Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
भारतच जिंकेल अंडर १९ चा विश्वचषक

व्हीएस न्यूज भारतीय संघ १९ वर्षांखालील आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम करेल, असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे. सौरव गांगुली क्रिकेट ईयर बुक या पुस्तकाच्या २० व्या वर्धापनदिनी पत्रकारांशी बोलत होता. मंगळवारी भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २०३ धावांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे.

गांगुलीने यावेळी शुभमन गिल, कमलेश नागरकोटी, शिवम मावी आणि ईशान पोरेल हे खूप प्रतिभावान खेळाडू संघात असल्याचे मत मांडले. भारतीय क्रिकेट व्यवस्थेची संरचना खूप चांगली आहे आणि या संरचनेशिवाय तुम्ही क्रिकेटपटू तयार करू शकत नाही. भारतीय क्रिकेटच्या या संरचनेतून हे खेळाडू तयार झाले आहेत. भारतीय क्रिकेट पुढील पाच वर्षांत ऑस्ट्रेलिया व इंग्लंडला मागे टाकून जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघ बनेल, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला. इंडियन प्रीमियर लीगची क्रिकेटप्रेमींमध्ये खूप आवड आहे, ते स्टेडियम गच्च भरू शकतात. आयपीएल क्रिकेटप्रेमींच्या पाठिंब्यामुळे खूप पुढे जाईल, असे गांगुली म्हणाले. भारत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली नक्की जिंकेल. भारताने प्रत्येक सामन्यात सहज विजय मिळविला असून ऑस्ट्रेलियाचा १०० धावांनी पराभव केला होता. त्याची पुर्नरावृत्ती अंतिम सामन्यात भारताने करावी, अशी आशाही गांगुलीने व्यक्त केली. बंगालचा मध्यमगती गोलंदाज इशान पोरेलने उपांत्य फेरीत ६ षटकात १७ धावात ४ बळी घेतल्याबद्दल विचारले असता गांगुली म्हणाला की, तो बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या व्हिजन २०२० चा खेळाडू आहे.

...Read More

V. S. News
शिवसेनेची सत्ता सोडण्याची हिंमत नाही –खडसे

व्हीएस न्यूज भाजप नेते एकनाथ खडसे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करणाऱ्या शिवसेनेला प्रत्युत्तर दिले असून सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत शिवसेनेत नाही. आधी सत्तेतून त्यांनी बाहेर पडावे आणि मग भाजपच्या लोकांवर टीका करावी, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ खडसेंवर बुधवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून विखारी टीका करण्यात आली होती. काँग्रेस- राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना खुली ऑफर आहे. पण अशी ऑफर पदर ढळल्यावर येणारच. याच जन्मात या जन्मातली कर्माची फळ फेडायची असतात, अशा शब्दात शिवसेनेने एकनाथ खडसेंवर निशाणा साधला होता. आता शिवसेनेवर एकनाथ खडसेंनीही पलटवार केला आहे. शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही. शिवसेनेने आधी सत्तेतून बाहेर पडावे, मग आमच्यावर टीका करावी, असे त्यांनी म्हटले आहे. सत्ता सोडण्याची शिवसेनेची हिंमत नसून ते सत्तेत राहुनच भाजपवर टीका करत राहतील, असे सांगत त्यांनी शिवसेनेला चिमटा काढला.

...Read More

V. S. News
१९८ रुपयांत व्होडाफोन देणार २८ दिवस १.४ जीबी डेटा

व्हीएस न्यूज - टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने प्रवेश केल्यापासून इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. ग्राहकांना जिओकडून मोफत इंटरनेट मिळत असल्याने इतर टेलिकॉम कंपन्यांना आपल्या प्लॅनमध्ये वारंवार बदल करावे लागत आहेत. आता आपल्या १९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये व्होडाफोनने नुकताच एक बदल केला आहे. १९८ रुपयांमध्ये आता ग्राहकांना १.४ जीबी डेटा मिळू शकणार आहे. यासोबतच युजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल, रोमिंग कॉल आणि दिवसाला १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत.

जिओ, एअरटेल, आयडीया आणि व्हो़डाफोन या कंपन्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार स्पर्धा सुरु आहे. व्होडाफोनने आता जाहीर केलेल्या प्लॅनची स्पर्धा एअरटेलच्या १९९ रुपये आणि जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानशी आहे. ग्राहकांना या दोन्ही प्लॅनमध्ये इंटरनेट आणि इतर सुविधा देऊन खूश करण्यात येत आहे. ग्राहकांना व्होडाफोनच्या १९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये आधी दिवसाला १ जीबी डेटा मिळत होता. तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दिवसाला १०० मेसेजेस फ्री मिळत होते. दरम्यान या प्लॅनमध्ये कॉलसाठी दिवसाला २५० मिनिटे आणि आठवड्याला १००० मिनिटांची लिमिट ठरवण्यात आली असल्यामुळे व्होडाफोन ग्राहकांना जास्त इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे.

...Read More

V. S. News
नवीन 50 व 200 रुपयांच्या नोटा पुन्हा तपासा

व्हीएस न्यूज - नवीन चलनी नोटा आणि नाणी तपासणी करावी, असे आदेश भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारला दिले आहेत. यात मुख्यतः 50 व 200 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. नवीन नोटा ओळखणे दृष्टिहिनांना कठीण आहे, असा आक्षेप न्यायालयाने घेतला आहे.

ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ ब्लाईंड ही स्वयंसेवी संस्था, एक कंपनी सेक्रेटरी आणि तीन वकीलांनी दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले. मुख्य न्यायाधीश गीता मित्तल आणि न्यायमूर्ती सी हरी शंकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. केंद्र आणि रिझर्व्ह बँकेने 200 रुपये आणि 50 रुपये किमतीच्या नवीन चलनी नोटांची पाहणी करावी कारण त्यांचा आकार व त्यावरील संकेत यांमुळे दृष्टीहीन लोकांना त्यांचा वापर करताना अडचणी येत आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

“हा मुद्दा तुम्ही (केंद्र सरकार, आरबीआय आणि याचिकाकर्ता) एकत्रितपणे सोडविण्याजोगा आहे. तुम्ही एकत्र बसा आणि तो सोडवा,” असे खंडपीठाने स्पष्ट केले. पूर्वी वापरात असलेल्या नोटांसारखा त्यांचा आकार का करता येत नाही, असा प्रश्नही न्यायालयाने केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) संजय जैन यांना विचारला.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी असून त्यापूर्वी आपले मत मांडण्यास न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले आहे. या नवीन 50 रुपयांच्या नोटांवरदृष्टिहिन लोकांनी अन्य नोटांपासून त्या वेगळ्या ओळखण्यासाठी कोणतीही खूण नाही, असे या याचिकेत म्हटले आहे. तसेच या नोटांची छपाई थांबवावी आणि विद्यमान नोटा रद्द कराव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजप निराश

व्हीएस न्यूज भाजपने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांना घातलेल्या महागड्या जॅकेटमुळे लक्ष्य केले. यावर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत असल्यानेच भाजप निराश झाल्याची टीका काँग्रेसने केली आहे. भाजप नेत्यांना राहुल गांधींच्या जॅकेटच्या किमती पाहण्याशिवाय दुसरे काम नाही का, अशा शब्दांत भाजपची खिल्ली उडवली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधी हे मेघालयामध्ये प्रचार करत आहेत. त्यांनी यावेळी घातलेले जॅकेट हे ब्रिटनच्या प्रसिद्ध ब्रँडचे असून त्याची किंमत सुमारे ७० हजार रुपये असल्याचा दावा भाजपने केला. यावर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भाजपच्या आरोपाची खिल्ली उडविली. ते जॅकेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना हवे असेल तर मी ७०० रुपयांमध्ये आणू शकते. त्यांच्या छातीचे ५६ इंचाशिवाय दुसरे माप आपल्याला माहीत नसल्याचेही त्यांनी उपरोधिकपणे म्हटले.

मला यावर हसावे की रडावे ते कळत नाही. राहुल गांधींच्या जॅकेटच्या किमती पाहण्याशिवाय भाजप कार्यकर्त्यांना दुसरे काम नाही का? भारतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आले असताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नावाचे जॅकेट घातले होते. त्यानंतर या जॅकेटचा कोट्यवधी रुपयांत लिलाव करण्यात आला होता. तेच सरकार राहुल गांधींच्या जॅकेटवरून राजकारण करत आहे, असेही चौधरी म्हणाल्या.

...Read More

V. S. News
दोन रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल

व्हीएस न्यूज - केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेल्या घोषणेमुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्यूटी घटवण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे पेट्रोल-डिझेल २ रूपयांनी स्वस्त झाले आहे. क्रूड तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्याने आणि भारतीय रूपयात आलेल्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. आयओसीच्या वेबसाईटवर मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीत दिल्लीत पेट्रोलचे दर २.९५ रुपयांनी वाढले आहे. दरम्यान पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी सरकारने २ रूपयांनी घटवून ४.४८ रूपये प्रति लिटर केली आहे. तेच डिझेलवरील एक्साईज ड्युटी २ रूपयांनी घटवून ६.३३ रूपये प्रति लिटर केली आहे.

...Read More

V. S. News
मला लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळेल कि नाही हे माहीत नाही

व्हीएस न्यूज भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर कोणते राजकीय पर्याय उपलब्ध असतील हे येणारा काळच ठरवेल, असे सुचक वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर आपला आगामी लोकसभा निवडणूकही लढवण्याचा निर्धार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. कारण आपल्याला भाजप तिकीट देईल का नाही याबद्दल त्यांनी संशय व्यक्त केली आहे.

तत्पूर्वी शत्रुघ्न सिन्हा यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंचामध्ये सामील झाले होते. यामध्ये अभिनेते आणि दुखावलेले अनेक राजकारणातील व्यक्ती सामील झाल्या आहेत. मला मत व्यक्त करण्याचा अधिकार भाजपमध्ये नसल्यामुळे या राष्ट्रीय मंचामध्ये मी सामील झालो असल्याचे सिन्हा म्हणाले. राजकारणात एक स्वतंत्र विचार मांडण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ उभे केले असल्याचे ते म्हणाले. पुढे बोलताना सिन्हा म्हणाले की, भाजप मला तिकिट देईल कि नाही हे मला माहीत नाही. परंतु, मला त्यांना हेच विचारावे लागेल की ते मला तिकीट का देऊ शकणार नाहीत. माझ्याजवळ मोठा मतदार वर्ग असल्यामुळे मला निवडणुकीची भीती नाही. त्यामळे मी काय निर्णय घ्यावा हा येणारा काळच ठरवेल असे सूचक वक्तव्य सिन्हा यांनी केले आहे.

...Read More

V. S. News
अर्थसंकल्प २०१८ : राष्ट्रपतींसह खासदारांच्या मानधनात होणार वाढ

व्हीएस न्यूज गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात राष्ट्रपतींसह संसदेतील लोकप्रतिनिधींच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार राष्ट्रपतींचे मानधन आता पाच लाख, उपराष्ट्रपतींचे मानधन ४ लाख आणि राज्यपालांना प्रत्येक महिन्याला ३ लाख एवढे घसघशीत मानधन मिळेल. जेटलींनी यावेळी खासदारांनाही नाराज केले नाही. २०१८ सालापासून खासदारांचे मानधनात वाढ करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच हे मानधन दर पाच वर्षांनी महागाईचा दर लक्षात घेऊन वाढवण्यात येईल, असेही जेटली यांनी स्पष्ट केले.

दरम्यान खासदार वरुण गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच खासदारांच्या वेतनात वाढ करू नये अशी मागणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे केली होती. सुमारे ४४० कोट्यधीश खासदार सोळाव्या लोकसभेत असल्यामुळे त्यांच्या वेतनात वाढ करू नये, अशा आशयाचे पत्र त्यांनी महाजन यांना दिले आहे. याचवेळी त्यांनी खासदारांनाही आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱ्या खासदारांनी आपले उर्वरित काळातील वेतन सोडावे, असे आवाहन केले होते. लोकसभेतील प्रत्येक खासदाराकडे सरासरी १४.६१ कोटी रूपयांची तर राज्यसभेतील प्रत्येक खासदाराकडे २०.१२ कोटींची संपत्ती आहे. अशावेळी महाजन यांनी लोकसभेच्या अध्यक्ष या नात्याने कोट्यवधींची संपत्ती असलेल्या खासदारांना वेतन घेऊ नये असे अपील करावे. वरूण यांनी आपल्या पत्रात एक उदाहरणही दिले आहे.

...Read More

V. S. News
आता कंपन्यांनाही काढावे लागणार ‘आधार कार्ड’, जेटलींकडून मोठी घोषणा

यापूर्वीच ३ लाखांहून अधिक बनावट कंपन्यांचे परवाने रद्द

कंपन्यांनाही काढावे लागणार आधार कार्ड

व्हीएस न्यूज - देशातील बहुतांश नागरिकांकडे स्वत:चा एक क्रमांक आहे म्हणजेच आधार कार्ड आहे. पण आता सरकार लवकरच कंपन्यांना त्यांचा स्वतंत्र ओळख क्रमांक देणार आहे. देशातील बहुतांश नागरिकांकडे स्वत:चा एक क्रमांक आहे म्हणजेच आधार कार्ड आहे. पण आता सरकार लवकरच कंपन्यांना त्यांचा स्वतंत्र ओळख क्रमांक देणार आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी वर्ष २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर करताना आता कंपन्यांनाही आधार कार्ड काढावे लागणार असल्याची घोषणा केली.

सरकार सर्व कंपन्यांना स्वत:चे एक ओळखपत्र देण्यासाठी आधारसारखी एक योजना आणणार आहे. सरकारला आधारच्या माध्यमातून सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार आणि सबसिडीतील गळती कमी करण्यास मदत झाली. आता सरकार आधार कार्डच्या माध्यमातून खासगी कंपन्यांमधील भ्रष्टाचार आणि बनावट कंपन्यांवर लगाम लावण्यासाठी सरसावले आहे. सरकारने यापूर्वीच तीन लाखांहून अधिक बनावट कंपन्यांचे परवाने रद्द केले आहेत. सरकारने नोटाबंदीनंतर संशयित व्यवहार झालेल्या कंपन्यांविरोधातमोठी कारवाई केलेली आहे.

...Read More

V. S. News
जाणून घ्या, नवीन बजेटमध्ये काय स्वस्त काय महाग

व्हीएस न्यूज - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला. गेल्या वर्षी १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर (जीसटी) लागू करण्यात आल्याने आधीच्या ८८ अर्थसंकल्पांपेक्षा यंदाचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी महागणार आणि काय स्वस्त होणार याकडे सर्वसामान्य माणसांचे लक्ष लागून असते. पण, जीसटीमुळे जवळपास यावरूनही पडदा उठला आहे. ज्या वस्तू जीसटीमध्ये मोडत नाहीत त्यांच्याच किंमतींमध्ये सर्वाधिक फरक दिसून येणार आहे. उदा. पेट्रोल आणि डिझेल.

काय स्वस्त

१. कच्चा काजूवरील सीमा शुल्क ५ वरुन अडीच टक्के करण्यात आल्याने काजू स्वस्त होतील.

२. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने इंधन २ रुपयांनी स्वस्त

३. आरोग्य सेवा स्वस्त.

काय महाग….

मोबाईलवरील सीमा शुल्क १५ टक्क्यांवरून वाढवून २० टक्के करण्यात आल्याने आता मोबाईल खरेदी महागणार आहे.

एलईडी, एलसीडी

तंबाखूजन्य वस्तूंवरील उत्पादन शुल्कात वाढ

फळं आणि भाज्यांचे ज्यूस

परफ्युम, सौंदर्यप्रसाधने आणि टॉयलेटरिज

ट्रक आणि बसचे टायर

सिल्क कपडा

गॉगल

चप्पल आणि बूट

इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड

खेळणी, व्हिडीओ गेम

क्रीडा साहित्य

मेणबत्त्या

खाद्यतेल

मासेमारी जाळं

खाद्यतेल / वनस्पती तेल जसे ऑलिव्ह ऑइल, शेंगदाणा तेल

...Read More

V. S. News
बजेट २०१८ : नोकरदारांच्या पदरी निराशा

व्हीएस न्यूज - सार्वत्रिक निवडणुकीपुर्वी मोदी सरकारकडून दिलासा मिळेल, अशी आशा लावून बसलेल्या नोकरदार वर्गाचा हिरमोड झाला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वैयक्तिक कररचनेत कोणताही बदल केलेला नाही. तर दुसरीकडे मोबाईल आणि टीव्हीवरील कस्टम ड्यूटी वाढवून सरकारने ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.

मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली गुरुवारी संसदेत सादर केला. वैयक्तिक कररचनेत बदल करुन मोदी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देईल, अशी आशा होती. मात्र, जेटलींनी कररचनेत कोणताही बदल न करता नोकरदार वर्गाची निराशा केली. वैयक्तिक कररचनेतील टप्पे जैसे थे आहे. यामुळे या वर्षीही पूर्वीप्रमाणेच अडीच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. तर अडीच ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के कर, पाच ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के, १० लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर भरावा लागणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवींवरील ५० हजार रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त असेल. या वर्षी ८.२७ कोटी लोकांनी कर भरला, गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ लाख करदाते वाढले, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी कस्टम ड्यूटी वाढवली आहे. मोबाईल फोन, टीव्ही वरील कस्टम ड्यूटी १५ टक्क्यांवरुन २० टक्क्यावर नेण्यात आली. याशिवाय शैक्षणिक उपकर ३ टक्क्यांवरुन ४ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. यातून अतिरिक्त ११ हजार कोटी रुपयांचे संकलन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा वेगाने विकास

चार वर्षांपूर्वी सत्तेवर येताना आम्ही जनतेला प्रामाणिक, स्वच्छ आणि पारदर्शी सरकार देऊ असे आश्वासन दिले होते. त्यावेळी भारताला भ्रष्टाचाराने ग्रासले होते. पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा सर्वाधिक वेगाने विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. भारतात व्यवसाय करणे आणखी सोपे झाले आहे, असे जेटलींनी सांगितले.

भारत जगातील सातवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

भारताचा आर्थिक विकास दर ७.५ टक्क्यांवर पोहोचला असून अर्थव्यवस्था २.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. भारत जगातील सातवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी आणि ग्रामीण क्षेत्रावर भर

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. २०१६-१७ या वर्षात २७५ मिलियन टन खाद्यान्न आणि लगभग ३०० मिलियन टन फळ आणि भाजीचे विक्रमी उत्पादन झाले, अशी माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट बाजारात विकता येत नाही. आम्ही २२ हजार ग्रामीण कृषी बाजारांचा विकास करु. तसेच ५८५ एपीएमसी मार्केटमधील विकासासाठी २ हजार कोटी रुपयांची तरतुद केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. उद्योग क्षेत्राप्रमाणेच शेतीमध्येही क्लस्टर पद्धतीने विकास केला जाईल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी ऑपरेशन्स ग्रीन ही मोहीम राबवली जाईल. तसेच बांबू हे हिरवे सोनेच आहे. त्यासाठी बांबू बांबू शेतीच्या विकासासाठी १,२९० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

गरीबांना २०२२ पर्यंत हक्काचे घर

गोरगरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. २०२२ पर्यंत प्रत्येक गरीब कुटुंबाचे हक्काचे घर असावे, असा आमचा संकल्प आहे. यासाठी शहरीभागात पंतप्रधान आवास योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २०१८ या वर्षात ५१ लाख घरे आणि २०१८-१९ या वर्षात ५१ लाख असे एकूण १ कोटी घरे बांधण्यात येतील. देशात सर्वात कमी सिंचन असलेल्या जिल्ह्यांसाठी २, ६०० कोटी रुपयांची तरतुद केली जाणार आहे.

आरोग्य आणि शिक्षण

राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमासाठी यंदा ९, ९७५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली. प्री- स्कूल ते बारावीपर्यंत समान शैक्षणिक धोरण असेल, असे जेटलींनी सांगितले. शिक्षणाचा दर्जा हा अजूनही चिंतेचा विषय असून शिक्षकांसाठी एकीकृत कार्यक्रमच राबवला जाईल, असे जेटली म्हणालेत. १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण तसेच डिजिटल शिक्षणावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. आदिवासी भागात एकलव्य शाळा सुरु केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. देशभरात २४ नवीन वैद्यकीय महाविद्यालये तसेच आरोग्य सुविधेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या आयुष्मान योजनेची घोषणाही त्यांनी केली.

रेल्वे आणि रस्ते

मोदी सरकारने रेल्वेसाठी यंदाच्या बजेटमध्ये १ लाख ४८ हजार रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय बडोद्यात रेल्वे विद्यापीठ सुरु केले जाणार आहे. ६०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. २५ हजार पेक्षा जास्त प्रवासी असलेल्या रेल्वे स्थानकांवर सरकते जिने बसवले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक ट्रेनमध्ये आणि स्थानकात वायफाय सुविधा दिली जाणार आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!