Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
आनंद महिंद्रा करणार खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये गुंतवणूक?

व्हीएस न्यूज - सोशल मीडियावरील आपल्या विधानांमुळे महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा अनेकदा चर्चेत असतात. आयुष्य सकारात्मक पद्धतीने कशाप्रकारे जगावे, हे सांगण्यासाठी त्यांनी मध्यंतरी शेअर केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आनंद महिंद्रा त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

नुकताच एक व्हिडिओ शेअर ट्विटरवरील काही युजर्सनी केला होता. हा व्हिडिओ मंगलोरमध्ये रस्त्यावर खाद्यपदार्थांची गाडी चालवणाऱ्या महिलेचा असून या महिलेने महिंद्राच्या बोलेरो गाडीत फुड सेंटर उभारले आहे. सोशल मीडियावर या अनोख्या फूड सेंटरचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत होता. ही गोष्ट ट्विटरवरील काही युजर्सनी आनंद महिंद्रा यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी पाहिला आणि ते यामुळे खूपच प्रभावित झाले. या महिलेला व्यवसायात मदत करण्याची तयारी त्यांनी दाखवली. या महिलेला मदतीची गरज नसली तरी आपण तिच्या व्यवसायात गुंतणवूक करू. जेणेकरून व्यवसाय वाढायला मदत होईल. साहजिकच महिलेसाठी आनंद महिंद्रांचा हा प्रस्ताव स्वप्नवत होता. तर दुसरीकडे अनेक युजर्सनी आनंद महिंद्रा यांनी दाखवलेल्या मोठेपणाचे कौतुक केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मंगलोरमधील शिल्पा यांचा हा व्हिडिओ असून महिंद्राच्या बोलेरो गाडीचे रुपांतर त्यांनी फूड सेंटरमध्ये केले आहे. कानडी पद्धतीचे खाद्यपदार्थ याठिकाणी त्या विकतात. त्यांचे हे फूड सेंटर उत्तम चवीमुळे चांगलेच लोकप्रिय झाले आहे. या फूड सेंटरचा व्हिडिओ येथील काही ग्राहकांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.

...Read More

V. S. News
हरियाणामध्ये सायको किलरने केली सहा जणांची हत्या

व्हीएस न्यूज सोमवारी रात्री दोन तासामध्ये हरियाणाच्या पलवलमधील वेगवेगळ्या ठिकाणी सहा हत्या झाल्याची घटना उघड झाली असून या सहाही हत्या एकाचा पद्धतीने करण्यात आल्या आहेत. पलवलमध्ये सध्या एकाच वेळी सहा हत्येच्या या घटनेमुळे दहशतीचे वातावरण आहे.

शहर पोलीस ठाण्यापासून १०० मीटरच्या अंतरावर सगळ्या हत्या झाल्या आहेत. या सगळ्या हत्या एकाच व्यक्तीने केल्याचे वृत्त आहे. या हत्या लोखंडी रॉडने डोक्यात घाव करून करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन तासात सहा हत्या करणाऱ्या या सायको किलरचा फोटो कैद झाला आहे. आरोपीचा शोध या फोटोच्या आधारे घेतला जातो आहे. त्या सायको किलरच्या हातात सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोखंडी रॉड स्पष्ट दिसतो आहे. सोमवारी रात्री झालेल्या या हत्याकांडानंतर शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

...Read More

V. S. News
मुंबई हाय तेलक्षेत्रानजीक सापडला मोठा तेलसाठा

व्हीएस न्यूज - अरबी समुद्रात मोठा तेलसाठा ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) या कंपनीला सापडला असून सध्याच्या मुंबई हाय तेलक्षेत्रानजीक हा साठा असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

त्यांनी या साठय़ाची माहिती लोकसभेमध्ये प्रश्नोत्तर तासात एका लेखी उत्तरात दिली. तो साठा मुंबई हायच्या पश्चिमेला स्थित असून त्यातून पूर्ण क्षमतेने उपसा केल्यास देशाच्या तेल उत्पादनात वाढ होऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले. याच क्षेत्रात आणखी नऊ ठिकाणी खोदकाम चालू असून तेथेही कच्चे इंधन तेल आणि नैसर्गिक वायू सापडेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्या आधारावर उत्खनन सुरू आहे.

साधारणतः ३ कोटी टन तेल नवीन सापडलेल्या साठय़ात मिळू शकेल. तसेच तेवढय़ाच प्रमाणात नैसर्गिक वायूही मिळेल, असे त्यांच्या उत्तरात म्हटले आहे. सध्या मुंबई हायमधून दिवसाला २ लाख ५ हजार बॅरल तेल उपसण्यात येत आहे. नव्या साठय़ामुळे त्यात आणखी २० हजार बॅरल्सची भर पडू शकेल. ओएनजीसीने २०१६-१७ या वर्षात २ कोटी ५५ लाख टन तेलाचे उत्पादन केले. ते २०१९-२० पर्यंत २ कोटी ९० लाख टनांपर्यंत पोचू शकेल, असे कंपनीच्या अधिका-यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

...Read More

V. S. News
स्टेट बँकेच्या गृहकर्जाचा ईएमआय स्वस्त!

व्हीएस न्यूज स्टेट बँक ऑफ इंडियाने १ जानेवारीपासून बेस रेट ८.९५%वरून ८.६५% केला असून इतर सर्व बँकांपेक्षा हा दर कमी असल्यामुळे २० लाख रुपयांच्या गृहकर्जाचा ईएमआय सुमारे ३८४ रुपयांनी कमी होणार आहे.

एमसीएलआर पद्धत एप्रिल २०१६ पासून सुरू होण्याआधी कर्जांवरील व्याज हे बेस रेटनेच ठरवले जात होते. बँकांच्या निधी उभारणीशी निगडित एमसीएलआरमध्ये बदल करण्यात आलेला नाही. एका वर्षाचा एमसीएलआर ७.९५% आहे. म्हणजे एप्रिल २०१६ नंतर कर्ज घेणाऱ्यांचा ईएमआय कमी होणार नाही.

स्टेट बँक ऑफ इंडियाने याआधी २८ सप्टेंबरला बेस रेट ०.०५% घटवला होता. बँकांनी व्याजदरात किंचित कपात केल्याने रिझर्व्ह बँकेने आक्षेप नोंदवला होता. रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २०१४ ते ऑक्टोबर २०१६ पर्यंत रेपोदरात १.७५% कपात केली आहे. तुलनेत बँकांनी बेसरेटमध्ये सरासरी ०.६० टक्केच कपात केली आहे.

...Read More

V. S. News
भाजपने नारायण राणेंना ठेवले झुलवत

व्हीएस न्यूज - भाजपने काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केलेल्या नारायण राणे यांना दिलेले आश्वासन काही पूर्ण होताना दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांना ३१ डिसेंबरपूर्वी त्यांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, नवीन वर्ष सुरु झाले तरी काहीही हालचाल होताना दिसत नसल्याने आश्वासन गाजर ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळात ३१ डिसेंबर पूर्वी स्थान मिळाणार असल्याची माहिती दिली होती. पण ३१ डिसेंबरची मुदतही आता उलटून गेली आहे. त्यामुळे राणे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. राणे यांनी डिसेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात नागपूर येथे जाऊन यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी हा शब्द या भेटीत दिल्याचे राणे यांनी विशेष मुलाखतीत सांगितले होते. राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, अशी शक्यता होती. मात्र अनेक दिवस वाट पाहिल्यानंतर राणेंनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला.

भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णयही या पक्षाने घेतला. राणेंचा मंत्रीमंडळात समावेश करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच त्यांना दिले होते. राणेंचा मंत्रीमंडळात दिवाळीपूर्वी समावेश होईल, अशी तेव्हा चर्चा होती. पण तेव्हा राणेंचा मंत्रीमंडळात समावेश झाला नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना ३१ डिसेंबरपूर्वीचा शब्द दिला होता. तो शब्दही पाळला न गेल्यानं भाजप राणेंना झुलवत ठेवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

...Read More

V. S. News
नितीन पटेलांना मिळाले हवे ते खाते

व्हीएस न्यूज : भाजपला गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दुर करण्यात यश आले आहे. हा तात्पुरता अंतर्गत कलह भाजपने त्यांच्या मागण्या मंजूर करून सोडवला आहे. उर्जेचे खाते आणि अजून काही छोटीखानी खाती गुजरातचे उपमुख्यमंत्री यांना देण्यात आली होती. पण त्यांना अर्थ खाते हवे होते. गुजरातमध्ये अर्थ खाते सगळ्यात प्रतिष्ठेचे मानले जाते. सौरभ पटेल यांना हे खाते देण्यात आले होते. नितीन पटेल आपल्याला साजेसे खाते मिळाले नाही म्हणून नाराज होते. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. अमित शहांनी तुमच्या मागण्या मंजूर होतील असे आश्वासन त्यांना दिले होते. भाजपमध्ये यामुळे फूट पडू शकणार होती. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तेव्हा हस्तक्षेप केला. नितीन पटेल यांना अमित शहांच्या हस्तक्षेपानंतर हवे असलेले अर्थ खाते मिळाले. तसेच सौरभ पटेल यांच्याकडचे अजून एक खाते कमी झाले आहे.

...Read More

V. S. News
एकनाथ खडसे यांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

व्हीएस न्यूज – आपल्या खास शैलीत मुख्यमंत्र्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी चिमटा काढला असून खडसे यांनी नांदुरा नगरपालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना नवीन वर्षात बोंड अळीचा प्रादूर्भाव होवू नये, अशी आशा व्यक्त करताना केवळ अभ्यास करण्यातच आमचा वेळ जातो असा टोला लगावला आहे.

खडसे यांच्या हस्ते नांदुरा नगर पालिकेच्या ५५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पक्षश्रेष्ठींवर एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा असल्यामुळे ते पक्ष नेत्यांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाविषयी कार्यक्रमानंतर पत्रकारांनी एकनाथ खडसे यांना छेडले असता, पक्ष प्रवेशाच्या केवळ चर्चा आहेत. आपले या चर्चांनी मनोरंजन होत असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

...Read More

V. S. News
नांदेडच्या गुरुद्वारा मंडळाचे ६१ कोटींचे कर्ज माफ करू

व्हीएस न्यूज - गुरू-ता-गद्दी २००८ सालच्या त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त गुरुद्वारा परिसरातील विविध कामे पूर्ण करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने गुरुद्वारा बोर्डाला बिनव्याजी स्वरूपात दिलेले ६१ कोटी रुपये माफ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.

शीख समाजाचे शेवटचे देहधारी गुरू श्री गुरू गोविंदसिंघजी यांच्या ३५० व्या जयंतीच्या समारोपाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गुरुद्वारा परिसरात पार पडला, या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबा कुलवंतसिंघजी, बाबा बलिवदरसिंघजी, बाबा नरेंद्रसिंघजी, आमदार हेमंत पाटील, आमदार डॉ. तुषार राठोड, गुरुव्दारा बोर्डाचे अध्यक्ष आमदार तारासिंग, भाजपा जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, संतुक हंबर्डे, प्रवीण साले आदींची उपस्थिती होती.

गुरू-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने नांदेड शहरात कोटय़वधी रुपयांची कामे करण्यात आली. यातील महत्त्वाची कामे गुरुद्वारा परिसरातील होती. ती पूर्ण करण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारने गुरुद्वारा बोर्डाला ६१ कोटी रुपये दिले होते. कालांतराने ही रक्कम परत करण्याची अट त्यावेळी घालण्यात आलेली होती. त्यानुसार सोहळा पार पडल्यानंतर शासनाच्या नियोजन व अर्थ विभागाकडून ६१ कोटी रुपये परत करण्याबाबत गुरुद्वारा बोर्डाला वारंवार कळविण्यात आले होते. त्याच वेळी शीख समाजाने ही रक्कम वसूल न करण्याची मागणी वारंवार केली होती. मात्र, काँग्रेस आघाडी सरकारने हा विषय २०१४ पर्यंत तसाच प्रलंबित ठेवला. विद्यमान सरकारच्या तीन वर्षांच्या काळातही तो प्रलंबितच होता. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ६१ कोटी रुपये माफ करण्याची घोषणा करून गुरुद्वारा बोर्ड व शीख समाजाला नववर्षांची अनुपम भेट दिली. मुळात गुरुजींकडून घ्यायचे असते. द्यायचे नसते असे सांगत जे ६१ कोटी रुपयांचे कर्ज आम्ही माफ केले, येणाऱ्या काळात गुरुजींच्या आशीर्वादाने राज्याच्या तिजोरीत ६१ हजार कोटी रुपये जमा होतील, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या कार्यातून भक्ती-शक्तीचा संगम निर्माण झाला. या प्रेरणेतून स्वाभिमानी समाज घडला आहे. त्याग, बलिदानाची परंपरा असलेल्या श्री हुजुरसाहिब गुरुव्दाराचे दर्शन घेऊन ऊर्जा प्राप्त होते, असे उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.

श्री गुरुगोवदसिंघजी यांचे ३५० वे जन्मशताब्दी वर्ष केंद्राने सोहळा म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. देशात उत्सव साजरे झाले. हा सोहळा साजरा करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो, असे फडणवीस यांनी सांगितले. सोहळयाचे प्रास्ताविक आमदार तारासिंग यांनी केले.

गुरुव्दारा परिसरातील नशापानावर बंदी आणू

गुरुव्दारा परिसरात जो नशापान केला जातो, त्या लोकांचा निश्चित बंदोबस्त केला जाणार आहे, इतक्या मोठय़ा धार्मिक स्थळी होणारा नशापान खपवून घेतला जाणार नाही. पोलीस प्रशासन कारवाई करील, असे आश्वासन या वेळी फडणवीस यांनी दिले.

...Read More

V. S. News
डी’व्हिलियर्सबद्दल आदर, पण तो आमच्या रडारवर

व्हीएस न्यूज - दक्षिण आफ्रिका दौरा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात सर्वात लक्षवेधी ठरणार आहे तो एबी डी’व्हिलियर्स. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि डी’व्हिलियर्स हे चांगले मित्र आहे. कारण आयपीएलमध्ये ते एकाच संघातून खेळतात. कोहलीला डी’व्हिलियर्सबद्दल आदर आहे. पण जेव्हा डी’व्हिलियर्स प्रतिस्पर्धी म्हणून समोर असेल तर तो सर्वप्रथम संघाच्या रडारवर असेल, असे मत कोहलीने व्यक्त केले आहे.

डी’व्हिलियर्सला जानेवारी २०१६ साली दुखापत झाली होती. त्यानंतर गेल्या २३ महिन्यांमध्ये तो फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे. ‘बॉक्सिंग डे’ला झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या चार दिवसीय कसोटी सामन्यामध्ये डी’व्हिलियर्स तब्बल दोन वर्षांनी खेळला होता. या सामन्यात संघाचे कर्णधारपदही त्याने भूषवले होते. ‘‘डी’व्हिलियर्स हा माझा चांगला मित्र आहे. तो एक चांगला फलंदाज आणि माणूसही आहे. त्याचा मी नेहमीच आदर करतो. पण मी भारताकडून खेळताना जेव्हा डी’व्हिलियर्स प्रतिस्पर्धी असतो तेव्हा त्याला झटपट कसे बाद करता येईल, याचाच मी विचार करत असतो,’’ असे कोहलीने सांगितले.

संघाला जिंकण्याची भूक अधिक

जर तुम्ही एक संघ म्हणून मैदानात उतरता तेव्हा प्रत्येक खेळाडूला विजयात हातभार लावायचा असतो. आपल्या कामगिरीमुळे संघाला विजय मिळावा, अशी प्रत्येक खेळाडूची भावना असते. काही वेळा एखादा खेळाडू अशी काही अद्वितीय कामगिरी करतो की, त्याच्या एकटय़ाच्या जोरावरही संघ जिंकू शकतो, पण जेव्हा २-३ खेळाडू विजयात मोलाचे योगदान देतात तेदेखील महत्त्वाचे असते. सध्याच्या घडीला भारतीय संघात प्रत्येक खेळाडूला जिंकण्याची भूक अधिक आहे. प्रत्येक जण संधीच्या शोधात असून संघासाठी ही चांगली गोष्ट आहे, असे कोहली म्हणाला.

...Read More

V. S. News
तिहेरी तलाकविरोधात आवाज उठवणाऱ्या इशरत जहाँचा भाजपात प्रवेश

व्हीएस न्यूज - तिहेरी तलाकविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांपैकी एक इशरत जहाँ यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तिहेरी तलाक हे अवैधानिक आणि मुस्लीम महिलांसाठी सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे सांगत पश्चिम बंगालमधील हावड़ा येथील इशरत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

भाजपाचे पश्चिम बंगालचे सरचिटणीस सायंतन बसूंच्या हवाल्याने ‘एनडीटीव्ही’ने हे वृत्त दिले आहे. इशरत जहाँ हावडा येथील कार्यालयात येऊन भाजपात सहभागी झाल्याचे बसू यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,भाजपाच्या हावडा येथील शाखेने शनिवारी सन्मानित केले आणि त्यांना पक्षात प्रवेश दिला. इशरत यांचा गौरव करण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचेही बसू यांनी म्हटले.

...Read More

V. S. News
वारंवार धमकी दिल्यास राजकारणात येईन : प्रकाश राज

व्हीएस न्यूज - मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे अभिनेते प्रकाश राज यांनी आपल्याला वारंवार धमकी दिल्यास राजकारणात प्रवेश करण्यास कचरणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

बेंगळुरू येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या उपस्थितीत प्रकाश राज म्हणाले, राजकारणात उतरण्यात मला रस नाही. पण जर मला वारंवार धमकी दिली, जर कोणी माझ्यावर सातत्याने दबाव टाकू लागला, जर कोणी मला वारंवार राजकारणात उतरण्याचे आव्हान देऊ लागले तर मी निश्चित राजकारणात प्रवेश करेल. सिद्धरामय्यांच्या उपस्थितीत प्रकाश राज यांनी केलेल्या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. प्रकाश राज अशी वक्तव्ये करून राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत देत असल्याचे बोलले जात आहे. कर्नाटकमध्ये याचवर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकी आधी ते काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

मोदीसरकारवर टीका करण्याची प्रकाश राज यांची ही पहिलीच वेळ नाही. मोदी सरकारवर टीका केल्यामुळे ते सातत्याने चर्चेत असतात. पत्रकार गौरी लंकेश यांच्या खून प्रकरणी त्यांनी आपला राष्ट्रीय पुरस्कार परत देण्याची धमकी दिली होती. राष्ट्रवाद आणि हिंदुत्व सारखेच असल्याचे म्हटल्याने प्रकाश राज यांनी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना लक्ष्य केले होते. सेक्युलर लोक निधर्मी असतात, हा अनेकांचा गैरसमज आहे. इतर धर्मांचा आदर करणे, हा सेक्युलरिझमचा खरा अर्थ असल्याचे प्रकाश राज यांनी म्हटले होते. तुम्ही लोकप्रतिनिधी असूनही एखाद्याच्या पालकांविषयी इतक्या खालच्या पातळीला जाऊन कसे बोलू शकता, असा सवाल प्रकाश राज यांनी विचारला होता.

...Read More

V. S. News
हुकूमशहा किम जाँगची अमेरिकेला धमकी

व्हीएस न्यूज - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग यांचे शत्रूत्व संपूर्ण जगाला माहीत आहे. गतवर्षी दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी एकमेकांना संपवण्याची धमकी दिली होती. आता नवीन वर्षाच्या आरंभीच किम जाँगने अमेरिकेला पुन्हा एकदा धमकावले आहे. नवीन वर्षानिमित्त देशाला संबोधित करताना त्यांनी अमेरिकेच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करण्याची आपली क्षमता असल्याचे म्हटले. संपूर्ण अमेरिका आपल्या अण्वस्त्रांच्या आवाक्यात आहे, आणि या अण्वस्त्राचे बटन नेहमी माझ्या टेबलावर असते..ही धमकी नव्हे तर सत्य आहे, असेही ते म्हणाले.

किमच्या मते, अमेरिका आता उत्तर कोरियाविरोधात कधीच युद्ध पुकारणार नाही. आम्ही अमेरिकेच्या सर्वच भागांवर अण्वस्त्रांनी हल्ला करण्याची क्षमता विकसित केली आहे. दरम्यान, त्यांनी दक्षिण कोरियाशी आपण चर्चेस तयार असल्याचेही म्हटले. चर्चेच्या माध्यमातून एकमेकांमधील तणाव दूर करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. फेब्रुवारी महिन्यात दक्षिण कोरियात हिवाळी ऑलिम्पिकमध्ये उत्तर कोरियाचे खेळाडू पाठवण्याबाबत किम म्हणाले की, दोन्ही कोरियाचे अधिकारी लवकरच एकमेकांना भेटतील आणि यावर विचार करतील. या स्पर्धेचे आयोजन यशस्वी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हिवाळी ऑलिम्पिकमध्ये कोरियन देशांना चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी आहे. प्योंगयांग आणि सियाल यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत. उत्तर कोरियाच्या सुरक्षेला जेव्हा धोका असेल, असे जाणवेल तेव्हाच आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू असा इशारा देखील त्यांनी दिला.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!