व्हीएस न्यूज – दिल्लीतील स्थानिक गुंड नीरज बवानाने दाऊदच्या इशाऱ्यावरून तिहार तुरूंगात कैदेत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या हत्येचा कट रचला होता, अशी गोपनीय माहिती समोर आली असून ही गोपनीय माहिती तिहार तुरूंग प्रशासनाला दोन आठवड्यांपूर्वी मिळाल्याचे सांगण्यात येते. राजनच्या सुरक्षेची ही माहिती समोर आल्यानंतर समीक्षा करून त्यात वाढ करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कटाबाबत बवानाच्या एका सहकाऱ्याने दारूच्या नशेत सांगितल्यामुळे दाऊद कंपनीची ही योजना फसल्यानंतर गुप्तचर संस्थांपर्यंत ही माहिती पोहोचल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
बवानाच्या बराकमध्ये काही दिवसांपूर्वी मोबाइल फोन आढळून आला होता. मुंबई किंवा महाराष्ट्रातील तुरूंगात ठेवण्यापेक्षा तिहारसारख्या अति सुरक्षित तुरूंगात राजनला ठेवल्यास त्याच्यावर हल्ला करणे कठीण जाईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता. तिहार प्रशासनाच्या मते अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत राजनला ठेवण्यात आले असल्यामुळे त्याच्यावर बवानाला हल्ला करणे शक्य नाही.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात बवानाचा एक सहकारी तुंरूगाबाहेर गेल्यानंतर ही माहिती समोर आली. राजनला दाऊद स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने मारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समजल्यानंतर राजनच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. ‘डी’ कंपनीसाठी राजनवर हल्ला हा प्रतिकात्मक विजयाप्रमाणे असेल आणि भारतीय सुरक्षेला हा धक्का असेल. तिहार आणि इतर तुरूंगाच्या सुरक्षेबाबत विजय माल्ल्यासारखा व्यक्ती प्रश्न उपस्थित करताना असताना राजनशी निगडीत गोपनीय माहिती समोर आल्यानंतर आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे एका अधिकाऱ्याने म्हटले.
व्हीएस न्यूज – मोबाईल उत्पादक कंपनी डिटेलच्या सोबतीने सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने एक नवीन फिचर फोन बाजारात आणला असून केवळ ४९९ रुपयांमध्ये हा फोन मिळणार असून या फोनवर बीएसएनएल १ वर्ष व्हॉईस कॉलची ऑफर देणार आहे.
३४६ रुपये ऐवढी या फोनची मूळ किंमत असून बीएसएनएलने यासोबत बंपर ऑफर दिली आहे. त्यामुळे हा फोन ४९९ रुपयात मिळणार आहे. जयपूरमध्ये या फोनची घोषणा करण्यात आली. बीएसएनएलने यावर कोणत्याही डाटा ऑफर दिलेली नाही. बीएसएनएलकडून देण्यात आलेल्या ऑफरची किंमत आहे १५३ रुपये तर फिचर फोनची किंमत ३४६ रुपये आहे. या ऑफरमध्ये वर्षभर बीएसएनएल टू बीएसएनएल १५ पैसे प्रति मिनिट दर आकारला जाईल तर बीएसएनएल टू अन्य नेटवर्कवर ४० पैसे प्रति मिनिट दर आकारला जाणार आहे. या फिचर फोनला १.४४ इंच असलेला मोनोक्रोम डिस्प्ले देण्यात आला आहे. हा जीएसएम २जी नेटवर्कवर काम करतो. यामध्ये केवळ एकच सिम वापरता येणार असून ६५०mAh क्षमता असलेली बॅटरी फोनला देण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज – आता थेट पाकिस्तानबरोबर युद्ध पुकारले पाहिजे, असे ज्येष्ठ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.
स्वामी यांनी पाकिस्तानचे चार तुकडे करावे अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. स्वामी यांनी अशी खळबळजनक प्रतिक्रिया कुलभूषण जाधव याची पत्नी आणि मातेला दिलेल्या अयोग्य वागणुकीमुळे दिली आहे. भारताने पाकिस्तानबरोबर युद्ध करण्यासाठी चांगलीच तयारी करावी असेही ते म्हणाले. पाकिस्तानने भारताच्या भावना दुखावल्या असून त्याला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे असेही स्वामी म्हणाले आहेत.
व्हीएस न्यूज - योगगुरू रामदेव बाबा यांना बॉलीवूड सेक्स बाँब राखी सावंत हिने नुकतेच आव्हान दिले असून रामदेव बाबाजी, तुमच्यात दम असेल तर पतंजली मध्ये कंडोम बनवा असे सुनावले आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत प्रसिद्धीत राहण्याची सवय जडलेल्या राखीला आता रामदेवबाबा काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकतेच राखीने विराट अनुष्का लग्नामुळे तिचा हृदयभंग झाल्याचे विधान करून त्यांना कंडोम भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याअगोदर तिने कंडोमच्या जाहिराती ठराविक वेळेत दाखविण्याच्या निर्णयाचा निषेध करताना असे म्हटले होते, की तिची कंडोमची जाहिरात येत असल्यामुळेच हा निर्णय घेतला गेला आहे. रामदेव बाबांना दिलेल्या आव्हानाचा व्हिडीओ तिने इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
व्हीएस न्यूज - केंद्रीय मंत्री व भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांनी मंगळवारी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. आम्ही सत्तेवर संविधानात बदल करण्यासाठीच आलो आहोत, असे वक्तव्य हेगडे यांनी केले होते. त्यावर एमआयएमचे नेते गुरुशांत पट्टेदार यांनी हेगडेंची जीभ कापून आणणाऱ्यास आम्ही १ कोटींचे बक्षीस देऊ, अशी घोषणा केली आहे. गुरुशांत पट्टेदार हे कलबुर्गी जिल्ह्याचे माजी पंचायत सदस्य आहेत.
हेगडे यांनी मंगळवारी धर्मनिरपेक्ष म्हणून मिरवणाऱ्यांना स्वतःचे मूळ माहिती नाही. त्यांना संविधानानेच धर्मनिरपेक्ष म्हणवण्याचा अधिकार बहाल केला आहे. पण, वारंवार याच संविधानात बदल करण्यात आले आहेत आणि आता आम्हीही असे बदल करू, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आम्ही सत्तेवर संविधानात बदल करण्यासाठीच आलो आहोत, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. हेगडे कोप्पल जिल्ह्यातील कुकानूर शहरात ब्राह्मण युवा परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. आता एमआयएमचे नेते गुरुशांत पट्टेदार यांनीही त्यावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे.
व्हीएस न्यूज - महाबळेश्वर मध्ये सुटी घालविण्यासाठी गेलेले शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आवाजाचा त्रास झाला म्हणून महाबळेश्वर मधील एक रिसॉर्ट सील केले गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. अर्थात हे रिसॉर्ट सील करण्यामागे प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण दिले गेले असले तरी कोणत्याही हॉटेलवर इतक्या तातडीने कारवाई केल्याची ही पहिलीच घटना असल्याने त्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे महाबळेश्वर येथे होते तेव्हा शेजारीच असलेल्या एव्हरशाईन रिसॉर्टमध्ये डीजे सुरू होता. त्या आवाजाचा त्रास ठाकरे यांना झाला तेव्हा स्थानिक शिवसेना नेत्यांनी आवाज कमी करण्याची सूचना दिली मात्र रिसॉर्टने ती धुडकावून लावताच त्वरीत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना माजी नगराध्यक्ष व सेना नेते डी.एम. बावडेकर यांनी फोनवरून माहिती दिली. या संदर्भात सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल गेली गेली व शनिवारीच हे रिसॉर्ट सील केले गेले.
रामदास कदम यांनी मात्र या रिसॉर्टमधील २७ खोल्या अनधिकृत बांधल्या गेल्या असल्याचे तसेच वॉटर रिसायकलींग सुविधा नसल्याचे व महाबळेश्वर हे शांत क्षेत्र घोषित केले गेल्याने आवाजाला बंदी असल्याचे कारण रिसॉर्ट सील करण्यामागे असल्याचे सांगितले. त्यापुढे त्यांनी मुंबईतील ३० हॉटेल्स तसेच लोणावळा येथील हॉटेल्सवरही अशी कारवाई करण्यात येणार असल्याची पुस्तीही जोडली. विशेष म्हणजे सेनेचे युवा नेते आदित्य मुंबईत रात्रभर पब्ज व हॉटेल्स खुली ठेवण्यासंदर्भात चळवळ करत असताना महाबळेश्वर मधील रिसॉर्टवर झालेली कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002