Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
माझ्या आंदोलनातून नेते निर्माण होणार नाहीत- अण्णा हजारे

व्हीएस न्यूज - मी समाजाच्या हितासाठी आंदोलन करतो, माझ्या आंदोलनातून यापुढे नेते निर्माण होणार नाहीत याची मी तुम्हाला खात्री देतो असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. जनलोकपाल आंदोलनाच्या वेळी मी काहीसा सावध नव्हतो. यापुढे माझ्या आंदोलनात कोणत्याही व्यक्तीला सहभागी होता येईल. मात्र आंदोलन झाल्यावर कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होणार नाही हे त्या व्यक्तीला लेखी कराराने लिहून द्यावे लागेल असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

जनलोकपाल आंदोलनाचा लढा संपलेला नाही त्याचमुळे अण्णा हजारे हे २३ मार्च २०१८ पासून पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करणार आहेत. २३ मार्चला जंतरमंतर येथे होणाऱ्या आंदोलनाबाबत अण्णा हजारे माहिती देत होते. त्याचवेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या यावेळच्या आंदोलनातूनही अरविंद केजरीवालसारखे काही नेते देशाला मिळणार का? याच प्रश्नाला उत्तर देताना माझ्या आंदोलनातून यापुढे नेते निर्मिती होणार नाही अशी घोषणा अण्णा हजारे यांनी केली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. निवडणूक चिन्ह आणि पक्षाचा आधार न घेता उमेदवारांनी त्यांच्या सामाजिक प्रतिमेच्या जोरावर निवडणूक लढवावी यासाठीही मी आग्रही आहे असेही अण्णा हजारेंनी म्हटले आहे. नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये भारतीय मतदार संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छ राजकारण आणि अपराधमुक्त भारत या विषयावर त्यांनी त्यांची मते मांडली. आजकाल राजकीय पक्षांपुढे फक्त सत्ता काबीज करणे हा एकमेव अजेंडा आहे. आपल्या संविधानात निवडणूक चिन्हाचा उल्लेख नाही मग ते निवडणूक व्यवस्थेत कसे आले? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ज्येष्ठ सामाजिक अण्णा हजारे यांनी यूपीए सरकारच्या काळात जनलोकपाल विधेयकासाठी देशव्यापी चळवळ उभी केली होती. हे आंदोलन संपल्यावर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी हा पक्ष काढला. तसेच याच पक्षाने दिल्लीची सत्ताही मिळवली. ही बाब अण्णा हजारे यांना मुळीच रूचलेली नाही. त्यांनी तसे बोलूनही दाखवले होते. आता मात्र आगामी काळात माझ्या आंदोलनातून नेते निर्मिती होणार नाही, तसा करारच मी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांकडून करून घेणार आहे असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

...Read More

V. S. News
नरेंद्र मोदींनी नोकरीचे आश्वासन दिलेच नव्हते

व्हीएस न्यूज - नरेंद्र मोदी यांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नोकरीचे आश्वासन दिलेच नव्हते. त्यांनी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते असे विधान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केले आहे. वाढती महागाई आणि घसरणारा विकास दर ही जगभरातील समस्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थराज्य मंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी ‘नवभारत टाइम्स’ या हिंदी दैनिकाला मुलाखत दिली. यात त्यांना मोदी सरकार नोकरीचे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी झाले का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शुक्ला म्हणाले,मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दरवर्षी १ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी नोकरीचे आश्वासन कधीच दिले नव्हते. नोकरी म्हणजे सरकारी नोकरी नसून तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. एका कार्यक्रमानिमित्त मुंबईत आले असताना त्यांनी ही मुलाखत दिली. मोदींच्या मुद्रा योजनेमुळे सुमारे १० कोटींपेक्षा जास्त तरुणांना कर्ज देऊन त्यांना रोजगार देण्यात आला. स्टार्टअप योजनांमुळे देशाचा फायदा होत असून महिलांसाठीही विशेष योजना सुरु झाल्या आहेत. यामुळे गावातील महिला देखील दररोज ५०० ते ६०० कमवू शकतात, असे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत मोदींनी काळा पैसा परत आणल्यास प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील असे आश्वासन दिले होते. मात्र हा निवडणुकीतील ‘जुमला’ होता, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले होते. तर अच्छे दिन येण्यासाठी आणखी २५ वर्ष लागतील, असेही शहा यांनी म्हटले होते. आता शुक्ला यांनी देखील असे विधान केल्याने भाजपवर टीका होत आहे.

...Read More

V. S. News
देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार आरोग्य विमा

व्हीएस न्यूज - मोदी सरकार १ फेब्रुवारी रोजी आपला अखेरचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात सरकारकडून प्रत्येक सामान्य नागरिकांना आरोग्य विम्याची भेट मिळण्याची शक्यता आहे. ही योजना अस्तित्वात आल्यास कोणताही आजार झाल्यास त्याच्यावर उपचार मिळण्यास अडचण येणार नाही. हा आरोग्य विमा ३ ते ५ लाख रूपयांपर्यंत असू शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वांना आरोग्य विमा देण्यासाठी ५ हजार कोटी रूपयांची तरतूद केली जाईल. त्याचबरोबर विश्वस्त संस्था स्थापन करून आरोग्य विमा देण्याचा विचार असल्याचे सांगण्यात येते. केंद्र पुरस्कृत ही योजना अंमलात आणली जाईल. यामध्ये एकूण खर्चापैकी ६० टक्के हिस्सा केंद्राचा तर ४० टक्के हिस्सा राज्य सरकारचा असेल, असेही म्हटले जाते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विमा तीन पद्धतीचा असेल. पहिली योजना ही गरिबी रेषेखाली व्यक्तींसाठी असेल. याला कल्याण योजना असे नाव दिले जाईल. दुसरी योजना ही ज्यांना २ लाख रूपयापर्यंत उत्पन्न आहे त्यांच्यासाठी असेल. तिला सौभाग्य योजना नाव असेल. त्याचबरोबर २ लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या सर्व वर्गासाठी सर्वोदय योजना आणली जाऊ शकते, असे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले आहे. यामध्ये अधिक उत्पन्न असलेल्यांकडून प्रीमियम घेतला जाईल. पण त्याची रक्कम किरकोळ स्वरूपाची असेल. अर्थ मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंतर्गत सर्व्हेक्षणानुसार देशातील सुमारे ७० टक्के लोकांकडे आरोग्य विमा नाही. त्यामुळे आजारी पडल्यानंतर त्यांच्याकडे उपचारासाठी पैशांची कमतरता भासते. तो मुद्दा विचारात घेत प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमातंर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

...Read More

V. S. News
सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल!

व्हीएस न्यूज - भाजप-शिवसेना सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल यात्रा सुरु झाली आहे. तुळजापूरच्या आई भवानीचा आशीर्वाद घेत आजपासून मराठवाडयात हल्लाबोल यात्रेला प्रारंभ झाला. विदर्भात १५५ किलोमीटरची यवतमाळ ते नागपूर अशी सरकारविरोधी हल्लाबोल पदयात्रा काढल्यानंतर आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मराठवाडयावर लक्ष केंद्रीत करत इथल्या समस्या सोडविण्यामध्ये सरकारच्याविरोधात हल्लाबोल यात्रेचे आयोजन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार राणा जगजितसिंग पाटील आदींसह मराठवाडयातील सर्व आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

तुळजापुरात भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असून त्यानंतर भव्य सभा होणार आहे. या सभेनंतर संध्याकाळी उमरगा येथे जाहीर सभा होणार आहे. मराठवाड्यात ८ जिल्ह्यात २७ तालुक्यात जवळपास १८०० किलोमीटरचा प्रवास होणार असून १० दिवसात २७ जाहीर सभा , मोर्चे, भेटी असा कार्यक्रम आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ३ फेब्रुवारीला औरंगाबाद शहरात शेवटची जाहीर सभा होणार आहे.

अशी असेल हल्लाबोल यात्रा….

दिनांक १७ जानेवारी: सकाळी ११ वाजता भूम, दुपारी ४ वाजता पाटोदा,सायंकाळी ७ वाजता बीड.

१८ जानेवारी: सकाळी ११ वाजता गेवराई, दुपारी ३ वाजता माजलगाव, सायंकाळी ७ वाजता अंबाजोगाई.

१९ जानेवारी: सकाळी ११ वाजता औसा, दुपारी ४ वाजता उदगीर, सायंकाळी ७ वाजता अहमदपूर.

२० जानेवारी: सकाळी ११ वाजता लोहा, दुपारी ३ वाजता गंगाखेड, सायंकाळी ७ वाजता परळी.

२१ जानेवारी: दुपारी १ वाजता उमरी, सायंकाळी ५ वाजता माहुर.

२२ जानेवारी: सकाळी ११ वाजता हिंगोली, दुपारी ४ वाजता वसमत, सायंकाळी ७ वाजता परभणी.

२३ जानेवारी: सकाळी ११ वाजता पाथरी, दुपारी ४ वाजता सेलू, सायंकाळी ७ वाजता मंठा.

२४ जानेवारी: सकाळी ११ वाजता जाफराबाद, दुपारी ३ वाजता घनसावंगी, सायंकाळी ७ वाजता बदनापूर.

...Read More

V. S. News
सज्ञान मुला-मुली मर्जीनुसार लग्न करू शकतात - सुप्रीम कोर्ट

व्हीएस न्यूज - सज्ञान मुलगा आणि मुलगी त्यांच्या मर्जीनुसार लग्न करु शकतात. आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलामुलींवर खाप पंचायत किंवा समाजाकडून कोणतेही निर्बंध नकोत, असेही सुप्रीम कोर्टाने सांगितले. केंद्र सरकारने खाप पंचायतीवर बंदी घातली नाही तर न्यायालय यात हस्तक्षेप करेल, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

खाप पंचायतींविरोधात सुप्रीम कोर्टात समाजसेवी संघटनांकडून याचिका दाखल झाल्या आहेत. याबाबत मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने खाप पंचायतींविरोधात कठोर भूमिका घेत केंद्र सरकारला फटकारले. केंद्र सरकारच्यावतीने अॅडिशनल सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी बाजू मांडली. महिलांचा सन्मान राखला जावा, अशी केंद्र सरकारचीही भूमिका आहे. अॅँटी ऑनर किलिंग विधेयक संसदेत प्रलंबित आहे, असे त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले.

न्यायालय मित्र म्हणून नियुक्त केलेले राजू रामचंद्रन यांनी सांगितले की, विधी आयोगाने आंतरजातीय विवाह करणाऱ्या युगुलांचे रक्षण करण्याबाबत कायदा तयार करण्याची शिफारस केली आहे. मात्र राज्य सरकारने केलेल्या सूचनांकडे केंद्र सरकार गांभीर्याने पाहात नाहीये असेच चित्र आहे, असा दावा त्यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला धारेवर धरले. न्यायालय मित्रांनी जे सांगितले त्याच्याशी आम्हाला घेणे-देणे नाही. एखादा सज्ञान मुलगा आणि मुलगी लग्न करतात, त्यावेळी त्यांना कोणतीही व्यक्ती, खाप पंचायत किंवा समाज रोखू शकत नाही तसेच त्यांना जाबही विचारु शकत नाही. एखाद्या मुलगा किंवा मुलीवरील हल्ला हे बेकायदा कृत्यच असते, असे कोर्टाने नमूद केले. न्यायालय मित्र राजू रामचंद्रन यांच्या शिफारशींवर काय केले, याबाबत केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. आता या प्रकरणाची सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

...Read More

V. S. News
अशोक सावंत यांची हत्या वैयक्तिक वैमनस्यातून

व्हीएस न्यूज – शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येमागे वैयक्तिक दुश्मनी, आर्थिक व्यवहारातील फायदे घेण्यावरून वाद आदी कारणे असल्याचे समोर येत आहे. सावंत हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार अनिल वाघमारे याला समतानगर पोलिसांनी अटक केल्यानंतर या हत्येमागील कारणे उघड झाली आहेत. सावंत यांच्या हत्येची तयारी अनेक महिन्यांपासूनच सुरू करण्यात आली होती. अखेर रविवारी, ७ जानेवारी रोजी त्यांची हत्या करण्यात आली.

कांदिवली पूर्व येथील समतानगर परिसरात राहणारा अनिल वाघमारे हा माहिती अधिकार कार्यकर्ता असून तो स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गही चालवितो. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीचा तो गैरवापरही करीत असे. अशा काही माहितीच्या आधारे आर्थिक फायदा होणे अपेक्षित असणा-या ठिकाणी सावंत यांनी त्याला विरोध केला होता. आपला आर्थिक तोटा होत असल्याचा राग वाघमारेला होता. तसेच, वाघमारेकडून काही ठिकाणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाला असता सावंत यांनी त्याला विरोध केला होता. सावंत यांच्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचा राग वाघमारे याच्या मनात खदखदत होता.

सावंत यांच्यासोबत असणा-या जगदीश पवार या अन्य आरोपीलाही पैशांची गरज होती. सावंत यांनी त्याला बाजूला केले होते. केबल व्यवसायात असणा-या सावंत यांच्याकडे हजार-दीड हजार केबल्स होत्या. या केबल व्यवसायात सहभागी करावे, असा पवार याने सावंत यांच्याजवळ आग्रह धरला होता. मात्र सावंत यांनी त्याला नकार दिल्याने पवारच्या मनात राग धुमसत होता. यातून या दोघांनी एकत्र येत हा कट रचला, असे पोलिसांनी सांगितले.

सावंत यांच्या हत्येत सहभागी असलेल्या पुण्यातील अल्पवयीन तरुणाचे गुन्हेगारी जगतात नाव कमावण्याचे स्वप्न आहे. पुण्यात राहणारा हा तरुण चरसी म्हणूनच कुख्यात असून तीन ते चार महिन्यांपासून तो या हत्येचा कट रचणा-या टोळीशी जवळीक साधून होता. घरची स्थिती सामान्य असलेल्या या तरुणाला जगदीश पवार आणि साथीदारांनी हेरले होते. अल्पवयीन असल्याने तुला फारसा त्रास होणार नाही, मग तू मोठा गँगस्टर होशील, अशी फूस त्याला लावली होती. सावंत यांच्या हत्येनंतर या अल्पवयीन आरोपीने दुस-या दिवशी नेहमीप्रमाणे महाविद्यालयातील वर्गात हजेरी लावल्याचेही समोर आले आहे. त्याची रवानगी सध्या बालसुधारगृहात झाली आहे.

...Read More

V. S. News
‘एसी’साठी प्रवाशांना आकर्षित करण्याची मोहीम

व्हीएस न्यूज- पश्चिम रेल्वेवर नव्यानेच सुरू झालेल्या वातानुकूलित (एसी) लोकलमध्ये सध्याच्या लोकलप्रमाणे पहिल्या आणि दुस-या श्रेणीचे डबे देण्याची सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या कमी असल्याने त्यात वाढ करण्यासाठी नवनवीन उपाय सुचविले जात आहेत. त्याचप्रमाणे एसीचे दरही प्रवाशांना परवडण्यासारखे असावेत, अशीही मुख्य सूचना पुढे आली आहे.

एसी लोकल विरापर्यंत विस्तारित केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा केला जात होता. मात्र एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या अल्प असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर गोयल यांनी एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी दरांमधील बदलांवरही भर दिला आहे. गोयल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी विविध रेल्वे प्रकल्पांबाबत शुक्रवारी चर्चा केली.

त्यापूर्वी मध्य, पश्चिम रेल्वेसह मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) अधिका-यांशीही त्यांनी संवाद साधला. त्यावेळी लोकलमध्ये एसीचा डबा उपलब्ध करण्याचा पर्यायही विचारात घ्यावा, अशी सूचनाही केली. पश्चिम रेल्वेने एसी लोकलविषयी प्रवाशांची मते मागवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रवासी पश्चिम रेल्वेच्या संकेतस्थळावर((http://www.wr.indianrailway.gov.in) वा सबमिट लिंकच्या आधारे सूचना करू शकतात. त्यासाठी प्रवाशांना नाव, इमेल, संपर्क, सूचना आदी माहिती द्यायची आहे.
...Read More

V. S. News
नोक-या मागणारे नव्हे, तर रोजगार देणारे बना!

राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांचे तरुणांना आवाहन

व्हीएस न्यूज – औद्योगिक संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांनी खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे. नोकरी मिळत नाही म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो, अशी अगतिकता असू नये; तर नोकरीतल्या संधी भलेही सोडेन पण, मी स्वत: रोजगार निर्माता होईन. नोकरी मागणारा नाही, तर नोकरी देणारा होईन, असा निर्धार तरुणांनी करावा, असे आवाहन देशाचे राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.

उत्तन (जि. ठाणे) येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आर्थिक जनतंत्र परिषद (इकॉनॉमिक डेमोक्रॅसी कॉन्क्लेव्ह)चे उद्घाटन करताना ते बोलत होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या नॉलेज एक्सलन्स सेंटर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, राज्यपाल डॉ. चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय अर्थ राज्य मंत्री शिवप्रताप शुक्ला, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार यांचीही उपस्थिती होती. राष्ट्रपती पुढे म्हणाले की, समाजातील काही वंचित आणि शोषित युवक रिफायनरी, रुग्णालय, हॉटेल्स अशा व्यवसायांमध्ये स्वत:ला सिद्ध करून यशस्वी होत आहेत. ‘डिक्की’सारखी संस्था त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करीत असल्याबद्धल राष्ट्रपतींनी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांचे कौतुक केले.

आर्थिक जनतंत्रात बँकांची भूमिकाही महत्वाची असून पंतप्रधान मोदी यांनी जनधन योजना आणल्यामुळे ३० कोटीहून अधिक लोकांनी बचत खाती उघडली, ज्यात ५० टक्के महिला आहेत. ‘डायरेक्ट बँक ट्रान्सफर’मुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आणि अशा खात्यांमध्ये विविध लाभांचे पैसे थेट जमा होऊ लागले, असे सांगून राष्ट्रपती म्हणाले की, विशेषत: महिलांनी आता केवळ बचत करण्याची प्रवृत्ती सोडून गुंतवणूक करायला शिकले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुलत: एक अतिशय विद्वान असे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्याच सूचनेप्रमाणे भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेची स्थापना झाली होती. तसेच त्याकाळी त्यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याची टेंडर्स ही दुर्बल आणि वंचित घटकाला मिळाली पाहिजे अशी भूमिका घेतली होती, असेही राष्ट्रपती म्हणाले. ठाणे, पालघर, मुंबई हा भाग ऐतिहासिक काळापासून व्यापार उदिमासाठी प्रसिद्ध आहे. वडा पाव विक्रेत्यापासुन ते मोठमोठे उद्योगपती याठिकाणी सक्रीय आहेत. येथे असलेल्या अनेक संधींचा फायदा युवकांनी घ्यावा आणि आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हावे असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले.

...Read More

V. S. News
२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर हाय अ‍ॅलर्ट!

व्हीएस न्यूज- – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर २६ जानेवारी रोजी अतिरेकी हल्ल्याच्या शक्यता लक्षात घेऊन दिल्लीसह संपूर्ण देशात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीतील जामा मशीद परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यामुळे हा हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी २६ जानेवारीच्या हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या आरोपाखाली बिलाल अहमद कावा याला अटक केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे.

देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा सुरक्षा विषयक आढावा घेत असतात. सुरक्षेशी संबंधित प्रत्येक विभाग आपापल्यापरीने गुप्तरीत्या माहिती काढत असतो. त्याचा आढावा सर्व यंत्रणांचे प्रमुख घेत असतात. या आढाव्यामधूनही अतिरेकी हल्ल्याची शक्यता पुढे आली आहे. त्यावरून जामा मशीद परिसरात तीन संशयित लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. हे संशयित दहशतवादी मोठय़ा घातपाताच्या तयारीत असून ते अफगाणिस्तानचे असल्याचेही गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. काश्मीरच्या पुलवामामधून त्यांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाला कोणतीही वाईट घटना घडू नये या दृष्टीने हा हाय अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांसह इतर तपास यंत्रणाही या घटनेकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.
प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये राजपथावर मोठय़ा कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. यामध्ये भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे क्षेपणास्त्रे यांच्याबरोबर संचलन करतात. राष्ट्रपतींना तिन्ही सैन्यदलांकडून मानवंदना दिली जाते. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यामुळे दिल्लीत कोणतीही अघटित घटना घडू नये, या दृष्टीने हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

...Read More

V. S. News
पाक परराष्ट्रमंत्र्यांची भारतावर अणू हल्ला करण्याची धमकी

व्हीएस न्यूज- भारतावर अणू हल्ला करण्याची धमकी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी दिली. ख्वाजा यांनी भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या वक्तव्यानंतर अणू हल्ल्याची भाषा करत प्रत्युत्तर दिले.

अत्यंत बेजबाबदार वक्तव्य ”भारताचे लष्करप्रमुख रावत यांनी केले, भारताची जर अणू हल्ल्याची इच्छा असेल तर त्यांचे आम्ही स्वागत करतो, असे ते म्हणाले. आम्ही पाकिस्तानच्या ‘न्युक्लिअर ब्ल्फ’ आणि सीमा रेषा पार करण्यासाठी तयार आहोत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी याबाबत टि्वट करून सांगितले, की भारतीय लष्करप्रमुखांकडून करण्यात आलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. आम्ही कोणताही मुद्दा सध्या सौम्यरितीने घेत नाही. कोणतीही अडचण कोणत्याही चुकीच्या आधारावर व्हायला नको. तसेच पाकिस्तान स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वत:ला वाचवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे.

...Read More

V. S. News
‘पद्मावत’चे नवे पोस्टर रिलीज

व्हीएस न्यूज - अनेक वादात सापडलेल्या ‘पद्मावत’चे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ट्विटरवर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी नवीन पोस्टर शेअर केले आहे. कुठल्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीचा फोटो या पोस्टरवर टाकण्यात आलेला नाही. प्रदर्शनापूर्वीपासूनच पद्मावत हा चित्रपट वादग्रस्त ठरला होता. करणी सेनेने सुरुवातीला केलेला विरोध, त्यानंतर सेन्सॉर बोर्डाची नाराजी, अशा विविध घटनांमुळे चित्रपट कात्रीत सापडला होता. चित्रपटाच्या वादामुळे निर्मात्यांना याची प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकलावी लागली होती. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले बदल केल्यानंतर मोकळा झाला होता. आता हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्याच धर्तीवर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ट्विटरवर नवे पोस्टर रिलीज केले आहे.

...Read More

V. S. News
आता अवघ्या एका क्लिकवर मिळणार महिनाभर जुने कॉल डिटेल्सही

व्हीएस न्यूज- मोबाईलमधील जुने कॉल डिटेल्स जर तुम्हाला बघायचे असतील तर ते वेळीच शोधणे आणि मिळवणे खूप कठीण काम आहे. आता मोबाईलमध्ये जुने कॉल डिटेल्स शोधायचे असतील तर ही प्रक्रिया सोप्पी होण्याची शक्यता आहे. कारण आता एका अ‍ॅपमुळे जुने कॉल डिटेल्स शोधणे सहज शक्य होणार आहे.
तुम्हाला ७-३० दिवस जुने कॉल डिटेल्स या अ‍ॅपमुळे शोधणे शक्य होणार आहे. तुम्हाला पीडीएफ फाईलच्या स्वरूपात डिटेल्स मिळतील. जो इमेल अ‍ॅपमध्ये तुम्ही द्याल त्याच इमेल आयडीवर कॉल डिटेल्स दिले जातात. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरमध्ये मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. तुम्हाला अवघ्या दोन मिनिटांत परवानगी मिळताच कॉल डिटेल्सही मिळतील. हे अ‍ॅप फोनमध्ये इंस्टॉल केल्यानंतर ज्या क्रमाकांचे तुम्हाला कॉल डिटेल्स हवेत तो नंबर एन्टर करा. काही प्रायव्हसी डिटेल्स घेतल्यानंतर त्यामध्ये तारीख, क्रमांक, कॉल ड्युरेशन यासारखे डिटेल्स दिले जातात. त्यामुळे युजर्सना ७-३० दिवसांपर्यतचे कॉल डिटेल्स मिळतात. mubble app नावाचे हे फ्री अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आहे. ४.४९ एमबीच्या अ‍ॅपला Recharge Plans & Prepaid Bill या नावानेही ओळखले जाते. ४.२ पेक्षा अधिकच्या अ‍ॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काम करते. अ‍ॅप डेव्हलपरच्या दाव्यानुसार एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, बीएसएनएल, एअरसेल, रिलायन्स जिओ, डोकोमोशिवाय इतरही टेलिकॉम कंपन्याच्या क्रमांकांचे डिटेल्स काढले जाऊ शकतात.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!