Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
काँग्रेसच्या दबावामुळेच ‘जीएसटी’त कपात : राहुल गांधी

व्हीएस न्यूज - काँग्रेस आणि देशातील जनतेच्या दबावामुळेच भाजप सरकारला ‘जीएसटी’त भरघोस कपात करावी लागली, असा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. पण आम्ही यावर समाधानी नाहीत. आम्हाला जीएसटीत कराचे पाच टप्पे नको, आम्हाला करआकारणीसाठी एकच टप्पा हवा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी शनिवारपासून गुजरात दौऱ्यावर असून पहिल्या दिवशी त्यांनी गांधीनगरमधील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. ‘भाजप सरकारने जीएसटीत बदल केले ही बाब स्वागतार्हच आहे. काँग्रेस आणि देशातील जनतेने टाकलेल्या दबावामुळेच सरकारने १७८ उत्पादनांवरील जीएसटीचे प्रमाण २८ वरुन १८ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आम्ही अजूनही समाधानी नाही, आमचा लढा इथेच संपलेला नाही, भारताला जीएसटीत पाच टप्प्यांऐवजी एकच टप्पा हवा आहे. जीएसटीत अजूनही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. नोटाबंदी आणि गब्बर सिंग टॅक्स (जीएसटी) या दोन निर्णयांनी देशातील लाखो तरुणांना बेरोजगार केल्याचा दावा त्यांनी केला. गांधीनगरमधील सभेपूर्वी त्यांनी अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. जीएसटीवरुन काँग्रेसने भाजप सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वीही तिखट शब्दात भाजपचा समाचार घेतला आहे. तर शनिवारी जीएसटीत कपात केल्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी देखील भाजपला चिमटा काढला होता. ‘जीएसटीतील कपातीसाठी मी गुजरातचा आभारी आहे. संसदेला जे जमले नाही ते गुजरातमुळे शक्य झाले’, असे उपरोधिक ट्विट करत त्यांनी भाजपला टोला लगावला होता. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत जीएसटीचा फटका बसेल या भीतीपोटी केंद्र सरकारने जीएसटीत बदल केल्याची चर्चा रंगली आहे.

राहुल गांधी हे तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून शनिवारपासून या दौऱ्याला सुरुवात झाली. या दौऱ्यात ते सहा जिल्ह्यांना भेट देतील. महिला, उद्योजक आणि तरुणांशी ते संवाद साधतील. याशिवाजी अंबाजी मंदिरालाही ते भेट देणार आहेत. शनिवारी त्यांनी एका ढाब्यावर कार्यकर्त्यांसोबत चहा आणि भजीचा आस्वादही घेतला.

...Read More

V. S. News
वाहन पसंती क्रमांकासाठी लिलाव बंद करण्याची मागणी

व्हीएस न्यूज - पसंतीचा वाहन क्रमांक देण्यासाठी “आरटीओ’ कार्यालयाकडून होणारी पिळवणूक थांबून, लिलाव पद्धती बंद करून पहिल्या अर्जदारास तो क्रमांक देण्यात यावा, अशी मागणी ह्यूमन राईट्‌स ऑफ असोसिएशन फॉर प्रोटेक्‍शनच्या वतीने करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांना या मागणीचे निवेदन दिले आहे.

नव्याने खरेदी केल्या जाणाऱ्या वाहनांसाठी आरटीओ कार्यालयाकडून ग्राहकांना पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज भरून घेतला जातो. अर्जासोबत क्रमांकासाठी “डिमांड ड्राफ्ट’ घेतला जातो. एकाच क्रमांसाठी अनेकजणांचे अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा लिलाव केला जातो. मात्र, या लिलाव पद्धतीमुळे गोरगरिबांया क्रमांकासाठी भरण्यास पुरेशी रक्कम नसते. शिवाय श्रीमंतांकडे भरमसाठ पैसे असल्यामुळे ते वाटेल ती किंमत मोजतात आणि आपल्या पसंतीचा नंबर घेतात.

या लिलाव पद्धतीमुळे गोरगरिबांची पिळवणूक होत असल्याने, पसंतीच्या क्रमांकाची लिलाव पद्धत बंद करून प्रथम येणाऱ्या अर्जदारास तो क्रमांक देण्यात यावा. तसेच, आरटी कार्यालय व पोलिसांकडून जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव अनेक वर्षे होत नसल्याने ती वाहेन वापरात आणता येत नाहीत. या वाहनांचा लवकर लिलाव केल्यास, यामधून महसूल मिळे. तसेच गोरगरिब नागरिकांचे स्वस्तात गाड्या घेण्याचे स्वप्न पुर्ण होईल, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

...Read More

V. S. News
आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ जाहीर

महाराष्ट्राच्या अवघ्या ३ खेळाडूंना संघात स्थान

व्हीएस न्यूज - इराणच्या गोरगान शहरात २२ ते २७ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताच्या संभाव्य संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. संभाव्य संघात निवड झालेले ३६ खेळाडू सध्या‘साई’च्या (Sports Authority of India) सोनेपत येथील शिबीरात सराव करत आहेत. १९ नोव्हेंबररोजी या शिबीराची सांगता होणार असून, यानंतर १२ जणांचा संघ निवडला जाईल. २०१६ साली झालेल्या कबड्डी विश्वचषकात भारताने इराणचा पराभव केला होता, त्यामुळे घरच्या मैदानावर खेळताना इराण आपल्या पराभवाचा बदला घेतो का हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – आशियाई अजिंक्यपद कबड्डी सराव शिबीरातून अनुप कुमारला वगळलं

यंदाच्या संघात निवड समितीने सिनीअर खेळाडूंना विश्रांती देत नवोदीतांना संघात जागा दिली आहे. ३६ जणांच्या यादीत हरियाणा, साई आणि सेनादलच्या खेळाडूंचा दबदबा पहायला मिळतो आहे. महाराष्ट्राच्या अवघ्या ३ खेळाडूंना या संभाव्य संघात जागा मिळाली आहे. असा आहे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ

जयदीप (सेनादल), संतोष (कर्नाटक), सुरिंदर नाडा (हरियाणा), सचिन शिंगाडे (महाराष्ट्र), शिव ओम (हिमाचल प्रदेश), थिवकरन (तामिळनाडू), अजय कुमार (सेनादल), अजय ठाकूर (हिमाचल प्रदेश), दिपक हुडा (राजस्थान),के.प्रपंजन (तामिळनाडू), कमल किशोर (राजस्थान), काशिलींग अडके (महाराष्ट्र), मणिंदर सिंह (पंजाब), मोनू गोयत (सेनादल), पी. मल्लिकार्जुन (तेलंगणा), पवनकुमार कादियान (हरियाणा), प्रदीप नरवाल (सेनादल), राहुल चौधरी (उत्तर प्रदेश), राजेश मोंडल (रेल्वे), राजुलाल चौधरी (राजस्थान), रिशांक देवाडीगा (महाराष्ट्र), रोहित बालियान (उत्तर प्रदेश), रोहित कुमार (सेनादल), सचिन (राजस्थान), विकास कंडोला (साई), विशाल भारद्वाज (हिमाचल प्रदेश),वझीर सिंह (हरियाणा), अमित नागर (दिल्ली), अमित हुडा (हरियाणा), मोहीत छिल्लर (रेल्वे), नितीन तोमर (सेनादल), संदीप नरवाल (हरियाणा), आशिष सांगवान (हरियाणा), सुरिंदर सिंह (पंजाब), सुरजीत (सेनादल), महेंद्र धाका (राजस्थान).

एकेकाळी कबड्डीवर आपलं वर्चस्व गाजवणाऱ्या महाराष्ट्राचं प्रभुत्व आता कमी झालंय. पुर्वी भारतीय संघात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा भरणा असायचा, मात्र संघटनांच्या राजकारणाचा फायदा, उत्तरेकडच्या राज्यांनी घेतला. सध्या कबड्डी जनार्दनसिंह गेहलोत यांच्या संघटनेचा दबदबा आहे. त्यामुळे भारतीय संघात जागा मिळताना, उत्तरेकडेच्या राज्यातील खेळाडूंना संधी मिळते अशी क्रीडाक्षेत्रात चर्चा आहे.

मात्र भारतीय संघात महाराष्ट्राच्या खेळाडूंची संख्या कमी होण्यास काही अंतर्गत गोष्टीही कारणीभूत आहेत का? या संदर्भात ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने माजी राष्ट्रीय कबड्डीपटू मेघाली कोरगावकर यांच्याशी संवाद साधला.“महाराष्ट्राच्या खेळाडूंना भारतीय संघात अधिकाधिक जागा मिळावी यासाठी आपली संघटना सतत प्रयत्नशील असते, मात्र त्यांचे प्रयत्न हे तोकडे पडतात. त्यात महाराष्ट्रातील काही खेळाडू हे शारीरिक तंदुरुस्तीच्या पातळीवर अजुनही कच्चे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धांमधल्या त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो. इथे उत्तरेकडच्या राज्यातले खेळाडू पुढे निघून जातात. याचसोबत शासकीय सेवेत असणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना सरावासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र इतर राज्यांमध्ये खेळाडूंना सरावासाठी पुरेसा वेळ दिला जातो.” अशा अनेक बाबींवर महाराष्ट्राचे खेळाडू कमी पडतात. त्यामुळे जीव तोडून मेहनत करणे आणि संघात आपलं स्थान पक्क करणे हेच आपल्या हातात असल्याचं मेघाली कोरगावकर म्हणाल्या.

...Read More

V. S. News
आता विमा पॉलिसीलाही ‘आधार’ कार्ड

व्हीएस न्यूज - बँक खाते आणि मोबाइल नंबर आधार कार्डशी जोडण्यावरून निर्माण झालेला वाद शमलेला नसतानाच आता विमाधारकांना त्यांच्या विमा पॉलिसी आधारशी जोडणे सक्तीचे करण्यात येणार असल्याचे वृत्त येत आहे.‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) सर्व विमा कंपन्यांच्या ग्राहकांच्या पॉलिसी आधार आणि पॅन क्रमांकाशी जोडण्याचे निर्देश जारी केले आहेत. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने बँका आणि मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना आधार क्रमांक जोडण्याबाबत लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या अफवा पसरवण्यावरून फटकारले होते. आधार कार्डशी निगडीत एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने बँका आणि मोबाइल कंपन्यांना ग्राहकांना आधार क्रमांकाशी जोडण्याबाबत अंतिम तारखेबाबत सातत्याने सूचना देण्यास सांगितले आहे.

या वृत्तानुसार, या आदेशानंतर जो पॉलिसी धारक आपल्या पॉलिसीशी आधार आणि पॅन कार्ड जोडणार नाही त्याला त्या विम्याची रक्कम मिळणार नाही. आयआरडीएने १ जून २०१७ च्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार विमा कंपन्यासह सर्व आर्थिक सेवा प्रदात्यांना ग्राहकांचे आधार आणि पॅन कार्ड/ फॉर्म ६० जोडण्यास सांगितले आहे. आयआरडीएचे (जीवन विमा) अधिकारी नीलेश साठे यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, जीवन विम्याशी निगडीत पॉलिसींनाही आधार आणि पॅनबरोबर जोडावे लागेल. अनेक विमा कंपन्या वार्षिक ५० हजारहून अधिक हप्ता देणाऱ्या ग्राहकांकडून यापूर्वीच पॅन क्रमांक घेऊन पैसे घेत आहेत.

विमा धारक संबंधित कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन किंवा मोबाइल संदेश किंवा ऑनलाइन आपले आधार आणि पॅन कार्ड जोडू शकतात. देशभरात सुमारे २९ कोटी लोकांनी जीवन विमा उतरवला आहे. तर २१ कोटी वाहन धारकांकडे विमा आहे. आरोग्य विमा धारकांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे. गेल्यावर्षी सुमारे अडीच कोटी लोकांनी जीवन विमा उतरवला होता. यामध्ये २.०५ कोटी लोकांनी भारतीय जीवन विमा निगमचे (एलआयसी) ग्राहक होते. देशात सुमारे ५४ विमा कंपन्या आहेत. देशात सार्वजनिक क्षेत्रात चार सामान्य विमा, एक जीवन विमा आणि एक पुर्नविमा कंपनी कार्यरत आहे.

...Read More

V. S. News
ईडी’कडून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची ‘चौकशी

व्हीएस न्यूज - इंटरनेटवरील एका ऑनलाईन स्कीमसंदर्भात बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी गुरूवारी अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरा गेला. ‘ईडी’च्या लखनऊ येथील विभागीय कार्यालयात नवाजुद्दीनची चौकशी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या ऑनलाईन स्कीमचे संचालक आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्यातील आर्थिक संबंध उघड झाले होते. त्यानंतर ‘ईडी’ने नवाजुद्दीनला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. या समन्समध्ये संबंधित कंपनीकडून मिळालेल्या १.१५ कोटींच्या रकमेप्रकरणी नवाजुद्दीनकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले होते.

वेब वर्क ट्रेड लिंक्स या कंपनीची उपकंपनी असलेल्या अॅडस् बुक्सकडून एका ऑनलाईन मॉडेलच्या सबस्क्रिप्शनसाठी जाहिरात केली जात होती. युजर्सनी यामधील जाहिरातींच्या लिंकवर क्लिक केल्यास त्यांना पैसे मिळतील, असे या जाहिरातीमध्ये म्हटले होते. परंतु, ही योजना संशयित वाटल्यामुळे ‘ईडी’कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच स्वत:च्या आयुष्यावरील ‘अॅन ऑर्डीनरी लाइफ’ या चरित्रात्मक पुस्तकावरून नवाजुद्दीन सिद्दिकी वादात सापडला होता. या पुस्तकामधील काही खळबळजनक गौप्यस्फोटांमुळे नवाजुद्दीनला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर नवाजने हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. नवाजच्या या पुस्तकात त्याने आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्पष्टपणे मांडल्या आहेत. पूर्वाश्रमीची प्रेयसी सुनीता राजवार, अभिनेत्री आणि सहकलाकार निहारिका सिंगसोबतचं अफेअर याविषयी त्याने लिहिलं होतं. या दोन्ही अभिनेत्रींनी यावर आक्षेप घेत नवाजवर सडेतोड टीकादेखील केली होती. त्यामुळे चरित्राच्या अनावरणापासूनच पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

...Read More

V. S. News
पुढच्या वर्षी नोकरदारांचे पगार १० टक्क्यांनी वाढणार

व्हीएस न्यूज - नोटाबंदीच्या निर्णयामुळे गेल्या वर्षभरापासून मंदीच्या सावटाखाली असणाऱ्या भारतीय रोजगार क्षेत्राच्यादृष्टीने एक आशादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालात आशियाई पॅसिफिक परिसरातील देशांमध्ये २०१८ साली होणाऱ्या वेतन श्रेणीतील बदलांवर भाष्य करण्यात आले आहे. आशियाई पॅसिफिक परिसरात भारत हा सर्वाधिक पगारवाढ होणार देश ठरेल. भारतातील उर्जा, गृहपयोगी वस्तूंचे उत्पादन (एफएमसीजी) आणि रिटेल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगारवाढ मिळेल. २०१७ प्रमाणे देशभरात पगार वाढण्याचे प्रमाण सरासरी १० टक्के इतके असेल, असे ‘सॅलरी बजेट प्लॅनिंग रिपोर्टच्या’ तिमाही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, अहवालात बीपीओ, केमिकल्स, बांधकाम क्षेत्र आणि अभियांत्रिकी, ग्राहकोपयोगी उत्पादने, रिटेल, आर्थिक सेवा, उच्च तंत्रज्ञान, उत्पादन, मीडिया, औषध आणि आरोग्य शास्त्र, उद्योग आणि तांत्रिक समुपदेशन, वाहतूक आदी क्षेत्रांसंदर्भात सविस्तर भाष्य करण्यात आलेय. जुलै महिन्यात आशिया पॅसिफिक क्षेत्रातील चार हजार प्रतिनिधींची मते विचारात घेण्यात आली होती. यामध्ये ३०० भारतीय कंपन्यांनी सहभाग घेतला होता. गेल्या काही वर्षात भारतात वेतनवाढीचा आलेख उतरला होता. मात्र, २०१८ मध्ये हा आलेख वरच्या दिशेने वाटचाल करेल, असे या अहवालात म्हटले आहे. भारतापाठोपाठ इंडोनेशियात ८.५ टक्के, चीनमध्ये ७ टक्के, फिलीपाईन्समध्ये ६ टक्के तर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये प्रत्येकी ४ टक्के पगारवाढ होईल, असेही अहवालात नमूद करण्यात आलेय.

...Read More

V. S. News
मोदींच्या लोकप्रियतेत १५ टक्क्यांनी घट

व्हीएस न्यूज - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या जनमत चाचणीचे (ओपिनियन पोल) निकाल गुरूवारी समोर आले. यामध्ये गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. लोकनीति आणि सीएसडीएस यांच्या सर्वेक्षणानुसार विधानसभेच्या १८२ जागा असलेल्या गुजरातमध्ये भाजपला ११३ ते १२१ मतदारसंघांमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला या निवडणुकीत ५८ ते ६४ जागांवर विजय मिळेल. याशिवाय, १ ते ७ मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत भाजपला एकूण ४७ तर काँग्रेसला ४१ टक्के मते पडतील. २०१२ साली झालेल्या निवडणुकीत भाजपला ४८ टक्के तर काँग्रेसला ३९ टक्के मते मिळाली होती. तर २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ६० टक्के आणि काँग्रेसला ३३ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला होता. यावेळी गुजरातमध्ये सत्तापालट होईल, असा दावा विरोधक करत होते. मात्र, या निवडणुकीत भाजप सत्ता कायम राखणार असल्याचे जनमत चाचणीत दिसत आहे. परंतु, निवडणुकीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. विशेष गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत १५ टक्क्यांनी घसरण झाल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
विमानतळांवरून २६०० किलो सोने-चांदी जप्त

व्हीएस न्यूज - नोटाबंदीला ८ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाला. यानिमित्त सत्ताधाऱ्यांनी काळा पैसा विरोधी दिन तर विरोधकांनी काळा दिवस म्हणून साजरा केला. परंतु, नव्याने उजेडात आलेल्या वृत्तानुसार नोटाबंदीच्या एक वर्षभरात देशातील विमानतळांवरून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) ८७ कोटी रूपयांची रोकड व २६०० किलो सोने आणि चांदी पकडली आहे.

सीआयएसएफकडे देशातील ५९ विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बंद केल्यानंतर अर्थ मंत्रालयाने सीआयएसएफला रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या सामानावर लक्ष ठेवण्याची सूचना केली होती. सीआयएसएफच्या आकडेवारीनुसार ८ नोव्हेंबर २०१६ ते ७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत ८१.१७ कोटी रूपयांची संशयित रोकड त्याचबरोबर १४९१.५ किलो सोने आणि ५७२.६३ किलो चांदी मिळून आली आहे.

सर्वाधिक ३३ कोटी रूपये मुंबईच्या विमातळावरून जप्त करण्यात आले. तर सर्वाधिक ४९८ किलो सोने हे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जप्त करण्यात आले. तर २६६ किलो चांदी हे जयपूर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले.

...Read More

V. S. News
चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात – साक्षी महाराज

व्हीएस न्यूज - वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असणार भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी आता पद्मावती या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे. इतिहासाची मोडतोड सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पद्मावती, महाराणी, हिंदू आणि शेतकऱ्यांची मस्करी केली जात आहे. हे चुकीचं होत आहे, हे सरकार आणि प्रशासनाला समजलं पाहिजे. पद्मावती चि़त्रपटावर बंदी घातली पाहिजे, असे ते म्हणाले. चित्रपट क्षेत्रातून याबाबत टीका केली जात आहे, असे त्यांना सांगितले असता ते म्हणाले की, चित्रपट सृष्टीला कुठली अस्मिता किंवा राष्ट्रवादाशी काही देणे घेणे नाही. त्यांना फक्त पैसा हवा आहे. यासाठी ते नग्न नाचण्यासही तयार होतील, असे ते म्हणाले. दि. १ डिसेंबर रोजी पद्मावती चित्रपट प्रसिद्ध होणार आहे.

साक्षी महाराजांपूर्वी भाजप खासदार चिंतामणी मालवीय यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत मालवीय यांनी चित्रपट जगतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान, चित्रपटाबाबत वाद वाढत असल्यामुळे संजय भन्साळी यांनी गुरूवारी पद्मावतीच्या फेसबुकवरून एक निवेदन जारी करून वाद मिटवण्याचे आवाहन केले आहे. चित्रपटात कोणतेही वादग्रस्त दृश्य नाही. हा चित्रपट राणी पद्मावतीचे साहस,धाडसावर आधारित आहे. त्यांच्या बलिदानाला आम्ही नमन करतो, अफवांकडे लक्ष देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. हा चित्रपट प्रामाणिकपणे व जबाबदारीने तयार केल्याचेही ते म्हणाले.

...Read More

V. S. News
जीएसटी प्रणाली सीएंनाही समजेना, मग आम्हाला काय समजेल..

व्हीएस न्यूज - जीएसटीच्या मुद्यावरुन विरोधी पक्ष भाजपवर टीका करत असताना मध्यप्रदेशमधील भाजप मंत्र्याने जीएसटी (वस्तू व सेवा कर) प्रक्रिया गुंतागुतीची असल्याचे वक्तव्य केलयं. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मध्यप्रदेशचे अन्न व पुरवठा मंत्री ओम प्रकाश ध्रुवे यांनी जीएसटीची प्रक्रिया अद्यापही समजलेली नाही, असे म्हटले. मोठे मोठे व्यापारी आणि सीए जीएसटी समजू शकलेले नाहीत. मला देखील ते समजलेले नाही, त्यामुळे या विषयावर प्रतिक्रिया देणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. सध्या जटील वाटणाऱ्या कर प्रणालीची प्रक्रिया हळूहळू समजेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विरोधी पक्ष जीएसटीच्या मुद्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत असताना ध्रुवे यांचे वक्तव्य एका अर्थाने विरोधी पक्षाला बळ देणारेच आहे. यापूर्वी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नव्या कर प्रणालीतील त्रूटीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले होते.शुक्रवारी जीएसटी समितीची विशेष बैठक होणार असून या बैठकीत जीएसटी प्रणालीतील समस्यावर काय उपाय योजना केले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

...Read More

V. S. News
नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयाचा सर्वत्र निषेध..

व्हीएस न्यूज - देशभरात लागू केलेल्या नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त केंद्र सरकारच्या या तुघलकी निर्णयाचा शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थांच्या वतीने निषेध करण्यात आला. सकाळपासून अनेक संघटनांच्या वतीने बुधवारी (दि.8) पिंपरीतील आंबेडकर चौकात शोकसभा, निदर्शनांच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. यानिमित्ताने केंद्र सरकारच्या या निर्णयविरोधात संघटना एकवटल्याचे चित्र पहायला मिळाले.

कोणतीही पूर्वकल्पना न देता केंद्र सरकारने वर्षभरापुर्वी केलेल्या नोटाबंदीचा फटका सर्वसामान्यांनाच अधिक बसला. काळा पैसाबाहेर काढण्यासाठी केलेला हा प्रयोग फसल्याचे लक्षात आल्याने सरकारने या नोटाबंदीची अन्य विविध घटनांशी तुलना करत नोटाबंदीचे लंगडे समर्थन करत असल्याचा विविध संघटनांच्या निदर्शनांमधून दिसून आला. याच मुद्‌द्‌यावर केंद्र सरकारवर टिका करण्यात आली.

लुटारूंचा दिवस आंदोलन’…

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाले असून, या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. भाजप सरकारच्या या कृतीच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बुधवारी (दि.8) “लुटारुंचा दिवस आंदोलन’ करण्यात आले. शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. काळा पैसा बाहेर काढण्याचे अमिष दाखवून भाजप सरकारने वर्षभरापुर्वी नोटाबंदी केली. बॅंकेतून रक्कम काढण्यावर निर्बंध लादण्यात आले. मात्र, यामुळे सर्वसामन्य नागरिकांचे मोठे हाल झाले. एटीएमच्या रांगेत उभ्या राहिलेल्या अनेक निष्पाप नागरिकांना विनाकारण जीव गमवावा लागला. या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले असून, हे हळुहळू आता समोर येऊ लागले आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीतून भाजप सरकराने सर्वसामान्यांची आर्थिक लूट केली आहे, अशा शब्दांत देवेंद्र तायडे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली. नोटाबंदी करण्याचे पंतप्रधानांना अधिकार आहेत की देशाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या रिजर्व्ह बॅंकेला? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित करत, देशात लोकशाहीच्या बुरख्यातुन एकाधिकारशाही सुरु असल्याची टिका त्यांनी केली. तसेच याविरोधात सर्वसामान्य जनता याचा बदला घेईल, असे ते म्हणाले. या आंदोलनात भारत कुंभारे, सुधीर कांबळे, सुधाकर साबळे, संजय खरात, मिलिंद केदारी, सुभाष गवळी, राजु वनकर, मनिषा साळवे आदीसह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

डाव्या संघटनांचे आंदोलन

केंद्र सरकारच्या नोटाबंदीला विरोध करत, डाव्या विचार सरणीच्या विविध संघटनांनी एकत्र येत, पिंपरीत आंदोलन करत निषेध केला. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना हक्काची रक्कम काढण्यासाठी बॅंकेत तासनतास थांबावे लागले. यामध्ये शेकडो निरपराध नागरिकांचा नाहक बळी गेला आहे. याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी केला. तर काळा पैसा बाहेर काढण्याचे कारण सांगत, केलेल्या नोटाबंदीचा निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला असून, केंद्र सरकारने या निर्णयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची संघटीतपणे लूट केल्याचा आरोप माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केला. या आंदोलनात स्वराज अभियान, डी.वाय.एफ.आय., शेतकरी कामगार पक्ष, लोकजागर संघटना, टी.यू.सी.सी., प्रहार जनशक्ती पक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि पंचशील मंडळ या संस्थाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

सामान्य नागरीक बलिदान दिवस

समाजवादी पक्षाच्या वतीने नोटाबंदीच्या निषेधार्थ सामान्य नागरिकाचा बलिदान दिवस पाळण्यात आला. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चौकात मौन पाळत केंद्र सरकारच्या निषेध केला. या आंदोलनात रफिकभाई कुरेशी,सालारभाई शेख, रवि यादव, प्रा. नरेंद्र पवार, बाबा नदाफ, जावेद शाह, विनोद भालेराव, सायराबानू शेख, शहनाज शेख आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

कॉंग्रेसच्या पर्यावरण विभागाची श्रद्धांजली

केंद्र सरकारने सर्वसामन्यांवर लादलेल्या नोटाबंदीच्या काळात रोख रक्कम काढण्यासाठी सर्वसामान्यांना तासनतास रांगेत ताटकळत थांबावे लागले. याकाळात देशभरात शेकडो नागरिकांचा नाहक मृत्यू झाला. या सर्व निरपराध नागरिकांना कॉंग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या वतीने बुधवारी (दि.8) भोसरीत आयोजित केलेल्या श्रद्धांजली वाहण्यात आली. कॉंग्रेस कमिटीच्या सदस्या निगार बारसकर यांनी या शोकसभेत मनोगत व्यक्त केले. या नोटाबंदीमुळे शेकडो निरपराध नागरिकांचा बळी गेला. हक्काची रक्कम काढण्यावर निर्बंध घातल्यामुळे चलन टंचाई निर्माण झाली. त्यामुळे अनेक मुलींची लग्ने मोडली. कामगार, उद्योग, सराफ बाजार, सर्वसामन्य विक्रेता व नागरिकांना याचा मोठा फटका बसला. केंद्र सरकारला या दु:खाची कल्पना नाही. मात्र, याकाळात नाहक बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटंबियांच्या दु:खात कॉंग्रेस पक्ष सहभागी आहे, अशा शब्दांत त्यांनी या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, नहासचिव अशोक मंगल, पार्यवरण विभागाचे शहराध्यक्ष उमेश बनसोडे, उपाध्यक्ष सतीश पैठणकर, सदस्य मंगल मोहिते, एस.टी. कांबळे, रोहन वाघमारे, दिलीप पांढारकर, निसार बारसकर, शांताराम मोरे, पोपटभाऊ पवार, राजू साळुंखे, केरबा शिंदे, बाळासाहेब काळे, संदीप मोरे, विकास चव्हाण, राज वैद्य, सांगदेव गालफाडे, अंबादास म्हेत्रे, साहेबराव निंबर्गीकर, रमेश सरोदे आदी उपस्थित होते.

रिपाइंकडून व्हाईट मनी डेसाजरा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने (आठवले गट) व्हाईट मनी डे साजरा करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी नोटबंदीचे पक्षाच्या वतीने समर्थन करण्यात आले. या कार्यक्रमास बाळासाहेब भागवत, बाळासाहेब ओव्हाळ, सम्राट गायकवाड, अशोक गायकवाड, भरत खरात, विलास गरड, विष्णु गजधने, नितीन गायकवाड, बापू गायकवाड, रत्नमाला सावंत, राघु बनसोडे आदी या वेळी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
नृत्याभिव्यक्‍तीने केले रसिकांना मंत्रमुग्ध

व्हीएस न्यूज - पायल नृत्यालयाच्या वतीने अभिव्यक्‍ती हा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नुकताच पार पडला. जगप्रसिद्ध नृत्यांगना पंडिता मनिषा साठे यांच्या ज्येष्ठ शिष्या पायल गोखले आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी हा अभिव्यक्ती कार्यक्रम सादर केला.

कार्यक्रमासाठी गुरु पंडिता मनिषा साठे, गुरु पं. नंदकिशोर कपोते, प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत निगुडकर उपस्थित होते. यावेळी मनिषा साठे म्हणाल्या की, कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी सातत्य, कष्ट, रियाज यांची जोड आवश्‍यक असते. आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली कला बहरत जाते. पिंपरी-चिंचवड शहरात कथ्थकचे मार्गदर्शन करत असल्याबद्दल त्यांनी आपल्या शिष्या पायल गोखले यांचे विशेष कौतुक केले.

भारतीय संगीत आणि नृत्य नव्या पिढीपर्यंत पोहचविणे आणि आपल्या समृद्ध कलासंस्कृतीचा प्रचार-प्रसार या क्षेत्रातील लोक मनापासून करत आहेत. पाश्‍चात्य नृत्य आणि संगीताच्या काळात देखील भारतीय नृत्य आणि संगीत आपली एक वेगळी ओळख टिकवून असल्याचे आणि अजूनही नागरिकांच्या मनात भारतीय नृत्य-संगीताबद्‌दल आदर व प्रेम असल्याचेही या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आले. या कार्यक्रमासाठी रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक चांगल्या कलाकृतीस टाळ्यांच्या कडकडाटाने भरभरुन दाद देत होते.

विशेष कलाकृतीने कार्यक्रमास बहार

कथ्थक नृत्याविष्काराने परिपूर्ण असलेल्या या कार्यक्रमात कथ्थकचे विविध रंग पाहायला मिळाले. सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर गुरु पायल गोखले यांनी झपताल सादर करुन प्रेक्षकांची दाद भरभरुन दाद मिळवली. तर अभंग, तराणा, तालप्रस्तुती, होरी, शिवस्तुती, ठुमरी यांनी कार्यक्रमाला विशेष बहार आणली. सतारवर केलेल्या कथ्थकनृत्याला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. यावेळी गुरु मनिषा साठे यांनी शिकवलेल्या रचना पायल गोखले यांनी पेश केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनल उंब्राणी यांनी केले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!