Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
अजिंक्य रहाणेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान

व्हीएस न्यूज – मराठमोळ्या अजिंक्य रहाणेसह रोहित शर्माला क्रिकेटमध्ये उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल राज्य सरकारकडून शिवजयंती दिनी शासनाचा ‘शिवछत्रपती’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आपल्या फेसबुक अकाउंटवर पुरस्कारासोबतचा एक फोटो अजिंक्य रहाणेने पोस्ट केला. तसेच आपल्याला या पुरस्कारासाठी पात्र मानल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

आतापर्यंत १९५ जणांची निवड गत तीन वर्षांच्या या पुरस्कारासाठी झाली. यामध्ये औरंगाबादची गुणवंत बुद्धिबळपटू साक्षी चितलांगे ही राज्य शासनाचा हा पुरस्कार पटकावणारी राज्यातील पहिली सर्वात युवा खेळाडू ठरली. १७ वर्षीय साक्षीने वयाच्या १५ व्या वर्षी २०१४-१५ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पटकावला.

रमेश तावडे, डॉ. अरुण दातार, बिभीषण पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. तसेच टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मासह अजिंक्य रहाणे, औरंगाबादच्या अंकित बावणेला हा पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय ऑलिम्पियन अॅथलीट ललिता बाबर, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे, रोव्हर दत्तू भोकनळचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

...Read More

V. S. News
मुंबई-पुणे दरम्यान धावणार जगातील पहिली हायपरलूप

व्हीएस न्यूज – मुंबई ते पुणेदरम्यान जगातील पहिली हायपरलूप धावणार असून दोन्ही शहरांतील १५० किमीचे अंतर तसे झाल्यास फक्त १४ ते २५ मिनिटांत कापले जाईल. हे अंतर गाठण्यासाठी सध्या तीन तास लागतात. रविवारी मुंबई-पुणे हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमला जोडण्याच्या करारावर व्हर्जिन ग्रुप आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्वाक्षऱ्या झाल्या.

पहिला हायपरलूप रूट सेंट्रल पुणे यास मेगा पोलिसासोबत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याची कोनशिला रविवारी बसवण्यात आली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गास समांतर हा मार्ग होऊ शकतो.

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेदरम्यान व्हर्जिन ग्रुपचे चेअरमन रिचर्ड ब्रेनसन यांनी म्हटले, महाराष्ट्र सरकारसोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हायपरलूप रूट इलेक्ट्रिक यंत्रणा आहे. कंपनीचा दावा आहे की, या तंत्राने १ हजार किलोमीटर ताशी वेगाने प्रवास करणे शक्य आहे. यापूर्वी आंध्रप्रदेश सरकारने विजयवाडा व अमरावती ही शहरे हायपरलूपने जोडण्यासाठीअमेरिकन कंपनीशी करार केला आहे.

...Read More

V. S. News
गावाने बंद केली अस्थिविसर्जनाची परंपरा

व्हीएस न्यूज - संगमनेरमधील एका गावाने हजारो वर्षापासून सुरू असलेली अस्थिविसर्जनाची परंपरा बंद केली असून नदीत अस्थी आणि रक्षा विसर्जन न करता घरासमोर फळ देणारे झाड लावून केले जाणारे आहेत.

संगमनेर तालूक्यातील या गावाचे नाव सावरगावतळ असे असून जेमतेम चार एक हजार ऐवढी गावाची लोकसंख्या असून चार वर्षांपूर्वी विवेकानंद युवा जागृती प्रतीष्ठानची गावातील तरूणांनी एकत्र येत स्थापना केली. अनेक योजना या मार्फत राबविल्या जातात. गावात यावर्षीपासून अस्थिविसर्जन बंद करण्यात आलंलेआहे. तर फळझाडाच्या मुळात मृतव्यक्तीच्या घरासमोर या अस्थिविसर्जित केल्या जात आहेत.

घरासमोर लावलेली झाडं आणि त्यात असलेल्या आपल्या व्यक्तीच्या आठवणी सतत मायेची सावली देणार असल्याची भावना येथील गावकरी व्यक्त करत आहेत. सहा महिन्यांपुर्वी वडीलांच्या निधनानंतर कारभारी गाडे यांनी घरासमोर लावलेल्या आंब्याच्या झाडाला आता बहर आला आहे. दिड वर्षापुर्वी सुरू झालेल्या या नव्या परंपरेनंतर ५१ कुटुंबांनी अशी झाडं लावली आहेत आणि या झाडांची ते काळजीही घेत आहेत. एका छोट्या गावातल्या तरूणांनी पर्यावरण रक्षणासाठी दिलेल्या या नव्या संकल्पनेचे सगळ्यांकडून कौतूक होत आहे.

...Read More

V. S. News
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची किल्ले शिवनेरीवर ‘ओली’ पार्टी

व्हीएस न्यूज - छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला, त्याच किल्ल्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दारूपार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मद्यधुंद वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दारुसह काही शिवप्रेमींनी रंगेहात पकडले आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना रात्री अटक करुन जामिनावर त्यांची सुटकाही केली. हा धक्कादायक शिवजयंतीच्या पुर्वसंध्येलाच प्रकार उघडकीस आल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणात काही पर्यटक गडकिल्ल्यांवर सोबत दारू घेऊन जात असल्याच्या तक्रारी आहेत, मात्र येथे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीच दारू प्यायला सुरूवात केली आहे.

...Read More

V. S. News
एअरटेल देणार ९ रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट

व्हीएस न्यूज - दररोज नवनव्या ऑफर्स टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्या सादर करत असून रिलायन्स जिओ पासून एअरटेल,वोडाफोनपर्यंत सर्वांनी आपल्या प्लान्सचे दर कमी केले आहेत. त्यात आता ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एअरटेलने नवी ऑफर सादर केली आहे. ग्राहकांना ज्यामध्ये खूपच स्वस्तात अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे.

प्रीपेड ग्राहकांसाठी एअरटेलने केवळ ९ रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. या प्लानची खास गोष्ट अशी की, ग्राहकांना जे १०० रुपयांच्या प्लानमध्ये मिळते ते सर्वकाही ९ रुपयांत मिळणार आहे. एअरटेलच्या ऑफरमध्ये प्रीपेड ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉलिंग, १०० SMS आणि १०० एमबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. हा सर्वात स्वस्त प्लान असल्याचे म्हटले जात आहे. सर्व ऑपरेटिंग सर्कल्समध्ये एअरटेलचा हा प्लान उपलब्ध असणार आहे. युजर्स ऑफिशियल वेबसाईट व्यतिरिक्त इतर ठिकाणी रिचार्ज करुन हा प्लान घेऊ शकतात. या प्लानची वैधता एका दिवसाची आहे.

...Read More

V. S. News
इच्छामरण मागणाऱ्या दाम्पत्याने आखला स्वतःच्या हत्येचा प्लान

व्हीएस न्यूज – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मुंबईतील नारायण लवाटे आणि इरावती लवाटे या वृद्ध दाम्पत्याने इच्छा मरणाची मागणी केली आहे. आता इच्छामरण मिळाले नाही तर नारायण लवाटे इरावती लवाटेंची हत्या करतील आणि त्यानंतर लवाटे मृत्यूदंडाची शिक्षा भोगतील आणि मरण पत्करतील, असे माध्यमांना त्यांनी सांगितले आहे.

८६ वर्षांचे नारायण लवाटे तर ७९ वर्षांच्या इरावती लवाटे या आहेत. इच्छामरणाची मागणी राष्ट्रपतींकडे करून त्यावर काहीही उत्तर न आल्याने या दाम्पत्याने आता स्वतःच्या हत्येची योजना आखली आहे. इरावती यांनी स्वतःच्या पतीला पत्र लिहून स्वतःला संपवण्याची मागणी केली आहे. पत्नीला मारल्यानंतर पतीलाही मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल, असे त्यांचे मत आहे.

चर्नीरोडजवळच्या ठाकुरद्वारमध्ये लवाटे दाम्पत्य राहते. या दाम्पत्याला मुल-बाळ नाही आहेत. आपला वयानुसार समाजासाठी काहीही उपयोग नसून स्वतःचा सांभाळ करण्यासाठी आपण आता सक्षम नसल्याचे या दाम्पत्याला वाटत आहे. केईएम हॉस्पिटलने अरूणा शानबाग यांना इच्छामरण मिळावे, यासाठी दया याचिका दाखल केली होती ते वाचूनच या दाम्पत्याने इच्छामरणाची याचिका दाखल केली.

या दाम्पत्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे २१ डिसेंबर रोजी इच्छामरणाची मागणी केल होती. आम्ही ३१ मार्च २०१८ पर्यंत उत्तराची वाट पाहू, असे या जोडप्याने पत्रात नमूद केले होते. पण पत्र पाठवून दोन महिने उलटत असून त्यांच्या पत्राला गांभीर्याने घेतले नसल्याने त्यांनी एकमेकांच्या हत्येची योजना आखली आहे.

...Read More

V. S. News
उद्योजकांनी सामाजिकभान जपावे - दिगंबर सुतार

एकाच वेळी 149 कॉपीराईट नोंदणीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

व्हीएस न्यूज - विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग-व्यवसाय उभे करून नोकरीच्या संधी उपलब्‍ध कराव्यात. उद्योजक होण्यासाठी निरंतर अभ्यास, मोठी स्वप्न बघा, कार्याचा ध्यास घ्या, सात्विकता, सृजनशीलता वाढवावी, आपण हाती घेतलेल्‍या कार्यास कठोर परिश्रमाची जोड द्या, याबरोबरच सामाजिकभान असणे हे सुध्दा आवश्यक असून, या बाबींची जीवनात अंमलबजावणी केली तर हमखास यश मिळेल. पीसीसीओईआरने नाविन्यपूर्ण कल्‍पना तसेच सृजनशीलता सिध्द केल्‍यामुळेच कॉपीराईट नोंदणीची लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली, असे प्रतिपादन क्‍वालिटी इंजिनिअरिंगचे संचालक दिगंबर सुतार यांनी व्यक्‍त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे 12 जानेवारी 2018 रोजी एकाच वेळी 149 कॉपीराईटची नोंदणी करण्यात आली. या विक्रमाची नोंद लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. त्यानिमित्त पीसीसीओईआर महाविद्यालयास प्रमाणपत्र प्रदान केले. प्राचार्य डॉ. हरिष तिवारी आणि त्‍यांच्या सहकारी प्राध्यापकांचा वल्‍ड रेकॉर्ड इंडियाचे चिफ एडिटर पवन सोळंकी यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्‍यावेळी सुतार बोलत होते. यावेळी एमसीइडीचे कार्यक्रम संचालक हेमंत भागवत, पीसीईटीचे ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलचे डीन प्रा. शितलकुमार रवंदळे, संयोजिका प्रा. अर्चना चौगुले, प्रा. किरण नापते, प्रा. सुदर्शन बोबडे, प्रा. निलेश कोरडे, प्रा. स्नेहा पावरे, प्रा. मयुरा येवले, प्रा. सोनाली कणसे, प्रा. श्याम मानकर, प्रा. महेंद्र साळुंखे, प्रा. चंदशेखर भावसार, प्रा. विजयलक्ष्मी कुंभार, प्रा. रुपाली सोनवणे, प्रा. मिनल बोडके, प्रा. स्मिता लांडगे आदी उपस्थित होते. यावेळी आंत्रप्रेनरशीप अवेरनेस कॅम्पचे उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना हेमंत भागवत म्‍हणाले की, जागतिक पातळीवरील पेटंट घेणारांची संख्या विचारात घेता भारतामध्ये हे प्रमाण खूप कमी आहे. पीसीसीओईआरने देशातील महाविद्यलयांपुढे नवा आदर्श घालून दिला आहे. पीसीसीओईआर विद्यार्थ्यांची सृजनशीलता, नाविन्यपूर्ण कल्‍पना यांना उभारी देण्याचे कार्य करत आहे, याबद्दल विशेष कौतुक केले. प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी कॉपीराईट नोंदणी करण्यामागील भूमिका विषद केली. तसेच पीसीसीओईआरने आतापर्यंत 190 पेटंटची नोंदणी केल्‍याचे त्‍यांनी सांगितले. यावेळी कॉपीराईट नोंदणी कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. अर्चना चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्‍त केले. या कार्यक्रमाच्या आयोजनास पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, शांताराम गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिपप्रज्वल करुन कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मानसी कुरकुरे, आभार किरण नापटे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...Read More

V. S. News
साडीचा आग्रह नको, पंजाबी ड्रेस हवा

व्हीएस न्यूज - साडी म्हणजे भारतीय पोशाख. मात्र खो-खो, कबड्डी, सामुदायिक कवायती आणि योग साडीमध्ये कसा करायचा, या विचाराने राज्यभरातील शिक्षिका अस्वस्थ आहेत. साडीचा अनाठायी आग्रह सोडून ड्रेस घालण्याबाबत राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक काढावे, यासाठी चळवळ जोर धरू लागली आहे. अ‍ॅक्टिव्ह टीचर्स फोरमच्या (एटीएफ) माध्यमातून मागील आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या लढय़ाची राज्य सरकारने मात्र अद्यापही नोंद घेतलेली नाही.

सरकारी वा खासगी शाळांमधील शिक्षिकांनी शाळेत साडीच घालून यावे, असा काही नियम नाही. जिल्हा परिषदेच्या सेवाशर्तीमध्ये तशी तरतूदही नाही. साडीची सक्ती सरकारी अथवा खासगी शाळांमधील शिक्षिकांना कोणीही करू शकत नाही. साडीबरोबरच त्या ड्रेसदेखील वापरू शकतात. राज्यातील काही जिल्हा परिषद शाळांनी केलेली विशिष्ट गणवेशाची सक्ती न्यायालयाने रद्द ठरविली आहे. तथापि अनेक शाळेत शिक्षिकांनी साडीच घालून शाळेत यायला हवे, असा अनाठायी आग्रह केला जातो. काही शिक्षण संस्थांनी तर शिक्षिकांनी विशिष्ट रंगाची साडी नेसूनच शाळेत यावे, असे आदेशच काढले आहेत. अशीच सक्ती अनेक सरकारी प्राधिकरणाच्या शाळांमध्येही पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे एकंदरीत सगळ्याच शैक्षणिक कामकाजावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.

राज्यभरातील लाखो शिक्षिकांच्या मनातील या भावनांना अ‍ॅक्टिव्ह टीचर्स फोरमने राज्य सरकापर्यंत पोहोचविले आहे. अनेक शिक्षिकांच्या स्वाक्षरीसह पुणे येथील शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांना साडीमुळे होणारा कोंडमारा आणि त्याचा शैक्षणिक कामकाजावरील परिणाम निदर्शनास आणून देण्यात आला आहे. टेमकर यांना राज्यातील अनेक महिलांनी या आशयाचे लेखी निवेदन सादर करून शाळेत ड्रेस वापरता यावा, यासाठी शासनाने सुस्पष्ट असे परिपत्रक काढावे असा आग्रह केला आहे. आता त्याला आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी शिक्षिकांच्या निवेदनाला साधे उत्तरही मिळाले नाही. शिक्षण विभागाने वेळ काढून एवढे खुलासेवाजा परिपत्रक काढायला हवे, जेणेकरून शासन याप्रश्नी संवेदनशील असल्याचा संदेश सर्वस्तरात जाईल; अन्यथा महिलांना बंडखोरी करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारादेखील या निवेदनात देण्यात आला आहे. पुणे, नगर, बारामती, अकोले, उस्मानाबाद, नाशिक, कोपरगाव, संगमनेर, हवेली, पाथर्डी अशा ठिकाणी हे निवेदन शिक्षण उपसंचालकांकडे सादर केले आहे.

...Read More

V. S. News
मंत्रालयासमोर वृद्धेचा विष प्राशनकरून आत्महत्येचा प्रयत्न

व्हीएस न्यूज - पुन्हा मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्ध महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांनी तात्काळ त्या महिलेला सेंट जॉर्ज रूग्णालयात दाखल केले आहे. शकुंतला विठ्ठल झाल्टे असं या वृद्ध महिलेचे नाव आहे. या महिलेने पत्र लिहून मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप कळू शकले नाही. गेल्या काही महिन्यांपासून मंत्रालयात किंवा मंत्रालय परिसरात आत्महत्येचे वेगवेगळे प्रयत्न झाल्याचे बघायला मिळाले. यातील धर्मा पाटील यांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतरही आत्महत्येचे काही प्रयत्न झालेत. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे.

राज्यमंत्री प्रविण पोटे यांच्याकडून चौकशी...

या घटनेची दखल घेत राज्यमंत्री प्रविण पाटील यांनी थेट रुग्णालय गाठून शकुंतला झाल्टे यांची भेट घेतली. शकुंतला झाल्टे यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती घेवून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

...Read More

V. S. News
शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमना पकडले

व्हीएस न्यूज – महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणाऱ्या अहमदनगरचे उपमहापौर असलेल्या श्रीपाद छिंदमना अटक करण्यात आली असून शिवाजी महाराजांबाबत छिंदम यांनी अपशब्द कसे काढले याची एक ऑडिओ क्लिप शुक्रवारी व्हायरल झाली. भाजपने ज्यानंतर त्यांचा राजीनामा घेत पक्षातून हकालपट्टीही केली. छिंदमना त्यानंतर अटक करण्यात आली आहे. कारने श्रीपाद छिंदम पळून जात होते त्यांनी त्यावेळी सोलापूर रोड भागात असलेल्या शिवाराचाही आधार लपण्यासाठी घेतला. पण त्यांचा नागरिकांनी पाठलाग केला आणि पोलिसांना बोलावले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ज्यानंतर छिंदमना अटक केली.

राज्यात सोमवारी शिवजयंती असल्याने उत्साहाचे वातावरण आहे अशात अहमदगरमध्येही शिवजयंतीची तयारी सुरु होती. पण छिंदम यांनी शिवाजी महाराज आणि शिवजयंती याबाबत अत्यंत हीन दर्जाचे शब्द महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यासोबत फोनवर बोलताना वापरले. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अहमदनगरमध्ये तणाव निर्माण झाला तसेच औरंगाबादमध्येही या प्रकरणाचे पडसाद उमटले.

या संदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार याबाबत शिवसेनेचे नगरसेवक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार छिंदम यांच्याविरुद्ध अश्लील व अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा तोफखाना पोलिसांनी दाखल केला आहे. छिंदम गुन्हा दाखल होण्यापूर्वीच संतप्त व तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहून फरार झाले. पण त्यांचा लोकांनी पाठलाग केला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान छिंदमला शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. छिंदमची रवानगी एक मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. छिंदमची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर अहमदनगर भाजपमध्ये उभी फूट पडली.

...Read More

V. S. News
राज्य शासनाचा मराठीचा वापर वाढवण्यावर भर – विनोद तावडे

व्हीएस न्यूज – सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना मराठी भाषेच्या वापरासाठी आग्रह जरूर असला पाहिजे, पण मराठीच्या वापराची सक्ती करता येणार नसल्यामुळे राज्य शासनाचा आग्रह करून मराठीचा वापर वाढवण्यावर भर राहणार असल्याचे सांगितले.

राज्य शासनाने माहिती तंत्रज्ञान, सरकारी कार्यालय आणि विज्ञान विषयक संशोधन या क्षेत्रातील मराठी भाषेच्या वापराची सद्य:स्थिती या विषयावर श्वेतपत्रिका प्रकाशित करावी, अशी मागणी बडोदा येथे सुरू असलेल्या साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात करण्यात येणार असून तावडे यांना त्या संदर्भात विचारले असता ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली. केंद्र सरकारच्या अखत्यारीत भाषेच्या अभिजात गरजेचा मुद्दा असून, लवकरच त्या संदर्भात निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाने किमान एक कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य साहित्य संमेलनासाठी करावे आणि अर्थसंकल्पात या रकमेची तरतूद करावी, अशी मागणी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी वारंवार केली होती. तावडे यांचे त्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी, साहित्य संमेलनासाठी तरतूद वाढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आणि त्याविषयी अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी पुढाकार घेऊ, असेही स्पष्ट केले.

...Read More

V. S. News
शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला होणार

व्हीएस न्यूज – मागील ३ वर्षांपासून शिक्षण विभागाच्या धोरणामुळे रखडलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला १८ फेब्रुवारीचा मुहूर्त मिळाला आहे. यासाठीचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे. राज्यभरातील ६ हजार १७७ केंद्रांवर पाचवी-आठवीची ही परीक्षा घेतली जाणार असून एकूण ८ लाख ५८ हजार ४६५ विद्यार्थी ही परीक्षा देतील.

आधी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीच शिक्षण विभागाक़डून शिष्यवृत्ती परिक्षा घेण्यात येत होती. त्यानंतर २०१५ पासून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी)साठी ४ लाख ८८ हजार ४७० तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) परीक्षेसाठी ३ लाख ५८ हजार ४६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव ढेरे यांनी दिली.

शालेय शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेत आमूलाग्र बदल करण्यासाठी यापूर्वी सुरू असलेल्या चौथी आणि सातवीच्या वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करून त्या पाचवी आणि आठवीच्या वर्गातील मुलांसाठी घेण्याचा निर्णय ३ वर्षांपूर्वी घेतला होता. या निर्णयानंतर या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यासाठीच्या समित्या यांच्या गोंधळामुळे मागील ३ वर्षे या शिष्यवृत्ती परीक्षा अडचणीत आल्या होत्या.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!