Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
सोनीच्या ‘या’ फोनवर तब्बल १३६०० रुपयांची सवलत

व्हिएस न्यूज - मोबाईल उत्पादक कंपनी सोनीने आपल्या एक्सपीरिया XZs च्या किंमतीत मोठी कपात केली असून या फोनच्या किंमतीत १३ हजार ६०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन आता ३६ हजार ३९९ रुपयात उपलब्ध आहे.

ब्ल्यू, वार्म सिल्व्हर आणि ब्लॅक कलरमध्ये सोनी एक्सपीरिया XZs उपलब्ध असेल. या फोनमध्ये १९ मेगापिक्सेलचा मोशन आय कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात ९६० फ्रेम/सेकंडच्या वेगाने सुपर स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो. 4K व्हिडिओही या फोनमध्ये रेकॉर्ड केला जाऊ शकतो. १९ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि १३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा या फोनमध्ये देण्यात आला आहे. शिवाय ४जीबी रॅम आणि ६४जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
...Read More

V. S. News
ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा आता लवकरच होणार कमी

व्हिएस न्यूज - शासनाच्या विविध योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून ६५ वयाची मर्यादा घालण्यात आली. पण लवकरच ही वयोमर्यादा कमी होण्याची शक्यता आहे. आता ६५ वरून ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले आहे.

सध्या राज्यात ६५ वर्षांवरील व्यक्ती ज्येष्ठ नागरिक म्हणून राज्य सरकारच्या सवलत घेऊ शकतात. पण या सवलतीचा लाभ त्यापेक्षा कमी वय असलेल्या नागरिकाला घेता येत नाही. त्यानंतर राज्य सरकार आता अशा सर्व नागरिकांसाठी वयोमर्यादा कमी करण्याच्या तयारीत आहे, याबाबतचे आश्वासन बडोले यांनी दिले आहे.
...Read More

V. S. News
आणखी एका नेत्याची अनुविराच्या हनीमूनवर टीका

व्हिएस न्यूज - ११ डिसेंबरला इटलीच्या टस्कनीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकले.

रोममध्ये या नवविवाहित दाम्पत्याने हनीमून साजरा केला. आता विराट आणि अनुष्का भारतात परतल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांचे लग्न आणि देशभक्तीवरुन सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आमदार पन्नालाल शाक्य यांच्यानंतर आता काश्मीर पार्टीचे नेते राकिफ वाणीनेही विराट-अनुष्कावर निशाणा साधला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विराट-अनुष्काने रोममध्ये हनीमून साजरा केल्यावरुन वाणीने त्यांच्यावर टीका केली आहे. विराट आणि अनुष्का ज्यांना चाहते विरुष्का असे म्हणतात. त्यांनी हनीमूनसाठी फिनलँड हे ठिकाण निवडले. भारतात अशी अनेक ठिकाणी आहेत जिथे हे जोडपे हनीमूनसाठी जाऊ शकले असते. कारण हनीमूनसाठी काश्मीर ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते अशा ठिकाणी जाऊ शकले असते. यामुळे पर्यटनाला चालना मिळाली असती, असे वाणी म्हणाले.
...Read More

V. S. News
व्हीवोने आणला दमदार फीचर्ससह नवा स्मार्टफोन

व्हिएस न्यूज - एनर्जेटिक ब्लू या रंगातील व्ही७ हा स्मार्टफोन चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी व्हिवोने लाँच केला. १८,९९० रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत आहे. याची ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही ठिकाणी विक्री सुरु करण्यात आली आहे.

व्हीवो व्ही७ मध्ये २४ मेगापिक्सेल सेल्फी आणि १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर ४ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, फुल एचडी व्ह्यू डिस्प्ले आणि ३०००एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मून लाईट ग्लो आणि फेस अॅक्सेस फीचरही देण्यात आले आहे.

व्हिवोने याआधी हा स्मार्टफोन मॅट ब्लॅक आणि शँपेन गोल्ड या दोन कलरमध्ये लाँच केला होता. खास सेल्फीप्रेमींसाठी गेल्या महिन्यात हा स्मार्टफोन लाँच केला होता. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवरुन फोन घेतल्यास १८ हजार रुपयापर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. त्यासोबतच व्हिवोकडून एका वर्षापर्यंत रिप्लेसमेंट ऑफरही दिली जात आहे.
...Read More

V. S. News
या ट्रिकने डिलीट करा गूगलकडे असलेली आपली माहिती

व्हिएस न्यूज - इंटरनेट विश्वातली जायंट सर्च इंजिन ‘गूगल’कडे तुम्ही काय ‘सर्च’ करता, तुमचा आवडता पदार्थ कोणता, तुम्ही कुठे कुठे जाता, कोणत्या वेबसाईटना भेट देता, याची सर्व माहिती असते. हे खरे आहे… जगातील सगळ्यात लोकप्रिय सर्च इंजिनकडे तुमची सर्वच माहिती आहे, तुमच्या प्रत्येक क्षणाची, तुम्ही एकटे राहात असाल, तरीही… गूगलच्या अटी आणि शर्तीच्या भल्या मोठ्या करारनाम्यात गूगलची सेवा वापरताना मिळत असलेल्या तुमच्या माहितीविषयी आमच्यावर विश्वास ठेवा, असे पहिले वाक्य आहे.

पण आता तुम्हाला हे माहीत आहे का, गूगलने ही जमा केलेली सर्व माहिती नष्ट करण्याची व्यवस्थाही ‘गूगल’नेच करून दिली आहे. गूगलच्या ‘My activity’मध्ये साठवलेली सगळी माहिती नष्ट करण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला आम्ही आज काही ट्रिक सांगणार आहोत.

आपल्या गूगल खात्याशी आपण करत असलेला प्रत्येक गूगल सर्च जोडला जातो. त्याचबरोबर आपली गूगलवर सुरू असलेली प्रत्येक हालचाल टिपली जाते, मग ते जीमेलवर पाहिलेला एखादा ईमेल असो वा गूगल फॉर्म्समध्ये भरलेला एखादा फॉर्म असो. ‘My Activity’ नावाच्या फोल्डरमध्ये ती सगळी माहिती जमा होते आणि तिथूनच ती डिलीट करता येते. तारीखवार माहिती शोधण्याचाही पर्याय त्यात देण्यात आहे. या फोल्डरमधली सगळीच माहिती तुम्ही नष्ट करू शकता किंवा एखादी विशिष्ट माहिती शोधूनही काढून टाकू शकता.

“All products” आणि “All time” हे पर्यायही माहिती नष्ट करण्यासाठी आहेतच. हे पर्याय निवडताच, त्याचे काय काय परिणाम होतील, हे सांगणारा एक इशारा गूगलकडून तुमच्या स्क्रिनवर झळकेल. प्रत्यक्षात, गूगलमधील तुमच्या शोधाचा इतिहास, म्हणजेच सर्च हिस्ट्री किंवा गूगलवरील तुमच्या भटकंतीची माहिती अर्थात ब्राउझिंग हिस्ट्री डिलीट केल्याचे कोणतेही परिणाम आपल्या गूगल खात्यावर किंवा त्या अॅप्लिकेशनवर होत नाही.

जगातील सर्वांत मोठी व्हिडीओ स्ट्रीमिंग साईट म्हणजे युट्यूब. आता युट्युबवर जगातील कुठलाही लोकप्रिय व्हिडीओ तिथेच सापडतो, आपल्याला तो फक्त तेवढा शोधावा लागतो. गूगलचे आपण यूट्यूबवर काय शोधतो आणि काय बघतो त्यावरही लक्ष असते. पण ती माहितीही डिलीट करता येते. यूट्यूबमध्ये डाव्या हाताला असलेल्या मेनूमधील हिस्ट्रीवर क्लिक करा. त्यातील Clear all search history आणि Clear watch history हे पर्याय निवडा.

आपली सगळी माहिती गूगल साठवून ठेवते, पण आपण वावरत असलेल्या वेबसाइट्सवर त्या माहितीच्या आधारे जाहिरातीही दाखवते. म्हणजेच आपण त्यांच्या सेवा वेबसाईटवर येणाऱ्या अॅड काय शोधले, पाहिले किंवा केले, यावरून ठरवण्यात येतात. म्हणूनच आपण केलेल्या सर्च किंवा ब्राउझिंगशी मिळत्या जुळत्या जाहिराती आपल्याला दिसू लागतात. पण काळजी करू नका! नेमकी कोणती माहिती जाहिरातदारांना गूगलने दिली, हे आपण शोधू शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल खात्यात लॉग इन करून Personal info & privacy या मेनूत जावे लागेल. तिथे गेलेल्या Ads Settingsचा पर्याय निवडा आणि त्यात Manage ads settingsमध्ये जाऊन त्यात, Ads personalisation हा पर्याय दिसेल. तो जर Deactivate किंवा निष्क्रीय केल्यानंतर आपल्या इंटरनेट ब्राउझिंगवर आधारित जाहिराती थांबतील. त्यावेळी गुगल तुम्हाला तसे करणे हे तुमच्या हिताचे नसल्याचे सांगेल. त्यामुळे आपल्याला तशा जाहिराती हव्यात का, हे ठरवून मगच निर्णय घ्यावा. पण जाहिरातच नको, असा पर्याय मात्र गूगलने दिलेला नाही.

जर अँड्रॉईड फोन तुम्ही वापरत असाल तर गूगल आपल्या लोकेशनची म्हणजेच आपण कुठे गेलो, याची माहितीही साठवून ठेवते. गूगल मॅपवरची ही माहिती डिलीट करण्यासाठी त्या पेजवर गेल्यावर लोकेशन ट्रॅकिंगचे बटण बंद करायचे. तसेच, सगळी किंवा विशिष्ट माहिती डिलीट करायची. त्यासाठी Waste basket हा पर्याय निवडून एखादा विशिष्ट प्रवास किंवा थांबा काढून नष्ट करता येतो.
...Read More

V. S. News
आता रेडिओ, वर्तमानपत्रातून झळकणार थुकरटांची नाव

व्हिएस न्यूज – इंदूरच्या महापौरांनी रस्त्यावर थुंकून परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर जरब बसवण्याकरिता एक नवा नियम जारी करण्याचे ठरवले असल्यामुळे रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून यापुढे दंड तर आकारण्यात येईलच पण, रेडिओ आणि वर्तमान पत्रांतूनही अशा लोकांची नावे यापुढे जाहीर करण्यात येणार असल्याचे इंदूरच्या महापौर मालिनी लक्ष्मण सिंग गौड यांनी एक वृत्त संस्थेला सांगितले आहे.

देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूर शहराला स्थान मिळाले असल्यामुळे भविष्यातही स्वच्छ शहराचा दर्जा कायम राहावा यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पान, गुटखा खाऊन जागोजागी पिचकाऱ्या मारणाऱ्यांवर यापुढे कारवाई करण्यात येईल आणि त्यांच्याकडून ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे गौड यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांची नावेही स्थानिक रेडिओद्वारे जगजाहीर करण्यात येतील असेही त्यांनी म्हटले आहे.
...Read More

V. S. News
प्रभू रामांसाठी लोकरीचे कपडे आणि हिटर द्यावे – विहिंप

व्हिएस न्यूज – प्रभू रामांसाठी लोकरीचे कपडे आणि एका रुम हिटरची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली असून फैजाबादच्या विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात परिषदेने तशी याचिका सादर केली आहे. राममंदिर वादामध्ये याप्रकरणामुळे आणखी ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत असून, सध्या हिवाळ्यातही या मुद्द्यावरून वातावरण गरम झाले आहे.

थंडीचे दिवस सध्या सुरू असल्यामुळे या याचिकेमधून श्रीरामांना थंडी वाजू नये यासाठी काही गरम कपडे आणि मंदिराचा गाभारा गरम ठेवण्यासाठी हिटरची मागणी करण्यात आली आहे. एका पुजाऱ्यांने यावर राम मंदिरामध्ये हिटर लावण्यास विरोध केला आहे. कारण, सध्या रामांची मूर्ती ज्या ठिकणी ठेवण्यात आली आहे आणि हिटरमुळे तिथे आग लागण्याची शक्यता असल्यामुळे त्या पुजाऱ्यांनी हिटरची मागणी म्हणजे विश्व हिंदू परिषदेचा एक स्टंट असल्याची टीका केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी शिवाय विश्व हिंदू परिषदेच्या मागणीची पुर्तता ही अशक्य आहे. पण अशी मागणी करणारे मागील २५ वर्षात काय झोपले होते काय, असा सवाल करत हा केवळ प्रसिद्धीचा प्रकार असल्याचे एका पुजाऱ्याने म्हटले आहे. यापूर्वीच्या सरकारच्या काळात असे प्रकार झालेले दिसून येत नाहीत. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्येच अशा प्रकारच्या याचिका करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
...Read More

V. S. News
Amityच्या विद्यार्थिनीला मायक्रोसॉफ्टचे १.०३ कोटींचे पॅकेज

व्हीएस न्यूज – Amity स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजीची माजी विद्यार्थिनी कथा चंदा हिला दरवर्षी १.०३ कोटी रुपये पॅकेज मिळाले आहे. अमेरिकन मायक्रोसॉफ्ट कंपनीने विद्यार्थिनीला नोकरीची ऑफर दिली आहे.

तिने Amityमध्ये बी.टेक (सीएसई) चे शिक्षण घेतले असून बीटेक करतानाच तिने सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि डिझाइनमधील एका मोठ्या प्रकल्पावर काम केले. तिची आवड शोध आणि परिवर्तनामध्ये आहे.

याबरोबरच तिने मेडिकल इमेजिंग समस्येवरही काम केले. कथा चंदा मायक्रोसॉफ्ट कंपनीतील नोकरीवर मार्चमध्ये रुजू होणार आहे. तिथे ती एका अशा टीमचा हिस्सा असेल ज्यात सुरक्षा व्यवस्था तयार केल्या जातात.
...Read More

V. S. News
राज्यातील सर्व खात्यांच्या मस्तवाल अधिकाऱ्यांना अजित पवारांनी भरला दम

व्हिएस न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील सर्व खात्यांच्या मस्तवाल अधिकाऱ्यांना दम भरत कुठल्याही लोकप्रतिनिधींचा अपमान यापुढे केला तर याद राखा. हे सभागृह त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले आहे.

नाशिकमधील तहसिलदाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार दीपिका चव्हाण यांचा अपमान केला होता. त्यामुळे दीड वर्षापूर्वी त्यांच्यावर विशेष अधिकार हक्कभंगाचा प्रस्ताव आणला गेला होता. परंतु, दीड वर्ष झाले तरी त्याच्यावर कारवाई झाली नसल्याचा मुद्दा सभागृहामध्ये चर्चेला आला. पक्षनेते अजित पवार या मुद्यावर आक्रमक झाले. सदस्यांना अधिकारी अशी वागणूक कशी देऊ शकतात. मस्तवालपणा करणाऱ्या आणि चुकीचे वागणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही. तो अधिकारी दीड वर्षाने कसा काय मॅटमध्ये जाऊ शकतो, असा संतप्त सवाल करत पवार यांनी सभागृहातील सर्व सदस्यांची बाजू घेतली.

राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनीही विशेषाधिकार भंगाच्या मुद्यावर या चर्चेत भाग घेत, सदस्यांचे अधिकार अबाधित राखण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी सदस्यांच्या हक्काबाबत सभागृहामध्ये मांडलेल्या मुद्द्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. आमदारांच्या हक्कांचे जर विशेषाधिकार समिती संरक्षण करू शकत नसेल, तर ही समितीच बरखास्त करावी, असा संताप विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
...Read More

V. S. News
बिहारची कुमारी सिंह बनली जगासाठी प्रेरणास्थान, तिला या कामासाठी मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

व्हिएस न्यूज - बिहारमधील भोजपूर जिल्ह्य़ातील कुमारी सिंह हे नाव संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान बनले आहे. स्विसच्या महिला विश्व समिट फाउंडेशनच्या वतीने तिला तिच्या उत्कृष्ट कामासाठी वुमेन्स क्रिएटिविटी इन रुरल लाइफ पुरस्कार प्रदान करण्यात आला. उच्चवर्गाच्या मुलांसारखे दलित समाजातील मुलांना शिक्षण देण्याचे काम केल्याबद्दल तिला हा हा सन्मान देण्यात आला आहे. या मुलीने २०१४ मध्ये रत्नापूर गावातून आपल्या या काम सुरु केली.

कुमारी याबाबत सांगते कि अशा लहान मुलांना शिकवण्याची प्रेरणा तिला तिच्या आध्यात्मिक गुरुकडे गेल्याने मिळाली. देशभरातील १०१ खेडयातील मुलांना शिक्षण देण्याची तिची इच्छा आहे. हा सन्मान मिळवणारा ती सर्वात युवा उमेदवार आहे. कुमारी आपल्या परिसरातील त्या वर्गातील मुलांसाठी देखील काम करते ज्यांच्या पालकांकडे स्वतःच्या जमिनी नाहीत आणि ते फक्त मजुरी करून आपले पोट भरतात. कुमारीने सुरुवातीला या कार्यक्रमात शाळेतून येणा-या अशा मुलांना ट्यूशन देणे सुरु केले जे शाळेत आल्यावर फक्त फिरण्याचे काम करत होते.

लहान मुलांना शिकवत असताना तिने त्या मुलांच्या पालकांचाही त्यांच्यासोबत समावेश केला. तिने सर्वांना महिन्याला किमान २० रुपये बचत केली असे सांगितले. नंतर त्यांनी हा पैसा सर्वसाधारण बँकेत जमा करणे सुरू केले. जेव्हा गावातील लोकांनी यापासून फायदा व्हायला सुरुवात झाली, तेव्हा त्यांनी कुमारीजवळ जवळपासच्या गावातील महिलांनाही पाठविणे सुरू केले. याबरोबरच आजूबाजूच्या गावातील मुले व मुलीही तिच्याजवळ यायला लागले.

बघता बघता १०० मुलांसह सुरु केली शिकवणी १००० मुलांपेक्षा जास्त झाल्यानंतर कुमारीने लोकांच्या मदतीने गावातील जनतेसाठी हात पंप आणि शौचालये तयार केली.
[9:18 AM, 12/22/2017] Swayam Aswar Press:
...Read More

V. S. News
नागपूरमध्ये साडेबारा टक्के व पोलीस आयुक्तालयाच्या मागणीसाठी आमदार चाबुकस्वार यांचे आंदोलन

व्हिएस न्यूज - प्राधिकरणातील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा व पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी या मागणीसाठी पिंपरीचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली आज नागपूर येथे आंदोलन करण्यात आले.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात निर्णय होऊनही वेळकाढूपणा चालू असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील या दोन प्रश्नांसाठी विधानसभेतील पायऱ्यांवर उभे राहून सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आले. आमदार चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सत्यजित पाटील, राजन साळवी, सुजीत मिंचेकर, सुरेश गोरे, प्रकाश आबीटकर आदी आमदारांनी यामध्ये भाग घेतला.

प्राधिकरणातील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमिन परतावा मिळावा यासाठी आमदार चाबुकस्वार यांनी यापूर्वी तीन वेळा नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्यासमवेत बैठक घेतली होती. हा विषय अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्याकडे प्रलंबित आहे. तशीच परिस्थिती शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीबाबत झाली आहे. निर्णय झाला परंतू अर्थखात्याची मान्यता तसेच प्रशासकीय सुस्तपणामुळे हा देखील प्रश्न लटकून राहिला आहे. मार्च मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार चाबुकस्वार यांनी याप्रश्नी विधानसभेत लक्षवेधीही मांडली होती.

आज सकाळी या दोन प्रश्नांच्या मागणीचे बॅनर फडकावत आमदार चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व आमदार विधानसभेतील पायऱ्यांवर आले. व त्यांनी आंदोलनास सुरूवात केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार चाबुकस्वार म्हणले की, पिंपरी चिंचवड शहरातील जनतेच्या जिव्हाळयाचे हे दोन प्रश्न आहे. गेली तीन वर्षे सातत्याने आपण हे प्रश्न सोडविण्याची मागणी करत आहोत. परंतू सरकार तातडीने निर्णय घेत नाही. येत्या दोन महिन्यात हे दोन्ही प्रश्न निकाली लागले नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्यचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
...Read More

V. S. News
केवळ १० पैशांत १ किमी धावणार ओकिनोवाची इलेक्ट्रीक स्कूटर

व्हिएस न्यूज - ओकिनोवा कंपनीने त्यांची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर प्रेझ भारतात मंगळवारी लाँच केली असून ही स्कूटर अगदी कमी खर्चात युजर चालवू शकणार आहे. ही स्कूटर चालविण्यासाठी प्रति किलेामीटर १० पैसे इतका मामुली खर्च करावा लागेल असा कंपनीचा दावा आहे. या स्कूटरचे प्री बुकींग सुरू झाले असून दोन हजार रूपये भरून ही नोंदणी करता येणार आहे. महिना अखेरी या स्कूटरची डिलिव्हरी सुरू होत आहे. कंपनीची भारतीय बाजारातील ही दुसरी स्कूटर आहे. यापूर्वी त्यांनी रिझ स्कूटर लाँच केली आहे. मात्र प्रेझ ही पहिली इलेक्ट्रीक स्कूटर असून तिची किंमत आहे ५९८८९ रूपये.

या स्कूटरला साईड स्टँड सेन्सर, कीलेस एंट्री, फाइंड माय स्कूटर फंक्शन, एलईडी टेललाईट, इंडिकेटर्स दिले असून ती ३ स्पीड मोडमध्ये उपलब्ध आहे. इकॉनॉमर, स्पोर्ट व टर्बो असे हे तीन स्पीड मोड आहेत. ही स्कूटर २ तासांत फुल चार्ज होते व एकदा चार्ज केल्यानंतर १७० ते २०० किमी जाते असाही दावा कंपनीने केला आहे.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!