Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
३१ डिसेंबरला रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश

व्हिएस न्युज - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी माझ्यासाठी राजकारण नवे नाही. पण थोडा उशीरच झाला, माझा राजकीय प्रवेशच हा मोठा विजय असल्याचे सांगत आपल्या राजकीय प्रवेशावर आज शिक्कामोर्तब केले. पण येत्या ३१डिसेंबरला यासंबंधित अधिकृत घोषणा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रजनीकांत गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार की स्वतंत्र पक्ष काढणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले असून चाहत्यांना त्यासाठी ३१ डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे. रजनीकांत आजपासून पुढचे सहा दिवस चेन्नईत त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या भेटीसाठी राघवेंद्र कल्याणा मंडपममध्ये १८ जिल्ह्यांतून हजारो चाहते आले आहेत.

कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश केल्यानंतर रजनीकांत यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. राजकारणात ते कधी येणार याचीच उत्सुकता त्यांच्या चाहत्यांसह तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातही होती. आज त्यांच्याही राजकारणातील प्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला. माझ्यासाठी राजकारण नवे नाही. पण थोडा उशीर झाला आहे. माझा प्रवेशच मोठा विजय आहे. यासंदर्भातील मी ३१ डिसेंबरला निर्णय जाहीर करेन, असे रजनीकांत म्हणाले. चाहत्यांशी काही दिवसांपूर्वी संवाद साधताना, रजनीकांत म्हणाले होते की, राजकारणात जर मी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तर वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सदैव दूर ठेवेन.
...Read More

V. S. News
सरकारने १० फेब्रुवारीपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करावी

व्हिएस न्युज - पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार कंबर कसली असून मराठा समाजाला सरकारने दिलेली आश्वासने १० फेब्रुवारी २०१८ पर्यंत प्रत्यक्ष कृतीत न आणल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनालाच घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजेच १९ फेब्रुवारीपासून मराठा आंदोलन पुकारणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

पनवेलमध्ये नुकतीच राज्यस्तरीय सकल मराठा समाज समन्वयकांची बैठक पार पडली. २९ जिल्ह्यातील समन्वयक या बैठकीत हजर होते. हा निर्णय त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. भाजप सरकारने मुंबईत सकल मराठा समाजाचा मोर्चा झाल्यानंतर घोषणांचा पाऊस पाडला. पण अद्याप त्या घोषणा कृतीत उतरवल्या नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपला इशारा देणारे पोस्टर्स मराठा युवा क्रांती मोर्चातर्फे मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले होते.
...Read More

V. S. News
सत्तेत संविधानात बदल करण्यासाठीच आलो आहोत – भाजप नेते

व्हिएस न्युज – आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद ओढवून घेत केंद्रीय मंत्री व भाजप नेते अनंत कुमार हेगडे यांनी भाजपलाच अडचणीत आणले आहे. संविधानात वेळोवळी बदल झाले आहेत आणि असे बदल आम्ही सुद्धा करणार असून आम्ही त्यासाठीच सत्तेवर आलो आहोत, असे वादग्रस्त वक्तव्य हेगडे यांनी केले आहे.

धर्मनिरपेक्ष म्हणून मिरवणाऱ्यांना स्वतःचे मूळ माहिती नाही. त्यांना संविधानानेच धर्मनिरपेक्ष म्हणवण्याचा अधिकार बहाल केला आहे. पण, वारंवार याच संविधानात बदल करण्यात आले आहेत आणि आम्हीही आता असे बदल करू हे त्यांनी लक्षात ठेवावे. अनंत कुमार हेगडे कोप्पल जिल्ह्यातील कुकानूर शहरात ब्राह्मण युवा परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

पुढे ते म्हणाले, एखादा व्यक्ती जर स्वतःला मुस्लिम, हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध म्हणवून घेत असेल तर त्याचा मला अभिमान वाटेल. कारण त्याची त्याच्या धर्माशी आणि जातीशी बांधिलकी आहे. परंतु, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे कोण आहेत? त्यांना स्वतःचे मूळही ठाऊक नाही. वादग्रस्त वक्तव्यांसाठी पाच वेळा लोकसभेवर निवडून आलेले अनंत कुमार हेगडे हे ओळखले जातात. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
...Read More

V. S. News
पोटनिवडणुकांसाठी भाजपची मोर्चेबांधणी

लोकसभेच्या आठ जागांसाठी फेब्रुवारीत निवडणुकीची शक्यता

व्हीएस न्यूज गुजरातमध्ये अपेक्षेपेक्षा कमीच नव्हे तर शंभराचा आकडाही गाठू न शकलेल्या भाजपने लोकसभेच्या आठ जागांसाठी होणा-या पोटनिवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यातील किमान चार जागा धोक्यात असल्याची घंटा वाजल्याने चिंतेत पडलेल्या भाजप नेतृत्वाने विविध राज्यांतील नेत्यांबरोबर चर्चा सुरू केली आहे.

लोकसभेच्या ज्या आठ जागा रिक्त झाल्यात त्यात महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियासह गोरखपूर, फुलपूर (उत्तर प्रदेश), अजमेर व अलवर (राजस्थान), अनंतनाग (काश्मीर), अरारिया (बिहार) व उलुबेरिया (प. बंगाल) या जागांचा समावेश आहे. २०१४ नंतर लोकसभेसाठी होणारी ही पहिलीच पोटनिवडणूक असेल. नियमांनुसार कोणतीही जागा रिक्त झाल्यावर सहा महिन्यांच्या आत तेथे पोटनिवडणुका घ्याव्याच लागतात. काश्मीरमधील दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर अनंतनागची निवडणूक टाळली तरी आठपैकी सात जागांवर फेब्रुवारी २०१८ पर्यंत आयोगास निवडणुका घ्याव्याच लागतील. साहजिकच नोटाबंदी व जीएसटीनंतर मोदी सरकारला जनतेचा कौल किंवा २०१९ची छोटी उपांत्य फेरी या दृष्टीनेही या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ व के. पी. मौर्य यांना भाजप नेतृत्वाने राज्यात पाठविल्याने गोरखपूर व फुलपूर या जागा रिक्त झाल्या आहेत. यातील गोरखपूरची जागा भाजप परत मिळवेल. मात्र फुलपूरमध्ये बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींचे कडवे आव्हान भाजपला पेलावे लागेल. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांत फुलपूरमध्ये भाजपचा जबरदस्त पराभव झाला होता. साहजिकच निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या सुमारास मायावतींच्या बेहिशेबी मालमत्ता गैरव्यवहाराच्या फाइल्स बाहेर येऊ शकतात.

भाजपमधून बाहेर पडून मूळ काँग्रेसकडे वळलेले नाना पटोले यांच्या भंडारा-गोंदिया जागेचाही यात समावेश आहे. गुजरातमधील कामगिरीने हुरूप आलेल्या काँग्रेसने यातील राजस्थान, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील जागांवर दिग्गज चेहरे उतरविण्याच्या हालचाली सुरू केल्याने भाजप नेतृत्वासमोरची चिंता अधिक वाढविली आहे. मोदी लाटेत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करून खासदार झालेले पटोले पुन्हा मैदानात उतरले, तर त्यांच्याविरुद्ध सक्षम उमेदवाराला बळ देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

भाजप सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अजमेरमधून काँग्रेसतर्फे सचिन पायलट उभे राहण्याची चिन्हे असल्याने त्यांच्यासमोर दिवंगत मंत्री सावरलाल जाट यांचे पुत्र रामस्वरूप लांबा यांचा तरुण चेहरा भाजप पुढे करू शकते, तर वसुंधराराजे यांचे निकटवर्तीय व राजस्थानातील मंत्री डॉ. जसवंत यादव यांना अलवरमधून संधी मिळू शकते.

...Read More

V. S. News
शेतकरी कर्जमाफीसाठी पुन्हा अर्ज करण्याची मुभा

व्हीएस न्यूज - ज्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा अर्ज भरायचा राहिला असेल, त्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी मुदत देणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. औरंगाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेत चुकीच्या माणसाला पैसे जाऊ नयेत, म्हणून सर्व पडताळणी करून शेतक-यांना पैसे दिले जात आहेत. पण जे शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेतून काही कारणास्तव बाजूला काढले असतील किंवा सिस्टीममधून बाहेर पडले असतील, त्यांच्यासाठी आमची एक समिती असेल. ही समिती त्या सर्व शेतक-यांच्या तक्रारी ऐकून घेईल, आणि जर त्यांची नावे कर्जमाफीच्या प्रक्रियेतून चुकीने काढले गेले असतील, तर त्यांना पुन्हा एकदा यादी करून लाभ दिला जाईल. तसेच, ज्या शेतक-यांचा कर्जमाफीचा अर्ज भरायचा राहिला असेल, त्यांना सुद्धा पुन्हा एकदा कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी मुदत देणार असल्याचे, त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. दानवे म्हणाले की, विरोधकांचा एक पाय तुरुंगामध्ये, तर एक पाय बाहेर आहे. म्हणून सरकारवर दबाव टाकण्यासाठी आंदोलन आणि मोर्चे काढले जात आहेत. कोंडून ठेवलेले उंदीर दरवाजा उघडल्यावर, जसे बाहेर पडतात, तसे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून लोक बाहेर पडत आहेत, असे दानवे यावेळी म्हणाले.

पत्ते अंतिम क्षणी खुले करणार

नागपूर अधिवेशनात विरोधकांकडून घातल्या जाणा-या गोंधळाचाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी समाचार घेतला. खूप कार्ड खिशामध्ये आहेत, याचा विरोधकांनाही पत्ता नाही. आम्ही शेवटच्या दिवसांमध्ये जे काही करू, त्यामुळे गोंधळ घालणाऱ्यांना निवडणुकीसाठी उमेदवार सुद्धा मिळणार नाही, असा टोला त्यांनी हाणला.

...Read More

V. S. News
‘बाराखडी’ नव्हे, आता ‘चौदाखडी’!

व्हीएस न्यूज – महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने पहिलीपासून शिकवल्या जाणा-या मराठी भाषेतील बाराखडी व वर्णमालेत बदल केला असून आता यापुढे मुलांना ‘बाराखडी’ऐवजी ‘चौदाखडी’ शिकवली जाणार आहे. मराठी शब्दोच्चारात मुलांना येणारी अडचण लक्षात घेऊन बाराखडीत ‘अँ’ आणि ‘ऑ’ या दोन स्वरांची भर घालण्यात आली असून त्यामुळे मराठी भाषेची बाराखडी आता चौदाखडी झाली आहे.

इयत्ता पहिली ते पाचवीतील काही विद्यार्थ्यांना अजूनही वाचता येत नसल्याचे विविध संस्थांचे सर्वेक्षण आणि अधिका-यांनी केलेल्या पाहणीत समोर आले आहे. त्यातच मराठी भाषेतील शुद्धलेखनाचे काही नवीन नियमही तयार करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्या प्राधिकरणाने विद्यार्थ्यांना तीन महिन्यांत शंभर टक्के वाचता येईल, याची हमी देणारा ‘मूलभूत वाचन क्षमता विकास कृती कार्यक्रम’ तयार केला आहे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.

टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभरातील शिक्षकांना प्रशिक्षण देऊन सर्व शाळांत हा कार्यक्रम करण्यात येत आहे. त्याचे पहिल्या टप्प्यातील तीन दिवसांचे प्रशिक्षण प्राथमिक शिक्षकांना देण्यात आले आहे. या मूलभूत वाचन विकास कृती कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आदर्श वाचन करता यावे असा आहे. वाचन करताना विद्यार्थ्यांना प्रामुख्याने अर्धचंद्र, अनुस्वार, काना, मात्रा, वेलांटी असणारे काही जोडशब्द अवघड वाटतात. अशा विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळवण्याची कृती या चौदाखडीमध्ये असणार आहे. सध्या एक वर्षासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. असा असेल नवीन स्वरमालेचा क्रमअ ते औ च्या बाराखडीत आता दोन नव्या स्वरांची भर घालण्यात आली आहे. सध्याच्या क्रमानुसारच्या ओ स्वरानंतर ‘ऑ’ हा नवा स्वर येईल.

...Read More

V. S. News
विजय रुपाणी यांच्या मंत्रीमंडळात ६ पाटीदार आणि ६ ओबीसी मंत्री

व्हिएस न्युज - गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्र्यांसह एनडीएशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले होते. मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांच्यासह १९ मंत्री शपथ घेतली आहे. ६ पाटीदार आणि ६ ओबीसी चेहऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

गांधीनगर येथील सचिवालयात गुजरातमधील नव्या सरकारचा शपशविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथे विजय रुपाणी हे गुजरातचे मुख्यमंत्री तर नितिन पटेल हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. रुपाणी यांना गुजरातचे राज्यपाल ओपी कोहली हे मुख्यमंत्री पदाची शपथ देतील. एकूणच हा सोहळा शपथविधीचा असला भाजप यावेळी एका प्रकारे आपले शक्तीप्रदर्शनच करणार आहे, असे दिसते. भाजप अध्यक्ष अमित शाह हे या सोहळ्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण मंत्रीमंडळ देखील शपथ घेणार आहे. रूपाणी यांच्या मंत्रिमंडळात काही नवे चेहरे देखील पाहायला मिळणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नारानपुरा विधानसभेतून निवडून आलेले आमदार कौशिक पटेल यांना विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळात जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आर. सी. फलदु, परबत पटेल, हितु कनोडिया, पंकज देसाई, पुर्णेश मोदी, निमा आर्चार्या, सौरभ पटेल आणि धर्मेंद्र सिंह जाडेजा या नव्या चेहऱ्यांना देखील मंत्रीमंडळात जागा मिळण्याची शक्यता आहे.
...Read More

V. S. News
जिओच्या ३९९ रुपयांच्या रिचार्जवर मिळणार ‘एवढा’ कॅशबॅक

व्हिएस न्युज - अगदी कमी कालावधीत भारतात रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीने आपले स्थान निर्माण केले असून जिओने ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशा एकाहून एक उत्तम ऑफर्स देत ग्राहकांची पसंती मिळवल्यानंतर जिओने त्यांना आकर्षक कॅशबॅक ऑफर्स देत अधिकच खूश केले आहे. नुकतीच आपली आणखी एक ऑफर जिओने जाहीर केली असून ३९९ रुपयाचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना तब्बल ३३०० रुपयांची कॅशबॅक मिळणार असल्यामुळे जिओची सेवा तुम्ही वापरत असाल तर ही संधी अजिबात वाया घालवू नका.

४०० रुपयांचे माय जिओ कॅशबॅक व्हाऊचर्स यामध्ये मिळतील. वॉलेटमध्ये ३०० रुपयांचे तत्काळ कॅशबॅक व्हाऊचर्स जमा होतील. तर ई-कॉमर्स साईटसचे २६०० रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट व्हाऊचर्स मिळणार आहेत. कंपनीने याआधी ३९९ आणि त्याहून अधिक रुपयांच्या रिचार्जवर जवळपास २५९९ रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर जाहीर केल्यानंतर आता ही आणखी एक धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे.
...Read More

V. S. News
शिपिंग कंटेनरमध्ये झाली कुलभूषण जाधव यांची मातृभेट

व्हिएस न्युज – पाकिस्तानने सोमवारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना काचेच्या पलीकडून भेटू देण्याचे नाटक पार पाडले. पण सांगितल्याप्रमाणे हे नाटक देखील पाकिस्तानच्या सरकारी इमारतीत न करता चक्क पार्किंग लॉटमधील एका शिपिंग कंटेनरमध्ये केल्याचा गौप्यस्फोट इंडिया टुडेने केला आहे. सोमवारी कुलभूषण जाधव यांची आई व पत्नीशी भेट झाली. जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानने भेटू दिले नाही.

जाधव यांना त्यामुळे कुटुंबियांना तब्बल २२ महिन्यांनी भेटता आले. पाकिस्तानने ती भेटही बंद खोलीत करण्याचा मोठेपणा दाखवला नाही आणि काचेच्या पलीकडे केवळ एकमेकांना दर्शनाचा लाभ घेता आला. या भेटीचे फोटो ज्यावेळी प्रसारमाध्यमांमध्ये आले त्यावेळी जाधव यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे जाणवत होते. त्यांचे हाल करण्यात आल्याचे मानण्यास पुरेशी जागा आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या आघा शाही येथील पार्किंग लॉटमध्ये असलेल्या शिपिंग कंटेनरमध्ये किंवा जहाजावर असतात त्या भल्या मोठ्या कंटेनरमध्ये ही भेट घडवण्यात आली आणि सरकारी इमारतीमधील खोलीमध्ये भेट घडवल्याचा आव पाकिस्तानकडून आणण्यात आला. याबाबत इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार तीन भागात हा कंटेनर विभागला होता. यामध्ये साउंड प्रूप भिंती उभारण्यात आल्या होत्या. स्पीकरच्या माध्यमातून जाधव व त्यांच्या आई व पत्नी यांनी संवाद साधला.
...Read More

V. S. News
अभिजीत कटके “महाराष्ट्र केसरी”

व्हीएस न्यूज - पुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली आहे. अंतिम फेरीत अभिजीतने साताऱ्याच्या किरण भगतवर १०-७ अशी मात केली. सामना जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते मानाची चांदीची गदा देऊन अभिजीतचा सत्कार करण्यात आला.

सामना सुरु झाल्यानंतर, सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये अभिजीतकडे चांगली आघाडी होती. मात्र किरण भगतने जोरदार पुनरागमन करत सामन्यात ३-३ अशी बरोबरी साधली. यानंतर किरण भगतने काही खास डावपेच आखत अभिजीतला चांगलीच टक्कर दिली. यावेळी किरणला गुण न दिल्यामुळे काहीकाळ किरणच्या प्रशिक्षकांनी आक्षेपही नोंदवला, यावेळी काहीकाळासाठी सामना थांबलेला पहायला मिळाला.

मात्र यानंतर अभिजीत कटकेने सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत किरण भगतला वरचढ होण्याची संधी दिली नाही. किरण भगतच्या तुलनेत अभिजीत हा उंची आणि वजनाने उजवा खेळाडू आहे. याचा फायदा घेत अभिजीतने किरणला चितपट देत अखेर महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावावर केला. अंतिम सामन्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही हजेरी लावली होती.

...Read More

V. S. News
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मोदींचा प्रमुख पाहुणे म्हणून गौरव

व्हीएस न्यूज - आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वर्षामध्ये आणखी एका गोष्टीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहेत. जगभरातले टॉप सीईओ आणि सत्ताधीश एकत्र येणाऱ्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मोदी सहभागी होणार आहेत. गेल्या २० वर्षांमधील या परिषदेत भारतीय पंतप्रधानांनी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकंच नाही तर मोदी या परिषदेत मुख्य पाहुणे म्हणून सन्मानिले जाणार असून हा मान मिळणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.

दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताचा वरचश्मा राहील अशी चिन्हे आहेत, कारण यात सहभागी होणाऱ्या भारतीय उद्योजकांची व सरकारी अधिकाऱ्यांची संख्या शंभरावर असणार आहे. भारताची आर्थिक स्थिती व भारतामधील गुंतवणुकीच्या संधी या विषयांभोवती अनेक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली असून भारतामध्ये परकीय गुंतवणूक आणण्यासाठी मोदी या परिषदेचा चांगला उपयोग करतील असे तज्ज्ञांचे मत आहे.

जानेवारी महिन्यात ही परिषद होत असून प्रजासत्ताक दिनही याच महिन्यात असल्याने भारतीय पंतप्रधान परिषदेला जाण्याचे टाळत आले आहेत. मात्र, अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून २३ ते २६ जानेवारी असा स्वित्झर्लंडचा हा दौरा करण्याचे मोदींनी ठरवले आहे. ते २६ जानेवारी रोजीच परततील आणि भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आसियानच्या नेत्यांचे स्वागत नवी दिल्लीत करतील.

याआधी केवळ दोन पंतप्रधानांनी पी. व्ही. नरसिंह राव व एच डी देवेगौडा या दोघा पंतप्रधानांनी दावोसच्या या परिषदेत सहभाग घेतला होता. त्यातली शेवटची भेट १९९७ ची असून या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणारे नरेंद्र मोदी हे २० वर्षांतील पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.

मोदींच्या बरोबर ३० ते ४० सरकारी अधिकारी या परिषदेत सहभागी होणार आहेत. तसेच मोठ्या संख्येने भारतीय उद्योजकही या परिषदेत सहभागी होणार आहेत. भारतामध्ये असलेल्या गुंतवणुकीच्या संधी विदेशी गुंतवणूकदारांसमोर मांडण्यासाठी ही परिषद म्हणजे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. २०१९ च्या निवडणुकांपूर्वी भारतामध्ये तेजीचे चित्र आणायचे असेल आणि अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल तर विदेशी गुंतवणूक येणं गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर दावोसची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

...Read More

V. S. News
देशातील ५० हजार मदरसा शिक्षकांचे वेतन रखडले

व्हीएस न्यूज - देशातील १६ राज्यातील ५० हजारांहून अधिक मदरसा शिक्षकांना मागील दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडून वेतन देण्यात आलेले नाही. वेतन नसल्यामुळे अनेकजण आपले काम सोडण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांचाही समावेश असून येथील मदरसा शिक्षकांना स्कीम फॉर प्रोव्हायडिंग क्वॉलिटी एज्युकेशन (एसपीक्यूएम) अंतर्गत देण्यात येणाऱ्या वेतनाचा हिस्सा मिळालेला नाही.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २००८-०९ मध्ये मदरसांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी एसपीक्यूएमची सुरूवात केली होती. त्याअतंर्गत मदरसा शिक्षकांच्या वेतनातील मोठा हिस्सा केंद्र सरकारकडून देण्यात येणार होता. पदवीधर शिक्षकांना दरमहा ६ हजार तर पदव्युत्तर शिक्षकांना दरमहा १२ हजार रूपये देण्यात येणार होते. त्यांच्या वेतनातील हा क्रमश: ७५ आणि ८० टक्के हिस्सा होतो. वेतनाचा उर्वरित हिस्सा राज्य सरकारकडून दिला जातो, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

आंदोलनाच्या पवित्र्यात मदरसा शिक्षक

अखिल भारतीय मदरसा आधुनिकीकरण शिक्षक संघाचे (एबीएमएएसएस) मुस्लिम राजा खान म्हणाले की, भारतातील अर्ध्याहून अधिक मदरसे उत्तर प्रदेशात आहेत. यूपीत २५ हजार मदरसे शिक्षक आहेत. सोळा राज्यातील शिक्षकांना केंद्र सरकारने वेतन दिलेले नाही. काही राज्यांमध्ये तर तीन वर्षांपासून वेतन देण्यात आलेले नाही. आम्ही ८ जानेवारी रोजी लखनऊ येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेश मदरसा बोर्डचे अधिकारी राहुल गुप्ता यांनी म्हणाले की, २०१६-१७ मध्ये २९६.३१ कोटी रूपये केंद्र सरकारने दिलेले नाहीत. २०१७-१८ मध्ये अद्यापतरी निधी जारी करण्यात आलेला नाही.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!