व्हीएस न्यूज – बलाढ्य संघांना पराभूत करत आपली दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाला आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाच्या संघाने ६ गडी आणि ७२ चेंडू राखून पराभूत केले.
ईक्रम अली खिलच्या ८० धावांच्या खेळीच्या जोरावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सर्वबाद १८१ धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाने या लक्ष्याचा पाठलाग करताना ३७.३ षटकांमध्ये चार गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून जॅक एडवर्ड्सने ७० धावांची खेळी केली. तर गोलंदाजीमध्ये जॉनथम मेरलोने १० षटकांमध्ये २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. मेरलोने २ निर्धाव षटकेही टाकली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुसर्कार देण्यात आला. आता अंतिम फेरीमध्ये तिन वेळा स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा सामना बांग्लादेश विरूद्ध भारत उपांत्य फेरीत विजयी होणाऱ्या संघाशी असेल.
व्हीएस न्यूज - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली असून संघात मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज सुरेश रैना याचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने नुकतीच या १६ सदस्यांच्या संघाची घोषणा केली. कर्णधार विराट कोहलीकडे संघाचे नेतृत्व राहणार आहे.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकामध्ये येत्या १८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान ३ सामन्याची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिका संपल्यानंतर पहिला टी-२० सामना जोहान्सबर्ग येथे खेळण्यात येणार आहे. निवड समितीने टी-२० मालिकेत सुरेश रैनाचा समावेश केल्याने आता या संधीचे सोने करण्यात सुरेश रैना यशस्वी ठरणार की नाही हे पाहण्याजोगे असेल. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यानंतर रैनाला संघातून वगळण्यात आले होते.
भारतीय टी-२० संघ – विराट कोहली (कर्णधार), महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (उप कर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार,जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, मनीष पांडे, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट आणि शार्दुल ठाकूर.
व्हीएस न्यूज – धर्मा पाटील यांची शेतकरी विरोधी सरकारने एकप्रकारे हत्याच केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारी प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील (वय ८४) यांच्या मृत्यूनंतर घणाघाती टीका केली आहे.
सरकारने उर्जा प्रकल्पासाठी शिंदखेडाचे रहिवासी असलेल्या धर्मा पाटील यांच्या मालकीची शेतजमीन ताब्यात घेतली. पण सरकारी भावाने यासाठी पैसे देण्यात आले. धर्मा पाटील गेली दोन वर्ष या अन्यायाविरोधात लढा देत होते. त्यांनी आठवडाभरापूर्वी मंत्रालयात विषप्राशन केले होते. जे जे रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. विरोधकही धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर आक्रमक झाले आहेत. ट्विटरवरुन सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र सोडले. जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. एकप्रकारे या शेतकरीविरोधी सरकारने त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच दिल्लीत झालेल्या एनसीसीच्या कार्यक्रमात जो कोणीही भ्रष्टाचार करेल त्याला तुरुंगात टाकणार ही काळ्या दगडावरची रेष असून ती व्यक्ती मग कोणीही असो, त्या व्यक्तीला सोडणार नाही. सध्याच्या घडीला देशात भ्रष्टाचार करणारे तीन माजी मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. त्यामुळे यापुढे एकाही भ्रष्टाचारी माणसाला माफ करणार नसल्याचे म्हटले आहे.
भ्रष्टाचार आणि काळा पैशाचे उच्चाटन होईपर्यंत या विरोधात सुरु झालेली लढाई थांबणार नाही. तरुणाईने देखील या लढाईत सहभाग घेतला पाहिजे असेही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एक काळ असा होता की भ्रष्टाचाराची केवळ चर्चा होत असे आणि लोक म्हणत असत की यात तर मोठ्या लोकांची नावे आहेत त्यांना काहीही होणार नाही. पण तीन माजी मुख्यमंत्री भ्रष्टाचार केल्यामुळेच सध्या तुरुंगात असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - मानसिक आजार, बौद्धिक अक्षमता आणि अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांचा केंद्र सरकारने विशेष प्रवर्गात समावेश केला आहे. यामुळे अॅसिड हल्ला पीडितांना आता सरकारी नोकरीत आरक्षण मिळाले आहे.
अॅसिड हल्ल्यातील जखमी मुलींसंदर्भात ‘लक्ष्मी’ या पीडितेने सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. डिसेंबर २०१५ मध्ये सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर निर्णय दिला होता. अॅसिड हल्ल्यातील पीडितांचा समावेश अपंग प्रवर्गात करुन त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करावी, असे आदेश कोर्टाने दिले होते. यानुसार कार्मिक व प्रशिक्षण विभागाने केंद्र सरकारअंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांना पत्रक पाठवले आहे. यामुळे अपंग प्रवर्गातील बदलांबाबत माहिती देण्यात आली आहे. थेट भरतीद्वारे भरावयाच्या पदांमध्ये चार टक्के आरक्षण दिले जाणार आहे. ४० टक्के पेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्यांसाठी हा नवा नियम लागू असेल. यातील एक टक्के जागा अंध व्यक्ती, मुकबधीर,सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोग, अॅसिड हल्ला पीडितांसाठी राखीव असेल. तर बौद्धिक अक्षमता, ऑटिझम (स्वमग्नता), अध्ययन अक्षमता आणि मानसिक आजार असलेल्यांसाठी एक टक्के जागा आरक्षित असेल. या संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक अधिकारी नियुक्त करावा. तक्रार दाखल केल्याच्या दोन महिन्यांमध्ये तक्रारीचे निवारण करावे, असे या पत्रकात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व संघमालकांनी सर्वोत्तम खेळाडूंना आपल्या संघाकडे कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांनी रणनिती आखत महत्वाचे खेळाडू आपल्याकडे कायम राखले आहेत. पहिल्या दिवशी जेवणाची सुट्टी होईपर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाबचा लिलावावर बोलबाला पहायला मिळाला. प्रिती झिंटा आणि विरेंद्र सेहवाग यांनी प्रत्येक खेळाडूवर बोली लावत चांगल्यातला चांगला खेळाडू आपल्या संघात कायम कसा राखता येईल याची जबाबदारी घेतली, आणि या प्रयत्नात त्यांना बऱ्याच प्रमाणात यश आलेलं पहायला मिळालं.
पहिल्या सत्रात काही अनपेक्षित निकाल पहायला मिळाले. विशेष करुन भारतीय खेळाडूंमध्ये काही जणांना अनपेक्षित बोली मिळाली तर काही महत्वाच्या खेळाडूंना नाममात्र बोलीवर समाधान मानावं लागलं. रणजी आणि स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मनिष पांडेला तब्बल ११ कोटी रुपये खर्च करुन सनराईजर्स हैदराबाद संघाने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. याचसोबत भारतीय संघाचा कसोटी सलामीवीर लोकेश राहुललाही ११ कोटी रुपयांची बोली लागली. लोकेश राहुल नवीन हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना दिसेल. दुसरीकडे करुण नायरलाही आपल्या ५० लाख या मुळ किमतीवरुन चांगली रक्कम मिळाली. दोन संघमालकांमध्ये सुरु असलेल्या चढाओढीत करुण नायरला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ५ कोटी ६० लाखांच्या बोलीत आपल्या संघामध्ये कायम राखलं आहे. याव्यतिरीक्त परदेशी खेळाडूंमध्ये सर्वात जास्त बोली लागलेल्या खेळाडूंच्या यादीत सध्याच्या घडीला ख्रिस लिनने बाजी मारली आहे. ख्रिस लिनला कोलकाता नाईट रायडर्स संघाने ९ कोटी ६० लाखांची बोली लावली. तर इंग्लंडच्या ख्रिस वोक्ससाठी रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाने ७ कोटी ४० लाख रुपये मोजत आपल्या संघात घेतलं.
एकीकडे भारतीय खेळाडूंना अनपेक्षितपणे कोट्यावधी रुपयांच्या बोली लागत असताना, आतापर्यंत १० हंगाम गाजवणाऱ्या काही महत्वाच्या खेळाडूंना नाममात्र बोलीवर समाधान मानावं लागलं. गौतम गंभीर अवघ्या २ कोटी ८० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार आहे. तर युवराजलाही २ कोटींच्या बोलीवर समाधान मानावं लागलं, यंदाच्या हंगामात तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळेल. तर गेली १० वर्ष मुंबईचं प्रतिनिधीत्व करत असलेला हरभजन सिंह यंदाच्या हंगामात धोनीच्या साथीने चेन्नईसाठी खेळताना दिसेल. याचसोबत चेन्नईने यंदा मराठमोळ्या केदार जाधवलाही आपल्या संघात कायम राखलं आहे. त्याला २ कोटी रुपयांची बोली लागली. त्यामुळे पुढच्या सत्रात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पहावं लागणार आहे.
- अफगाणिस्तानच्या राशिद खानला तब्बल ९ कोटींची बोली, राईट टू मॅच कार्डाद्वारे हैदराबाद संघाने लावली बोली.
- अफगाणिस्तानच्या राशिद खानसाठी संघमालकांमध्ये चढाओढ.
- कर्ण शर्मा चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे, बोली ५ कोटी.
- न्यूझीलंडच्या इश सोढीला बोली नाही
- इम्रान ताहिर १ कोटी रुपयांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघात
- पियुष चावला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, बोली ४ कोटी २० लाख
- लसिथ मलिंगाला पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही
- कगिसो रबाडा दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ४ कोटी २० लाखांची बोली
- मोहम्मद शमी नवीन हंगामातही दिल्लीकडून खेळणार, राईट टू मॅच कार्डाद्वारे शमीवर ३ कोटींची बोली
- भारताच्या इशांत शर्मालाही पहिल्या फेरीत बोली नाही
- न्यूझीलंडच्या टीम साऊदीला मात्र बोली नाही
- विदर्भ एक्स्प्रेस उमेश यादव बंगळुरुच्या यार्डात, रॉयल चॅलेंजर्सकडून ४ कोटी २० लाखांची बोली
- ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स मुंबई इंडियन्सकडे, बोली ५ कोटी ४० लाख
- मिचेल जॉन्सन, जॉश हेजलवूड यांच्यावर कोणत्याही संघाकडून बोली नाही
- बांगलादेशचा जलदगती गोलंदाज मुस्तफिजुर रेहमान मुंबई इंडियन्स संघाकडे, बोली २ कोटी २० लाख
- बटलरवर राजस्थानकडून ४ कोटी ४० लाखांची बोली
- इंग्लंडचा जोस बटलर आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
- इंग्लंडच्या सॅम बिल्गींज्गवर बोली नाही
- अंबाती रायडू नवीन हंगामात चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार, बोली २ कोटी २० लाख
- संजू सॅमसनला तब्बल ८ कोटी रुपयांची बोली, नवीन हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
- रॉबिन उथप्पा पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे कोलकात्याची ६ कोटी ४० लाखांची बोली
- नमन ओझावर बोली नाही
- दिनेश कार्तिक कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, बोली ७ कोटी ४० लाख
- वृद्धीमान साहावर ५ कोटी रुपयांची बोली, सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार साहा
- जॉनी बेअरस्ट्रोवर बोली नाही
- क्विंटन डी कॉक २ कोटी ८० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
- पार्थिव पटेलला बोली नाही
- इंग्लंडचा मोईन अली १ कोटी ७० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणार
- मार्कस स्टॉयनिस ६ कोटी २० लाखांच्या बोलीत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार
- न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो १ कोटी ९० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे
- युसूफ पठाणवर १ कोटी ९० लाखांची बोली, नवीन हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
- ऑस्ट्रेलियाच्या जेम्स फॉल्कनरवर बोली नाही
- कॉलिन डी ग्रँडहोम रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाकडे, बोली २ कोटी २० लाख रुपये
- शेन वॉटसनवर ४ कोटी रुपयांची बोली, धोनीच्या संघात आणखी एक अष्टपैलू खेळाडू
- मराठमोळा केदार जाधव ७ कोटी ८० लाखांच्या बोलीत चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडे
- कार्लोस ब्रेथवेटवर २ कोटी रुपयांची बोली, नवीन हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
- इंग्लंडचा ख्रिस वोक्स ११ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणार, वोक्सवर ७ कोटी ४० लाखांची बोली
- मनिष पांडेवर ११ कोटी रुपयांची बोली, नवीन हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार पांडे
- न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलवर पहिल्या फेरीत बोली नाही
- दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलावर पहिल्या फेरीत बोली नाही
- ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस लिन कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, लिनवर ९ कोटी ६० लाखांची बोली
- इंग्लंडचा जेसन रॉय १ कोटी ५० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे
- ब्रँडन मॅक्यूलम ३ कोटी ६० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
- अॅरोन फिंचवर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ६ कोटी २० लाखांची बोली
- डेव्हिल मिलर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ३ कोटी रुपयांची बोली
- मुरली विजयवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही
- राहुलवर ११ कोटी रुपयांची बोली
- लोकेश राहुलला आपल्या संघात घेण्यात किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी
- अखेर किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी, करुण नायरला ५ कोटी ६० लाखांची बोली
- मुळ रक्कम ५० लाखांवरुन करुण नायरची कोट्यांमध्ये घौडदौड
- करुण नायरसाठी पंजाब आणि राजस्थानच्या संघमालकांमध्ये चढाओढ
- दुसऱ्या सत्रातल्या खेळाडूंचा लिलाव संपला, ५ मिनीटांची विश्रांती
- युवराज सिंह नवीन हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार, युवराजवर २ कोटी रुपयांची बोली
- इंग्लंडच्या जो रुटवर कोणत्याही संघाकडून बोली नाही
- केन विलियमसन ३ कोटी रुपयांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघात
- ब्राव्होवर ६ कोटी ४० लाखांची बोली
- राईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होला संघात परत घेतलं
- गौतम गंभीरवर २ कोटी ८० लाखांची बोली
- गौतम गंभीर माहेरी परतला, नवीन हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार
- ग्लेन मॅक्सवेल ९ कोटी रुपयांमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार
- हैदराबाद विरुद्ध दिल्लीच्या लढाईत दिल्लीची बाजी
- ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलसाठी संघमालकांमध्ये पुन्हा एकदा चढाओढ
- बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन सनराईजर्स हैदराबाद संघाकडे, बोली २ कोटी रुपये
- मुंबई इंडियन्सचा हरभजन सिंह चेन्नईच्या ताफ्यात, हरभजनवर २ कोटी रुपयांची बोली
- पहिल्या खेळाडूंचा संच संपला, आता १५ मिनीटांची विश्रांती
- ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क ९ कोटी ४० लाखांच्या बोलीत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे
- अजिंक्य रहाणे माहेरी परतला, राजस्थान रॉयल्सची रहाणेवर राईट टू मॅच कार्डाद्वारे ४ कोटींची बोली
- डु प्लेसीसवर १ कोटी ६० लाखांची बोली
- दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीस राईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जकडे
- बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघाकडे, बोली १२ कोटी ५० लाख
- इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्ससाठी संघमालकांमध्ये चढाओढ
- वेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेलवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही
- कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ५ कोटी ४० लाखांची बोली
- अखेर रविचंद्र आश्विन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, ७ कोटी ६० लाखांच्या बोलीत नवीन संघाकडून खेळणार
- रविचंद्रन आश्विनसाठी संघमालकांमध्ये चढाओढ
- राईट टू मॅच कार्डाद्वारे शिखर ५ कोटी २० लाखात हैदराबाद संघाकडे
- पहिल्या खेळाडूची बोली लागली, शिखर धवन सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
व्हीएस न्यूज - महाराष्ट्राच्या चार सर्वोत्तम पैलवानांना दत्तक घेण्याचा दिलेला शब्द अवघ्या महिन्याभरात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरा केला आहे.
शरद पवारांनी राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे या राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पैलवानांसह महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्या परदेशी प्रशिक्षणाचा खर्च उचलला आहे. चार पैलवानांच्या खर्चासाठी म्हणून शरद पवार यांनी २४ लाख रुपयांचे धनादेश त्यांच्या प्रशिक्षकांकडे सुपूर्द केली आहे. राहुल आवारे, उत्कर्ष काळे आणि किरण भगत यांचे प्रशिक्षक अर्जुनवीर काका पवार आणि अभिजीत कटकेचे प्रशिक्षक भरत म्हस्के यांनी पवारांकडून ते धनादेश स्वीकारले आहेत. तीन वर्षे ही योजना सुरु राहिल.
प्रसिद्ध कलाकार मनोज जोशी यांना मिळणार पद्मश्री पुरस्कार
व्हीएस न्यूज - केंद्र सरकारच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणा-या पद्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ८५ जणांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पद्यश्री पुरस्काराने अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार मनोज जोशी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. जेव्हा राष्ट्र ऐवढा मोठा सन्मान देते तेव्हा खूप आनंद मिळतो. मला या पुरस्काराच्या स्वरुपात माझ्या अभिनयाचे फळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान, इलायाराजा (संगीत) आणि परमेश्वरन यांना पद्मविभूषण तर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि बिलियर्डपटू पंकज अडवाणीला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी दोन मान्यवरांची निवड झाली आहे. यात साहित्यिक गंगाधर पानतावणे व शिक्षणतज्ज्ञ अरविंद गुप्ता यांचा समावेश आहे.
व्हीएस न्यूज - भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटलेला एक कैदी शिक्षेनंतर थेट अभियांत्रिकी पदवी घेऊनच बाहेर पडला असून अनेकांना त्याचा हा कायपालट थक्क करणारा वाटत आहे. रागाच्या भरात एकाचा भोपाळ तुरुंगातून सुटलेल्या रामकृष्ण काळुराम या कैद्याने खून केला होता. मध्य प्रदेशमध्ये दरवर्षी २६ जानेवारीला चांगली वर्तणूक असणाऱ्या कैद्यांची शिक्षा माफ केली जाते. रामकृष्ण या कैद्याची त्यामध्ये ६ वर्षांची शिक्षा माफ करण्यात आल्यामुळे हा कैदी कुटुंबियासमवेत राहू शकणार आहे. या कैद्याची प्रजासत्ताक दिनाला सुटका झाली, तेव्हा त्याच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू आले.
आपले शिक्षण व्यवसायाने शिक्षक असणारे रामकृष्ण काळुराम याने तुरुंगातही सोडले नाही. त्याला तुरुंगात आल्यानंतर पश्चाताप झाला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आसाम विद्यापीठातून त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. त्याच्यासोबत असलेल्या काही कैद्यांनी संगणक पदविका मिळविली. तर काही जणांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. रामकृष्ण हा तुरुंगात राहून कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्याचबरोबर प्रकाश रेयकवार या कैद्याची वर्तणूक चांगली असल्याने त्याचीही मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. सुटकेनंतर शेती करणार असल्याचे रेयकवार याने सांगितले आहे.
व्हीएस न्यूज - करणी सेनेने जरी ‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध केला असला तरी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. यात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्यासोबत शाहिद कपूरच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. पण शाहिद राजा रावल रतन सिंह यांच्या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हती.
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला याआधी राजा रावल रतन सिंह यांच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. पण भन्साळींची शाहरुखसोबत बोलणी फिस्कटली आणि अखेर ही भूमिका शाहिदच्या पदरात पडली. ऐतिहासिक चित्रपटामध्ये मुख्य भूमिका शाहरुखला साकारायची नव्हती. त्यामुळे त्याने भन्साळींना नकार दिला. शाहरुखने भन्साळींना मानधनाचा आकडा दुप्पट करुन मागितल्याचीही चर्चा होती. शाहरुख पूर्वी एका चित्रपटासाठी ४५ ते ५० कोटी रुपये घ्यायचा, पण त्याने पद्मावतसाठी चक्क ९९ कोटींची मागणी केली होती. त्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी दुसऱ्या अभिनेत्याचा शोध सुरु केला. अवघ्या ९ ते १० कोटी रुपयांमध्ये शाहिद कपूर तयार झाला
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002