Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
भाजप नेते गोहर अहमद यांची दहशतवाद्यांकडून हत्या

व्हीएस न्यूज - जम्मू काश्मीरमधील शोपिया येथील भाजयुमोचे नेते गोहर अहमद यांची घरातून अपहरण करून हत्या करण्यात आली. ही घटना गुरूवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. गोहर अहमद यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून ६ किमी दूर असलेल्या एका बागेत आढळून आला. अहमद यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोठी गर्दी उसळली होती. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट करत त्यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे. काश्मीर खोऱ्यातील युवकांना चांगले भविष्य निवडण्यापासून रोखण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश यशस्वी होणार नाही, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. भाजप अहमद यांच्या कुटुंबाबरोबर उभे आहे, असेही त्यांनी म्हटले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गळा चिरून हत्या करण्याचे हे दुसरे प्रकरण आहे. यापूर्वी एजाज अहमद यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. एजाज अहमद हा एक काश्मिरी युवक होता. तो भारतीय सैन्यात होता.

...Read More

V. S. News
जगात वेगाने घोडदौड करणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत - पंतप्रधान मोदी

व्हीएस न्यूज - भारतीय अर्थव्यवस्था वेगाने घोडदौड करत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वर्ल्ड फूड इंडिया २०१७ च्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. वस्तू आणि सेवा करामुळे वेगवेगळे कर बाद झाले आहेत. त्यामुळे करव्यवस्था अतिशय सोपी आणि सुटसुटीत झाली आहे, असेदेखील मोदींनी म्हटले. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने वर्ल्ड फूड इंडिया २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘खाद्य पदार्थांच्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबतच कररचना सोपी झाल्याने त्याचा फायदा उद्योगांना होत आहे. त्यामुळे जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होतो,’ असे मोदींनी म्हटले. ‘भारत एका मोठ्या क्रांतीसाठी तयार आहे. भारतात फूड चेन्सना चांगली संधी आहे. भारतात ग्राहकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे भारतात फूड चेन्स यशस्वी होऊ शकतात,’ असेही ते म्हणाले. सरकार मेक इन इंडियासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदींनी आज वर्ल्ड फूड इंडिया २०१७ चे उद्घाटन केले. यामध्ये जगभरातील गुंतवणूकदारांसोबत प्रमुख कंपन्या सहभागी झाल्या आहेत. अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. खाद्य जगताशी संबंधित अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवणे, परकीय गुंतवणुकदारांना आकर्षित करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हादेखील हेतू या कार्यक्रमामागे आहे. पंतप्रधान मोदींनी अनेकदा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

...Read More

V. S. News
गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

व्हीएस न्यूज - सरकारने अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ४.५० रूपयांनी वाढ केली आहे. विनाअनुदानित सिलिंडरचे दरही वाढवण्यात आले आहेत. आता विनाअनुदानित सिलिंडरसाठी ९३ रूपये जास्त द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर जेट इंधनच्या किंमतीतही २ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट आणि विमानाचे तिकीट दोन्ही महाग होणार आहेत. जुलै २०१६ नंतर सरकारने १९ वेळा सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयावर यापूर्वीही विरोधी पक्षांनी टीका केली होती. परंतु, कोणत्याही परिस्थितीत गॅस सिलिंडरवर देण्यात येणारे अनुदान सुरू ठेवणार नसल्याचे सरकारच्या भूमिकेवरून स्पष्ट होते.

गेल्यावर्षी जुलैमध्ये सरकारने प्रत्येक महिन्यात किंमत वाढवून गॅस सिलिंडरवर देण्यात येणारे अनुदान संपवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत १९ वेळा किंमतीत वाढ करण्यात आली आहे. आता घरगुती अनुदानित १४.२ किलोग्रॅमचा एक सिलिंडर ४९५.६९ रूपयांना मिळेल. विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत ९३ रूपयांची वाढ होऊन त्याची किंमत आता ७४२ रूपये इतकी झाली आहे. यापूर्वी एक ऑक्टोबर रोजी यामध्ये ५० रूपयांची वाढ करून त्याची किंमत ६४९ रूपये इतकी नेण्यात आली होती.

गेल्या वर्षी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना प्रत्येक महिन्यात दरांमध्ये वाढ करण्यास सांगितले होते. पुढील मार्च महिन्यापर्यंत अनुदान संपवण्यासाठी सरकारने या सूचना केल्या होत्या. हे धोरण अवलंबण्यास सुरूवात केल्यापासून अनुदानित सिलिंडरच्या दरात आतापर्यंत ७६.५१ रूपयांची वाढ झाली आहे. जून २०१६ मध्ये याची किंमत ४१९.१८ इतकी होती. सरकारी पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस एलपीजी आणि एटीएफ (विमान इंधन) किंमतीत बदल करतात. मागील महिन्यातील तेलाची सरासरी किंमत आणि विदेशी मुद्रा विनिमय दरावर हे अवलंबून असते.

...Read More

V. S. News
…मग मी अर्थव्यवस्थेवर का बोलू शकत नाही’ – शत्रुघ्न सिन्हा

व्हीएस न्यूज - भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरूण जेटली आणि माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. ‘एक वकील आर्थिक प्रकरणांवर बोलू शकतो, एक टीव्ही अभिनेत्री मनुष्यबळ विकास मंत्री होते आणि एक चहावाला पंतप्रधान बनू शकतात तर मी अर्थव्यवस्थेवर का बोलू शकत नाही,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही पण त्यांचा इशारा मोदी, जेटली आणि इराणी यांच्याकडे होता. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी आयोजित परिसंवादात ते बोलत होते. लोकांमध्ये जीएसटी आणि नोटाबंदीवरून राग आहे. गुजरात विधानसभा निवडणूक भाजपसाठी निवडणूक नसून एक ‘आव्हान’ आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मी माझ्या पक्षाला आव्हान देत नसून फक्त भाजपला राष्ट्रीय हितासाठी ‘आरसा’ दाखवत असल्याचे त्यांनी सुरूवातीलाच स्पष्ट केले. ते म्हणाले, जीएसटी, नोटाबंदी, बेरोजगारीवरून लोकांमध्ये राग पाहता भाजपला किती जागा मिळतील हे मी सांगू शकत नाही. पण ही निवडणूक भाजपसाठी एक आव्हान असणार आहे. भाजप एकजूट राहिल्यास त्यांच्या जागा वाढू शकतात. पण त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी, असे ते म्हणाले. यावेळी त्यांना ते दुसऱ्या राजकीय पक्षात जाणार का असा प्रश्न विचारताच त्यांना ‘खामोश’ या आपल्या चिरपरिचित शैलीत उत्तर दिले.

सरकारला देश चालवण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारख्या विरोधी पक्षातील तज्ज्ञ आणि ज्ञानी लोकांकडून सूचना मागितल्या पाहिजेत, असा सल्ला त्यांनी दिली. अरूण जेटली यांनी यशवंत सिन्हांवर केलेल्या टीकेचा त्यांनी समाचार घेतला. ८० वर्षीय यशवंत सिन्हा यांनी ‘नोकरीसाठीचे अर्जदार’ अशा शब्दांत टीका केली होती. यावर सिन्हा यांनी जेटलींना टोला लगावला. जेटली स्वत: आपली नोकरी गमावण्याची शक्यता आहे आणि हे दुसऱ्यांसाठी नोकरी सुचवायला निघाले आहेत, असे ते म्हणाले.

...Read More

V. S. News
मुंबईपेक्षा दिल्लीत पगार जास्त

व्हीएस न्यूज - नोकरीसाठी मुंबई चांगली की दिल्ली, याबद्दल अनेकदा चर्चा होते. देशातील दोन प्रमुख महानगरांपैकी कोणते शहर उत्तम, यावर अनेकदा वादही झडतात. मात्र सुट्ट्या आणि इतर सुविधांचा विचार केल्यास मुंबई काम करण्यासाठी उत्तम असल्याचे जागतिक बँकेच्या अहवालातून समोर आले आहे. मात्र पगाराचा विचार केल्यास दिल्ली आर्थिक राजधानी मुंबईच्या पुढे आहे. दिल्लीत कर्मचाऱ्यांना मिळणारा सरासरी पगार मुंबईच्या तुलनेत जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक आहे.

मंगळवारी जागतिक बँकेने व्यवसाय सुलभतेबद्दलचा अहवाल जाहीर केला. यानंतर आता जगभरातील प्रमुख शहरांमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सरासरी पगाराची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. यामधून दिल्लीतील सुपरमार्केटमध्ये काम करणाऱ्या एका कॅशियरला दर महिन्याला कमीत कमी २१७.६ अमेरिकन डॉलर म्हणजेच साधारणत: १४ हजार रुपये इतका पगार मिळतो. तर मुंबईत एका कॅशियरला सरासरी १३४ डॉलर म्हणजेच ८ हजार ६५० रुपये पगार मिळतो. याचा अर्थ दिल्लीतील कर्मचाऱ्यांचा पगार मुंबईतील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ६० टक्क्यांनी जास्त आहे.

दिल्लीतील कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार जास्त असला, तरी तेथील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्ट्यांचे प्रमाण कमी आहे. दिल्लीतील कर्मचाऱ्यांना वर्षाकाठी सरासरी १५ भरपगारी रजा मिळतात. तर मुंबईतील कर्मचाऱ्यांना २१ भरपगारी रजा मिळतात. मात्र तरीही मुंबईत मिळणाऱ्या भरपगारी रजांची संख्या साओ पावलो (ब्राझील) आणि लंडन (ब्रिटन) येथील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भरपगारी रजांपेक्षा कमीच आहे. साओ पावलोतील कर्मचाऱ्यांना दरवर्षी २६, तर लंडनमधील कर्मचाऱ्यांना दरवर्षी २८ भरपगारी रजा मिळतात.

मुंबईतील कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार इतर विकसनशील देशांमधील शहरांमध्ये काम करणाऱ्यांपेक्षा कमीच आहे. मुंबईतील कर्मचाऱ्यांना दर महिन्याला सरासरी १३४ अमेरिकन डॉलर वेतन मिळते. याबाबतीत मेक्सिको सिटी (१५२ अमेरिकन डॉलर), व्हिएतनाम (१६८ अमेरिकन डॉलर) आणि कुवेत (१९९ अमेरिकन डॉलर) येथील कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळतो. दिल्लीतील कर्मचाऱ्यांना यापेक्षा जास्त वेतन मिळत असले, तरीही येथील राहणीमान अतिशय महागडे असल्याचे जागतिक बँकेचा अहवाल सांगतो.

...Read More

V. S. News
जगातील सर्वाधिक कुपोषणग्रस्त बालकं भारतात

व्हीएस न्यूज - भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्याचा दावा केला जात असला, तरी या विकासाची फळे सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळेच कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर असल्याची आकडेवारी समोर आली आहे. असोचेम आणि ईवाय यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून ही चिंताजनक माहिती पुढे आली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होत असला, तरी त्याचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचे असोचेम आणि ईवाय यांच्या सर्वेक्षणातून अधोरेखित झाले आहे. भारतात कुपोषणग्रस्त बालकांची संख्या सर्वाधिक असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. कुपोषणाच्या विळख्यात सापडलेल्या जगातील एकूण बालकांपैकी ५० टक्के बालके भारतातील आहेत. त्यामुळे सामाजिक असमानता दूर करण्यासाठी आणि आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी धोरणांची आखणी करणे आवश्यक असल्याचे असोचेम आणि ईवायने अहवालात नमूद केले आहे.

‘२००५ ते २०१५ या कालावधीत भारतातील बालमृत्यूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. मात्र या काळात कुपोषणाची समस्या वाढली आहे. त्यामुळे जगातील एकूण कुपोषणग्रस्त बालकांपैकी ५० टक्के बालके भारतातील आहेत,’असे अहवालातील आकडेवारी सांगते. २०१५ मध्ये देशातील ४० टक्के बालके कुपोषणाचा सामना करत होती, असेही आकडेवारीतून समोर आले आहे. ‘देशातील ३७ टक्के बालकांचे वजन अतिशय कमी आहे. तर ३९ टक्के मुलांचे वजन त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी आहे. याशिवाय उंचीच्या तुलनेत वजन कमी असणाऱ्या देशातील बालकांचे प्रमाण २१ टक्के आहे,’ असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एकीकडे देशात कुपोषणाची समस्या तीव्र असताना लठ्ठपणाची समस्यादेखील वाढताना दिसत आहे. या यादीत भारताचा क्रमांक जगात तिसरा आहे. अमेरिकेत लठ्ठपणाची समस्या अतिशय बिकट असून त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. याशिवाय मधुमेहाचे सर्वाधिक रुग्णदेखील भारतात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. त्यामुळे भारतात आरोग्याच्या समस्यांनी गंभीर स्वरुप धारण केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

...Read More

V. S. News
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कापण्याच्या निर्णयाला स्थगिती

व्हीएस न्यूज - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) संपकरी कर्मचाऱ्यांचे ३६ दिवसांचे वेतन कापण्याच्या निर्णयाला मंगळवारी स्थगिती देण्यात आली. त्याऐवजी संप केलेल्या चार दिवसांचा पगारच कापण्यात येईल. मात्र, त्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांची आठ दिवसांची रजा समर्पित करावी, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील पगारकपातीचे संकट दूर होणार असले तरी त्यांची हक्काची रजा हिरावली जाणार आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी याबद्दल काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

एसटी प्रशासनाने काल दंडात्मक कारवाई म्हणून संपकरी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापणार असल्याचे जाहीर केले होते. सहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने हा पगार कापण्यात येणार होता. संप केल्यास दंडात्मक कारवाई म्हणून प्रत्येक दिवसाकाठी आठ दिवस याप्रमाणे कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याची तरतूद नियमात आहे. त्यानुसार संपकरी कर्मचाऱ्यांचे दंडात्मक कारवाईचे ३२ दिवस आणि संपाचे ४ दिवस असे मिळून एकूण ३६ दिवसांचे वेतन कापण्यात येणार असल्याचे परिपत्रक एसटीकडून जारी करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कर्मचारी संघटनांकडून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करण्यात आली होती. हा निर्णय अयोग्य असून त्याविरोधात औद्योगिक न्यायालयात दाद मागणार असल्याचे ‘इंटक’चे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले. आम्ही संपावर जाण्यापूर्वी एसटी प्रशासनाला रीतसर नोटीस दिली होती. त्यामुळे न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला असला तरी ही कारवाई खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आज लगेचच या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.

...Read More

V. S. News
केंद्र सरकारला न्यायाधीशांचा पगार वाढविण्याचा विसर - सुप्रीम कोर्ट

व्हीएस न्यूज - न्यायाधीशांचे वेतन वाढवणे विसरलात का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्यानंतर नोकरशहांचे पगार न्यायाधीशांपेक्षा जास्त आहेत, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. सर्वोच्च न्यायालयाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘धुलाई भत्ता’ देण्याबद्दलच्या एका याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने ही टिप्पणी केली.

न्यायाधीश एस. अब्दुल नजीर आणि जे. चेलेश्वर यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करताना सॉलिसिटर जनरल पी. एस. नरसिंहा यांना न्यायाधीशांच्या वेतनाबद्दल प्रश्न विचारला. ‘सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील वेतनाबद्दल तुमचे काय विचार आहेत? सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ज्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्या प्रमाणात न्यायाधीशांचे वेतन वाढलेले नाही,’ असे न्यायाधीश नजीर आणि चेलेश्वर यांनी म्हटले.

न्यायाधीशांच्या वेतनवाढीबद्दलचा प्रस्ताव मार्चमध्ये आला होता. मात्र तेव्हापासून ही प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. संसदेत विधेयक मंजूर झाल्याशिवाय न्यायाधीशांच्या वेतनात वाढ होऊ शकत नाही. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यावर नोकरशाहीत सर्वोच्च पदावरील (कॅबिनेट सचिव) अधिकाऱ्यांना प्रतिमहिना २.५ लाख रुपये वेतन मिळते. याशिवाय विविध प्रकारचे भत्तेदेखील मिळतात. मात्र घटनात्मकदृष्ट्या अधिकाऱ्यांपेक्षा वरिष्ठ असणाऱ्या सरन्यायाधीशांना दर महिन्याला १ लाख रुपये वेतन आणि इतर भत्ते मिळतात. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना प्रति महिना ९० हजार रुपये वेतन मिळते. तर उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांना ८० हजार रुपये वेतन मिळते.

याबद्दल सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या काही न्यायाधीशांनी त्यांच्या भावना एका इंग्रजी वृत्तपत्राकडे व्यक्त केल्या. हा केवळ वेतनाचा प्रश्न नसून तो सन्मानाचा मुद्दा आहे, अशी प्रतिक्रिया अनेक न्यायाधीशांनी दिली. ‘घटनेने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वोच्च स्थान दिले आहे. मात्र न्यायाधीशांना नोकरशहांपेक्षा कमी वेतन देणे, त्यांच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही,’ असे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले.

...Read More

V. S. News
शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन : नारायण राणे

व्हीएस न्यूज - नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असतानाच राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करत शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. तीन वर्ष शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन असे राणेंनी म्हटले आहे.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून मंगळवारी नारायण राणेंनी त्यांच्या खास शैलीत भाजपला शुभेच्छा दिल्या. ‘तीन वर्ष शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार टिकवले आणि चालवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा’ असा मजकूर असलेले पोस्टर नारायण राणे यांनी ट्विट केले. शिवसेनेला आता नाकच राहिले नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. गेल्या महिन्यात राणे यांच्या पक्षाने भाजपप्रणीत ‘एनडीए’त प्रवेश केला. नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असून त्यांच्याकडे कोणते खाते दिले जाते याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहे. राणे यांचा ११ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळात समावेश होईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राणे यांनी सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवर टीका केली आहे. आता राणेंना शिवसेनेकडून काय प्रत्यूत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात राणे – सेनामधील संघर्ष आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

...Read More

V. S. News
विम्याची रक्कम देताना भविष्यातील कमाईचा विचार - सुप्रीम कोर्ट

व्हीएस न्यूज - रस्ते अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या भविष्यातील उत्पन्नाचा विचार करुन त्याच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे यापुढे विम्याची रक्कम देताना मृत पावलेली व्यक्ती जिवंत असती, तर भविष्यात तिची कमाई किती असती, हे आता पाहिले जाणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. ‘सध्याची विम्याची रक्कम निश्चित करण्याची व्यवस्था योग्य नाही. वाहन कायद्यामध्ये न्यायसंगत नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. मृत पावलेल्या व्यक्तीची सध्याची कमाई पाहून विमा निश्चित करणे, न्यायसंगत होऊ शकत नाही,’ असे मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटले. या खंडपीठात न्यायमूर्ती ए. के. सीकरी, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांचा समावेश होता. या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार, यापुढे रस्ते अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम देताना त्याच्या सध्याच्या नव्हे, तर भविष्यातील उत्पन्नाचा विचार केला जाईल. यासोबतच संबंधित व्यक्ती नोकरी करत होती की तिचा व्यवसाय होता,हेदेखील लक्षात घेतले जाणार आहे.

रस्ते अपघातात मृत पावलेली व्यक्ती नोकरी करत असल्यास आणि तिचे वय ४० पेक्षा कमी असेल, तर त्या व्यक्तीचे उत्पन्न सध्याच्या कमाईपेक्षा ५० टक्के जास्त धरले जाईल. मृत पावलेली व्यक्ती ४० ते ५० वर्ष वयोगटातील असेल, तर भरपाईची रक्कम ३० टक्क्यांनी वाढवली जाईल. मरण पावलेली व्यक्ती ५० ते ६० वर्ष वयोगटातील असल्यास भविष्यातील उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढवले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

...Read More

V. S. News
गुजरातमध्ये भाजपाला अपयश येईल - राहुल गांधी

व्हीएस न्यूज - गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवसर्जन यात्रेवर असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीकास्त्र डागले. केंद्र व गुजरातमधील भाजप सरकार हे सर्वसामान्यांसाठी नसून देशातील फक्त ५ ते १० उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप केला. मोदी सरकार रोजगार निर्मितीत सपशेल अपयशी ठरले असून देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. मोदींच्या मेक इन इंडिया, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. काळा पैसा बाहेर काढण्याच्या बाता करणाऱ्या सरकारने किती स्वीस बँक खातेधारकांना तुरूंगात डांबले, असा सवाल उपस्थित करत गुजरातच्या लोकांमध्ये राग आहे तेच भाजपला ‘शॉक’ देतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

भरूच येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मोठ्याप्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. ते म्हणाले, भाजप सरकार काही ठराविक उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहे. टाटा नॅनोसाठी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी ३३ हजार कोटी रूपये नाममात्र दरात दिले. यासाठी गुजरातमधील शेतकऱ्यांची जमीन, पाणी दिले. पण आज गुजरात काय देशातही नॅनो रस्त्यावरून धावताना दिसत नाही. या पैशांमध्ये गुजरातच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, असती. गरिबांकडून वीज, पाणी, जमीन घ्या, ती उद्योगपतींना द्या, हेच मोदींचे गुजरात मॉडेल असल्याचे ते म्हणाले.

आज समाजात राग आहे. प्रत्येकाला रोजगार हवा आहे. राज्यातील ९० टक्के शिक्षण क्षेत्रही उद्योगपतींच्या ताब्यात आहे. त्यामुळे गरिबांच्या मुलांना लाखो रूपये देऊन शिकता येत नाही. गुजरातमधील शिक्षण प्रचंड महागले आहे. तीच अवस्था आरोग्य क्षेत्रात असून धनाढय उद्योगपतींनी खासगी रूग्णालयांच्या माध्यमातून गरिबांची लूट चालवली असल्याचा आरोप त्यांनी केला. पैसे नसतील तर काम होणार नाही, हे गुजरात मॉडेल असल्याचे ते म्हणाले.

आपली मुख्य स्पर्धा ही चीनबरोबर आहे. त्यांची आणि आपली लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. चीनमध्ये दररोज ५० हजार युवकांना रोजगार दिला जातो. तर तेच मोदींच्या मेक इन इंडियामध्ये २४ तासांत अवघ्या ४५० युवकांना रोजगार मिळतो. संपूर्ण देशाला सांगितलं होतं की, मेक इन इंडिया अंतर्गत सर्व भारतातच होईल. पण तसं होताना दिसत नाही. गुजरातमध्येच ३० लाख लोक बेरोजगार आहेत, असेही त्यांनी म्हटले.

जीएसटी लागू करायला काँग्रेसचा विरोध नव्हता. पण ते लागू करताना हळूहळू लागू करावे व एकच कर ठेवावा, अशा सूचना आम्ही अरूण जेटलींना केल्या होत्या. पण त्यांनी आमचं ऐकलंच नाही. आज याचा सर्वाधिक फटका देशातील छोट्या छोट्या उद्योगांना,शेतकऱ्यांना बसत आहे. मोदींनी हसत हसत नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. याचा फटका शेतकरी, शेतमजूर, छोट्याछोट्या उद्योगांना बसला. हे सर्वजण रोखीत व्यवहार करतात. ते काळा धंदा किंवा चोरी करत नाहीत. काळा पैसा सोने आणि जमिनीत गुंतला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी यांनी स्वीस बँक खातेधारकांना तुरूंगात टाकू असे म्हटले होते. किती जणांना मोदी सरकारने तुरूंगात टाकलंय. या निर्णयांमुळे देशाचा जीडीपी घसरला आहे. लोकांमध्ये आता राग आहे, त्यांना त्रास होतोय. याचा ‘करंट’ भाजप सरकारला निश्चित बसणार, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. जेटलींना विदेशातील मंडळी जे सांगतात ते योग्य वाटतं आणि देशातील गरीब जनता सांगते, त्याकडे ते दुर्लक्ष करतात, असेही ते म्हणाले.

...Read More

V. S. News
शिवस्मारकाला पर्यावरण खात्याचा हिरवा कंदील, जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार

व्हीएस न्यूज - मुंबईतील अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार आहे. शिवस्मारकाच्या उंचीबाबत राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण खात्याने सोमवारी हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने आता शिवस्मारकाची उंची १९२ मीटरऐवजी २१० मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता. गिरगाव चौपाटीपासून समुद्रात सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावरील १५.८६ हेक्टर जागेवर स्मारक उभे केले जाणार आहे. या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे २३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिवस्मारकाजवळ पर्यटकांना शिवाजी महाराजांची माहिती देणारे दालन, पुस्तक प्रदर्शन, वस्तूसंग्रहालय, शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असणार आहे.

सुरुवातीला शिवस्मारकाची उंची १९२ मीटर होती. मात्र, हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरावा यासाठी ही उंची २१० मीटर इतकी करण्यात यावी, अशी शिवप्रेमींची भावना असल्याचे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी म्हटले होते. यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याकडे प्रस्तावदेखील सादर केला होता. या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सोमवारी मंजुरी दिल्याचे वृत्त ‘हिंदुस्तान टाईम्स’ या दैनिकाने दिले आहे. शिवस्मारकाच्या कामाला जानेवारी २०१८ मध्ये सुरुवात होण्याची शक्यता असून २०२१ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होईल, असे या वृत्तात म्हटले आहे.शिवस्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात हेलिपॅड, आयमॅक्स थिएटरचे काम केले जाणार आहे.

सध्या चीनमधील लुशान कौंटी येथील स्प्रिंग टेम्पलमधील बुद्धाचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. २००८ मध्ये या पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात आले असून या पुतळ्याची उंची २०८ मीटर इतकी आहे. दरम्यान, पर्यावरणवादी व मच्छिमारांचा प्रस्तावित शिवस्मारकाला विरोध असून स्मारकासाठी मोठ्याप्रमाणात भराव टाकण्यात येणार असल्याने त्याचा परिणाम समुद्रातील भरती-ओहोटीच्या प्रवाहांवर होण्याची शक्यता आहे. तसेच स्मारक ज्या खडकावर होणार आहे, तिथे प्रवाळांचे अस्तित्व असून ते संरक्षित प्रजातींपैकी आहेत

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!