Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
इंग्लंडमधील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी फुलनदेवी अभ्यासाचा विषय

व्हीएस न्यूज – आता इंग्लंडमधील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक भयानक दरोडेखोर, त्यानंतर एक खासदार असा बँन्डिट क्वीन फुलनदेवीचा प्रवास अभ्यासाचा विषय असेल. बुधवारी लंडनहुन भारतामध्ये यासाठी मुळचे भारतीय असलेले दोन ब्रिटिश प्राध्यापक मुकुललाल आणि मुकुल सबरवाल दाखल झाले असून कल्पी येथे राहणाऱ्या फुलनच्या परिवाराची त्यांनी भेट घेतली.

मुला देवी यांच्याकडे फुलनदेवी यांच्याविषयी ब्रिटीश प्राध्यापकांनी विचारणा केल्यावर, सुरुवातीला मुला देवी काहीही सांगण्यास तयार नव्हती. पण पोलिसांनी जेव्हा प्रयत्न केले, तेव्हा तिने फुलनच्या सगळ्या प्रवासाबद्दल माहिती दिल्याचे पोलिसांनी अणि प्राध्यापकांनी दिली. प्राध्यापकांनी बॅन्डिट क्वीनची माहिती घेतल्यानंतर तिच्या कुटुंबाला आर्थिक मदतही दिली आहे. २५ जुलै २००१ ला त्यांच्या सरकारी निवासस्थानासमोर बॅन्डिट क्वीन फुलनदेवी यांची हत्या करण्यात आली होती.

...Read More

V. S. News
लवकरच चलनात येणार १० रुपयांच्या नव्या नोटा !

व्हिएस न्यूज - लवकरच चलनात दहा रुपयांच्या नव्या नोटा आणल्या जातील, असे भारतीय रिझर्व्ह बँकने सांगितले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी सीरीजच्या या नव्या नोटा असतील. दहा रुपयांच्या १०० कोटी नोटांची छपाई यापूर्वीच रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता दहा रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या जातील.

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून नोटाबंदीनंतर बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दोनशे, पन्नास रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. आता दहा रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या जात आहेत. दहा रुपयांच्या नव्या नोटा ब्राऊन कलरच्या असतील. तसेच या नोटांमध्ये सुरक्षा फिचर्स देण्यात आले आहे.

महात्मा गांधी सीरीजच्या दहा रुपयांच्या नव्या नोटा असतील. ब्राऊन कलरच्या या सर्व नोटा असतील. कोणार्क सूर्य मंदिरचे चित्र या सर्व नोटांवर असणार आहे. नव्या नोटांच्या नंबर पॅनेलच्या इन्सेटमध्ये इंग्रजीमध्ये ‘एल’ अक्षर लिहिण्यात आले आहे. नोटांच्या मागील बाजूस छपाई वर्ष २०१७ लिहिलेले असेल. त्यावर रिझर्व्ह बँकेच्या नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांचे हस्ताक्षर असणार आहे.
...Read More

V. S. News
२०० रूपयांच्या नोटांसाठी एटीएममध्ये होणार बदल

व्हिएस न्युज - रिझर्व्ह बँकेने २०० रूपयांच्या नोटांचा पुरवठा वाढवला आहे. यासाठी त्यांनी बँकांना एटीएममध्ये बदल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. आरबीआयच्या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी बँकिंग जगताला १ हजार कोटी रूपयांहून अधिक रूपये खर्च करावे लागण्याची शक्यता आहे. सध्या बँका बुडीत कर्जामुळे अडचणीत आहेत. त्याचवेळी त्यांच्यावर या खर्चाचा आणखी भार पडणार आहे.
एका बँकरने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. तो म्हणाला की, आरबीआयने बँका आणि एटीएम उत्पादकांना लवकरात लवकर २०० रूपयांसाठी एटीएममध्ये बदल करण्यास सांगितले आहे. आम्हाला २ हजार रूपयांच्या नोटेबरोबर २०० रूपयांच्या नोटेचेही आवश्यकता आहे. आरबीआयचे हे चांगले पाऊल आहे. ही प्रणाली लागू करण्यासाठी ५ ते ६ महिने लागू शकतात, असे वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि १ हजार रूपयांच्या जुन्या नोटा चलनबाह्य ठरवण्यात आल्या होत्या. भ्रष्टाचार, काळा पैसा व टेरर फंडिंग रोखण्यासाठी उच्च मूल्याच्या नोटा मागे घेतल्याचे सरकारने त्यावेळी सांगितले होते. पण नंतर २ हजार रूपयांची नोट जारी करण्यात आली. यावरून सरकारवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर २०० रूपयांची नोट येणार असल्याचे वृत्त आले होते. २ हजाराच्या नोटांमुळे गतवर्षी एटीएममधून मोठ्याप्रमाणात पैसे काढण्यात आल्याचे बँकर्सनी म्हटले आहे. आरबीआय एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा ठरवू शकते, असेही या बँकर्सने म्हटले. सप्टेंबर २०१७ मध्ये एटीएममधून एकूण २.४४ लाख कोटी रूपये काढण्यात आले होते. तर सप्टेंबर २०१६ मध्ये ही रक्कम २.२२ कोटी रूपये होती.
...Read More

V. S. News
पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढली !

व्हीएस न्यूज - पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी खुल्या प्रवर्गासाठी आता २५ ऐवजी २८ वयोमर्यादा, तर मागासवर्गीयांसाठी ३० ऐवजी ३३ एवढी वयोमर्यादा करण्यात आली आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रविंद्र कुमार संगल यांनी पोलीस शिपाई भरतीबाबत सुधारित मसुदा जाहीर करताना खुल्या आणि मागासवर्गीयांसाठी वाढलेल्या वयोमर्यादेबाबत माहिती दिली. खुल्या वर्गातील पोलीस भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा कमीत कमी वय १८ वर्षे, तर जास्तीत जास्त वय २८ वर्षे असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी वय १८ वर्षे, तर जास्तीत जास्त वय ३३ वर्षे असणार आहे. पोलीस भरती आधीच सुरु झाली आहे. मात्र, ज्यांनी यापूर्वीच ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
प्रकाश आंबेडकरांनी दंगलीत पाणी ओतावे तेल नाही – शिवसेना

व्हीएस न्यूज - बुधवारी दलित संघटनांनी भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधात पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’नंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज सरकारला लक्ष्य केले. राज्यातील परिस्थितीवर या बंद दरम्यान सरकारची भूमिका काय? असा थेट सवाल केला. त्याचबरोबर अग्रलेखातून भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचाही समाचार घेतला. सोबतच राज्याचे वातावरण गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांनी बिघडवल्याचे देखील म्हटले आहे.

या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीचा वापर करू नये. दंगल भडकवण्यापेक्षा पेटलेल्या जमावास शांत करणारा व दिशा देणारा हाच खरा नेता असतो,अशा शब्दांत शिवसेनेने प्रकाश आंबेडकरांचा समाचार घेतला. तसेच बाजूच्या राज्यांतील लोक आमच्या राज्यात येऊन वातावरण बिघडवत आहेत, असे म्हणत जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांना देखील सामनातून लक्ष्य करण्यात आले.

त्याचबरोबर सरकारवर निशाणा साधताना राज्यात ठिकठिकाणी उसळलेल्या हिंसाचारात सांडलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंब महाराष्ट्राचा आहे. या सर्व परिस्थितीत आज सरकारची भूमिका नक्की काय आहे? पोलीस खात्याचे राजकारण व गृहखात्याचा भाजप झाल्याचे परिणाम राज्याला भोगावे लागत आहेत. सरकारने आता तरी निवडणुकांच्या चक्रव्यूहातून स्वतःला सोडवावे, जमिनीवर यावे. शिवसेनेशी लढायला सारे जीवन आहे. शिवसेनेस राजकारणातून खतम करण्यासाठी शक्ती पणास लावण्यापेक्षा महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढा. राज्य पेटले आहे. ती शेकोटी एक दिवस तुम्हालाही खाक करील!, अशा शब्दांत त्यांनी भाजपाला सुनावले आहे.

...Read More

V. S. News
चोर सोडून संन्याशाला पकडत आहे सरकार – कपिल पाटील

व्हीएस न्यूज सरकार भीमा कोरेगावाच्या हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना सोडून शांततेच्या मार्गाने होणारी विद्यार्थ्यांची सभा उधळून लावत असून विद्यार्थ्यांना उचलून तुरूंगात टाकत आहे. विद्यार्थ्यांना तुरूंगात टाकणारे हे सरकार नाकर्ते आहे, अशी टीका आमदार कपिल पाटील यांनी केली.

कपिल पाटील गुरूवारी मुंबईच्या पार्ले परिसरातील भाईदास सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या छात्र भारतीच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गुजरातमधील दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवाणी आणि ‘जेएनयू’मधील आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेला विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद यांची भाषणे भाईदास सभागृहातील छात्र भारतीच्या संमेलनात या संमेलनात होणार होती. पण पोलिसांनी ऐनवेळी भीमा कोरेगाव हिंसाचार आणि महाराष्ट्र बंदमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला परवानगी नाकारली. याला छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर विद्यार्थी नेत्यांना पोलिसांनी अटक केली व उर्वरित विद्यार्थ्यांना परिसरातून हुसकावून लावले.

आमदार कपिल पाटील यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना संताप व्यक्त केला. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करायची सोडून विद्यार्थ्यांना सरकार अटक करत आहे. भिडे आणि एकबोटेंचे सरकार कौतुक करते. पण शांततेच्या मार्गाने होणाऱ्या सभा उधळून लावते. पोलिसांकडून आज सकाळपासून विद्यार्थ्यांना अटक केली जात आहे. पोलिसांनी सभेच्या स्टेजवरील सामानही उचलून नेले. विद्यार्थ्यांच्या सभा उधळणारे, त्यांना अटक करणारे सरकार हे नाकर्ते असते. सरकारने एक कार्यक्रम रोखला म्हणून दुसरा कार्यक्रम होणारच नाही, असे नव्हे. सरकारने खूप प्रयत्न केले तरी ते आमचे असे किती कार्यक्रम बंद पाडणार, असे कपिल पाटील यांनी म्हटले.

...Read More

V. S. News
शरद पवारांच्या मुलाखतीला ‘तारीख पे तारीख’

व्हीएस न्यूज - पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची घेणार असलेली बहुप्रतीक्षित मुलाखत रद्द करण्यात आली असून आयोजकांकडून हा निर्णय कोरेगाव- भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. पवारांच्या कार्यव्यग्रतेमुळे ३ जानेवारी रोजी होणारी ही मुलाखत याआधी देखील रद्द करून तिचे नियोजन ६ जानेवारी करण्यात आले होते. पण अखेरीस ती पुन्हा रद्द झाली. ही माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली असून बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात ६ जानेवारीस सायंकाळी ५ वाजता पवारांची ही मुलाखत होणार होती. ती मुलाखत राज ठाकरे घेणार असल्यामुळे पुणेकर रसिक मोठ्या उत्सुकतेने या मुलाखतीची वाट पाहत होते.

पण ती मुलाखत आता अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्यामुळे ही मुलाखत आता कधी होणार हे माहीत नसल्याने अनेकजण हिरमुसले आहेत.

...Read More

V. S. News
सांगलीत संभाजी भिडेंवरील गुन्ह्याच्या निषेधार्थ मोर्चा

व्हीएस न्यूज - काल विविध संघटनांच्या वत्तीने भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्र बंद पाळण्यात आला. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आता सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानकडून आंदोलन करण्यात येत आहे.

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला जबाबदार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्याचबरोबर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे आता मागे घेण्याची मागणी करण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यासाठी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सांगलीतील मारुती चौकात जमा झाले होते. तेथून ते जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले. सध्या परिसरात प्रचंड तणाव असल्याची माहिती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

...Read More

V. S. News
उत्तर प्रदेश सरकार २३०० मदरशांची मान्यता रद्द करणार

व्हीएस न्यूज - उत्तर प्रदेश मदरसा बोर्डाच्या संकेतस्थळावर आपले तपशील न भरणाऱ्या 2300 मदरशांची मान्यता समाप्त करण्याचा विचार योगी आदित्यनाथ यांचे सरकार करत आहे. असे मदरसे हे बनावट असल्याचा दावा राज्याच्या अल्पसंख्यक कल्याण विभागाने केला आहे.

‘‘उत्तर प्रदेशमध्ये 19 हजार 108 मदरशांना राज्य मदरसा बोर्डाकडून मान्यता मिळालेली आहे. त्यातील 16 हजार 808 मदरशांनी खात्याच्या पोर्टलवर आपली माहिती दिली आहे. मात्र सुमारे 2300 मदरशांनी आपले तपशील दिलेले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना खोटे मानतो,” असे राज्याचे अल्पसंख्यक कल्याण मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. मदरसा बोर्डाचे परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी आहे. परंतु संकेतस्थळावर माहिती भरण्याची तारीख अगोदरच उलटून गेली आहे. त्यामुळे या महिन्याच्या शेवटी या मदरशांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे.

ही माहिती न देणाऱ्या मदरशांबाबत सरकारने अद्यापही मवाळ भूमिका घेतली असून ते अजूनही आपल्या समस्या मांडू शकतात. त्यावर उपाय काढण्यात येईल, असे मंत्री नारायण यांनी सांगितले. सरकार एक नवीन व्यवस्था आणणार असून त्यातून शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती वगैरे सरकारच्या संमतीने होईल, असेही त्यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
मुलाच्या पालनपोषणाबद्दल आईला भरपाई

व्हीएस न्यूज - जन्मापासून मोठे होईपर्यंत आईने केलेल्या पालनपोषणाबद्दल आईला भरपाई म्हणून सुमारे अमेरिकन 7 लाख 44 हजार अमेरिकी डॉलर देण्याचा आदेश तैवानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

चू नावाच्या एका दंतवैद्याला न्यायालयाने हा आदेश दिला असून हा दंतवैद्य 41 वर्षांचा आहे. यापूर्वी एका खालच्या न्यायालयाने दिलेला आदेश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य मानला आहे. विशेष म्हणजे या दंतवैद्य मुलाने 20वर्षांपूर्वी आईसोबत तिला ही भरपाई देण्याचा करार केला होता आणि त्या कराराचा मान राखण्यास न्यायालयाने त्याला सांगितले आहे.

लो असे या प्रकरणात दाद मागणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिचा नवऱ्यासोबत 1990 मध्ये घटस्फोट झाला होता आणि त्यानंतर तिने स्वतःच्या बळावर दोन मुलांना वाढविले होते. म्हातारपणी कोणी आपली काळजी घेणार नाही, या चिंतेने तिने दोन्ही मुले 20 वर्षांची झाल्यानंतर मुलांसोबत करार केला होता. या मुलांनी आपल्या उत्पन्नातून 60 टक्के वाटा तिला द्यावा, असे त्या करारात म्हटले होते. मात्र या मुलांचे संसार सुरू झाल्यानंतर त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. इतकेच नाही तर त्यांच्या मैत्रिणींनी आपल्या वकिलामार्फत तिला पत्र पाठवून त्यांना तसदी न देण्याची मागणी केली, अशी तिची तक्रार होती.

या दोघांनी आपल्या कराराचे पालन करण्यास नकार दिल्यानंतर आठ वर्षांपूर्वी तिने खटला दाखल केला. मोठ्या मुलाने अखेर तिला काही रक्कम देऊन खटल्यात तडजोड केली. मात्र हा करार “चांगल्या चालीरीतीं”चे उल्लंघन करत असून मुलांना वाढविण्याचे मोजमाप पैशांत करता कामा नये, असे धाकट्या मुलाचे म्हणणे होते. या लहान मुलाने त्याच्या आईविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती. खालच्या न्यायालयाचा निर्णय मुलाच्या बाजूने गेल्यानंतर लो यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

...Read More

V. S. News
महिलांना प्रसूतीची रजा नऊ महिने का नको ? उच्च न्यायालयाचा सवाल

व्हीएस न्यूज - गरोदर महिलांना तमिळनाडू सरकार 270 दिवसांची (नऊ महिन्यांची) प्रसूती रजा देते. मग केंद्र सरकारने तसे का करू नये, असा प्रश्न मद्रास उच्च न्यायालयाने विचारला आहे. न्या. एन. किरुबाकरन यांच्यासमोर आलेल्या एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस हा प्रश्न विचारण्यात आला. यू. ऐश्वर्या नावाच्या महिलेने ही याचिका दाखल केली आहे. महिलांना 180 दिवसांची रजासुद्धा न देणाऱ्या राज्यांना केंद्र सरकार आपल्या बरोबरीने रजा देण्यास का सांगत नाही?प्रसूती रजा देण्यासाठी केंद्र सरकार कलम 249 वापरून कायदा का करत नाही?या विषयाला राष्ट्रीय हीत का मानण्यात येत नाही?प्रसूतीच्या संदर्भातील लाभ महिलांना न देणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद का करण्यात येत नाही, असे प्रश्नही न्यायाधीशांनी आपल्या निकालपत्रात विचारले आहेत. तसेच प्रसूतीच्या संदर्भातील लाभ घेणाऱ्या महिलांकडून दोनपेक्षा अधिक अपत्यांना जन्म न देण्याची प्रतिज्ञा का लिहून घेण्यात येत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

या संदर्भात कायदा, महिला व बालकल्याण या केंद्रीय मंत्रालयाचे सचिव, महिला विकास आयोग, कायदा व आरोग्य खात्याचे राज्याचे सचिव यांनी 22 जानेवारीपर्यंत आपले उत्तर दाखल करावेत, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

...Read More

V. S. News
कपिल सिब्बल यांच्याकडून जिग्नेश मेवाणींची पाठराखण

व्हीएस न्यूज राष्ट्रीय दलित अधिकार मंच संयोजक जिग्नेश मेवाणी यांच्यावर होत असलेल्या आरोपातून काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी त्यांचा बचाव केला आहे. पुण्यात ३१ डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप मेवाणी यांच्यावर करण्यात येत आहे.

भाजप सरकारचा गेल्या साडेतीन वर्षांचा कार्यकाळ पाहिल्यास सत्य समोर येईल. जिग्नेश उनाच्या घटनेमध्ये नव्हता, जिग्नेश रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणामध्ये देखील नव्हता, असे सांगतानाच गेल्या काही वर्षांमध्ये दलितांना गैरवागणूक दिली जात असल्याचे सिब्बल म्हणाले.

महाराष्ट्र पोलिसांनी गुजरातचे आमदार आणि दलित कार्यकर्ते जिग्नेश मेवाणी यांच्याविरोधात चिथावणीखोर भाषण दिल्याची तक्रार मिळाल्याची माहिती दिली आहे. मेवानी भीमा-कोरेगाव युद्धाचा २०० वा विजय दिवस साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान झालेल्या एका युवकाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात बऱ्याच भागात तणाव निर्माण झाला होता. अनेक दलित संघटनांकडून भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक देण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी सध्याकाळी हा बंद मागे घेण्यात आला होता.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!