Breaking News

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन |
V. S. News
सिंगापूरमध्येही धोनीची क्रिकेट अकादमी

व्हीएस न्यूज - सिंगापूरमध्ये नवी क्रिकेट अकादमी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी उघडणार असून २० जानेवारीला सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये या अकादमीचे ३६ वर्षीय धोनी उद्घाटन करणार आहे. त्याची परदेशात ही दुसरी अकादमी असेल. धोनी याबाबत बोलताना म्हणाला, खेळ हा कोणत्याही मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा असून तुम्हाला फिट राहण्याशिवाय जीवनात नेतृत्व तसेच अन्य पैलू शिकायचे असतील तर खेळ हे चांगले माध्यम आहे. मैदानावरचे खेळ प्रत्येक मुलाला खेळलेच पाहिजेत. धोनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिली ग्लोबल क्रिकेट अकादमी अल कोज दुबईमध्ये सुरु केली होती. यासाठी त्याने पॅसिफिक स्पोर्ट्स क्लब आणि आरका स्पोर्ट्स क्लबसोबत भागीदारी केली होती.

धोनी स्वत: सिंगापूर क्रिकेट अकादमीसाठी करीकुलम डिझाईन करणार आहे. त्याच्यासोबत सिंगापूर राष्ट्रीय महिला संघाची कर्णधार जीके दिव्या असणार आहे. सर्व वयोगटातील मुलांना अनुभवी प्रशिक्षकांसह ईस्ट कोस्ट रोडवरील सेंट पॅट्रिक स्कूलस्थित ही अकादमी प्रशिक्षण देणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली असून आतापर्यंत २०० मुलांनी आपली नावे नोंदवली आहेत.

...Read More

V. S. News
इराणमधील इंग्लिश शिकवण्यावर बंदी

व्हीएस न्यूज - इराणमधील प्राथमिक शाळांमध्ये इंग्लिश शिकवण्यावर बंदी घालण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र डॉनने दिले आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार कमी वयात इंग्लिश शिकल्याने मुले पाश्चिमात्य संस्कृतीकडे आकर्षित होतात, असे मत इस्लामिक नेत्यांनी व्यक्त केले आहे. प्राथमिक शाळांमध्ये इंग्लिश शिकण्याविरुद्ध इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर या बंदीबाबतची घोषणा इराणच्या वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी केली. इराणची प्रमुख भाषा पारसी असून वयाच्या सहाव्या वर्षापासून येथील मुलांचे प्राथमिक शिक्षणाचे वय सुरु होते. या देशात इंग्लिश अधिकतर माध्यमिक विभागांमध्ये शिकवले जाते. १२ ते १४ वर्षातील वयोगटाच्या मुलांचा या विभागात समावेश असतो. मात्र इराणमधील काही प्राथमिक शाळांमध्येही इंग्लिश शिकवली जाते.

...Read More

V. S. News
जिओच्या बंद होणार मोफत सेवा!

व्हीएस न्यूज : एकीकडे आपल्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओ नव-नवे प्लान्स लॉन्च करत आहे. तर, दुसरीकडे जिओने आपल्या प्राईम युजर्ससाठी एक वाईट बातमी दिली आहे. जिओची प्राईम मेंबरशिप ३१ मार्च २०१८ ला संपत आहे.

जिओ प्राईम मेंबरशिप २१ फेब्रवारी २०१७ रोजी मुकेश अंबानी यांनी लॉन्च केली होती. ३१ मार्च २०१७ ही मेंबरशिप घेण्याची शेवटची तारीख होती. कंपनीने त्यानंतर ही तारीख वाढवून १५ एप्रिल २०१७ केली होती. या प्राईम मेंबरशिपची वैधता १ वर्ष होती. जर तुम्ही १४ एप्रिल २०१७ रोजी मेंबरशिप घेतली असेल तर ३१ मार्च २०१८ रोजी तुमची मेंबरशिप संपेल. जिओ प्राईम मेंबरशिपसोबत ग्राहकांना जिओ अॅप्स म्हणजेच जिओ टीव्ही, जिओ म्युझिक, जिओ सिनेमासारख्या १०,००० रुपयांचे अॅप्स या सेवा मोफत मिळत होत्या. ग्राहकांनी यासाठी ९९ रुपये देत प्राईम मेंबरशिप घेतली होती. या मेंबरशिपसोबतच ग्राहकांना जिओचा एक बेस्ट प्लान खरेदी करावा लागला होता. अद्याप युजर्सला कंपनीकडून मेंबरशिप संपल्यावर काय करावे? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सूत्रांच्या मते, ही मेंबरशिप चालू ठेवण्यासाठी युजर्सला पुन्हा प्लान खरेदी करावा लागणार आहे. पण त्याचसोबत जिओ प्राईम मेंबरशिपची रक्कम कंपनी वाढवू शकते. जिओ प्राईम मेंबरशिपची अट होती की, ३१ मार्च २०१८ रोजी संपणार आहे. आता युजर्सने जेव्हा कधीही मेंबरशिप घेतली असेल तरी ती ३१ मार्च रोजीच संपेल. कंपनी या मेंबरशिपची वैधता ३१ मार्चनंतर वाढवू शकते. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच नव्या प्लानच्या किंमतीतही वाढ होऊ शकते. असे झाल्यास युजर्सला जास्त पैसे खर्च करण्यास तयार रहावे लागेल.

...Read More

V. S. News
अयोध्या प्रश्न सामंजस्याने सोडवा

व्हीएस न्यूज - अयोध्येला जागतिक शांतता शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी भेट दिली असून त्यांनी राम जन्मभूमी व बाबरी मशिद वाद सामंजस्याने सोडवण्यासाठी उपाय सुचविला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेला विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील जागतिक शांतता विद्यापिठाच्या ११ प्रतिनिधींनी भेट दिली. या शिष्टमंडळात नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू विजय भटकर, जागतिक शांतता विद्यापीठाचे प्रमुख विश्वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. एन. पठाण, ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र एंडे, माजी केंद्रीय मंत्री अरीफ मोहम्मद खान फिरोझ भक्त अहमद आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिराज कुरेशी यांचासमावेश होता. वर्षानुवर्षे सुरू असलेला हा वाद सामंजस्याने सोडवण्यावर या शिष्टमंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत भर देण्यात आला.श्रीराम ह्युमॅनिटी बिल्डिंग या वादग्रस्त जागी बांधण्याचा या शिष्टमंडळाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे या ठिकाणाहून जगाला विश्व शांती व मानवतेचा संदेश मिळेल, असे या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे.

...Read More

V. S. News
विश्व विवेक फाऊंडेशनच्या वतीने रविवारी रक्तदान शिबीराचे आयोजन

व्हीएस न्यूज - विश्व विवेक फाऊंडेशनच्या वतीने कै. अशोक नावंदर यांच्या 21 व्या स्मृती दिनानिमित्त रविवार दि. 7 जानेवारीला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती नगरसेवक व विश्व विवेक फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक बाबू नायर यांनी प्रसिध्दीस दिले आहे. रविवारी सकाळी 9 वाजता निगडी प्राधिकरण सेक्टर 27 येथील संत तुकाराम उद्यान येथे खासदार अमर साबळे यांच्या हस्ते आणि लोक लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराचे उद्‌घाटन होणार आहे. रक्तदात्यांनी या शिबीरास उपस्थित राहणाचे आवाहन नायर यांनी केले आहे.

...Read More

V. S. News
छत्रपतींच्या वंशजावर आली होती हिरा विकण्याची वेळ – श्याम जाजू

व्हीएस न्यूज - हिरा विकण्याची वेळ शिवाजीमहाराजांच्या वंशजावर म्हणजेच भोसल्यांवर आली होती. मुंबई गाठून त्यांनी हिऱ्याचा लिलावही सुरू केला. पण हे सर्वकाही माहेश्वरी समाजाच्या व्यापाऱ्याला बघवले नाही. लिलाव थांबवून त्याने भोसले कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत केली, असा दावा करत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी करत नव्या वादाला तोंड फोडले.

कलाग्राम येथे ‘महाराष्ट्र ट्रेड फेअर’चे महाराष्ट्र प्रदेश औरंगाबाद जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेतर्फे आयोजन करण्यात आले आहे. जाजू यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले त्या वेळी ते बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे,भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी हे वक्तव्य माहेश्वरी समाजाचे मोठेपण सांगताना केले. पण त्यांनी हिरा विकण्यासाठी गेलेला शिवाजी महाराजांचा ‘तो’ वारस कोण हे सांगितले नाही. त्यांनी फक्त ‘भोसले’ असाच उल्लेख केला.

कोणत्याही मातीत गेल्यावर तेथील समाजाशी एकरूप होऊन माहेश्वरी समाज व्यवसाय करतो. स्थानिकांच्या अस्मिताही जपतो. एकदा आपल्याकडील जुना अनमोल हिरा विकण्याची वेळ शिवाजी महाराजांच्या वंशजावर आली. हिरा विकण्यासाठी ते मुंबईच्या बाजारपेठेत आले. भोसले हिरा विकण्यासाठी स्वत: पुढे न जाता त्यांनी दुसऱ्याला पुढे केले. व्यापारी हिरा पाहून अचंबित झाले.

हिरा विक्रीसाठी ज्याने पुढे केला त्याला विचारले की, तुझ्यासोबत कोण आहे? त्यानंतर भोसले यांनी आपली ओळख दिली. हिऱ्याचा लिलाव काही वेळानंतर सुरू झाला. हिऱ्यासाठी ६२ लाख रुपयांपर्यंत बोली लागली होती. माहेश्वरी समाजाच्या एका व्यापाऱ्याने तेव्हा भोसले यांना बाजूला घेऊन तुम्हाला किती पैशांची गरज आहे, अशी विचारणा केली. भोसलेंनी ५० लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. लगेच त्या व्यापाऱ्याने ५० लाख रुपये काढून त्यांना दिले. त्या बदल्यात भोसलेंकडून धनादेश घेतला नाही की कागदावर लिहून घेतले नाही. त्यानंतर भोसले यांनी लिलाव रद्द केला.

...Read More

V. S. News
अस्तित्व टिकविण्यासाठी जिओने स्वस्त केले आपले प्लान

व्हीएस न्यूज - टेलिकॉम क्षेत्रातील चुरस रिलायंस जिओच्या आगमनानंतर अधिकच वाढली असून या क्षेत्रातील आपले अस्तित्त्व आणि ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी इतर टेलिकॉम कंपन्यांनी नवनव्या ऑफर्स आणल्या आहेत.

जिओने सुरूवातीला ‘हॅपी न्यू इयर’ प्लान अंतर्गत ग्राहकांना प्रतिदिन १ जीबी डाटा प्लान आणला होता. जिओ ग्राह्कांना आता अजून दोन ऑफरचा लाभ घेता येणार आहे. प्रतिदिन १ जीबी डाटा या प्लानची किंमत आता ६० रूपयांवरून ५० रूपये करण्यात आली आहे. १९९ ऐवजी आता २८जीबी डाटा चा प्लान १४९ रूपयात मिळणार आहे. या प्लानची व्हॅलिडीटी आता २८ दिवसांची आहे. ७०जीबी डाटा प्लानदेखील आता ३९९ ऐवजी ३४९ रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या प्लानची व्हॅलिडीटी ७० दिवसांची आहे.

आता ग्राहकांना जिओ ५० % अधिक डाटा उपलब्ध करून देणार आहे. तुमच्या प्रत्येक दिवसाच्या डेटा प्लानची लिमिट यामध्ये वाढवण्यात आली आहे. ग्राहकांना पूर्वी मिळत असलेल्या १ जीबी डाटा आता या प्लानमुळे ५० % अधिक डाटा मिळणार आहे. आता नव्या प्लाननुसार ग्राहकांना १.५ जीबी डाटा मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या नव्या प्लानचा फायदा ग्राहकांना ९ जानेवारीपासून घेता येणार आहे.

...Read More

V. S. News
रूफ टॉप पार्ट्याना विरोध करणाऱ्यांच्या रुफला ‘टॉप’ आहे का?

व्हीएस न्यूज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला कमला मिल दुर्घटनेनंतर रूफ टॉप पार्ट्याना विरोध करणाऱ्यांच्या रुफला ‘टॉप’ आहे का? असा उपरोधिक टोला लगावला आहे.

शिवसेनेचा कमला मिल दुर्घटनेनंतर अनधिकृत बांधकामांवर करण्यात येणाऱ्या कारवाईला पाठिंबा आहे. पण बांधकामाच्या अधिकृततेची खातरजमा कारवाईपूर्वी करावी, असे उद्धव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे कमला मिल दुर्घटना होण्याआधी कमला मिल परिसरात गेले होते, अशी चर्चा सुरू आहे. उद्धव यांनी यावर भाष्य करताना मंत्रालयाला आग लागली तेव्हा मुख्यमंत्री तिथे होते त्यामुळे आगीच्या दुर्घटनेला मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. प्रशासनाला दुर्घटनेला जबाबदार आरोपींचा शोध घेण्याकरता बक्षीस जाहीर करण्याची नामुष्की ओढावली आहे. यामुळे प्रशासनाची दुरावस्था समोर आल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे. तसेच दोषी आरोपी आहेत की दहशतवादी? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे.

...Read More

V. S. News
मुख्यमंत्र्यांचे कोरेगाव-भीमाप्रकरणातील दोषींवर कारवाईचे आश्वासन

व्हीएस न्यूज - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली असून त्यांनी आज (शनिवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

ज्यांचा हात या प्रकरणात असेल त्यांच्यावर जरुर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आठवलेंना दिले आहे. पण कुणालाही अटक करण्याआधी सगळे पुरावे गोळा करणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

...Read More

V. S. News
भारतात होतात रोज ३,६00 बालविवाह !

व्हीएस न्यूज राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने भारतात रोज होत असलेल्या सुमारे ३,६०० बालविवाहांची गंभीर नोंद घेत, राज्यांना ही सामाजिक कुप्रथा नष्ट करण्यासाठी अत्यंत कठोर धोरण अवलंबून २००६ च्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

बालविवाहावरील विभागीय परिषदेत आयोगाचे सरचिटणीस अंबुज शर्मा यांनी सांगितले की, १८ वर्षांखालील मुलांचे विवाह ही देशाची समस्या बनत असून राष्ट्रीय पातळीवर कृती योजना ते थांबविण्यासाठी तयार करणे या परिषदेचा हाहेतू आहे. संबंधित संस्थांपुढे कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करताना असलेली आव्हाने आणि बालविवाहांचा शोध लावणे व त्याची नोंद करण्यासाठी निकष तयार करण्यावरही चर्चा होईल. जगात होणा-या बालविवाहांपैकी ४० टक्के बालविवाह एकट्या भारतात होतात. ३,६०० असे विवाह रोज लागतात, असे नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरोच्या (एनसीआरबी) हवाल्याने आयोगाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. प्रत्यक्षात मोजक्याच बालविवाहांची नोंद होते.

...Read More

V. S. News
…तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील

व्हीएस न्यूज जो हिंसाचार भीमा कोरेगावमध्ये उसळला त्यामागे हिंदुत्त्ववादी संघटना होत्या असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी भोपाळमध्ये या प्रकरणातल्या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा झाली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील अशी टीका केली.

भाजपविरोधात एक लाठी रॅली मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये महात्मा फुले परिषदेतर्फे माजी खासदार सुखलाल कुशवाह यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आली होती. प्रकाश आंबेडकरांचीही त्या लाठी रॅलीला हजेरी होती. त्यांनी हे वक्तव्य यानंतर झालेल्या भाषणात केले आहे. समाजवादीचे नेते शरद यादव यांचीही या कार्यक्रमात उपस्थिती होती. या मंचावरून देशातील मागासवर्गीय, दलित बांधव आणि आदिवासींनी सरकारविरोधात एकत्र आले पाहिजे असेही आवाहन करण्यात आले.

पोलिसांनी महाराष्ट्र सरकारच्या इशाऱ्यावरूनच दोषींना सोडून पीडितांवर कारवाई केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर ही सगळी कारवाई होते आहे असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. महाराष्ट्र सरकारला भीमा कोरेगावच्या दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात केली. जर ही मागणी मान्य झाली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील हे विसरू नका असा इशाराही त्यांनी दिला.

...Read More

V. S. News
…अशी असेल नवीन १० रुपयांची नोट

व्हीएस न्यूज १० रुपयांची नवीन नोट भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) प्रसिद्ध केली असून ही नोट लवकरच चलनात आणली जाणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

चॉकलेट ब्राऊन म्हणजेच आत्ताच्या १० रुपयांच्या नोटांपेक्षा थोड्या गडद रंगाची १० रुपयांची नवी नोट आहे. ओडिशा येथील जगप्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिराचे चित्र या नोटांच्या मागील बाजूवर आहे. समोरील बाजूस महात्मा गांधीचे चित्र असणाऱ्या सिरीजमधीच ही नोट असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सरकारकडून मागील आठवड्यामध्ये नवीन नोटांच्या डिझाइनला होकार मिळाल्यानंतर आठवड्याभरात रिझर्व्ह बँकेने १०० कोटी रुपये किंमतीच्या नोटा छापल्या आहेत. याआधी २००५ साली १० रुपयांच्या नोटांच्या रचनेत बदल करण्यात आला होता. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये २०० रुपयांच्या आणि ५० रुपयांच्या नवीन नोटा आरबीआयने चलनात आणल्या होत्या. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांमध्ये आरबीआय पुन्हा या नव्या १० रुपयांच्या नोटा चलनात आणणार आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!