Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
विराटला माहीच्या टीम मध्ये जागा नाही

व्हीएस न्यूज : आपली प्लेईंग ११ टीम भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने घोषित केली आहे. भारताच्या ३ खेळाडूंना या टीममध्ये जागा मिळाली आहे. शिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या ३ खेळाडूंना या टीममध्ये जागा दिली गेली आहे. भारताच्या सेहवाग, सचिन आणि युवराजला या संघात धोनीने स्थान दिले आहे.
विराटला माहीच्या या टीम मध्ये जागा मिळाली नाही. धोनी आणि कोहली या दोघांमध्ये क्रिकेटच्या मैदानात चांगले संबंध आहे. पण धोनीने टीममध्ये कोहलीला जागा न देणे हे क्रिकेट चाहत्यांच्या समजण्यापलीकडे आहे.
अशी आहे धोनीची ऑल टाईम प्लेइंग टीम
1.वीरेन्द्र सेहवाग (भारत)
2.एलिस्टर कुक (इंग्लंड)
3.हाशिम अमला (दक्षिण आफ्रिका)
4.रिकी पोटिंग (कर्णधार) ( ऑस्ट्रेलिया)
5.सचिन तेंडूलकर (भारत)
6.युवराज सिंह (भारत)
7.एडम गिलख्रिस्त (विकेटकीपर) (ऑस्ट्रेलिया)
8.बेन स्टोक्स (इंग्लंड)
9.शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
10.कर्टली एम्ब्रोस (वेस्टइंडीज)
11.जिम्मी एंडरसन (इंग्लंड)

...Read More

V. S. News
इस्त्राईलच्या पंतप्रधानांनी मोदींसाठी आणली भेटवस्तू


व्हीएस न्यूज : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आजपासून भारत दौर्‍यावर आले आहेत. मोदींसाठी खास गिफ्ट बेंजामिन आणणार आहेत. मोदी गेल्यावर्षी इस्त्राईल दौर्‍यावर असताना त्यांना मोबाईल वॉटर प्युरिफिकेशन जीप आवडली होती. नेतन्याहू इस्त्राईलमध्ये ओल्गा बीचवर ड्राईव्हही केली होती. हीच मोबाईल वॉटर प्युरिफिकेशन जीप आता मोदींना भेट म्हणून मिळणार आहे.
ही जीप भूकंप, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान फार महत्त्वाची मदत करणार आहे. ही जीप एका दिवसात २० हजार लीटर समुद्री पाण्यात आणि ८० लीटर दूषित पाण्यात काम करू शकते. भारतात पंजाबमध्ये अनेक दुर्गम भागात पाणी वेळीच पोहचवण्यासाठी या जीपचा फायदा होणार आहे.
...Read More

V. S. News
एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन अंतर्गत पाच समित्यांची स्थापना

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन फोरम अंतर्गत सुक्ष्म, लघु, उद्योजक समिती, मध्यम उद्योजक, बॅंकिंक आणि करकायदे समिती, लेबर वेलफेर, औद्योगिक कायदे समिती अशा पाच समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व समित्यांची स्वतंत्र अध्यक्ष व कार्यकारिणीही फोरमतर्फे जाहीर करण्यात आली आहे.

सुक्ष्म, लघु, उद्योजक समितीची कार्यकारणी पुढीलप्रमाणे ः जयंत कड (अध्यक्ष), गोडगे-पाटील, सुनिल गोसावी, नितीन गहाणी, प्रमोद राणे, मिलिंद जोशी (सर्व सदस्य).

मध्यम उद्योजक समिती ः योगेश बाबर (अध्यक्ष), पी. के. सावंत, विनोद बन्सल, सुनिल बन्सल, प्रेमचंद आर. मित्तल, लाला जैन (सर्व सदस्य).

बॅंकिंग आणि करकायदे समिती ः विनोद बन्सल (अध्यक्ष), ऍड. आप्पासाहेब शिंदे, संजय ववले, मिलिंद जोशी, रोहिर बोरा, नितीन कोंढाळकर (सर्व सदस्य).

लेबर वेलफेर समिती ः रंगनाथ गोडगे-पाटील, विनोद पटकोटवार, विनोद बन्सल, संदीप लखानी, प्रेमचंद आर. मित्तल, संजय राऊत (सर्व सदस्य).

औद्योगिक कायदे समिती ः नितीन बनकर (अध्यक्ष), ऍड. आप्पासाहेब शिंदे, विनोद पटकोटवार, संजय सातव, नितीन गहाणी, रंगनाथ गोडगे-पाटील (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे.

...Read More

V. S. News
जिजाऊंचे संस्कार व शिवरायांच्या विचारांची गरज

व्हीएस न्यूज - समाजात माता जिजाऊ यांचे कुठेतरी संस्कार हरवत असल्याने आजचा तरुण व्यसनाधीन बनत चालला आहे.म्हणून समाजाला राजमाता जिजाउंचे संस्कार तर छत्रपती शिवाजी महराजांच्या विचारांची आज गरज आहे, असे उद्‌गार शिवव्याख्यात्या अर्चना भोर- कारंडे यांनी काढले.

स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत "गरज जिजाऊंच्या संस्काराची- छत्रपतींच्या विचारांची" या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेविका व माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक अजय सायकर, उद्योजक संदीप नेवाळे, वास्तुविशारद कवि राजेंद्र कोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे आदी उपस्थित होते.

भोर पुढे म्हणल्या कि, शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. शाहू महाराज 18 व्या वर्षी सिंहासनावर विराजमान झाले. महात्मा फुले यांनी वयाच्या 21 व्या वर्षी शाळा सुरू केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वयाच्या 28 व्या वर्षी संविधान लिहिले. भगतसिंग हे 21 व्या वर्षी हसतमुखाने फासावर गेले. या सर्व युगपुरुषांनी अल्प वयातच कारकिर्द गाजवली. आजचे तरूण 30 ओलांडली तरी आईवडिलांच्या जीवावर बसून खातात. काही उनाडक्या करीत फिरतात. काही तरुण शिवरायांसारखे दिसावे म्हणून दाढी वाढवून, कपाळावर चंद्रकोर लावून स्वतःला मिरवतात. तरुणांनी शिवरायांचा एकतरी विचार आत्मसात केला तरी समाजात परिवर्तन होईल.

महाराष्ट्रात बलात्काराचे प्रमाण वाढले. कारण आपल्या घरातील जिजाऊ संस्कार देण्यात कमी पडत आहे. आज आपण महापुरुषांना जाती धर्मात वाटून घेतलेच. त्याचबरोबर निसर्गाने दिलेले रंग देखील आपण वाटून घेतले. महापुरुषांनी आपल्याला दिले काय? अन्‌ आपण घेतले काय? शिवराज व भिमराय समजले असते तर त्यांनी जातीच्या नावावर दंगली घडून आणल्या नसत्या. सुत्रसंचालन संतोष ठाकुर यांनी तर उल्हास तापकिर यांनी आभार मानले.

...Read More

V. S. News
पतंगाचा मांजामुळे ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्याला दुखापत

व्हीएस न्यूज - पतंगाच्या मांज्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्याला दुखापत झाली आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी सहा वाजता काळेवाडी येथे घडली आहे. तीन दिवसापुर्वी नातेवाईकाबरोबर दुचाकीवरून जाणाऱ्या एका दोन वर्षीय मुलाच्या डोळ्याला मांज्यामुळे गंभीर जखम झाली होती. त्यामुळे पतंगाचा मांजा जीवघेणा ठरत आहे.

रंगनाथ बाळकृष्ण भुजबळ (रा. ज्योतिबा नगर काळेवाडी), असे जखमी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. भुजबळ गुरूवारी सायंकाळी काळेवाडीतील तापकीर चौकातून दुचाकीवरून जात होते. अचानक पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला गुंडाळला गेला. मांजा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता हाताच्या अंगठ्यालाही जखम झाली. गळ्यालाही जबर जखम झाली. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी काळेवाडीतच हमजा खान या दोन वर्षाच्या मूलाच्या पतंगाच्या मांज्यामुळे जबर जखम झाली होती. यामध्ये त्याच्या डोळ्याला तब्बल 32 टाके पडले आहेत.

मांजा ठरतोय जीवघेणा

मकरसंक्रात हा सण उद्या (रविवार) आहे. यानिमित्त शहरातील विविध भागात लहान मुले पतंग उडवत आहेत. या पतंगाचा मांजा नायलॉनच्या धागा असतो. त्यामुळे नागरिकांनाही यापासून मोठी इजा होत आहे. पतंगाचा माजा सर्वाधिकपक्षांसाठी घातक ठरत असून यामुळे अनेक पक्षांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.

...Read More

V. S. News
…आता केस राहिलेत तरी किती - अजित पवार

व्हीएस न्यूज - आपल्या रांगड्या स्वभावासाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार प्रसिद्ध असून पुन्हा एकदा याची प्रचिती बारामतीच्या कार्यक्रमात आली. यावेळी अजित पवारांनी फेटा फारसा न बांधण्यामागील रहस्य सांगितले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

तुम्हाला माहित आहे कि मी तर कधी फेटा बांधत नाही. पण मलाही तुम्ही फेटा बांधल्यावर राहवले नाही, म्हटले बांध बाबा, आता काय करु? कारण फेटा बांधायला आता केस पण राहिले नाहीत की काय, सगळे केस गेले, तुमच्यासाठी काम करता करता माझे केस पण गेले. मी सुनेत्राला म्हणत असतो आता माझे केस बारामतीकरांकरता गेले, का तुझ्यामुळे गेले बघ आता.

बारामतींसाठी केलेल्या कामाचा बोजा आणि पत्नीच्या त्रासाशी केस गळतीचा संबंध अजित पवारांनी जोडला. उपस्थितांची अजित पवारांचे बिनधास्त वक्तव्य ऐकून हसूनहसून पुरेवाट झाली.

...Read More

V. S. News
सुरेश रैनाला धोनीनंतरची जबाबदारी

व्हीएस न्यूज - महेंद्र सिंह धोनी आयपीएलच्या ११व्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) टीमचा कर्णधार असणार आहे. तर उपकर्णधारची देखील निवड केली असल्याचा खुलासा सुरेश रैनाने केला आहे. गेल्या २ वर्षापासून रैना गुजरात लायंस टीमचा भाग होता. गुजरात लायंसचा तो कर्णधार होता. धोनी आणि जडेजाला ११ व्या सीजनसाठी फ्रेंचायजीने रिटेन केले आहे. पहिल्या सीजनपासून आठव्या सीजनपर्यंत धोनी टीमचा कर्णधार होता. यंदा देखील त्यालाच कर्णधार बनवले जाण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे पुन्हा एकदा रैनाला धोनीनंतरची जबाबदारी मॅनेजमेंटने सोपवली आहे.

धोनी जर अनफिट असला तर रैना कर्णधार असेल. सीएसके २ वर्षाच्या बंदीनंतर पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. २७ आणि २८ जानेवारीला होणाऱ्या लिलावावर आता सगळ्यांची नजर असणार आहे. रैनाने म्हटले आहे की, टीमचा कर्णधार धोनी असेल तर मी उपकर्णधार. एक ऑलराउंडर म्हणून जडेजा टीममध्ये असेल. यानंतर आता आमची नजर लिलावावर आहे. लवकरच आम्ही बैठक घेणार आहोत. त्यानंतर लिलावाची तयारी करु.

...Read More

V. S. News
५० दिवसांत हटवा राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्ज : उच्च न्यायालय

व्हीएस न्यूज - पुढील ५० दिवसांत राज्यभरातील सर्व बेकायदेशीर होर्डिंग्ज, पोस्टर्स हटवा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरातील पालिका प्रशासन आणि राज्य सरकारला दिले आहेत. जानेवारी अखेरीस ही मुदत संपत होती, पण ही मुदत प्रशासनाच्या विनंतीवरून २३ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली.

मुंबईत प्रत्येक वॉर्डनुसार या कामाकरता दररोज दोन सशस्त्र पोलीस अधिकारी देण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. तसेच या कामावर इतर ठिकाणीही एसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी देखरेख ठेवावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेत. यापुढे यासंदर्भात जर सरकारी अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाला, तर उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केल्याबद्दल कारवाईला तयार राहा, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर सुस्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने यासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

यासुनावणी दरम्यान राज्यभरातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या भिंती आणि खांब हे सध्या बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि फलक लावून अथवा रंगाने लिहून विद्रुप केल्या जातात. राजकिय पक्षांचा आणि त्यांच्या नेत्यांचा ज्यात प्रामुख्याने समावेश असतो असे मत न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. त्यामुळे कुणाचीही हयगय न करता या संदर्भात थेट गुन्हे नोंदवण्याचे आदेश याआधीच उच्च न्यायालयाने दिलेत. या संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी नगरविकास खात्याच्या दोन अधिकाऱ्यांची समिती नेमावी, असे निर्दोशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

...Read More

V. S. News
बँकेकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सेवा बंद होणार नाहीत

व्हीएस न्यूज - सध्या सोशल मीडियावर २० जानेवारीपासून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सेवा बंद होणार असून त्यासाठी पैसे मोजावे लागणार अशा बातम्यांनी धूम उडवली आहे. पण अर्थ मंत्रालयाने ही बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाच्या वतीने सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या या अफवांकडे दुर्लक्ष करावे असे सांगण्यात आले आहे, त्याचबरोबर याबाबत इंडियन बँक असोसिएशननेही स्पष्टीकरण दिले आहे.

अशाच प्रकारे ट्वीटरवर व्हायरल होणाऱ्या एका मॅसेजला रिट्वीट करत अर्थ मंत्रालयाने म्हटले की, २० जानेवारीपासून मोफत सेवा बंद करण्याचा असा कोणताही प्रस्ताव नाही. ही केवळ अफवा आहे. याकडे दुर्लक्ष करा. बँकिंग असोसिएशनला मंत्रालयाने सल्ला दिला की, सोशल मीडियावरील अशा प्रकारच्या मॅसेजवर स्पष्टीकरण द्यावे.

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत एक मॅसेज व्हारल होत होता. त्यात म्हटले होते की, सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये दिल्या जाणाऱ्या मोफत सेवांसाठी २० जानेवारीसाठी शुल्क वसूल केले जाईल. ग्राहकांमध्ये हा मॅसेज व्हायरल झाल्यानंतर बँकांबद्दल संताप निर्माण झाला होता. आधीच मिनिमम बॅलेंन्सच्या नावाखील पैसे कापले जात असताना आता इतर सेवांसाठीही पैसे वसूल करण्याची ही योजना त्रासदायक असल्याचे लोकांचे म्हणणे होते.

...Read More

V. S. News
राजस्थानमध्ये मुलीने विधवा आईचे करून दिले लग्न

व्हीएस न्यूज - मात्र राजस्थानात आपल्या विधवा आईचे लग्न करून देण्यासाठी मुलीने पुढाकार घेतल्याचे उदाहरण पुढे आले आहे. विशेष म्हणजे ही मुलगी स्वतःच उपवर आहे.

राजधानी जयपुर येथील या आगळ्यावेगळ्या लग्नाचा निर्णय व त्याचे आयोजन यांची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. संहिता अग्रवाल असे या मुलीचे नाव आहे. संहिताचे वडील मुकेश गुप्ता यांचे वयाच्या 52 व्या वर्षी 13 मे 2016 अचानक मृत्यू झाला होता. त्यामुळे संहिताची आई गीता नैराश्यात गेल्या होत्या. संहिताच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर घरात केवळ ती व आई हेच राहिले होते. संहिताला नोकरी लागल्यानंतर तिची आई पूर्णपणे एकटी राहिली.

तेव्हा 2016 मध्ये संहिताने एका मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर आईचे प्रोफाईल बनविले. त्यातून गोपाल गुप्ता या 55 वर्षांच्या महसूल अधिकाऱ्याचा प्रस्ताव त्यांना आला. त्यांच्या पत्नीचा एक वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. एका मोठ्या ऑपरेशननंतर त्यांनी रुग्णालयात सेवा केली. त्यांच्या निस्वार्थ सेवेने प्रभावित होऊन संहिताच्या आईने लग्नासाठी होकार भरला. दोघांनीही आपल्या निवडक नातेवाईकांसमक्ष आर्यसमाज मंदिरात लग्न केले. ‘मी केवळ पुढाकार घेतला आहे. तुम्ही साथ दिली तर आपल्याला या देशातील घरांबाहेर हातात जपमाळ ओढणाऱ्या व कोणीतरी बोलण्याची वाट पाहणारे वृद्ध दिसणार नाहीत. ती असहायता संपवायची आहे,’ असे संहिताने आपल्या फेसबुक वॉलवर लिहिले आहे.

...Read More

V. S. News
जाहीरात कमी करण्याचा फेसबुकचा निर्णय

व्हीएस न्यूजफेसबुकवरून आपल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी संधी शोधणाऱ्या कंपन्यांसाठी वाईट बातमी. फेसबुकने आता जाहिरातींऐवजी लोकांना त्यांच्या मित्रमंडळीच्या व कुटुंबियांच्या पोस्टला जास्त दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्ध फेसबुकचा संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याने यंदा फेसबुकमध्ये केल्या जाणाऱ्या बदलांची खुली चर्चा केली आहे.

या बदलांनुसार लोकांच्या मित्र किंवा कुटुंबियांनी शेअर केलेल्या सामग्रीला न्यूज फीडमध्ये अधिक प्राधान्य देणार आहे. तसेच एखाद्या ब्रँड किंवा अन्य पब्लिशर्सच्या सामग्रीला कमी महत्त्व देण्यात येणार आहे. “आतापर्यंत लाईक्स किंवा कॉमेंट्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांना बांधून ठेवणाऱ्या साहित्याला फेसबुक महत्त्व देत होते. मात्र आता कंपनीने हे धोरण बदलण्याचे ठरविले आहे,” असे झुकेरबर्गने सांगितले. मात्र फेसबुकवर प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींवर या बदलांचा कोणताही परिणाम होणार नाही, असे फेसबुकचे उपाध्यक्ष जॉन हेगमॅन यांनी स्पष्ट केले. जगभरातील दोन अब्जपेक्षा जास्त लोक दर महिन्याला फेसबुकचा वापर करत असून हे जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्क आहे.

...Read More

V. S. News
मुकेश अंबानी आणणार जिओ कॉईन्स

व्हीएस न्यूज - रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी लवकरच जगभर लोकप्रिय ठरलेल्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनच्या धर्तीवर जिओ कॉईन्स आणण्याच्या तयारीत असल्याचे बिझनेस न्यूजपेपर मिंट च्या रिपोर्ट मध्ये नमूद केले गेले आहे. या योजनेवर मुकेश यांचा मुलगा आकाश याच्या नेतृत्त्वाखाली ५० युवा सदस्यांची टीम काम करत असल्याचेही सांगितले जात आहे. ही टीम ब्लॅकचेन टेक्नॉलॉजीवर काम करत आहे.

विशेष म्हणजे जगभरात कांही महिन्यांच्या अवधीत रेकॉर्ड ब्रेक किंमत नोंदविणारे बिटकॉईन सध्या घसरणीला लागले असतानाच रिलायन्स कडून क्रिप्टेाकरन्सी सुरू केली जात असल्याची बातमी आली आहे. बिटकॉईनला सर्वाधिक मागणी असलेल्या दक्षिण कोरियाने बिटकॉईन एक्स्चेंजला टाळे ठेाकण्याची तयारी चालविली असून यामुळे बिटकॉईनच्या प्रतिकॉईन १७ हजार डॉलर्सवर गेलेल्या किंमती वेगाने घसरून १२८०० डॉलर्सवर आल्या आहेत.जगभरातील बहुतेक सर्व देशांचे सरकार लोकांचे आकर्षण बनत चाललेल्या क्रिप्टोकरन्सीमुळे सावध झाली आहेत.

भारतात अर्थमंत्री अरूण जेटली व रिझर्व्ह बँकेनेही क्रिप्टेाकरन्सीमधील कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीला सरकार जबाबदार नसल्याचे व हे व्यवहार धोकादायक ठरू शकत असल्याचा इशारा यापूर्वीच वारंवार दिला आहे. तरीही ज्यांना या करन्सीमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी ती स्वतःच्या जबाबदारीवर करावी अशा सूचनांही जारी केल्या गेल्या आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!