Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
१.९ कोटी आसामींना भारतीय दर्जा

व्हीएस न्यूज - आसामने रविवारी ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स’चा मसुदा जाहीर केला. आसाममधील ३.२९ कोटींपैकी १. ९ कोटी लोकांना अधिकृत भारतीयाचा दर्जा देण्यात आला आहे. उर्वरित नावांची तपासणी सुरु असल्याची माहिती ‘रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया’ शैलेश यांनी दिली.

रविवारी रात्री आसाममध्ये ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स’चा पहिला मसुदा जाहीर करण्यात आला. आसाममधील विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपची सत्ता आल्यास बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांना पुन्हा बांगलादेशमध्ये पाठवू, असे आश्वासन दिले होते. स्थानिक हिंदूंचे रोजगार हिरावून घेणाऱ्या आणि बेकायदा घुसलेल्या मुस्लिमांवर कारवाई करु, अशी गर्जनाच भाजपने केली होती. या दृष्टीने आसाममध्ये ‘नॅशनल रजिस्टर सिटीझन’ला (एनआरसी) महत्त्व प्राप्त झाले आहे. १९५१ च्या जनगणनेनुसार हा मसुदा तयार करण्यात आला आहे. यामुळे बांगलादेशी घुसखोरांना शोधणे शक्य होणार आहे.

रविवारी रात्री जाहीर झालेल्या मसुद्यानुसार ३.२९ कोटी अर्जदारांपैकी १.९ कोटी लोकांना अधिकृत भारतीय नागरिकाचा दर्जा देण्यात आला. राज्यातील एनआरसीचे समन्वयक प्रतीक हजेला याबाबत माहिती देताना म्हणाले, ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाही, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. ही अत्यंत कठीण आणि किचकट प्रक्रीया होती. त्यामुळे पहिल्या यादीत काही लोकांना स्थान मिळू शकले नसेल, पण यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले. एनआरसी मसुद्यातील दुसरी यादी कधी जाहीर होणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, हे सर्व काम सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सुरु आहे. ही संपूर्ण प्रक्रीया २०१८ मध्ये पूर्ण होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मे २०१५ पासून एनआरसीसाठीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली. आसाममधील ६८.२७ लाख कुटुंबांकडून एकूण ६.५ कोटी कागदपत्रे प्राप्त झाली होती. एनआरसीबाबत तक्रारी करता येतील, मात्र एनआरसीचा अंतिम मसुदा जाहीर झाल्यानंतरच तक्रार करता येईल, असे प्रतीक हजेला यांनी सांगितले. बांगलादेश युद्धाच्या दरम्यान हजारो बांगलादेशी भारतात विस्थापित झाले. यात आसाममधील प्रमाण लक्षणीय असून तेव्हापासून स्थानिक विरुद्ध बांगलादेशी असा वाद सुरु आहे.

...Read More

V. S. News
मदरशात कोंडलेल्या 51 विद्यार्थिनींची सुटका

व्हिएस न्यूज - उत्तर प्रदेशात एका मदरशात कोंडून ठेवलेल्या 51 विद्यार्थिनींची पोलिसांनी सुटका केली आहे. तसेच या मदरशाच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.

लखनऊ येथे यासीनगंज नावाच्या भागात स्थानिक लोकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी मदरसा जामिया खदीजतुल कुबरा लिलबनात येथून या विद्यार्थिनींची सुटका करण्यात आली, असे उत्तर प्रदेश पुलिस मुख्यालयातील एका प्रवक्त्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. हा मदरसा नोंदणीकृत होता किंवा अनधिकृत चालू होता, याची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या मदरशातील वसतिगृहात 51 विद्यार्थिनींना डांबून ठेवले होते. त्यांना कैदेतून सोडवून मोहम्मद तैयब झिया नावाच्या व्यवस्थापकाला अटक केली आहे, असे प्रवक्त्याने सांगितले. हा व्यवस्थापक आमचे शोषण करत होता आणि आमच्याशी अमानुष व्यवहार करत होता, अशी तक्रार या विद्यार्थिनींनी केली आहे. पोलिसांनी या विद्यार्थिनींना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोचविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
...Read More

V. S. News
कोणी काहीही बोलू पण मी पक्ष सोडणार नाही – नितीन पटेल

व्हिएस न्यूज – मंत्रीपदाची जबाबदारी कमी केल्यानंतर नाराज झालेले गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी माध्यमांसमोर बाजू मांडली. त्यांनी यावेळी काही झाले तरी पक्ष सोडणार नाही, असे स्पष्ट केल्यामुळे पटेल पक्ष सोडणार किंवा राजीनामा देणार, या चर्चेवर पडदा पडला आहे.

स्वत:चे मत पक्षाच्या नेत्यासमोर मांडले असून मंत्रीपद वाटप किंवा स्वत:चा प्रभाव, हा प्रश्न नाही, तर सन्मान महत्त्वाचा आहे. माझा पक्षाच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. पक्षासाठी ४० वर्ष काम केले आहे. पूर्ण आयुष्य भाजपसाठी घातले आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अशा शब्दांत पटेल यांनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

अद्यापही आपल्या खात्यांचा पदभार पटेल यांनी स्वीकारलेला नाही. पटेल अर्थ खाते न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा आहे. पटेल हे अपेक्षित खाते न मिळाल्यास बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू होती. पटेल यांच्याकडे आनंदीबेन आणि रुपाणी सरकारच्या काळात अर्थ खात्याचा पदभार होता. नवीन मंत्रीमंडळात अर्थ खात्याचा कारभार सौरभ पटेल यांच्याकडे सोपविण्यात आला. आरोग्य, नर्मदा, कल्पसर आणि पाटनगर प्रकल्प योजनेचा कारभार नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात पटेल यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे तुलनेने कमी महत्त्वाची खाती मिळाली आहेत.
...Read More

V. S. News
भाजप-पीडीपी नेते एकत्रित बसून खातात गाय आणि डुकराचे मांस

व्हिएस न्यूज - एकीकडे नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा फारुख अब्दुल्ला हे वादग्रस्त विधान करत सुटले आहेत. आता त्यांच्या साथीला नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार अकबर लोने यांनी वादग्रस्त वक्तव्य करून एकच राळ उडविली आहे. लोने यांनी भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी’ (भाजप आणि पीडीपी) या दोन्ही पक्षाचे नेते गाय आणि डुकराचे मांस एकत्र बसून खातात, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.

एकाच नाण्याच्या दोन बाजू भाजप व पीडीपी हे दोन्ही पक्ष असल्याचे सांगून लोने यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नागरिकांनी त्यांना बहिष्कृत करावे, असे आवाहन करायलाही ते विसरले नाहीत. काही दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांनी चांदणी चौकात तिरंगा ध्वज लावण्यावरुन वादग्रस्त आव्हान केले होते. ते आव्हान शिवसेनेच्या नेत्यांनी स्वीकारुन त्या ठिकाणी ध्वजही लावला होता.
...Read More

V. S. News
हैदराबादच्या तरुणीने पायाने रेखाटली जगातली सर्वात मोठी पेंटिंग

व्हिएस न्यूज – हैदराबादच्या एका तरुणीने १४० स्केअर मीटरची पेंटिंग पायाच्या सहाय्याने रेखाटली आहे. ही पेंटिंग जगातली सर्वात मोठी पेंटिंग असल्याचा दावा करत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये या पेटिंगची नोंद होण्यासाठी ती प्रयत्न करत आहे.

जगातली सर्वात मोठी पेंटिंग रेखाटल्याचा दावा जान्हवी मगांन्ती (१८) या तरुणीने केला आहे. यापुर्वी ब्रिटेन विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने १०० स्केअर मीटर पेंटिंग रेखाटण्याचा विश्वविक्रम केला होता. जान्हवीने हा विश्वविक्रम मोडत १४० स्केअर मीटरची पेंटिंग रेखाटण्याचा नवीन विक्रम केला आहे. जान्हवी ही उत्तम नर्तकी, शास्त्रीय गायिका असुन तिने राष्ट्रीय स्तरावर बॉस्केटबॉल संघाचे प्रतिनिधीत्व देखील केले आहे. तिने नुकताच नृत्य करताना पायाच्या सहाय्याने कमळ आणि मोराचे पंख रेखाटले आहे.
...Read More

V. S. News
कमला मिलमधील ‘त्या’ पबला भाजप आमदाराच्या दबावामुळे अनधिकृत परवाने

व्हिएस न्यूज - भाजपाचे नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख आणि मुंबई पालिकाच लोअर परळ येथील कमला मिलमधील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोज’ या दोन हॉटेलला लागलेल्या आगीला जबाबदार असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. आपले राजकीय वजन वापरून कमला मिलमधील ‘मोजोस’ या पबला देशमुख यांनी परवाने मिळवून दिले होते. तसेच या आमदाराच्या आशीर्वादाने तिथे अनधिकृत बांधकामसुद्धा झालेले होते, असा दावाही त्यांनी केला आहे.

देशमुख यांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणीही निरुपम यांनी केली आहे. याबाबत निरुपम यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून पुरावे असल्यास त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान निरुपम यांना आमदार सुधाकर देशमुख यांनी दिले.

या प्रकरणाशी आपला दुरान्वयेही संबंध नसून सध्या कोणतेच काम निरुपम यांना नसल्याने ते नवनवीन आरोप करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून चौकशीत सत्य समोर येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.
...Read More

V. S. News
मुस्लीम कुटुंबियांनी चक्क संस्कृतमधून छापली लग्नपत्रिका !

व्हिएस न्यूज - चक्क देवभाषा असलेल्या संस्कृतमधून सोलापुरातील एका मुस्लीम कुटुंबात होणाऱ्या लग्नाची पत्रिका छापण्यात आली आहे. अलीकडे सर्वत्रच भाषा, जात, धर्मावरून समाजात संकुचित दृष्टिकोन पाहावयास मिळत असताना संस्कृत भाषेच्या प्रेमातून ही अशी निमंत्रणपत्रिका सोलापुरातील या मुस्लीम कुटुंबाने तयार केल्याने सध्या हा कुतूहलाचा विषय ठरत आहे.

ही संस्कृत पत्रिका प्रख्यात संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या नातीच्या लग्नात तयार करण्यात आली आहे. संस्कृतच्या प्रचार आणि प्रसारासाठीच मूळचे अक्कलकोट तालुक्यातील असलेले बिराजदार यांनी आपले आयुष्य वेचले आहे. त्यांनी संस्कृत भाषेत विपुल लेखनासह ओघवती व्याख्याने देत संस्कृतप्रसाराचा वसा आजवर जपला आहे. येत्या ८ जानेवारी रोजी सोलापुरात दंतरोगतज्ज्ञ असलेली त्यांची नात डॉ. समीन हिचा विवाह हाजी मुहम्मद मुनीर रजवी यांचे पुत्र डॉ. मुहम्मद जमीर यांच्याबरोबर होत आहे. संस्कृतसह उर्दू, मराठी आणि इंग्रजीतून निमंत्रणपत्रिका त्यासाठी छापण्यात आल्या आहेत.
...Read More

V. S. News
शिखर धवनचे आरोप अमिरात एअर लाईन्सने फेटाळले

व्हिएस न्यूज - गुरुवारी पहाटे दक्षिण अफ्रिकेसाठी टीम इंडियाचा क्रिकेट संघ दुबई मार्गे रवाना झाला. भारताचा सलामीवीर शिखर धवनची पत्नी आणि मुलाला यावेळी अमिरात एअर लाईन्सच्या अधिकाऱ्यांनी दक्षिण अफ्रिकेच्या फ्लाईटमध्ये जाण्यापासून रोखले. जन्म तारखेचा पुरावा दाखवण्यासाठी अधिकाऱ्यांनी सांगितले. शिखर धवनने हा सारा प्रकार ट्विट केला होता. तसेच अव्यावसायिक वागणुकीचा आरोप अमिरात एअरलाईन्सवर केला होता. पण धवनचे हा सारे आरोप एअरलाईन्सने फेटाळले आहेत.

शुक्रवारी भारतीय फलंदाज शिखर धवनचे अव्यावसायिक वागणुकीचे आरोप अमिरात एअरलाइन्सने नाकारले. हे काम दक्षिण आफ्रिकेच्या कायद्यांनुसार करण्यात आल्याचे स्पष्टीकरण एअरलाइन्सने दिले आहे. याबाबत अमिरात एअरलाइन्सने एक निवेदन जारी केले असून त्यात असे स्पष्ट केले आहे की, १ जून २०१५ पासून, दक्षिण आफ्रिकेच्या नियमांनुसार १८ वर्षांखालील अल्पवयीनसह प्रवास करणाऱ्या पालकांना पालकत्व सिद्ध करणे आवश्यक आहे. यामुळे शिखर धवनची पत्नी आयेशा आणि मुलगा झोरावर यांना रोखल्याचे एअरलाईन्सने स्पष्ट केले.
...Read More

V. S. News
२०१६-१७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावली; सरकारची कबुली

व्हिएस न्यूज – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत महिनाभरावर येऊ घातलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर वित्त क्षेत्रातील नियामकांची बैठक घेतली.

देशाचा आर्थिक विकास परदेशी तसेच देशांतर्गत वित्तीय गणित बिघडल्याने मंदावल्याची कबुली केंद्र सरकारने दिली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६ मधील ८ टक्क्यांच्या तुलनेत गेल्या वित्त वर्षांत विकास दर कमी, ७.१ टक्के राहिल्याचे म्हटले आहे. या संथ अर्थव्यवस्थेला परदेशी तसेच देशांतर्गत आर्थिक, वित्तीय घटक जबाबदार असल्याचे जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

गेल्या आर्थिक वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात कमी झालेली ढोबळ स्थिर गुंतवणूक, कंपन्यांचा आर्थिक चणचणीचा ताळेबंद, बँकांमधील कर्जाचे कमी प्रमाणातील वितरण याचबरोबर जागतिक स्तरावरही विकास दर रोडावल्याचे कारण अर्थमंत्र्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही जागतिक स्तरावर आर्थिक मंदी असल्याचे नमूद केले असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचेही जेटली म्हणाले. सरकार विविध उपाययोजना भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी करीत असून निर्मिती, वाहतूक, ऊर्जा, ग्रामीण पायाभूत, थेट विदेशी गुंतवणूक या क्षेत्रात कार्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
...Read More

V. S. News
अखेर रामदेव बाबा सापडले

व्हिएस न्यूज - बाबा रामदेव यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती लवकरच अभिनेता अजय देवगण करणार असून पण हा बायोपिक मालिकेच्या माध्यमातून लोकांना पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रामदेव यांची भूमिका कोण साकारणार यासाठी शोध सुरू होता. या भूमिकेसाठी सुरु असलेला शोध संपला असल्याचे वृत्त नवभारत टाइम्सने दिले आहे.

रामदेव यांचे जीवन या सीरिजमध्ये दोन टप्प्यांत दाखवण्यात येणार असून राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार नमन जैन पहिल्या टप्प्यातील म्हणजेच बालपणातील रामदेव यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता क्रांती प्रकाश झा दुसऱ्या टप्प्यातील भूमिका साकारणार आहे. एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतच्या मित्राची भूमिका क्रांतीने साकारली होती. बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक घटना या मालिकेत दाखवल्या जाणार आहेत.

अजयने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याविषयी म्हटले की, सर्वत्र या सीरिजची बरीच चर्चा आहे. आम्हाला यातील मुख्य भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याचा शोध होता. ही भूमिका क्रांती उत्तमरित्या साकारू शकेल असा मला विश्वास आहे. क्रांतीच्या निवडीवर बाबा रामदेव यांनीसुद्धा आनंद व्यक्त केला. जेव्हा मी क्रांतीला भेटलो तेव्हा त्याची स्मरणशक्ती आणि संस्कृत श्लोक वाचण्याची क्षमता पाहूनच मी खूश झालो होतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वावर आध्यात्मिकतेचा प्रभाव दिसून येतो, असे ते म्हणाले.
...Read More

V. S. News
शेतीमध्ये अणुऊर्जेचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावे - डॉ. एस. टी. म्हेत्रे

व्हीएस न्यूज - अणुऊर्जेचा वापर हा वीज निर्मिती, कॅन्सर रोगांवर इलाज, औद्योगिक क्षेत्र, शेती आणि अन्न धान्यांची साठवणूक, मूलभूत संशोधनांमध्ये केला जातो. शेती क्षेत्रामध्ये अणुऊर्जेचा वापर करून अनेक महत्वपूर्ण शोध लावले असून शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि शेती उत्पादन वाढवावे. असे आवाहन बीएआरसीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. एस.टी.म्हेत्रे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे मुंबईतील भाभा ॲटोमीक रिसर्च सेंटरच्या (बीएआरसी) वतीने ‘शांतता, शक्ती आणि प्रगती साठी अणु ऊर्जा’(ATOMIC ENERGY FOR PEACE, POWER AND PROSPERITY)या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेत मार्गदर्शन करताना डॉ. एस.टी. म्हेत्रे बोलत होते. यावेळी वालचंदनगर इंडस्ट्रिजचे मुख्य व्यवस्थापक जी. के. पिल्लई, इंडियन न्युक्लिअर सोसायटीचे सचिव आर. के. सिंग,पीसीओेईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, बीएआरसीचे समुह संचालक आर. एस. यादव, ज्येष्ठ संशोधक हेमंत शिंपी, संगणक विभाग प्रमुख प्रा. महेंद्र साळुंके आदींसह अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. म्हेत्रे मार्गदर्शन करताना म्हणाले की, उत्परिवर्तन ही निसर्गनिर्मित प्रक्रिया असून जनुकांमध्ये बदल होत असतात. परंतु हे बदल होण्यासाठी जास्त काळ लागतो. विकिरणांच्यामुळे ही बदल होण्याची क्रिया आपण अधिक वेगाने घडवून आणू शकतो. कारण विकिरणांमुळे जनुकांमध्ये बदल केले जातात आणि त्यापासून नवीन प्रजाती विकसित केली जाते. अशा प्रकियेच्या मदतीमुळे भाभा अणु संशोधन केंद्राने पिकांच्या 42 जाती विकसित केल्या आहेत. तसेच कडुनिंब एक प्रभावी कीड नाशक आहे. लिंबोळ्याच्या बि मध्ये तेल असते ज्यामध्ये अझाडिरॅक्टिन नावाचा घटक असतो. त्यामुळे लिंबोळीमध्ये कीडनाशक गुणधर्म आढळतात. याचे तंत्रज्ञान बीएआरसी आणि विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT) नागपूर यांनी मिळून विकसित केले आहे. यामध्ये लिंबोळीपासून पावडर बनवली जाते आणि त्याच्या कणांची जाडी जसजशी कमी होईल तसे त्याचा प्रभाव वाढल्याचे आढळून आले आहे. हे तंत्रज्ञान खाजगी कंपनीला हस्तांतरित केलं असून थोड्याच काळात यावर आधारित उत्पादन बाजारांत दाखल होईल. रासायनिक औषधे आणि खतांच्या अतीवापरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून नापीक जमिनीची आकडेवारी फुगत चालली आहे. या रासायनिक शेतीने माती, हवा, पाणी जेव्हा मृतवत होईल. तेंव्हा मानवाचे डोळे उघडतील आणि मगच नैसर्गिक शेतीचे महत्व लोकांना समजेल व लोक नैसर्गिक शेतीकडे वळतील. परंतु आता जमिनी खराब होण्याची वाट न बघता सर्व शेतक-यांनी लवकर या पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. असे घडले तर भविष्यकाळ उज्वल होईल यात शंका नाही. भाभा अणु संशोधन केंद्राने अशा प्रकारे शेतीच्या विविध क्षेत्रामध्ये भरीव योगदान केले आहे. शांततेसाठी अणु ऊर्जेचा वापर कसा करता येऊ शकतो हे येथील शास्त्रज्ञांनी आपल्या अथक प्रयत्नाने आपल्याला दाखवून दिले आहे. आता या तंत्रज्ञानाचा सर्व शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असेही आवाहन डॉ. एस.टी. म्हेत्रे यांनी केले.

ही परिषद यशस्वी करण्यासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी मार्गदर्शन केले. स्वागत प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, सूत्रसंचालन प्रा. मानसी कुरकुरे आणि आभार प्रा. जमीर कोतवाल यांनी मानले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!