Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
केरळमध्ये ‘दलित’ आणि ‘हरिजन’ शब्दांवर बंदी

व्हीएस न्यूज - केरळ सरकारने ‘दलित’ आणि ‘हरिजन’ या शब्दांच्या वापरावर बंदी आणली आहे. सरकारच्या जनसंपर्क विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. या विभागाने एससी/एसटी आयोगाच्या शिफारशीचा हवाला देत हे परिपत्रक काढले आहे.

जनसंपर्क विभागाने या परिपत्रकाद्वारे सर्व सरकारी प्रकाशन संस्था आणि सरकारच्या प्रचार-प्रसार साहित्यामध्ये ‘दलित’ आणि ‘हरिजन’ हे शब्द वापरता येणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. या परिपत्रकानुसार, ‘दलित’, ‘हरिजन’ या शब्दांऐवजी एससी, एसटी असा शब्दप्रयोग करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार,एससी/एसटी आयोगाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, दलित आणि हरिजन या शब्दांच्या वापरावर बंदीबाबत करण्यात आलेली शिफारस ही आजही समाजात सुरु असलेल्या भेदभावाला नष्ट करण्यासाठी करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे दलित चळवळीतील कार्यकर्त्यांना केरळ सरकारचा हा निर्णय आवडलेला नाही. त्यांचे म्हणणे आहे की,सरकारचा हा निर्णय ते स्वीकारु शकत नाही. कारण दलित शब्द त्यांना सामाजिक आणि राजकीय ओळख देणारा आहे. यासंदर्भात एका दलित आदोलनकर्त्याने सांगितले की,सरकार अशा प्रकारणामध्ये विनाकारण हस्तक्षेप करीत आहे.

...Read More

V. S. News
भारत अमेरिकेचा मोठा खनिज तेल ग्राहक

व्हीएस न्यूज - अमेरिकेने दोन वर्षांपूर्वी त्यांच्या खनिज तेलाची निर्यात जागतिक बाजारपेठेत सुरू केल्यानंतर भारताने आखाती देशांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या हेतून अमेरिकी तेल नमुन्यांच्या चाचण्या देशातील शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये सुरू केल्या आहेत. आगामी काळात भारत अमेरिकी तेलाचा मोठा ग्राहक बनेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भारत आपल्या गरजेपैकी बहुतांश खनिज तेल आयात करतो. त्यात आखाती देश भारताचे पारंपरिक तेल पुरवठादार राहिले आहेत. गेल्या काही वर्षांत भारताने आफ्रिकेतील नायजेरियासारख्या देशांतून तेल आयात करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत तेलाचे मोठे साठे असले तरी अमेरिका जागतिक बाजारात तेल निर्यात करत नव्हती. अमेरिकेने ही निर्यातबंदी २०१५ साली उठवली. त्यानंतर जागतिक बाजारात अमेरिकी तेल मोठय़ा प्रमाणात येऊ लागले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने दिवसाला २० लाख बॅरल तेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत धाडून नवा आठवडी उच्चांक प्रस्थापित केला. त्यात भारताचा वाटा खूपच कमी असला तरी भविष्यात तो वाढण्याचे संकेत आहेत. कोणत्याही नव्या स्रोताकडून खनिज तेल आयात करण्यापूर्वी त्याचे नमुने विकत घेऊन देशातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये तपासले जातात. भारतातील तेल शुद्धीकरण कारखान्यांत सध्या अमेरिकी तेलाचे नमुने तपासण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे.

भारतातील अनेक तेल शुद्धीकरण कारखाने अमेरिकी तेलाच्या चाचण्या घेण्यास उत्सुक आहेत, असे अमेरिकेतील ह्य़ुस्टन येथील एका तेल दलालाने सांगितले. अमेरिकेतील पश्चिम टेक्सास प्रांतातील पर्मियन बेसिन, त्याच्या काहीसे पूर्वेकडील ईगल फोर्ड, अमेरिकी आखातातील मार्स सोअर आणि सदर्न ग्रीन कॅनियन या प्रकारचे तेल भारतात चाचण्यांसाठी आणले जात आहे.

जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत अमेरिकेकडून भारताला तेलपुरवठय़ाबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने अमेरिकी खनिज तेलाच्या आयातीला चालना दिली आहे. मार्च महिन्यापर्यंत भारतातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या तेल कंपन्यांना अमेरिकी तेल आयात करण्याची विशेष परवानगी देण्यात आली. या कंपन्या आखाती देशांच्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अमेरिकी तेलाची आयात वाढवत असल्याचे न्यूयॉर्कमधील कॅपिटल एलएलसी या एनर्जी हेज फंडाचे भागीदार जॉन किल्डफ यांनी सांगितले.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये कंपनी नायजेरियाऐवजी अमेरिकेतून तेल आयात करण्याची शक्यता पडताळून पाहत होती. या कंपनीने सप्टेंबरमध्ये प्रथम अमेरिकी तेल आयात केले. आयकॉन शिपिंगच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरच्या सुरुवातीला २० लाख बॅरेल अमेरिकी तेल भारतात उतरवले गेले. त्यानंतर आणखी ३० लाख बॅरल तेल नोव्हेंबरमध्ये येणे अपेक्षित आहे. ऑगस्टमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अमेरिकेतील ट्रॅफिग्युरा व्यापारी कंपनीकडून प्रत्येकी ९ लाख ५० हजार बॅरल ईगल फोर्ड शेल आणि मार्स क्रूड या प्रकारचे तेल विकत घेतले. या कंपनीने ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतील सदर्न ग्रीन कॅनियन आणि डब्ल्यूटीआय मिडलॅण्ड क्रूड प्रकारचे प्रत्येकी १० लाख बॅरल तेल विकत घेतले. या सरकारी तेल कंपन्यांसह खासगी क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज लि.ने अमेरिकेतून प्रत्येकी १० लाख बॅरल मिडलॅण्ड आणि ईगल फोर्ड प्रकारचे तेल विकत घेतले असून ते नोव्हेंबरमध्ये भारतात दाखल होईल.

...Read More

V. S. News
ताजमहाल सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे पर्यटनस्थळ

व्हीएस न्यूज - गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असलेल्या राजकीय आक्रमणामुळे ताजमहाल सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशची सूत्रे हाती घेतल्यापासून कायमच ताजमहाल ही परकीय राज्यकर्त्यांची निशाणी असल्याचे सांगत या वास्तूला डावलण्याचा प्रकार सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेश सरकारने प्रसिद्ध केलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या मुद्द्यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे.

मात्र, या राजकीय वादामुळे ताजमहालची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली दिसत नाही. सध्याच्या घडीला ताजमहाल हे देशातील सर्वाधिक उत्त्पन्न मिळवून देणारे पर्यटनस्थळ आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या महसुलाच्या आकडेवारीवरून ही बाब सिद्ध झाली आहे. याशिवाय, गेल्यावर्षी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी लोकसभेत सादर केलेली आकडेवारीही ताजमहालची लोकप्रियता स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. ताजमहालात प्रवेश करण्यासाठी शुल्क आकारले जाते. त्यानुसार ताजमहाल देशातील सर्वाधिक उत्त्पन्न मिळवून देणारे पर्यटनस्थळ ठरले आहे. या आकडेवारीनुसार २०१४-१५ मध्ये पर्यटनाच्या माध्यमातून ताजमहालने २१.२३ कोटींची कमाई केली. त्यापाठोपाठ कमाईच्याबाबतीत आग्रा किल्ला ( १०.५८ कोटी), लाल किल्ला (५.९७४ कोटी) , हुमायूनची कबर ( ६.३५५५ कोटी) आणि कुतुबमिनार (१०.२९ कोटी) या पर्यटनस्थळांचा क्रमांक लागतो.

योगी आदित्यनाथ यांनी कालच ताजमहालच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. ताजमहाल कोणी बांधला आणि कोणत्या कारणासाठी बांधला हे महत्त्वाचे नाही. तो भारतीय मजुरांच्या घामातून उभारला गेला, हे महत्त्वाचे आहे. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ताजमहाल महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच ताजमहाल परिसरात सोयीसुविधा पुरवणे आणि पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य आहे, असे त्यांनी म्हटले होते. योगी आदित्यनाथ २६ ऑक्टोबरला आग्र्याला भेट देणार आहेत. त्यावेळी ते ताजमहाललाही भेट देतील.

...Read More

V. S. News
स्मृती इराणींनी वाजविल्या शिट्ट्या

व्हीएस न्यूज - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या आजपर्यंत राजकारणाशिवाय त्यांच्या अभिनय कौशल्यासाठी आणि वक्तृत्व कलेसाठी ओळखल्या जायच्या. मात्र, दिल्लीत मंगळवारी पार पडलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फ‌ॅशन टेक्नॉलॉजीच्या (एनआयएफटी) पदवीदान सोहळ्यात त्यांचे वेगळे रूप पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चक्क शिट्टी वाजवली. बिनधास्तपणे तोंडात बोट घालून जोरदार शिट्ट्या वाजवणाऱ्या स्मृती इराणींना पाहून विद्यार्थ्यांना क्षणभर आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनीही शिट्ट्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला.

एनआयएफटी संस्थेचा पदवीदान सोहळा काल स्मृती इराणी यांच्या हस्ते पार पडला. इराणी यांनी यावेळी विद्यार्थांना पदव्या देऊन नेहमीप्रमाणे औपचारिक भाषण केले. या भाषणात त्यांनी काही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं आवर्जुन कौतुक केलं. एका विद्यार्थ्यानं फॅशनमधील तंगालिया या दुर्मिळ प्रकाराचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. लुप्त होत असलेले हे कलाप्रकार वाचविण्यासाठी आपण पुढे आलात तर मला अभिमान वाटेल, असे इराणी यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
अकरा वर्षीय मुलीचा भूकबळी

व्हीएस न्यूज - सरकारकडून करण्यात येणारी आधार कार्डाची सक्ती कायमच विरोधकांच्या टीकेचा विषय राहिला आहे. झारखंडमधील एका घटनेमुळे हा विरोध आणखीनच धारदार होण्याची शक्यता आहे. येथील सिमडेगा जिल्ह्यातील एका शिधावाटप दुकानात रेशन कार्ड आधारला लिंक न केल्यामुळे कुटुंबाला धान्य नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. २८ सप्टेंबरला ही घटना घडली होती. दुर्देवाची गोष्ट म्हणजे यानंतर त्या कुटुंबातील संतोषी कुमारी या ११ वर्षीय मुलीचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. शेवटच्या क्षणापर्यंत ही मुलगी ‘भात खायला द्या’, अशी विनवणी करत होती. मात्र, घरात धान्यच नसल्यामुळे कुटुंबीयांना तिला काहीच खाऊ घालता आले नाही. परिणामी तिचा मृत्यू झाला. मी रेशनच्या दुकानावर तांदूळ आणायला गेले होते. मात्र, दुकानदाराने तुम्हाला रेशन मिळणार नाही, असे सांगितले. दिवसभर काहीच न खाल्ल्यामुळे माझ्या मुलीचे पोट खूप दुखत होते. २४ तास उलटून गेले तरी माझ्या मुलीच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. अखेर माझ्या मुलीने ‘भात-भात’ म्हणत जीव सोडला, अशी प्रतिक्रिया मृत मुलीची आई कोयली देवी यांनी दिली.

साहजिकच हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनावर टीका होण्यास सुरूवात झाली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित कुटुंबाचे रेशन कार्ड आधारला जोडण्यात आले नव्हते. त्यामुळे हे रेशन कार्ड रद्द करण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना झारखंडचे अन्नपुरवठा मंत्री सरयू राय यांनी म्हटले की, आधार कार्ड नसले तरी लोकांना रेशन द्या, असा स्पष्ट आदेश मी दिला होता. त्यामुळे संबंधितांची ओळख पटवून त्यांना धान्य दिले जाणे अपेक्षित होते. त्यामुळे खरंच आधार कार्डामुळे अडवणूक होऊन कुणाचा मृत्यू झाला असेल तर अधिकाऱ्यांनी याविरूद्ध कडक कारवाई केली पाहिजे, असे सिरया यांनी सांगितले. सरकारने काही महिन्यांपूर्वी शिधावाटप दुकानांमधून आधारकार्ड व ठशांच्या आधारे सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला होता.

...Read More

V. S. News
सरपंच व नगरसेवकांनी मालमत्तेचा तपशील सादर करावा – गोवा लोकायुक्त

व्हीएस न्यूज - गोव्यातील सर्व पंच सदस्य, सरपंच, नगरसेवक आणि जिल्हा पंचायत सदस्य यांना आपल्या मालमत्तेविषयीचा तपशील लोकायुक्तांना यापुढे सादर करावा लागेल. गोव्याच्या लोकायुक्तांकडून त्याविषयीच्या एका याचिकेची दखल घेऊन प्राथमिक प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे.मंत्री व आमदारांप्रमाणेच सरपंच, पंच,नगराध्यक्ष, नगरसेवक यानी लोकायुक्तांना दरवर्षी स्वत:च्या मालमत्तेविषयीचा तपशील सादर करणे बंधनकारक आहे. गोवा लोकायुक्त कायद्यात तशी तरतुद आहे पण नगरसेवक, पंच तसेच जिल्हा पंचायत सदस्यही कधीच या तरतुदीचे पालन करत नाहीत. बहुतांश आमदार व मंत्री स्वत:चा तपशील देत असतात.

आरटीआय कार्यकर्त्यांनी नुकतीच लोकायुक्त पी. के. मिश्रा यांना याचिका सादर केली व गोवाभरातील पंच, नगरसेवक वगैरे मालमत्तेचा अहवाल सादरच करत नाहीत याकडे लोकायुक्तांचे लक्ष वेधले. लोकायुक्तांनी या याचिकेच्या अनुषंगाने नुकतीच पहिली सुनावणी घेतली. याचिकादाराचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले व आता पंचायत संचालक, पालिका प्रशासन संचालक आणि जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याना पत्र लिहिले आहे. गोव्यातील सर्व पंचायती, नगरपालिका आणि जिल्हा पंचायत सदस्यांची नावे व पत्ते असलेली यादी येत्या महिन्यात लोकायुक्तांना सादर करावी, अशी सूचना या पत्रातून करण्यात आली आहे. ती यादी मिळाल्यानंतर लोकायुक्त पुढील भूमिका ठरवणार आहेत.

दरम्यान गोव्यातील ज्या मंत्री व आमदारांनी आपल्या मालमत्तेविषयीचा तपशील सादर केला नव्हता त्यांना लोकायुक्तांकडून दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत येत्या 18 आॅक्टोबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यानंतर अशा आमदारांची नावे सार्वजनिक करण्याची तरतुद लोकायुक्त कायद्यात आहे. लोकायुक्तांनी यापूर्वी याविषयीचा अहवाल राज्यपालांना सादर केला आहे.

...Read More

V. S. News
केरळात सरकारनेच दहशतीचे वातावरण – मनोहर पर्रिकर

व्हीएस न्यूज - केरळात सरकारनेच राजकीय दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे असा आरोप गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला आहे. गोव्यात सध्या भाजपने जन रक्षा यात्रा सुरू केली आहे त्यात सहभागी होण्यासाठी पर्रिकर केरळात आले आहेत.

ते म्हणाले की डाव्या विचारांच्या सरकारने राज्यातील संघ आणि भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करून अनेक हत्या घडवून आणल्या आहेत. देशात एकीकडे मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाचे राजकारण सुरू असताना केरळ मध्ये मात्र दहशतीचे राजकारण सुरू आहे ही बाब अत्यंत घातक आहे. केरळातील सुसंस्कृत आणि सुशिक्षीत लोकांनी राज्य सरकारचे हे दहशतीचे वातावरण झुगारून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. आज या यात्रेत भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर याही सहभागी झाल्या होत्या. भाजपची ही जन रक्षा यात्रा पंधरा दिवसांची आहे. केरळात संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या ज्या हत्या झाल्या आहेत त्याच्या विरोधात ही यात्रा आहे.

...Read More

V. S. News
पुढील २५ वर्ष सातवा वेतन आयोग नाही : दिवाकर रावते

व्हीएस न्यूज - पुढची २५ वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही, असे म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी धुडकावून लावली आहे. शिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केला आहे.

दिवाकर रावते म्हणाले की, “कर्मचाऱ्यांचा संप कामगार न्यायालयाने, औद्योगिक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. तरीही सातव्या वेतन आयोगासाठी त्यांनी संप पुकारला आहे. सातवा वेतन आयोग देण्याची शक्ती महामंडळाची आणखी २५ वर्ष तरी होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. कारण एसटी कायम तोट्यात असते. त्यापलिकडे जाऊन सरकारने सातवा वेतन आयोग द्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि बैठक बोलावली.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मी सातवा वेतन आयोग देऊ शकत नाही, तुम्हालाही देऊ शकत नाही. शिवाय दिवाळीच्या काळात संप पुकारुन लोकांना वेठीला धरु नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.”

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी. जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी,कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी.

...Read More

V. S. News
मुख्यमंत्री फडणवीस यांना नागपूरमध्ये धक्का

व्हीएस न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपूरमध्ये धक्का बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावातच राष्ट्रवादी पुरस्कृत महिला सरपंचपदी विराजमान होत आहे. नागपुरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांना झटका मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात ग्रामपंचायत निवडणूक झाली. राष्ट्रवादीनं पुरस्कृत केलेल्या धनश्री टोमणे सरपंच झाल्या आहेत.

एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपनं जिंकल्या आहेत, तर चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजेतेपद मिळाले. मात्र सरपंचपद भाजपच्या हातून निसटले आहे. काल १८ जिल्ह्यातील जवळपास ४ हजार ११९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झाले. यातील साधारण ३८० ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

...Read More

V. S. News
‘ईफ्फी’साठी सहा मराठी चित्रपटांची निवड

व्हीएस न्यूज गोवा येथे दि. 20 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (ईफ्फी) सहा मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटांमध्ये झाला बोभाटा, पिंपळ, फिरकी, दशक्रीया, हृदयांतर, बंदुक्‍या या सहा चित्रपटांचा समावेश आहे.

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2015 पासून एनएफडीसीच्या फिल्म बाजारमध्ये मराठी चित्रपट सरकारतर्फे पाठविण्यात येत आहे. या महोत्सवात अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक, समीक्षकांनी तसेच चित्रपट रसिकांनी हे चित्रपट पाहिले. त्यामुळे मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहचण्यास मदत झाली. महोत्सवाकरिता चित्रपटांच्या परीक्षणासाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्यामार्फत महोत्सवाकरिता प्राप्त झालेल्या 20 चित्रपटांचे परीक्षण करण्यात आले. या समितीने 6 चित्रपटांची निवड केली.

...Read More

V. S. News
तीन कंपन्यांकडून विनापरवाना कापूस बियाणांची विक्री

व्हीएस न्यूज तृणनाशक जीनचा समावेश असलेल्या बिजी 3 नावाने वेगवेगळ्या कंपन्या कापूस बियाणांची विक्री राज्यात विनापरवाना करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तातडीने प्रतिबंध करण्यासाठी राज्यातील बायोटेक्‍नॉलॉजीस्ट समन्वय समितीची बैठक घेण्याचे आदेश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिले. या बियाण्यांचे सामाजिक, शारिरीक व कृषी क्षेत्रावर होणा-या दुष्परिणामांचा अभ्यास न करता विक्री होत आहे ही गंभीर बाब असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

देशात बिजी 1 आणि बिजी 2 या प्रमाणित बियाणांच्या विक्रीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. मात्र काही कंपन्या वेगवेगळे ब्रॅण्डनेम वापरून तृणनाशक गुणधर्म असलेले बिजी 3 कापसाचे बियाणे परवाना नसताना विक्री करीत आहेत. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा यासारख्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये अशा प्रकारची विक्री होत आहे.केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने काही नमुने तपासल्यावर ते पॉझिटिव्ह आढळून आले आहे. याबाबतची माहिती घेऊन अशा विनापरवाना बियाणे विक्रीवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी बैठक घ्यावी. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्यस्तरीय बायोटेक्‍नॉलॉजी समन्वय समितीची बैठक तातडीने आयोजित करावी, असे आदेश कृषिमंत्र्यांनी विभागाच्या प्रधान सचिवांना दिले.

...Read More

V. S. News
राज्यातील अंगणवाडी केंद्रांना 11 कोटींचा निधी वाटप

व्हीएस न्यूज - एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील 553 ग्रामीण, आदिवासी व नागरी प्रकल्पातील 97 हजार 346 अंगणवाडी केंद्र व 12 हजार 08 मिनी अंगणवाडी केंद्रांना सन 2017-18 या वर्षातील किरकोळ खर्च भागविण्यासाठी 11 कोटी रुपये इतक्‍या परिवर्तनीय निधीचे प्रकल्प स्तरावर वाटप करण्यात आले आहे. प्रकल्पस्तरावरुन संबधित अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांचे बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे, अशी माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कमलाकर फंड यांनी दिली आहे.

या परिवर्तनीय निधीमधून अंगणवाडी सेविका यांना अंगणवाडी केंद्रातील साहित्य दुरुस्ती, झेरॉक्‍स, वजन काट्यांच्या दुरुस्तीचा खर्च, इलेक्‍ट्रॉनिक मशीनच्या बॅटरीचा खर्च,अंगणवाडी केंद्राकरिता अत्यावश्‍यक किरकोळ साहित्य, अंगणवाडीसाठी लागणारे रजिस्टर्स, वही, पेन इ. खर्च या तरतुदीमधून भागविणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. किरकोळ खर्च भागविण्यासाठी परिवर्तनीय निधी, प्रवास खर्च, भत्त्याची रक्कम, अंगणवाडी भाड्याची रक्कम, गणवेशाची रक्कम मिळत नसल्याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात मागणी होती. त्याअनुषंगाने किरकोळ खर्च भागविण्यासाठी 11 कोटी रुपयांच्या परिवर्तनीय निधीचे वाटप करण्यात आले आहे. प्रवास खर्च, भत्त्याची रक्कम, अंगणवाडी भाड्याची रक्कम, गणवेशाची रक्कम यावरील खर्च भागविण्यासाठी माहे नोव्हेंबर 2017 मध्ये निधीचे वाटप करण्यात येणार असल्याचे आयुक्त फंड यांनी सांगितले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!