Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
तिहार तुरुंगात कैदी आणि कुटुंबीय यांच्यात फुटबॉल सामना

व्हीएस न्यूज - देशातील सर्वात मोठा तुरुंग अशी ख्याती असलेल्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात २८ जानेवारी रोजी कैदी आणि त्यांचे कुटुंबीय याच्या मध्ये फुटबॉल चा सामना होणार आहे. देशात या प्रकारचा प्रयोग प्रथमच केला जात असून कैदी व त्यांचे कुटुंबीय यांना तुरुंगातच सामन्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी कोच नेमला गेला आहे.

तुरुंगाचे अतिरिक्त महानिरीक्षक राजकुमार या संदर्भात म्हणाले जेल मध्ये शिक्षा भोगत असताना कैद्याच्या मनावरही ताण येत असतो. तो दूर करणे हा या मागचा उद्देश आहे. कैदी आपली मुले, वडील, भाऊ यांच्यासोबत सामना खेळतील. त्यासाठी ज्या कैद्यांच्या कुटुंबीयांनी तयारी दाखविली त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक जेल मधील कैद्यांनाहि संधी दिली जाणार आहे. हा सद्भावना सामना आहे व दिल्ली सॉकर असोसीएशन त्यासाठी रात्रंदिवस तयारी करत आहे. हा सामना प्रोफेशनल पातळीवर खेळविला जाणार आहे.


...Read More

V. S. News
विवाहानंतर बदलू जात शकत नाही : सर्वोच्च न्यायालय

व्हीएस न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका सुनावणीदरम्यान आरक्षणासंदर्भात व्यक्तीच्या जातीत बदलत करता येत नाही तसेच ती विवाहानंतरही बदलू शकत नसल्याचे मत नोंदवले आहे. २१ वर्षांपूर्वी केंद्रीय विद्यालयात मागासवर्गीय कोट्यातून सवर्ण समाजातील एक महिला शिक्षिका म्हणू रुजू झाली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिची ही नियुक्ती रद्दबातल ठरवली होती. त्यानंतर तिने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. वरिष्ठ न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीदरम्यान हे मत नोंदवले आहे. ही सुनावणी न्या. अरुण मिश्रा आणि एम. एम. शंतनागौदर यांच्या खंडपीठासमोर झाली. संबंधित महिला ही अगरवाल कुटुंबात जन्मली असून ही जात सर्वसाधारण प्रवर्गात मोडते. पण तिचा पती हा मागासवर्गीय समाजातील असल्याने तिला लग्नानंतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र कसे काय मिळू शकते, हे बेकायदा असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

वीस वर्षांच्या सेवेनंतर सध्या उपप्राचार्य पदावर या प्रकरणातील शिक्षिका कार्यरत होती. पण ही शिक्षिका कथित उच्च जातीत जन्मलेली असताना मागासवर्गीय व्यक्तीबरोबर तिने लग्न केल्यानंतर तिची जात बदलू शकत नसल्यामुळे तिला आरक्षणाचे फायदे घेता येणार नाहीत, अशी तक्रार तिच्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

...Read More

V. S. News
मोदी हे महान देशभक्त : नेतान्याहू

व्हीएस न्यूज - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत भारतासाठी जे चांगले आहे तेच पंतप्रधान मोदी करतात असे सांगताना मोदी हे फक्त भारताचाच विचार करीत असल्याने महान देशभक्त आहेत. असे उद्गार काढले आहेत.
संयुक्त राष्ट्रांद्वारे भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दहशतवादाला आंतरराष्ट्रीय दहशतवाद घोषित केले असल्यामुळे इस्रायलचा भारताच्या या कारवाईला पाठींबा आहे. दहशतवादाविरोधात परस्पर सामंजस्य भारत-इस्रायलदरम्यान असल्याने यापेक्षा वेगळे सांगण्याची गरज नाही. पण एखाद्या विशिष्ट देशाविरोधात इस्रायल नसल्याचेही नेतान्याहू यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले पाकिस्तानचा इस्रायल शत्रू नाही आणि इस्रायलला पाकिस्ताननेही आपला शत्रू समजता कामा नये.
दरम्यान, इस्रायलसोबतच्या मैत्रीवर भारतातील काही लोकांना आक्षेप आहे. याबाबत नेतान्याहू यांना विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे देशभक्त असून प्रत्येक गोष्ट ते देशाच्या हिताचीच करतात. दहशतवादाविरोधात भारताची सुरक्षा, दुग्ध उत्पादनात वाढ आणि भाजीपाला उत्पादनात वाढीबाबत जेव्हा मोदी विचार करतात. तेव्हा ते केवळ याचा विचार करीत नाहीत की यामध्ये इस्रायलचा किती फायदा आहे. तर याचा भारताला किती फायदा आहे याचाच ते विचार करतात. त्यामुळे माझ्या मते मोदी योग्य आहेत.
...Read More

V. S. News
भगतसिंग यांना शौर्य पुरस्कार देण्याची मागणी

व्हीएस न्यूज - भगतसिंह यांना पाकिस्तानातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘निशान-ए-हैदर’ द्यावा आणि त्यांचा पुतळा लाहोरच्या शादमन चौकात स्थापित करण्यात यावा, अशी मागणी पाकिस्तानातील एका संस्थेने केली आहे. भगतसिंग यांनी भारतीय उपखंड मुक्त करण्यासाठी आपले प्राण अर्पण केले होते आणि ते या पुरस्कारासाठी पात्र आहेत, असे संस्थेने म्हटले आहे.
भगतसिंग मेमोरियल फाऊंडेशन असे या संस्थेचे नाव असून न्यायालयात भगतसिंग यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी ही संस्था काम करते. सरकारच्या विरूद्ध कट रचणे आणि ब्रिटिश पोलिस अधिकारी जॉन पी. साँडर्स याला मारण्याच्या आरोपावरून भगतसिंग यांच्यावर राजगुरू व सुखदेव यांच्यासह खटला चालवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ब्रिटीश शासनाने 23 मार्च 1931 रोजी लाहोरमध्ये फाशी दिली होती.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांत शासनाला संस्थेने या संबंधात नव्याने अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे, की “भगतसिंह यांच्यासारखा शूर व्यक्ती उपखंडात कोणीही झाला नाही, अशा शब्दांत पाकिस्तानचे संस्थापक कैद-ए-आझम मोहम्मद अली जिन्ना यांनी या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली होती.” “भगतसिंह हे आमचे नायक आहेत आणि महान पराक्रमी मेजर अझीझ भट्टी यांच्या प्रमाणेच त्यांनाही निशान-ए-हैदर द्यावा,” असे संस्थेने म्हटल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. फाउंडेशनने शादमन चौकाला भगतसिंग यांचे नाव देण्याचीही पुन्हा मागणी केली आहे.
...Read More

V. S. News
सहा लाखांपेक्षा जास्त खरेदी? गुप्तचर खात्याला मिळणार माहिती

व्हिएस न्यूज - दोन लाखांच्या नगदी देवाणघेवाणीवर सरकारने या आधीच बंदी घातली आहे. आता सहा लाखांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करणाऱ्यांवर सरकारी अंकुश लागणार आहे. सहा लाखांपेक्षा जास्त खरेदी केल्यास त्या व्यवहाराची माहिती गुप्तचर खात्याला मिळणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
सरकारची नजर सहा लाखांच्या खरेदीवर असले, त्यात हा व्यवहार काळा पैसा वैध बनविण्यासाठी तर केला जात नाही ना, हे पाहिले जाईल. खासकरून ज्वेलरी किंवा अन्य महागड्या सामानांच्या खरेदीवर कठोर नजर ठेवली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. जगातील बहुतांश देशांत ही पद्धत प्रचलित असून 10 हजार डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 6 लाख 38 हजार 565 रुपयांची सीमा ठरविली आहे. आपल्या देशात सर्वसंमतीने सुमारे सहा लाख रुपयांची मर्यादा घालण्यावर चर्चा चालू आहे. ही व्यवस्था लागू झाल्यानंतर किरकोळ विक्रेत्यांना या मर्यादेपेक्षा अधिक खरेदी झाल्यास फायनांशियल इंटेलिजन्स युनिटला (एफआययू) त्याची माहिती द्यावी लागेल, असे हिंदुस्तान टाईम्सने एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. सरकारने 50 हजारांच्या कोणत्याही व्यवहारावर पॅन क्रमांक आवश्यक करणारा आदेश यापूर्वी काढलेला आहे. तसेच 23 ऑगस्ट 2017 रोजी हिरे व दागिन्यांच्या वितरकांना त्यांच्या व्यवहारांचा अहवाल सरकारला देण्यास सांगितले होते. मात्र ऑक्टोबरमध्ये तो आदेश परत घेण्यात आला होता.
...Read More

V. S. News
सर्वोच्च न्यायालयातील महत्वपूर्ण खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रसारण करा

व्हीएस न्यूज - चार न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केल्यानंतर मोठा वादंग माजला होता. वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रसारण करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिकेव्दारे केली आहे. त्यांनी यासाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाच्या होणाऱ्या थेट प्रक्षेपणाचा दाखला दिला आहे.
खटल्याविषयी अधिकृत माहिती थेट प्रसारणामुळे नागरिकांपर्यंत पोहचेल तसेच होणारे गैरसमज टाळता येतील. तसेच जयसिंग यांनी आपल्या याचिकेत घटनेच्या कलम १९ (१) (अ) नुसार न्यायालयाच्या खटल्यांची माहिती जाणून घेणे हा नागरिकांचा घटनासिद्ध अधिकार असल्याचे नमूद केले आहे.
जयसिंग यांनी आधारची घटनात्मकता, शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश, पारशी महिलांच्या धर्म बदलण्याचा खटला, कलम ३७७ यांचे थेट प्रसारण करण्याची मागणी केली आहे. पण देशाच्या दृष्टीने कोणत्या खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करायचे याचा निर्णय न्यायालयाच्या समितीने करावा, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
...Read More

V. S. News
‘आप’च्या २० आमदार ठरणार अपात्र, निवडणूक आयोगाचा निर्णय

व्हीएस न्यूज - निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिल्लीतील आम आदमी पक्षाला (आप) हादरा दिला असून निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे लाभाच्या पदावर नियुक्ती केलेले २० आमदार अपात्र ठरवण्याची शिफारस केली आहे. राष्ट्रपती निवडणूक आयोगाच्या शिफारशीवर संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षातील भ्रष्टाचार उघड झाला असून मुख्यमंत्रीपदाचा अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.
संसदीय सचिव म्हणून दिल्ली सरकारने ‘आप’च्या २१ आमदारांची नियुक्ती केली होती. याचिकाकर्ते प्रशांत पटेल यांनी या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या आमदारांची संसदीय सचिव म्हणून आमदारांची निवड या उच्च न्यायालयाने रद्द ठरवली होती. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सुनावणी जून २०१७ मध्ये सुरुच राहणार, असे स्पष्ट केले होते. १३ मार्च २०१५ ते ८ सप्टेंबर २०१६ या काळात आप आमदारांनी संसदीय सचिव हे लाभाचे पद भूषवले होते, या निष्कर्षाप्रत निवडणूक आयोग आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. निवडणूक आयोगाने या प्रकरणात राष्ट्रपतींकडे शिफारस केली आहे.
...Read More

V. S. News
‘पद्मावत’ बघण्यात मुस्लिमांनी वेळ वाया घालवू नये – ओवेसी

व्हीएस न्यूज – एमआयएम पक्षाचे नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पद्मावत हा बकवास चित्रपट असून हा चित्रपट बघण्यात मुस्लिमांनी वेळ वाया घालवू नये, असे वक्तव्य केले आहे.
बुधवारी वारंगल येथे असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभा घेतली. ओवेसी यांनी या सभेत ‘पद्मावत’ चित्रपटाबाबत भाष्य केले. पद्मावतसारख्या चित्रपटावर मुस्लिम तरुणांनी वेळ आणि पैसे वाया घालवू नये. हा चित्रपटच बकवास आहे. या वाईट चित्रपटाच्या मागे धावू नका, असे आवाहन त्यांनी केले. तुम्हाला चित्रपट बघण्यासाठी अल्लाहने पृथ्वीवर पाठवलेले नाही. चांगले काम तुम्ही करावे आणि सदैव लक्षात राहिल असे काम तुम्ही केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. पद्मावतसारख्या बकवास चित्रपटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ सदस्यीय समिती नेमली आणि या समितीने काही कट्स सांगितले. या चित्रपटाला ऐतिहासिक आधारच नाही. हा चित्रपट काल्पनिक असून अशा चित्रपटाकडे सरकारने ऐवढे लक्ष द्यावे, हे दुर्दैवच आहे, असा चिमटा त्यांनी काढला. चित्रपटाचा प्रश्न आल्यावर मोदी समिती नेमतात. पण तिहेरी तलाकबाबत मोदींना मुस्लिम नेत्यांशी चर्चादेखील करावीशी वाटत नाही, असा आरोप त्यांनी केला.
मुस्लिमांनी पद्मावती राणीच्या पाठिशी उभे राहणाऱ्या राजपूतांकडून धडा घ्यावा. पद्मावतविरोधात राजपूत एकत्र आले आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला. मुस्लीम कधीही इस्लामिक कायद्यातील बदलांविरोधात एकत्र येऊन उभे राहत नाही, असे ओवेसींनी नमूद केले. प्रवीण तोगडिया हे मुस्लीमविरोधी आहेत. अशा व्यक्तीला काँग्रेस पाठिंबा कसा देऊ शकते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
...Read More

V. S. News
समुद्रातील कठीण मार्ग नौदलाच्या महिलांनी यशस्वीरित्या केला पार

व्हीएस न्यूज - केपहॉर्नला समुद्रमार्गाने जगाची सफर करत असलेल्या भारतीय नौदलातील महिलांची INSV ‘तारिणी’ दाखल झाली असून त्यांनी तेथे भारताचा झेंडा फडकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाविका सागर परिक्रमा या साहसी मोहिमेतील महिलांचे अभिनंदन केले. आयएनएसव्ही तारिणी या देशी बनावटीच्या बोटीतून भारतीय नौदलातील सहा महिला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या साहसी मोहिमेवर मार्गस्थ झाल्या होत्या.
त्यांनी या प्रवासादरम्यान समुद्रातील कठीण समजला जाणारा मार्ग ‘ड्रेक पॅसेज’ यशस्वीरित्या पार केला आहे. त्यांनी फॉकलँड बेटावरील पोर्ट स्टॅन्लेच्या दिशेने पुढे जाताना तिरंगा फडकावला. फ्रेमँटल (ऑस्ट्रेलिया) हा एकूण १६५ दिवसांच्या या प्रवासाचा पहिला टप्पा होता. त्यानंतर त्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये लिटलटन (न्यूझीलँड) हा दुसरा टप्पा गाठला. पोर्ट स्टॅन्लेनंतर आता ते केपटाऊनच्या दिशेने रवाना होणार आहेत. लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी नाविक सागर परिक्रमा या मोहिमेचे सारथ्य करीत आहेत.
...Read More

V. S. News
व्हॉट्सअॅपचे आता स्वतंत्र बिझनेस अॅप

व्हीएस न्यूज - ऑनलाईन छोटे व्यवसाय करणाऱ्यांना फेसबुकमुळे मोठे व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे या व्यवसायांना चांगलीच चालना मिळाली. यामध्ये व्हॉट्सअॅपचा आपल्या ग्राहकांशी संपर्क करण्यासाठी किंवा आपल्या प्रॉडक्टचे फोटो शेअर करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर वापर होतो.
व्हॉट्सअॅप आता याचाच विचार करुन स्वतंत्र बिझनेस अॅप घेऊन येणार आहे. छोटे व्यवसाय करणाऱ्यांना ज्याद्वारे आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. हे अॅप आज (शुक्रवार) इंडोनेशिया, इटली, मॅक्सिको, अमेरिका या देशांमध्ये लाँच होणार असून मात्र भारतात हे अॅप वापरण्यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. हे अॅप अॅपल आणि अॅंड्रोईड दोन्हीवर वापरता येणार आहे.
हे अॅप गुगल प्ले स्टोअरमध्ये विनाशुल्क डाउनलोड करता येणार आहे. हे अॅप छोट्या व्यवसायांचा विचार करुनच तयार करण्यात आले आहे. आपल्या प्रॉडक्टचे वर्गीकरण करणे, ऑटो रिप्लाय यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत ज्याद्वारे ग्राहकांना रिप्लाय करणे यामुळे सोपे होणार आहे.
...Read More

V. S. News
‘पद्मावत’वरुन नंदुरबार पोलिसांची चित्रपटगृहांना नोटीस

व्हीएस न्यूज मोठ्या प्रमाणात अनेक संघटनांनी जिल्ह्यात ‘पद्मावत’ या चित्रपटाला विरोध दर्शवला असून हा चित्रपट नंदुरबार शहरातील चित्रपटगृहात प्रदर्शित केल्यास कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास चित्रपटगृह मालक जबाबदार राहणार, अशा आशयाचे नोटीस नंदुरबार शहर पोलिसांनी चित्रपटगृह मालकांना दिल्या आहेत. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मथुरे यांनी ही माहिती दिली आहे.

येत्या २५ जानेवारीला देशभरात संजय लीला भंसाळी दिग्दर्शित पद्मावत ही चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही संघटनांचा चित्रपटाला प्रखर विरोध आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या पाच दुरुस्त्या करुन अखेर मोकळा झाला आहे.

वास्तविक पाहता सेन्सॉरने परवानगी दिल्यानंतर हा चित्रपट ज्या चित्रपटगृहात दाखवला जाणार चित्रपटगृहात आणि तेथे येणाऱ्या प्रेक्षकांना संरक्षण देणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. चित्रपट प्रदर्शित केल्यास काही अनुचित घडले अन् कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास चित्रपटगृह मालक जबाबदार राहणार, अशा आशयांच्या नोटीस देऊन पोलीस जबाबदारीतून हात झटकू शकत नाहीत, अशी चर्चा सध्या नागरिकांत होत आहे.

...Read More

V. S. News
‘फाशी द्या, पण तडफडत ठेवू नका’

व्हीएस न्यूज - ‘मी निर्दोष आहे. मला पोलिसांनी या गुन्ह्यात गोवले आहे.वाटल्यास मला फाशी द्या, पण तडफडत ठेवू नका…’ सोनई हत्याकांडातील दोषी संदीप कुऱ्हेने न्यायालयात मांडलेली त्याची बाजू. तर दोषींन कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती दोषींच्या वकिलांनी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडाप्रकरणी नाशिकमधील जिल्हा सत्रन्यायालयातील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. या प्रकरणात सहा दोषी असून दोषींच्या वतीने तीन वकिल होते. यातील दोन वकिल गुरुवारी न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित होते. बचावपक्षांच्या दोन्ही वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने वकिल अनुपस्थित असल्याने संदीप कुऱ्हेलाच स्वतःची बाजू मांडण्यास सांगितले.

संदीप कुऱ्हे म्हणाला, मी निर्दोष आहे. मला या गुन्ह्यात अडकवण्यात आले. वाटल्यास मला फाशी द्या, पण तडफडत ठेवू नका. जी शिक्षा आहे ती देऊन टाका. पोलिसांनी मला चुकीच्या गुन्ह्यात फसवले. जवळपास अर्धा तास हा युक्तिवाद झाला. सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. सर्वांनी मिळून कट रचला आणि इतके क्रूरपणे हत्या केली. या भयानक क्रौर्यात सर्वांचा सहभाग होता. त्यामुळे सर्वांना एकसारखीच शिक्षा द्यावी, असे निकम यांनी सांगितले.

घटनाक्रम….

* १ जानेवारी २०१३ च्या सकाळी ११ ते रात्री ८ दरम्यान

* सातही आरोपी अटक केल्यापासून कारागृहातच, त्यांचा जामीनअर्ज उच्च न्यायालयाने वेळोवेळी फेटाळला.

* प्रथम तपास सोनईचे सहायक निरीक्षक पाटील यांच्याकडे, आरोप झाल्याने नंतर श्रीरामपूरचे उपअधीक्षक गांगर्डे यांच्याकडे, एक महिन्याने सीआयडीचे उपअधीक्षक एस. डी. बांगर, उपनिरीक्षक रऊफ शेख, खलिल शेख व रमेश कालंगडे यांच्या पथकाकडे वर्ग.

* २६ मार्च २०१३ रोजी ९८२ पानांचे दोषारोपपत्र दाखल

* खटल्याची सुरुवातीची सुनावणी नेवासे येथील सत्र न्यायालयात नंतर नाशिककडे वर्ग

* खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती

खटल्यात ५३ साक्षीदारांची तपासणी

* १५ जानेवारी २०१८- न्यायालयाने पोपट उर्फ रघूनाथ दरंदले, रमेश दरंदले, प्रकाश दरंदले, गणेश उर्फ प्रवीण दरंदले, संदीप कुल्हे, अशोक नवगिरेला दोषी ठरवले

* १८ जानेवारी २०१८ – शिक्षेबाबत युक्तिवाद पूर्ण

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!