Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
जामखेड येथील राष्ट्रवादीच्या नऊ नगरसेवकांवर टांगती तलवार.

व्हीएस न्यूज - जामखेड नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसपार्टी कडून निवडून आलेले दहा पैकी नऊ नगरसेवकांनी नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला मतदान केले.त्यामुळे नऊ नगरसेवकांवर राष्ट्रवादीने शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे राष्ट्रवादीच्या नऊ नगरसेवकांवर टांगती तलवार उभी राहिली आहे.

जामखेड नगरपरिषदेत एकुण २१ नगरसेवक आहेत या मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस कडुन दहा, भाजप कडून तीन, म न से एक शिवसेना चार व अपक्ष तीन असे बलाबल होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तात्कालिन नेते माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपचे तीन व एक अपक्ष नगरसेवक वगळून सतरा नगरसेवकांनी मोट बांधून अपक्ष निवडून आलेल्या प्रीती विकास राळेभात तर उपनगराध्यक्ष पदी मेहरूनिस्सा कुरेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. यामुळे जामखेड नगरपरिषदेत माजी मंत्री सुरेश धस यांना एकहाती सत्ता मिळवण्यास यश आले. मात्र दिड वर्षातचत आंतर्गत वादा मुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या विद्या राजेश वाव्हळ यांच्यासह नगरसेवक गुलशन हीरामन अंधारे,गणेश उत्तमराव आजबे,, खान फरिदा असिफ, निखिल मुकूंद घायतडक, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेभात,संदीप सुरेश गायकवाड, सुमन अशोक शेळके, या नऊ नगरसेवकांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी केली.

पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नगरसेवकांना बरोबर घेऊन सतरा नगरसेवक एकञ आणले. नगरअध्यक्षा प्रती राळेभात व उपनगराध्यक्षा कुरेशी यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठराव दाखल होण्यापूर्वीच नगराध्यक्षा प्रीती राळेभात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर भाजपच्या नगरअध्यक्षा पदासाठी नऊ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमांना दांडी मारली होती. जाहीरपणे भाजप चिन्ह आसलेले डीजीटल बोर्ड छापून लावण्यात आले.या प्रकरणाचा अहवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पाठवला होता. या मुळे वरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडुन आलेल्या या नऊ नगरसेवकांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.नऊ नगरसेवकांन विरोधात स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यालयात तक्रारी केल्या होत्या.त्यानुसार वरीष्ठ पातळीवरुन कमीटीने या कारवाई करण्यासाठी पक्षविरोधी कारवाईचा अहवाल मागवला आहे. पक्ष विरोधात भुमिका घेतल्याने नऊ नगरसेवकांन बाबत पुरावे गोळा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनकडे दाखल करण्यात येणार आहे.त्यानंतर लगेच त्यांच्यावर कारवाई होणार आहे.अशी माहिती राष्ट्रवादी चे प्रभारी तालुका अध्यक्ष राजेंद्र कोठारी यांनी दिली आहे.
...Read More

V. S. News
भिडे गुरुजी व एकबोटे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत

व्हीएस न्यूज - कोरेगाव भीमा प्रकऱणी हिंदू आघाडी समितीचे मिलिंद एकबोटे व शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने पिंपरी पोलिसांना केली.

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे संजय जढर, गणेश भुजबळ, अतुल माने, धनाजी मस्के, संभाजी बालघरे, संतोष वाघ, सचिन थोरात, गणेश लांडगे, अक्षय तापकीर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या वेळी संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे हे दोघेही उपस्थित नव्हते. तसेच त्यांचा या घटनेशी काडीमात्र संबंध नाही. घटनेच्या दिवशी भिडे गुरूजी हे सांगलीमध्ये होते. तसेच एकबोटे हे देखील परिसरात नव्हते. त्यांच्यावरील आरोप हे निराधार आहेत. त्यांच्या कार्याला मिळत असलेला प्रतिसाद सहन होत नसल्याने हे आरोप केले जात आहेत असे निवेदनात म्हटले आहे.

संघटनेचे काम जातीय दृष्टिकोन न बाळगता केले जाते. तसेच कोरेगाव भीमा हा विषय कधीच संघटनेच्या कार्याचा भाग नव्हता. यामुळे दोघांवर केलेले आरोप पूणर्पणे निराधार असून त्यांच्यावरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरूणाला मारहाण

व्हीएस न्यूज - तरूणाला रस्त्यावर आडवून त्रिकुटाने दारू पिण्यास दोनशे रूपये मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने त्रिकुटाने तरूणाला लाकडी दांडक्याने मारहाण करीत खिशातील रोख 12 हजार रूपये व दोन मोबाईल असा18 हजारांचा ऐवज हिसकावून नेला. ही घटना शनिवारी रात्री पावणे आठ वाजता भोसरी, एमआयडीसीतील क्वालिटी सर्कल कॅन्टीन समोर घडली.

याप्रकरणी बालाजी दुर्गादास पवार (वय-30, रा. बालाजीनगर वसाहत भोसरी) याला अटक केली असून त्याचे दोन साथीदार फरार आहेत. श्रावण गव्हाणे (वय-21, रा. बालाजीनगर, भोसरी) याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण हा शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास कामावरून घरी जात होता. क्वालिटी सर्कल कॅन्टीन जवळ तिघांनी त्याची दुचाकी अडविली. आरोपींनी त्याच्याकडे दारू पिण्यास दोनशे रूपये मागतिले. श्रावणने पैसे देण्य़ास नकार दिल्याने चिडलेल्या आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण करीत त्यांच्या खिशातील रोख 12 हजार रूपये व दोन मोबाईल असा 18 हजार रूपये किंमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. फौजदार एस. एन. आहेर अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
जातीपातीची भांडणे लावणाऱ्यांना शिवसेना सोडणार नाही – उद्धव ठाकरे

व्हीएस न्यूज - ज्यांचा कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार घडवण्यात पुढाकार होता, जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पुढे यावे. शिवसेना जातीपातीमध्ये भांडणे लावून राजकीय पोळी भाजणाऱ्यांना कदापी सोडणार नाही, असा इशारा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. रविवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईच्या सीमेवर बांधण्यात आलेल्या चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, राज्यात जे अदृश्य हात दंगली घडवत आहेत, त्यांच्यावर सरकार कारवाई करत नसेल तर ते काम शिवसेना करील. काहींचे धर्मांतर झाले असले तरी रक्तातील धर्म संपलेला नसल्यामुळे राजकीय स्वार्थ साधू पाहणाऱ्या नेत्यांच्या इशाऱ्यावर समाजाने हिंसाचार घडवणे योग्य नाही. राज्यातील हवा गुजरात निवडणुकीनंतर बदलली असून राज्यातील थंडी कमी होऊन गर्मी देखील वाढली आहे. दिल्ली काबीज केली, आता तुम्हाला मुंबई काबीज करायची आहे. पण मुंबई तुम्हाला काबीज करू देणार नाही, ही शिवसेनेची शपथ आहे, असा थेट इशाराच उद्धव यांनी भाजपला नाव न घेता दिला.



...Read More

V. S. News
भीमा कोरेगावची घटना निंदनीय - मारुती भापकर

व्हीएस न्यूज - भीमा कोरेगाव येथे घडलेली घटना निंदनीय आहे. त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. परंतू त्या घटनेनंतर बुधवारी 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी प्रामाणिक प्रयत्न केले ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. परंतू शहरातील सर्व समाजातील तरुण वर्गांमध्ये हिंसक जातीयवादास हातभार लागेल अशी विचारसरणी वाढत आहे हे चिंताजनक आहे. असे मत माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी व्यक्त केले.

शनिवारी (दि. 6 जानेवारी 2018) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींची ‘सामाजिक सलोखा बैठक’ घेण्यात आली. यावेळी माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, मानव कांबळे, संयोजक आनंद कुदळे, रामदास मोरे, प्रताप गुरव, सोलमन पास्टर, चंद्रकांत डोके, प्रदिप पवार, संतोष जोगदंड, सिध्दीकी शेख, प्रताप सोनवणे, सुरेश गायकवाड, गिरीष वाघमारे, गुलाब पानपाटील, संदीप कुदळे, महेश भागवत, दिलीप गायकवाड, आकाश कांबळे, अब्दुल शेख आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भापकर म्हणाले की, शहरातील सामाजिक सलोखा वाढीस लागण्यासाठी शहरातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध पक्षांच्या पदाधिकारी व मुख्य कार्यकर्त्यांनी आप आपल्या परिसरात जाऊन तरुणवर्गाचे सामाजिक एकोपा वाढीस लागावा यासाठी प्रबोधन करावे, असे भापकर म्हणाले.

...Read More

V. S. News
गांधींच्या हत्येचा फेरतपास नाही

व्हीएस न्यूज सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या आपल्या अहवालात न्यायमित्रांनी (एमीकस क्युरी) महात्मा गांधी यांच्या हत्येचा पुन्हा एकदा नव्याने तपास होणार नसल्याचे म्हटले आहे. माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरेंद्र शरण यांची न्यायमित्र म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नेमणूक केली होती. गांधी हत्याकांडाशी निगडीत विविध दस्तऐवजांचा त्यांनी तपास केला आणि सर्वोच्च न्यायालयाला गांधीच्या हत्येचा पुन्हा एकदा तपास करण्याची गरज नसल्याची शिफारस केली. नथुराम गोडसेनेच महात्मा गांधीची हत्या केली असून अज्ञात व्यक्तीचा यात हात नव्हता असे शरण यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शरण यांना यासंबंधीचे निर्देश अभिनव भारतचे पंकज फडणीस यांच्या याचिकेवर दिले होते. एका अज्ञात व्यक्तीने महात्मा गांधी यांची हत्या केली होती. त्यांच्यावर ‘चौथी गोळी’ त्या अज्ञात व्यक्तीनेच झाडली होती. कधीच या चौथ्या गोळीचे रहस्य सुटले नाही, असा दावा करत पुन्हा नव्याने याचा तपास व्हावा अशी मागणी फडणीस यांनी आपल्या याचिकेत केली होती. शरण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपला अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवला.

...Read More

V. S. News
‘कलम ३७७’बाबत पुनर्विचार करणार - सर्वोच्च न्यायालय

व्हीएस न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना फौजदारी गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानातील कलम ३७७ बाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला असून हे प्रकरण न्यायालयाच्या घटना पीठाकडे वर्ग करण्यात आले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचा २००९ मधील प्रौढ व सज्ञान व्यक्तींमधील परस्परसंमतीने असलेले समलैंगिक संबंध वैध ठरवणारा निर्णय डिसेंबर २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला होता. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना समलिंगी संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हाच असून त्यासाठी जन्मठेपेची तरतूद कायम असल्याचे म्हटले होते. संसदेला ३७७ हे कलम काढून टाकण्याचे अधिकार असून पण ते रद्द होत नाही तोपर्यंत समलैंगिक संबंध हा गुन्हाच आहे, असे न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयात डिसेंबर २०१३ मधील या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिका एलजीबीटी कम्यूनिटीतील पाच जणांनी दाखल केल्या होत्या. आमच्या लैंगिक दृष्टीकोनाला सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा ठरवल्याने आम्ही रोज भीतीच्या सावटात जीवन जगत आहोत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. सोमवारी या याचिकांवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकाल दिला. खंडपीठाने डिसेंबर २०१३ मधील निर्णयाबाबत पुनर्विचार करु, असे स्पष्ट करत हे प्रकरण घटना पीठाकडे वर्ग केले.

...Read More

V. S. News
महसूल विभाग लाचखोरीत अव्वल

व्हीएस न्यूज - राज्याचा महसूल विभाग २०१७ या वर्षात लाचखोरीत अव्वलस्थानी असून पोलीस एसीबीच्या नागपूर परिक्षेत्रात लाचखोरीत टॉपवर आहेत. २०१७ मध्ये २०१६ च्या तुलनेत राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तब्बल ११० सापळे कमी झाले. २०१६ मध्ये राज्यात एसीबीचे एकूण ९८५ सापळे होते, तर एसीबीचे राज्यात २०१७ या वर्षात एकूण ८७५ सापळे यशस्वी झाले. राज्यातील भ्रष्टाचारी या आकड्यांवरुन कमी झाला, की एसीबीच्या सापळ्यातून लाचखोर निसटले, हा चर्चेचा विषय आहे. राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा २०१७ या वर्षातील अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. राज्यात या अहवालानुसार गेल्यावर्षी एसीबीचे एकूण ८७५ सापळे यशस्वी झाल्याचा उल्लेख आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लाचखोरीच्या या प्रकरणांमध्ये बाजी मारली. तर नागपूर विभागात लाचखोरीमध्ये पोलीस अव्वलस्थानी आहेत.

...Read More

V. S. News
उत्तर प्रदेशमधील महिला झुरका मारण्यात टॉपवर

व्हीएस न्यूज - उत्तर प्रदेशमधील तरुणी आणि महिलांवर चमकत्या आधुनिक जीवनशैलीचा वाईट प्रभाव पाडत असून आवड म्हणून सुरू झालेली धूम्रपानाची सवय आता या महिला आणि तरुणींचे व्यसन बनत आहे. ग्लोबल एडल्ट टोबॅकोने १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांचे सर्वेक्षण केले. या गोष्टीचा खुलासा यामध्ये झाला असून उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी ६ वी महिला धूम्रपान करत आहे.

ग्लोबल एडल्ट टोबॅको सर्वे (गेट्स) २०१६-१७ ची फॅक्ट शीट लखनौमध्ये मागील काही दिवसात सादर करण्यात आली. जे आकडे या अहवालात देण्यात आले होते. तरुणी आणि महिलांना लागलेले हे धुम्रपानाचे व्यसन कसे सोडविता येईल यावर विचार करण्यास या अहवालाने भाग पाडले आहे.

या अहवालाची विस्ताराने माहिती देताना मुंबईहून आलेल्या कंसल्टेंट सुलभा परशुरामन यांनी सांगितले, की १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना गेट्स-२ सर्वेमध्ये सहभागी करुन घेण्यात आले होते. केंद्रीय परिवार कल्याण विभाग, डब्लूएचओ व टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईद्वारा मल्टी स्टेज सँपलचे डिजाईन तयार करण्यात आले आहे. यामध्ये देशभरातून ७४,०३७ लोकांचे आणि यूपीतून १,६८५ पुरुष व १,७७९ महिलांना सहभागी करण्यात आले होते.

परशुरामन यांचा अहवाल आपण मानला तर असे दिसून येते, की सध्या उत्तर प्रदेशमध्ये वर्ष २००९-१० मध्ये झालेल्या सर्वेपेक्षा धूम्रपान करणा-यांची संख्या वाढलेली दिसून येते. तंबाकूजन्य उत्पादनांचा उपयोग करणाऱ्या पुरुषांची सरासरी संख्या यामध्ये ५२ टक्के आहे. तेच प्रमाण महिलांमध्ये १७.७ टक्के इतके आहे. तंबाकू अथवा तिचे कोणात्यातरी स्वरूपाचे सेवन अहवालानुसार प्रत्येक ६ वी महिला करत आहे. गुटखा, खैनी, बीडीचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये मजूर महिलांची संख्या जास्त असून सुरुवातीला शौक म्हणून सुरु केलेली ही सवय आता त्यांचे न सुटणारे व्यसन बनत चालल्याचे या अहवालातून दिसून आले आहे.

तंबाखु उत्पादनाच्या प्रचाराची सरासरी वर्ष २००९-१० मध्ये १०.३ होती, आता ती वाढून १६.३ झाली आहे. उत्तर प्रदेश तंबाकू उत्पादनांचे सेवन करण्यात १२ व्या क्रमांकावर आहे. एकुण सरासरीचा विचार केला तर त्रिपुरामधील ६४.५ टक्के लोक तंबाकू उत्पादनांचे सेवन करत आहेत. मिझोरममध्ये ५८.७ टक्के लोक याचे सेवन करत आहेत.

...Read More

V. S. News
दुबईत एका भारतीयाला लागली करोडोची लॉटरी

व्हीएस न्यूज - दुबईत नोकरी करणारा हरिकृष्णन व्ही. नायर हा भारतीय ‘दुबई रॅफेल ड्रॉ’ या लॉटरीचे पहिल्या क्रमांकाचे जॅकपॉट बक्षीस जिंकल्याने एका रात्रीत कोट्यधीश झाला. बक्षिसापोटी १३ दशलक्ष संयुक्त अरब अमिरातीचे दिरहम (सुमारे २०.६७ कोटी रुपये) एवढी रक्कम नायर यांना मिळाली.

रविवारी या लॉटरीची सोडत आबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काढण्यात आली. डिसेंबरमध्ये ‘दि बिग टिकेट ड्रीम १२’ या मालिकेतील या लॉटरीच्या तिकिटांची विक्री केली गेली होती. ऑनलाइन किंवा विमानतळांवर या लॉटरीची तिकिटे खरेदी करण्याची सोय होती. ५०० दिरहमचे एक तिकीट घेतल्यास, त्यावर आणखी एक तिकीट मोफत दिले जात होते. नायर यांना मोफत मिळालेल्या तिकिटावर हे जॅकपॉटचे बक्षीस लागले.

...Read More

V. S. News
लालूंना तुरुंगात मिळणार ९३ रुपये रोजंदारी

व्हीएस न्यूज - बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना देशातील बहुचर्चित चारा घोटाळय़ातील देवघर कोषागार भ्रष्टाचार प्रकरणी साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालूंना या कारावासात माळीचे काम करावे लागणार असून त्यातून दररोज ९३ रुपये पगार मिळणार आहे.

हजारीबागच्या खुल्या कारागृहात लालूंना ठेवण्यात आले असून ‘राजद’ने त्यांच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. ३ वर्षाहून कमी शिक्षा लालूंना मिळाली असली तर विशेष न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला असता पण ३ वर्षाहून अधिक शिक्षा झाल्याने त्यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागणार आहेत. लालूंनी शिक्षा सुनावल्यानंतर मोदी सरकारविरोधात ट्विटरद्वारे एक पत्र लिहीले असून, मोदी हुकूमशाह असल्याचा आरोप यातून केला आहे.

ज्यांना जनतेने निवडले ते कारागृहात तर ज्यांना निवडले नाही ते सरकारमध्ये आहे, असा आरोप बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला. तसेच लालूप्रसादांना टार्गेट करत बदनामीचे षड्यंत्र असल्याचेही म्हटले आहे. लालूंना कारावास झाला असला तरी काँग्रेस व राजदची युती कायम राहणार असल्याची बिहार काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष कादरी यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरसाठी परवानगी अनिवार्य

व्हीएस न्यूज - उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात येणार असून या निर्णयाचा परिणाम प्रशासनाची परवानगी न घेतलेल्या भोंग्यांवरच होईल. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा मंदिर, मशीद आणि गुरुद्वारांचा शोध घेतला जात आहे. हा निर्णय तुम्हा-आम्हाला सामना करावा लागतो त्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असून मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर धार्मिक स्थळांवर वाजवले जातात. पण हा प्रकार आता उत्तर प्रदेशात बंद होणार आहे. परवानगीशिवाय धार्मिक स्थळांवर भोंगे लावता येणार नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दिला आहे.

त्याचबरोबर उच्च न्यायालयाने हा नियम तोडणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश उत्तर प्रदेशच्या मुख्य गृहसचिवांनी दिले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात आता मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा या सर्व ठिकाणी परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वाजवता येणार नाही. लाऊडस्पीकर असे केल्यास जप्त केला जाईल, शिवाय कायदेशीर कारवाईचा सामनाही करावा लागेल.

१० जानेवारीपर्यंत नियम मोडणाऱ्या स्थळांची ओळख पटवण्याची मुदत देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात अनेकदा धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरमुळे वाद आणि दंगलीही झाल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करतानाही वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सपा नेते आझम खान यांनी या निर्णयानंतर भाजपवर निशाणा साधला आहे. नकारात्मक विचार सोडून भाजपने सकारात्मक विचार करणे गरजेचे असून जिथे सध्या लाऊडस्पीकर लावण्यात आलेले आहेत, तिथे परवानगी देण्यात यावी आणि यापुढे परवानगी अनिवार्य करावी’, अशी मागणी आझम खान यांनी केली आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!