहे. १० मार्च २०१४ च्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकार काय करत आहे, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने १ नोव्हेंबरला केली होती. लोकप्रतिनिधींविरोधातील खटल्यांचा एक वर्षात निकाल लावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

दोषी लोकप्रतिनिधींच्या निवडणूक लढवण्यावर आजन्म बंदीसाठी सरकारने सहमती दर्शवली होती. त्यानंतर प्रलंबित खटल्याचा निकाल जलद लावण्यासाठी सरकारची काय योजना आहे, अशी विचारणा कोर्टाने सरकारला मागील महिन्यात केली होती. निवडणूक आयोगाकडून कोर्टात सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये एकूण १५८१ खासदार तसेच आमदारांविरोधात गुन्हेगारी खटले प्रलंबित होते. यात लोकसभेचे १८४ आणि राज्यसभेचे ४४ खासदार होते. तर महाराष्ट्राचे १६०, उत्तर प्रदेशचे १४३, बिहारचे १४१ आणि पश्चिम बंगालचे १०७ आमदारांवरील खटले प्रलंबित होते. सर्व राज्यांमधील गुन्हा दाखल असलेल्या लोकप्रतिनिधींची एकूण संख्या १५८१ होती. न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. खरेतर कोणत्याही राज्यात न्यायालयांची स्थापना राज्य सरकार करते. पण या प्रकरणात उशीर झाल्याने, त्यापासून वाचण्यासाठी केंद्र सरकारने एक योजना बनवून विशेष कोर्टाची स्थापना करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

लोकसभा खासदारांवरील खटल्यांचा निकाल जलद लावण्यासाठी दोन न्यायालयांची स्थापना करायची आहे, असे सरकारने सांगितले. ज्या राज्यांमध्ये प्रलंबित गुन्हेगारी खटले असलेल्या आमदारांची संख्या जास्त आहे,तिथेही एक-एक कोर्टाची स्थापना केली जाईल. सध्या अशाप्रकारच्या १२ विशेष कोर्टाची स्थापना केली जाईल. सरकारने कोर्टाच्या स्थापनेसाठी निवडणूक आयोगाच्या आकडय़ांनाच आधार बनवले आहे. प्रलंबित खटल्यांवर स्वत:कडून कोणतीही आकडेवारी दिलेली नाही. सरकारने आकडय़ांची जुळवाजुळव करण्यासाठी आणखी मुदत मागितली आहे. आता या प्रकरणावर पुढील आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

...Read More

V. S. News
प्रत्येक पात्र शेतकऱ्यास लाभ मिळेपर्यंत कर्जमाफी योजना सुरु राहणार - मुख्यमंत्री

आतापर्यंत ४३ लाख १६ हजार ७६८ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर

व्हीएस न्यूज - राज्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देत बोगस खातेधारकांना योजनेच्या लाभापासून रोखता यावे आणि त्याची पारदर्शक अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या योजनेतून आतापर्यंत ४३ लाख १६ हजार ७६८ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली आहे. त्यासाठीचे २० हजार ७३४ कोटी रुपये बँकांना पाठविण्यात आले आहेत. अर्ज केलेल्या उर्वरीत शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करुन त्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल. राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची योजना प्रभावी आणि पारदर्शकपणे राबविली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य सर्वश्री डॉ. अनिल बोंडे, सुनिल प्रभू, राजेंद्र पाटणी, हर्षवर्धन जाधव आदींनी नियम २९३ अन्वये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, २००८ मध्ये राबविण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेत ‘कॅग’ने ३९.४३ टक्के प्रकरणांमध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आणून दिले. ही अनियमित प्रकरणे सुमारे चार हजार कोटी रुपयांची होती. त्यावेळी एकाच कुटुंबांतील अनेक सदस्यांनी लाखो रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ घेतल्याचे दिसले. बँका आणि सहकारी सोसायट्यांनीही त्यावेळी अनियमितता केल्याचे पुढे आले. हे सर्व रोखण्यासाठी सध्या राबविल्या जात असलेल्या‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’त पूर्णत: पारदर्शक अशा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी जमिनीची मर्यादा ठेवण्यात आली नाही. या योजनेसाठी सुमारे ७७ लाख ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. दुबार अर्ज केलेले, योजनेसाठी पात्र नसलेले, आयकर भरणारे यातून कमी झाले. उरलेल्या ६९ लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यापैकी ४३ लाख १६ हजार ७६८ शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली असून त्यासाठीचे २० हजार ७३४ कोटी रुपये बँकांना पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २२ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष पैसे जमा झाले आहेत. यामध्ये विदर्भातील ११ लाख खातेदार शेतकऱ्यांना ५ हजार ७५४ कोटी रुपये, मराठवाड्यातील ११ लाख शेतकऱ्यांना ६ हजार कोटी, उत्तर महाराष्ट्रातील ७ लाख शेतकऱ्यांना ३ हजार ७०४ कोटी रुपये आतापर्यंत जमा करण्यात आले आहेत. उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची कार्यवाही वेगात सुरु असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही कार्यवाही सुरु राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले नाहीत परंतु ते पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांचाही अर्ज भरुन घेऊन कर्जमाफीचा लाभ त्यांना देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

2008 मधील कर्जमाफी योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी २८ महिन्यांचा कालावधी लागला होता. पण त्या तुलनेत चालू कर्जमाफी योजनेची गतीने आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांतील त्रुटी टाळून प्रत्येक पात्र शेतकऱ्यास कर्जमाफीचा लाभ मिळावा. तसेच शासनाच्या प्रत्येक पैशाचा सुयोग्य वापर व्हावा यादृष्टीनेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही पूर्णत: पारदर्शक अशा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, असेही श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

...Read More

V. S. News
सिंचन घोटाळाप्रकरणी गुन्हे दाखल

व्हीएस न्यूज - गोसेखुर्द सिंचन घोटाळाप्रकरणी राज्य सरकारने मंगळवारी सायंकाळी एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने एकूण चार एफआयआर दाखल केले. धक्कादायक बाब म्हणजे तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी घोटाळ्याच्या फाईलींवर सह्या केल्याचे उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शेतकरी कर्जमाफी, शिष्यवृत्ती, मंत्र्यांच्या घोटाळ्याच्या माध्यमातून विरोधकांनी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतानाच जन आक्रोश, हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून वातावरण तापवले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या कार्यकाळातील घोटाळे उघड करण्याचे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच संकेत दिले होते. नागपुरात राष्ट्रवादी काँगेसचे हल्लाबोल आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे सरकारकडून सिंचन घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले.

दरम्यान, अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीनचिट दिलेली नाही, असे उत्तर लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला दिले होते. एसीबीने या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. विशेष म्हणजे, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचीही चौकशी लाचलुचपत विभागाने केली होती.

काय आहे सिंचन घोटाळा?

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा ७२ हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा असल्याचे बोलले जाते. विदर्भातील ३८ सिंचन प्रकल्पांची किंमत ६६७२ कोटी रुपयांवरून थेट २६६७२ कोटी रुपयांवर पोहोचली. विदर्भ सिंचन विकास महामंडळाने ही दरवाढ केली. ही दरवाढ ठेकेदारांच्या दबावाखाली झाल्याचा आरोप करण्यात येतो. ही थक्क करणारी किंमत वाढ मूळ प्रकल्पाच्या ३०० पट आहे,किंमत वाढीच्या जास्तीच्या २०००० कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाला फक्त तीन महिन्यांमध्ये परवानगी मिळाली. जून, जुलै आणि ऑगस्ट २००९ मध्ये वाढीव खर्चाला कोणत्याही हरकतीशिवाय परवानगी देण्यात आली. व्हीआयडीसी म्हणजे विदर्भ सिंचन विकास महामंडळाने ही भाववाढ मंजूर करून घेण्यासाठी बांधकाम साहित्यातील भाववाढ, मजुरांवरील खर्च आणि इंजिनीअरिंग कामाचा खर्च आणि भूसंपादनात झालेली वाढ ही कारणे दिली.

मात्र वाढीव खर्च मंजूर करवून घेण्यासाठी जी तत्परता दाखवण्यात आली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सर्वात थक्क करायला लावणारी बाब म्हणजे निम्न वर्धा प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी चक्क १५ ऑगस्ट राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी मिळाली आहे. या प्रकल्पाची किंमतही ९५० कोटी रुपयांवरून २३५६ कोटी रुपयांवर वाढवली गेली. अमरावतीमधील अप्पर वर्धा प्रकल्पाची किंमतही ६६१ कोटींवरून १३७६ कोटी रुपयांवर पोहोचली. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदीवरील प्रकल्पाची किंमत १२७८ कोटी रुपयांवरून २१७६ कोटी रुपयांवर पोहोचली. या वाढीव खर्चाला १४ ऑगस्ट २००९ मध्ये परवानगी मिळाली. अप्पर वर्धा आणि बेंबळा नदीवरील प्रकल्प एकाच दिवसात म्हणजे १४ ऑगस्टला मंजूर झाले. २४ जून २००९ या एकाच दिवशी विदर्भ सिंचन विकास महामंडळाने तब्बल दहा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली. त्यामध्ये वेसावली, लोणवडी, दगडपारवा आणि दावा या लघु प्रकल्पांचा तर हुमन नदी, खरबडी केटी वेअर, जियागाव, खडक पूर्णा, पेंटाकली आणि चंद्रभागा या मोठय़ा प्रकल्पांचा समावेश आहे. या दहा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय परवानगी मिळाल्यानंतर व्हीआयडीसीने एकाच दिवसात लगेच सर्व ३८ प्रकल्पांसाठी निविदाही जारी केल्या. व्हीआयडीसीचे कार्यकारी संचालक देवेंद्र शिर्के यांनी हे सर्व प्रकल्प मंजूर केले.

...Read More

V. S. News
शाळाबाह्य विद्यार्थी शोधा, शिक्षण विभागाचे फर्मान

व्हीएस न्यूज - शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून सर्व पातळीवर प्रयत्न झाले. मात्र यात पाहिजे तितके यश काही मिळालेले नाही. असे असतानाही पालकांच्या संपर्कात राहा आणि मुलांना शाळेत आणा, असे नवे फर्मान शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी काढले आहे. याचबरोबरच शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी परिसरात फिरण्याची सवय स्वत:ला लावून घ्या, असाही उल्लेखही विभागाच्या एका पत्रात करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात शाळाबाह्य मुलांचा प्रश्न निरुत्तरितच आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी आणि शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभागाने अनेक मोहिमा आखल्या. मात्र शाळाबाह्य मुलांची संख्या कमी झालेली नाही. सध्या वेगवेगळ्या अहवालांचा आधार घेत राज्यात साधारण ४ लाख २० हजार मुले शाळाबाह्य असल्याचे शासनानेच कबूल केले आहे. आता पुढील वर्षीच्या शैक्षणिक आराखडय़ात या मुलांची संख्या शून्यावर आणण्याचा उद्देश शिक्षण विभागाने ठेवला आहे. त्यासाठी शाळाबाह्य मुलांच्या पालकांचे संपर्क क्रमांक मिळवण्याची सूचना शिक्षण विभागाकडून शिक्षकांना करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाचे एक वरिष्ठ अधिकारी जालना जिल्ह्याच्या दौ-यावर गेले होते. त्यावेळी परिसरात फेरफटका मारताना एका पालावर दोन मुले आढळली. अधिका-यांनी माध्यमांसह सर्व कनिष्ठ अधिका-यांना जागे केले. सर्व शिक्षण विभाग कामाला लागला; चक्क दोन मुलांचा शाळेत प्रवेश झाला आणि त्यांच्यावरचा शाळाबाह्य हा शिक्का पुसला गेला. त्यावेळी शाळाबाह्य मुलांच्या पालकांकडे मोबाईल असतो. त्याचा क्रमांक मिळाल्यास मुलांवरील शाळाबाह्य हा शिक्का पुसला जाईल, या विचारातून या मुलांच्या पालकांचे मोबाईल क्रमांक मिळवण्याचे फर्मान शिक्षण विभागाकडून सुटले आहे.

शाळाबाह्य मुलांची संख्या घटण्याचे गुपित

राज्यात साधारण ४ लाख २० हजार शाळाबाह्य मुले आहेत. मात्र त्यातील ३ लाख २२ हजार मुले ही मान्यता क्रमांक नसलेल्या शाळांमध्ये आहेत. त्यामुळे ही मुले शाळाबाह्य दिसत आहेत. सध्या अनधिकृत असलेल्या शाळांना यूडीएस क्रमांक मिळाला की शाळाबाह्य मुलांची संख्याही कमी दिसेल. शाळाबाह्य आणि स्थलांतरित मुलांचे शिक्षण या कार्यात आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत, अशा आशयाचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.

...Read More

V. S. News
२०११ पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना पक्की घरे!

व्हीएस न्यूज - मुंबईतील झोपडपट्टीधारकांना हक्काचे पक्के घर मिळावे म्हणून सरकारनेही एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या अधिवेशनात त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा फायदा १८ लाख सामान्य मुंबईकरांच्या सुमारे साडेतीन लाख झोपड्यांना होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने मुंबई झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत बदल करून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत सध्या लेटर ऑफ इंटेट दिलेल्या १५१३ झोपडपट्टी पुनर्विकासाच्या योजना सुरू असून त्यातून ४ लाख ४१ हजार घरे तयार होणार आहेत. त्यापैकी २ लाख घरांच्या निर्मितीचे काम सध्या सुरू आहे. मुंबईतील झोपडपट्टीधारकांना पुनर्विकासाची योजना राबवताना २००० पर्यंतची झोपडी कायद्याप्रमाणे अधिकृत ठरते. त्यानंतरच्या झोपडपट्टीधारकांना कायद्याप्रमाणे घर मिळत नाही.

मुंबईतील प्रत्येक योजनेत एकुण झोपडीधारकांपैकी सरासरी ३० टक्के लोक अपात्र ठरतात त्यामुळे या रहिवाशांना बेघर व्हावे लागते. किंवा त्यावर कायदेशीर वाद निर्माण होतात व न्यायालयात जाऊन रखडतात. किंवा झोपडपट्टी पात्रता ठरवताना मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली व अशा विविध कारणांनी या योजना रखडल्या. पर्यायाने शहर विकासावर त्याचा परिणाम होतो आहे. या योजनांमध्ये सुलभता यावी तसेच सर्वांना हक्काची घरे मिळावीत, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ठोस भूमिका घेतली आहे.

सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता २००० पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना पक्के घर तर मिळेलच. पण २००० नंतरच्या आणि २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना त्याच योजनेमध्ये त्याच ठिकाणी बांधकाम खर्च अथवा तस्सम खर्च देऊन घर मिळेल असा निर्णय मंत्रीमंडळात घेण्यात आला. मुंबई उपनगरातील हजारो झोपडपट्टीमध्ये राहणा-या सर्वसामान्य माणसाला हा निर्णय दिलासा देणारा व हक्काचे घर देणारा आहे. असे सांगत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

...Read More

V. S. News
बँक खात्याला ‘आधार’ लिंकची मुदत रद्द

व्हीएस न्यूज - केंद्र सरकारने बँक खात्याशी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची ३१ डिसेंबरची मुदत रद्द केली आहे. अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागाने मंगळवारी यासंबंधीचे परिपत्रक काढले असून पुढील मुदत चर्चेअंती ठरवण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाकडून ३३ कोटी पॅन कार्ड वितरीत करण्यात आले असून त्यापैकी ४१ टक्के म्हणजे १४ कोटी पॅनकार्ड आधार कार्डबरोबर लिंक झाले आहेत. तर ११५ कोटी लोकांकडे आधार कार्ड आहे. गुरुवारी आधारबाबत सर्वोच्च न्यायालयात एक महत्वाची सुनावणी होणार आहे. ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही, सरकार त्यांच्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१७ ऐवजी ३१ मार्च २०१८ पर्यंत करत असल्याचे मागील सुनावणीवेळी केंद्र सरकारकडून अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यासाठी शुक्रवारी परिपत्रक जारी केले जाईल. दरम्यान, मोबाइल क्रमांकाला आधार क्रमांक जोडण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०१८ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही मुदत वाढवली जाणार नाही.

दरम्यान, ८ डिसेंबरला सरकारने आधारला पॅन कार्डशी लिंक करण्याची अखेरची मुदत वाढवून ती ३१ मार्च २०१८ करण्यात आली होती. पॅन कार्डशी आधार लिंक केल्याशिवाय पुढच्या वर्षी कर भरता येणार नाही. दरम्यान, यावर्षीही ज्या लोकांनी आधार-पॅनला लिंक केले नव्हते. त्यांना कर जमा करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मोबाइलला क्रमांकाला आधार क्रमांक जोडण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०१८ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही मुदत वाढवली जाणार नाही.

...Read More

V. S. News
नागपूरमध्ये घुमला पिंपरीच्या आमदाराचा आवाज; मागासवर्गीयांच्या प्रश्नावर आमदार चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

व्हीएस न्यूज - मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी कायदा, पदोन्नतीमध्ये आरक्षण तसेच स्वतंत्र पाली विद्यापीठाची स्थापना आदी मागण्यांसाठी आज विधानसभेतील पायऱ्यांवर बसून आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केले.


नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी विविध पक्षाच्या आमदारांनी एकत्र येऊन छेडलेल्या या आंदोलनाने मुख्यमंत्र्यासह सर्व मंत्री तसेच प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष वेधले.
पिंपरीचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय व महामंडळातील पदोन्नतीमधील शासन निर्णय अधिनियम २००१ नुसार अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, तसेच आंध्र व कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रात अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी कायदा उपयोजना लागू करावी आणि स्वतंत्र पाली विद्यापीठाची स्थापना करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे नेते व आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. सुजित मिनचेकर, बालाजी किणीकर, प्रा. ज्ञानराज चौगुले, सुभाष साबणे दिलीप सोपल आदी आमदारांनी एकत्र येऊन बॅनर फडकावून आपल्या एकजूटीचे दर्शन घडविले. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार चाबुकस्वार म्हणाले की, जो लाभ अन्य राज्यातील मागासवर्गीय समुदायाला मिळतो तोच कायदा महाराष्ट्राने लागू करणे गरजेचे आहे. मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षणप्रश्नी सरकारने सकारात्मता दर्शविली असून चर्चेसाठी निमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.
...Read More

V. S. News
भटके-विमुक्त , आदिवासींच्या प्रश्नांसह नितीन आगे प्रकरणासंदर्भात हिवाळी आधिवेशनात आवाज उठविणार - अॅड.डाॅ.अरुण जाधव

समता आंदोलनाच्या वतीने हिवाळी अधिवेशनात नागपूरला करणार धरणे आंदोलन

व्हीएस न्यूज - नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भटके विमुक्तांच्या प्रशनासह आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आनण्यासाठी शासनाने राज्यपातळीवर पारधी विकास आराखडा तयार करुण त्याची अंबलबजावणी करावी यासाठी महाराष्ट्रातील समता आदोलनाच्या वतीने विविध संस्था संघटनांच्या १४ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्रातील वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर खर्डा येथिल नितीन आगे प्रकरणात शासनाने विशेष लक्ष घालुन शासनाने नितीनला न्याय मिळावा यासाठी तज्ञांची समिती नेमावी,खटल्याची रीट्रायल घेण्यात यावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
सदरील धरणे आंदोलनात संपूर्ण महराष्ट्रातून लोक येणार आहेत या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहण लोकअधिकार आदोलन,ग्रामीण विकास केंद्र,वंचित विकास संस्था यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती लोकअधिकार आंदोलनाचे जिल्हासचिव प्रमोद काळे यांनी दीली.
...Read More

V. S. News
विराट – अनुष्का यांच्या लग्नाला अखेर पूर्णविराम

व्हीएस न्यूज - गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या विराट-अनुष्का लग्नाच्या चर्चेला अखेर सोमवारी पुर्णविराम मिळाला. इटलीमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित दोघांनी आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरु केली. विराट-अनुष्काची यांची चर्चा तशी नवी नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या जोडीवर प्रसार माध्यमांचे कॅमेरे टपून बसले होते. दोघांच्या नात्याबाबत बित्तम बातम्या माध्यमे देत होती. मात्र, मैदानातील धमाकेदार कामगिरीनं प्रतिस्पर्ध्यांना हतबल करणाऱ्या विराटने प्रसारमाध्यमांना आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या इव्हेंटपासून दूर ठेवण्यात यश मिळवले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट विश्रांती घेणार याबाबत चर्चा जोर धरु लागली होती. कारण विराटने विश्रांतीचा आधार घेत सुट्टीची विनंती केली होती. यासोबत त्याने खेळाडूंच्या मानधनाच्या मुद्यावर भाष्य करत वेगळ्या मुद्द्याकडे माध्यमांचे लक्ष वेधले. यंदाच्या वर्षात विराट कोहली सर्वाधिक सामने खेळला आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज आहे, हे सर्वमान्य होते.

पण, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात १०४, दुसऱ्या सामन्यात २१३ आणि तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात २४६ आणि ५० ही धावासंख्या त्याला थकवा वैगेरे नाही, हेच सांगते. मात्र, विराटला ही दीर्घ विश्रांती थकवा दूर करण्यासाठी नाही, तर लग्नासाठी हवी होती, हे स्पष्ट झाले आहे. एखाद्या विवाहाची आठवड्याभरात तयारी करणे सहज आणि सोपे नाही. त्यात विराट-अनुष्का यांसारख्या लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या जोडीच्या विवाहाच्या तयारीला फक्त आठ दिवस हे म्हणजे अशक्यच! विराटचा हा लग्नसोहळा श्रीलंकेच्या भारत दौऱ्यानंतर पार पडला असला तरी विराट भारत-श्रीलंका दौऱ्यावर गेला होता, तेव्हापासून लग्नाची तयारी सुरु होती का? असा प्रश्न दोघांच्या चाहत्यांना नक्कीच पडू शकतो. ही जोडी ज्यावेळी मायदेशी परतेल त्यावेळी कदाचित तयारीबद्दल ऐकायलाही मिळेल. मात्र, तोपर्यंत विराट-अनुष्का आपल्या लग्नाची तयारी गोपनिय ठेवण्यात यशस्वी ठरले, असेच म्हणावे लागेल. मैदानात प्रतिस्पर्ध्यांना हताश करणाऱ्या विराटने खेळातील सातत्य, विश्रांती, खेळाडूंच्या मानधनाचा मुद्दा यामध्ये माध्यमांना अडकवून त्याने लग्नाच्या तयारीची कल्पनाही कोणाला येऊ दिली नाही.

...Read More

V. S. News
मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत १०९ व्या स्थानी

व्हीएस न्यूज - वर्षभरात देशातील इंटरनेटच्या वेगात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. वर्षभरात भारतात ४जीची सेवा वेगाने विस्तारली आहे. मात्र असे असले तरी, इंटरनेटच्या वेगाच्या बाबतीत भारताला जगातील पहिल्या १०० देशांच्या यादीतही स्थान मिळालेले नाही. इंटरनेटचा वेग पडताळून त्याबद्दलची आकडेवारी जाहीर करणाऱ्या ओक्ला या संस्थेने ही माहिती दिली आहे. या यादीत नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे.

मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात १०९ व्या क्रमांकावर आहे. तर ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारत ७६ व्या स्थानी आहे. २०१७ च्या सुरुवातीला भारतातील मोबाईल डाऊनलोडिंगचा सरासरी वेग ७.६५ एमबीपीएस (मेगा बाईट पर सेकंद) इतका होता. मात्र वर्षाच्या अखेरपर्यंत इंटरनेटच्या वेगात वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये भारतातील मोबाईल इंटरनेट स्पीड ८.८० एमबीपीएस इतका होता, अशी ओक्लाची आकडेवारी सांगते. वर्षाच्या सुरुवातीचा इंटरनेट स्पीड लक्षात घेतल्यास इंटरनेटच्या वेगातील वाढ १५ टक्के इतकी आहे. नॉर्वेमध्ये मोबाईल इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक (६२.६६ एमबीपीएस) आहे. यानंतर नेदरलँड्स (५३.०१ एमबीपीएस) दुसऱ्या आणि आईसलँड (५२.७८ एमबीपीएस) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मोबाईल इंटरनेटच्या क्रमवारीत १०९ व्या क्रमांकावर असलेला भारत, ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत ७६ व्या क्रमांकावर आहेत. वर्षभरात भारतातील ब्रॉडबँडचा वेग जवळपास ५० टक्क्यांनी वाढला आहे. जानेवारी महिन्यात देशातील ब्रॉडबँडचा वेग १२.१२ एमबीपीएस इतका होता. नोव्हेंबरपर्यंत हा वेग १८.८२ एमबीपीएसवर जाऊन पोहोचला. ब्रॉडबँड इंटरनेटच्या वेगाचा विचार केल्यास सिंगापूर (१५३.८५ एमबीपीएस) पहिल्या क्रमांकावर आहे. तर आईसलँड (१४७.५१ एमबीपीएस) दुसऱ्या आणि हाँगकाँग (१३३.९४ एमबीपीएस) तिसऱ्या स्थानी आहे.

...Read More

V. S. News
मुंबई महापालिकेत १ हजार ३८८ पदे भरणार

व्हीएस न्यूज - मुंबई महापालिकेत २००९ नंतर सर्वात मोठय़ा मेगाभरतीला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. यामध्ये चतुर्थश्रेणी कामगारांच्या एकूण १३८८ जागा भरल्या जाणार आहेत. राज्य सरकार आणि टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाऑनलाइन लिमिटेड कंपनीतर्फे या भरतीचे नियोजन होणार आहे.

जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण,कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार अशा चतुर्थश्रेणी कामगारांच्या एकूण १३८८ जागा या भरतीत भरण्यात येणार आहे. शेवटची तारीख ३१ डिसेंबर रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या आणि तिस-या आठवडय़ात ऑनलाईन परीक्षाही घेण्यात येणार आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!